जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/229 प्रकरण दाखल तारीख - 16/09/2010 प्रकरण निकाल तारीख – 04/02/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या श्री.निलावतीबाई भ्र.तेजेराव श्रीरामे, वय वर्षे 55, धंदा घरकाम रा.गौळ, ता.कंधार जि.नांदेड. अर्जदार. विरुध् 1. भारतीय डाक विभाग, कार्यालय,शिवाजीनगर, गैरअर्जदार 2. भारतीय डाक विभाग, उप विभागीय कार्यालय,कंधार, जि.नांदेड. 3. भारतीय डाक विभाग, शाखा गौळ ता.कंधार. अर्जदारा तर्फे वकील - अड.उध्दव पौळ. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड. डि.जी.शिंदे. निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.एस.आर.देशमुख, सदस्या) अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, ग्रामीण डाक विमा योजने अंतर्गत विमा उतरवीला होता. ज्याचा विमापत्र क्र. MH-7-RP-24113-NMRF असा आहे. विमा उतरविलेली रक्कम रु.20,000/- असून तसा दि.05/02/1996 रोजी पोष्ट कार्यालयाने मान्य केला आहे. अर्जदाराने विमा हप्ता दरमहा रु.198 प्रमाणे भरले व त्याप्रमाणे पोष्ट खाता गौळ ता.कंधार येथे भरलेला आहे. अर्जदार योजना/ वर्ग/RP/10 असून कालावधी 10 वर्षाचा आहे व तक्ता डी- 5 असा आहे. सदर विम्याची मॅच्यूरिटी दि.04/02/2006 होती. अर्जदाराने मॅच्युरिटी झाल्यनंतर रक्क्म देण्यात येईल असे सांगीतले होते. अर्जदारास त्यांच्या वैद्यकिय उपचारासाठी पैशाची अत्यंत गरज होतीपरंतु गैरअर्जदाराने पैसे दिले नाही. वेळावेळी मागणी करुनही गैरअर्जदार यांनी मॅच्युरिटीची रक्कम दिली नाही व सेवेतील त्रुटी दिली. शेवटी अर्जदाराने दि.27/07/2010 रोजी वकीला मार्फत नोटीस गैरअर्जदारास पाठवीली. परंतु त्यानी कोणतेही उत्तर दिले नाही. शेवटी अर्जदाराने कंटाळून न्यायमंचात तक्रार दाखल करुन अशी मागणी केली की, गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना आदेश देण्यात यावेत की, त्यांनी अर्जदार यांस विमापत्र क्र. MH-7-RP-24113-NMRF योजना अंतर्गत रु.20,000/- व्याजासही देण्याचे आदेश व्हावेत. मानसिक व शारिरीक मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व दावा खर्चा पोटी रु.5,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकीला मार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी निवेदन दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदाराकडे पी.एल.आय. पॉलिसी काढली होती हे मान्य आहे. व त्याचा हप्ता रु. 198/- माहे होता. तो त्यांनी ऑगष्ट 2002 पर्यंत भरलेला होता फक्त मार्च 2002 चा हप्ता राहीलेला होता. गैरअर्जदार क्र. 3 यांनी कार्यालयात खूप भ्रष्टाचार केलेला होता. मे 1998 ते ऑगष्ट 2002 पर्यंतचे 51 हप्ते अर्जदार यांनी भरलेले होते. त्या हप्त्याची रक्कम रु.10,098/- चा गैरअर्जदार क्र 3 यांनी भ्रष्टाचार केला होता. व त्याबाबतची बोगस पावती अर्जदार यांना देण्यात आली होती. अर्जदाराची पॉलिसी लॅप्स झाल्यामुळे त्यांनी सप्टेंबर 2002 ते जानेवारी 2006 पर्यंतचे हप्ते भरलेले नाहीत. त्यामुळे जेवढी देय रक्कम होती तेवढी रक्कम औरंगाबाद कार्यालयाने मंजुर केली. त्यामुळे गैरअर्जदार यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी नसुन अर्जदारांची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र तपासल्यानंतर खालील मुद्ये स्पष्ट झाले. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार ही ग्राहक आहे काय? होय. 2. अर्जदार हीने केलेली मागणी पूर्ण करण्यास गैरअर्जदार जबाबदार आहेत काय? होय. 3. काय आदेश? अंतीम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 – अर्जदार ही मौजे गौळ ता.कंधार जि.