Maharashtra

Nashik

CC/21/2012

Ashok Shankar Pawar - Complainant(s)

Versus

Indian Emu Life Pvt. Ltd. - Opp.Party(s)

Kashva Shelke

31 Mar 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/21/2012
 
1. Ashok Shankar Pawar
Lasalgoan tal.Nifada
Nashik
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Indian Emu Life Pvt. Ltd.
Regi.Office I St,Floar Shakuntala Complex Ayragabad Naka Panchavat,Nashik
Nashik
Maharashtra
2. Shri Harish Jayprakash Dixit,
Flate No-2 Jayhari Aparment,Om nagar Hirawadi Road Panchawati-3
Nashik
Maharashtra
3. Shri Jauprakash Waman Dixit,
Flat No-2 Jayhari Aparment,Om Nagar Hirawadi Road,Panchawati,Nashik3
Nashik
Maharashtra
4. Indian Emu life Pvt.Ltd.
Shop No-G-28-Drem Mall,Near Railway Station Bhandup.[W]Mumbai-400078
Mumbai
Maharashtra
5. Su. Manda Waman Dixit
Flat No-2 Jayhari Aparment,Om Nagar Hirawadi Road,Panchawati,Nashik3
Nashik
Maharashtra
6. Su. Monali Harish Disxit
Flat No-2 Jayhari Aparment,Om Nagar Hirawadi Road,Panchawati,Nashik3
Nashik
Maharshtra
7. Shri Shivagi BaBuraw Sherekar
Dhangarlane Lasalgona Tal.Nifad
Nashik
Maharashtra
8. Sau.Lilabae Shivagi Sherekar,
Dhangarlane Lashalgona Tal.Nifad
Nashik
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. R.S.Pailwan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.V.Dani MEMBER
 
PRESENT:Kashva Shelke, Advocate for the Complainant 1
 
ORDER

(मा.सदस्‍या अँड.सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)

 

                      नि  का      त्र                             

अर्जदार यांना सामनेवाले क्र.1 ते 8 यांचेकडून रक्‍कम रु.2,57,338/- मिळावी, या रकमेवर पावत्‍यांची मुदत संपल्‍यापासून 15% दराने व्‍याज मिळावे, मानसिक, शारिरीक व आर्थीक त्रासापोटी नुकसान रक्‍कम रु.50,000/-मिळावेत  व अर्जाचा खर्च रक्‍कम रु.5000/- मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.

     सामनेवाला क्र.1 ते 8 हे याकामी गैरहजर राहिलेले आहेत. त्यामुळे त्‍यांचेविरुध्‍द दि.22/03/2012 रोजी एकतर्फा आदेश करण्‍यात आलेले आहेत.

     अर्जदार यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः

मुद्देः

1.  अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय

2.  सामनेवाले क्र.1 ते 8 यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यात कमतरता केली    

          आहे काय?-होय.

3.  अर्जदार हे सामनेवाले क्र. 1 ते 8 यांचेकडून रक्‍कम व्‍याजासह वसूल होऊन

    मिळणेस पात्र आहेत काय?-- होय

4.  अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी

           रक्‍कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय? ---होय

5.  अंतीम आदेश?  -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र. 1 ते 8

          यांचेविरुध्‍द अंशतः मंजूर करणेत येत आहे.

विवेचनः

     अर्जदार यांनी पान क्र.11 लगत युक्‍तीवादाबाबत पुरसीस दाखल केलेली  आहे.  

अर्जदार यांनी याकामी पान क्र.6 ते पान क्र.8 लगत रक्‍कम भरल्‍याच्‍या व बोनससह मिळणा-या रकमेच्‍या पावत्‍या हजर केलेल्‍या आहेत. तसेच पान क्र.9 लगत धनादेशाची झेरॉक्‍स प्रत हजर केलेली आहे. सामनेवाला यांनी ही कागदपत्रे म्‍हणणे दाखल करुन स्‍पष्‍टपणे नाकारलेली नाहीत. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 ते 8 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.

याकामी अर्जदार यांनी पान क्र.6 ते पान क्र.9 लगत हजर केलेल्‍या कागदपत्रांचा विचार होता अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे रक्‍कमा गुंतवलेल्‍या होत्‍या.  सामनेवाला यांनी अर्जदार यांना गुंतविलेल्‍या रक्‍कमा व बोनस परत केलेल्‍या नाहीत ही बाब वरील सर्व कागदपत्रांवरुन स्‍पष्‍ट होत आहे.  वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला क्र.1 ते 8 यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.

पान क्र.6 ते 9 लगतच्‍या पावत्‍यांचा विचार होता अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे जी रक्‍कम गुंतवलेली होती त्‍या रकमेपोटी अर्जदार हे सामनेवाला क्र.1 ते 8 यांचेकडून वैयक्‍तीक व संयुक्‍ती‍क रित्‍या रक्‍कम रु.2,57,338/- इतकी रक्‍कम वसूल होवून मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

रक्‍कम रु.2,57,338/- इतकी मोठी अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून योग्‍य त्‍या वेळेत परत मिळालेली नाही यामुळे निश्चितपणे अर्जदार यांना आर्थीक नुकसान सहन करावे लागलेले आहे.  गुंतवलेल्‍या सर्व रक्‍कमा अर्जदार यांना दि.28/11/2010 पासून दि.04/03/2011 या तारखेपर्यंत बोनससह परत मिळणार होत्‍या.  याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 ते 8 यांचेकडून वैयक्‍ती‍क व संयुक्‍तीक रित्‍या आर्थीक नुकसान भरपाई म्‍हणून मंजूर रक्‍कम रु.2,57,338/- या रकमवेर दि.05/03/2011 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्‍याज मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाले यांचेकडून रक्‍कम वसूल होऊन मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवाले यांचेविरुध्‍द या मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे व त्‍याकरीता तक्रार अर्ज दाखल करावा लागलेला आहे. या कारणामुळे निश्चितपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्‍याकरीता खर्चही करावा लागलेला आहे.  वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार  हे  सामनेवाले क्र.1 ते 8 यांचेकडून वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्‍कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, युक्‍तीवादाबाबतची पुरसीस आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेः

                       आ दे श

 

1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 ते 8 यांचेविरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

2) आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवालस क्र.1 ते 8 यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍ती‍करित्‍या अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रक्‍कम द्यावी.(अ) रक्‍कम रु.2,57,338/- दयावेत. व या मंजूर रकमेवर दि.05/03/2011 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्‍याज द्यावे.

3) अर्जदार यांना एकत्रीतरित्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/-दयावेत.

4) अर्जदार यांना एकत्रीतरित्‍या अर्जाचे खर्चापोटी  रु.1000/- दयावेत.

 

 

 

 
 
[HON'ABLE MR. R.S.Pailwan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.V.Dani]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.