Maharashtra

Nashik

CC/150/2011

Vithal Vyanktesh Mandpagane - Complainant(s)

Versus

Indian insurance life pra. Ltd. - Opp.Party(s)

20 Oct 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/150/2011
 
1. Vithal Vyanktesh Mandpagane
Kapad bajar nashik
...........Complainant(s)
Versus
1. Indian insurance life pra. Ltd.
Shakuntala complex,Aurangabad naka Panchavti,nashik
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. R.S.Pailwan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.V.Dani MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

(मा. अध्‍यक्ष श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)

 

                      नि  का      त्र                             

               

अर्जदार यांना सामनेवाले क्र.1 ते 8 यांचेकडून रक्‍कम रु.19,10,600/- मिळावी, या रकमेवर पावत्‍यांची मुदत संपल्‍यापासून 15% दराने व्‍याज मिळावे, 

                                              तक्रार क्र.150/2011

मानसिक, शारिरीक व आर्थीक त्रासापोटी रु.50,000/- मिळावेत व अर्जाचा खर्चापोटी रु.5000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.

     सामनेवाला क्र.1 ते 6 हे याकामी गैरहजर राहिलेले आहेत. त्‍यामुळे त्‍यांचेविरुध्‍द दि.07/09/2011 रोजी एकतर्फा आदेश करण्‍यात आलेले आहेत व सामनेवाला क्र.7 व 8 यांनी योग्‍य त्‍या वेळेत म्‍हणणे दाखल केले नाही यामुळे सामनेवाला क्र.7 व 8 यांचेविरुध्‍द म्‍हणणे दाखल नाही असे आदेश दि.07/09/2011 रोजी करण्‍यात आलेले आहेत.

     अर्जदार यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः

 

मुद्देः

1.  अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय

2.  सामनेवाले क्र.1 ते 8 यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यात कमतरता केली आहे 

    काय?-होय.

3.  अर्जदार हे सामनेवाले क्र.1 ते 8 यांचेकडून व्‍याजासह रक्‍कम  वसूल होऊन

    मिळणेस पात्र आहेत काय?-- होय

4.  अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम 

    वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय ---होय

5.  अंतीम आदेश?  -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.1 ते 8 यांचेविरुध्‍द

    अंशतः मंजूर करणेत येत आहे.

 

विवेचनः

     अर्जदार यांनी याकामी पान क्र.32 लगत युक्‍तीवादाबाबत पुरसीस दाखल केलेली  आहे. सामनेवाला हे युक्‍तीवादाचे वेळी गैरहजर राहीलेले आहेत.  

अर्जदार यांनी याकामी पान क्र.6 इमु मॅनेजमेंटचे माहितीपत्रक, पान क्र.7 ते 14 लगत रक्‍कम भरल्‍याच्‍या पावत्‍या व पान क्र.15 ते 19 लगत चेक रिटर्न मेमो व परत आलेल्‍या चेक्‍सच्‍या झेरॉक्‍स इ. कागदपत्रांच्‍या झेरॉक्‍स प्रती हजर केलेल्‍या आहेत.  सामनेवाला यांनी ही कागदपत्रे स्‍पष्‍टपणे नाकारलेली नाहीत.  पान क्र.7 ते 19 लगतचे कागदपत्रांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 ते 8 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.

 

 

 

 

       

                                              तक्रार क्र.150/2011

अर्जदार यांनी याकामी पान क्र.6 लगत इमु मॅनेजमेंटचे माहितीपत्रक, पान क्र.7 ते 14 लगत रक्‍कम भरल्‍याच्‍या पावत्‍या व पान क्र.15 ते 19 लगत चेक रिटर्न मेमो व परत आलेल्‍या चेक्‍सची झेरॉक्‍स इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.  या

कागदपत्रांचा विचार होता.  अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे रक्‍कम गुंतवलेली होती व सामनेवाला यांनी अर्जदार यांना या रकमेपोटी चेकही दिलेले होते परंतु हे चेक न वटता परत आलेले आहेत. सामनेवाला यांनी अर्जदार यांना गुंतविलेली रक्‍कम व बोनस परत केलेला नाही ही बाब वरील सर्व पान क्र.7 ते 19 लगतचे कागदपत्रावरुन स्‍पष्‍ट होत आहे.  वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला क्र.1 ते 8 यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.

पान क्र.6 ते 19 लगतचे कागदपत्रांचा विचार होता अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे जी रक्‍कम गुंतवलेली होती त्‍या रकमेपोटी अर्जदार हे सामनेवाला क्र.1 ते 8 यांचेकडून वैयक्‍तीक व संयुक्‍ती‍क रित्‍या रक्‍कम रु.19,10,600/- इतकी रक्‍कम वसूल होवून मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

रक्‍कम रु.19,10,600/- इतकी मोठी अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून योग्‍य त्‍या वेळेत परत मिळालेली नाही यामुळे निश्चितपणे अर्जदार यांना आर्थीक नुकसान सहन करावे लागलेले आहे.  गुंतवलेल्‍या सर्व रकमा अर्जदार यांना दि.25/05/2010 या तारखेपासून दि.05/09/2010 या तारखेपर्यंत बोनससह परत मिळणार होत्‍या.  सामनेवाला यांनी अर्जदार यांना दि.24/12/2010 रोजी व त्‍यानंतर दि.10/01/2011 पर्यंत वेगवेगळया रकमेचे चेक्‍स दिलेले आहेत.  याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 ते 8 यांचेकडून वैयक्‍ती‍क व संयुक्‍तीक रित्‍या आर्थीक नुकसान भरपाई म्‍हणून मंजूर रक्‍कम रु.19,10,600/- या रकमवेर दि.11/01/2011 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्‍याज मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाले यांचेकडून रक्‍कम वसूल होऊन मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवाले यांचेविरुध्‍द या मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे व त्‍याकरीता तक्रार अर्ज दाखल करावा लागलेला आहे. या कारणामुळे निश्चितपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्‍याकरीता खर्चही करावा लागलेला आहे.  वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार  हे  सामनेवाले क्र.1 ते 8 यांचेकडून वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्‍कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

                                              तक्रार क्र.150/2011

अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, युक्‍तीवादाबाबतची पुरसीस आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.

                          आ दे श

1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.1 ते 8 यांचेविरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

2) आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाले क्र.1 ते 8 यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍ती‍करित्‍या अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रक्‍कम द्यावी.

(अ) रक्‍कम रु.19,10,600/- दयावेत. व या मंजूर रकमेवर दि.11/01/2011 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्‍याज द्यावे.

3) अर्जदार यांना एकत्रीतरित्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.15,000/-दयावेत.

4) अर्जदार यांना एकत्रीतरित्‍या अर्जाचे खर्चापोटी  रु. 1000/- दयावेत.

 

 

 
 
[HON'ABLE MR. R.S.Pailwan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.V.Dani]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.