नांदेड येथील राहणारी असून ग्रामीण डाक विभाग विमा योजने अंतर्गत तीने गैरअर्जदार यांचेकडे विमा उतरवलेला होता, ज्याचा विमा पत्र क्र.MH-7-RP-24113-NMFR असा आहे. सदरील पॉलिसीची रक्कम रु.2,000/- रुपये होती त्या पॉलिसीची सुरुवात दि.05/02/1996 रोजी झालेली असून विमा रक्कम मॅच्युरिटी दि.04/02/2006 रोजी होती या पॉलिसीमध्ये विमा हप्ता रक्कम रु.198/- प्रती महीना भरावयाची होती. सदरील रक्कम अर्जदार हीने दर महिना असे दहा वर्षे भरलेली होती व शेवटी जेंव्हा तीने पॉलिसीची मुदत संपल्यानंतर तीची हक्काची रक्कम मागीतली त्यावेळी गैरअर्जदार हयांनी ती दिली नाही. दि.01/06/2009 रोजी गैरअर्जदार यांचेकडे अर्ज करुनहही आजपर्यंत गैरअर्जदार यांनी तीची रक्कम अदा केली नाही. अर्जदार ही वृध्द स्त्री असून ती आजारी असते अशा वेळी जर तीच्या हक्काची रक्कम तीला मिळाली नाही तर तीने काढलेल्या विमा पॉलिसीच्या रक्कमेचा काय उपयोग झाला? तीने गैरअर्जदार यांचे सर्व हप्ते भरले होते. गैरअर्जदार यांनी हजर झाल्यानंतर त्यांचे लेखी म्हणणे मांडले व गैरअर्जदार क्र. 3 पोष्ट मास्तर व्ही.एम.नीलेवार यांनी त्यांनी त्याकाळात जी फ्रॉड केला. त्यामुळे अर्जदार हीची प्रमीयम रक्कम भरण्यात गेली नाही. सदरील फ्रॉड केलेली रक्कम त्यांचेकडून वसुल केली पण अर्जदाराचा क्लेम फॉर्म न मीळाल्यामुळे गैरअर्जदार यांनी सदरील रक्कम तीला दिली नाही हे म्हणणे तीतकेसे पटत नाही कारण जेंव्हा ती तीच्या मॅच्युरिटीच्या तारखेवर गैरअर्जदार यांचेकडे पोहचलेली होती त्या तारखेला तीला जर घडलेल्या प्रकरणाची माहीती देऊन तीचेकडन क्लेम फॉर्म सही/अंगठा घेऊन गैरअर्जदार सदरील रक्कम तीला देऊ शकले असते पण ते न दिल्यामुळे अर्जदार हीस ग्राहक मंचासमोर यावे लागले व या ठिकाणीच गैरअर्जदार यांची सेवेतील त्रुटी दिसुन येते. एकतर तीने वेळेवर प्रिमीअम भरुन सुध्दा केवळ गैरअर्जदार क्र. 3 त्यांनी केलेल्या फ्रॉडमुळे तीला हक्काच्या मिळणा-या रक्कमे पासुन वंचीत रहावे लागले त्यानंतर गैरअर्जदार क्र. 3 हयांनी फ्रॉड केलेली रक्कम त्यांचेकडुन वसुल केल्यानंतरही त्या वृध्देस मॅच्युरीटी रक्कम न देता उलटपक्षी तीचा क्लेम फॉर्म नाही म्हणुन तीचीच रक्कम दि.04/02/2011 ते आजपर्यंत म्हणणे पाच वर्षे ठेवून घेऊन ग्राहकाला त्रास दिला हे स्पष्टपणे सिध्द होते, म्हणुन दि.04/02/2006 ते 04/02/2011 पुर्ण पाच वर्षे रु.20,000/- वर 9 टक्के व्याजाने ती रक्कम होईल ती रक्कम एक महिन्यात द्यावी अस न केल्यास दि.04/02/2011 पर्यंतची रु.20,000/- रुपय वरील 9 टक्के व्याजाने जी रक्कम होईल त्या रक्कमेवर 10 टक्के व्याजाने रक्कम फीटेपर्यंत द्यावे लागेल. त्याच बरोबर दावा खर्च म्हणुन रु.1,000/- व मानसिक त्रासाबद्यल रु.1,000/- एक महिन्यात द्यावेत अन्यथा त्यावरही रक्कम फिटेपर्यंत 10 टक्के व्याज लागेल व्याजाची सर्व रक्कम गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे गैरअर्जदार क्र. 3 त्यांचेकडुन वसुल करु शकतात. आदेश. 1. अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. अर्जदारा हीस रु.20,000/- रुपयावर दि.04/02/2006 ते दि.04/02/2011 या कालावधीतील व्याज 9 टक्के दराने होणारी संपुर्ण रक्कम एक महिन्यात द्यावी असे न केल्यास संपुर्ण रक्कमेवर 10 टक्के दराने व्याज रक्कम फिटेपर्यंत द्यावे लागेल. 3. अर्जदारास हीस मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व कोर्ट खर्चापोटी रु.1,000/- एक महीन्यात दयावेत. अन्यथा रु.2,000/- रक्कमेवर देखील रक्कम फिटेपर्यंत 10 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. 4. उभय पक्षांना निर्णय कळवीण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडेपाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |