Maharashtra

Nashik

CC/281/2011

Samir Chabulal Aagharkar - Complainant(s)

Versus

Indian Emu Life Ltd. - Opp.Party(s)

Keshav Shelake

30 Mar 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/281/2011
 
1. Samir Chabulal Aagharkar
Vrindavan Hights,Flat.No.4] Gen.Vaidhya Ngr] Near Ganpati Temple, Dwarka Nashik
Nashik
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Indian Emu Life Ltd.
Regd.Off. 1st. Floor, Shakuntala Complex, Aurangabad Naka Panchavati, Nashik
Nashik
Maharashtra
2. Indian emu Life Pvt.Ltd.
Shop No.G-28, Dream Mall Near Railway Station, Bhandup (w), Mumbai-400078.
Mumbai
Maharashtra
3. Harish Jayprakash Dixit,
Flat No.2 Jayhari Apt. Om Ngr, Hirawadi Rd. Panchavati, Nashik
Nashik
Maharashtra
4. Jayprakash waman Dixit
Flat No. 2, jayhari Apt. Om Ngr. Hirawadi Rd, Panchavati, Nashik.
Nashik
Maharashtra
5. Sau.Manda Waman Dixit
Flat No. 2, Jayhari Apt, Om Ngr. Hirawadi Rd. Panchavati, Nashik
Nashik
Maharashtra
6. Sau. Monali Harish Dixit
Flat No. 2 Jayhari Apt. Om Ngr, Hirawadi Rd. Panchavati, Nashik
Nashik
Maharashtra
7. Deepak v. Pawar,
Opp. Bharat Product, Khaire Galli, Tivandha Lane, Nashik
Nashik
Maharashtra
8. Smt. Deepali Karangkar.
Vijay Ngr. Near NMC Garden,hirawadi Panchavati, Nashik
Nashik
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. R.S.Pailwan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.V.Dani MEMBER
 
PRESENT:
Shri Keshav Shelke, Advocate
......for the Complainant
 
ORDER

ग्राहक तक्रार अर्ज क्र.281/2011

ग्राहक तक्रार अर्ज दाखल दि.26/12/2011    

अंतीम आदेश दि.30/03/2012

 

नाशिक जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नाशिक

 

श्री.समीर छबुलाल आघारकर                            तक्रारदार

रा.वृंदावन हाईटस,फ्लॅट नं.4,                        (अँड.के.एस.शेळके)                        

जनरल वैद्य नगर, गणपती मंदिराशेजारी,

द्वारका, नाशिक.

 

      विरुध्‍द                                     

           

1. इंडियन इमु लाईफ प्रा.लि

  रजि.ऑफीस, 1 ला मजला,

  शकुंतला कॉम्‍प्‍लेक्‍स,          

  औरंगाबाद नाका, पंचवटी, नाशिक.                     

2. इंडियन इमु लाईफ प्रा.लि.

   शॉप नं.जी-28, ड्रीम मॉल,

   रेल्‍वे स्‍टेशनजवळ, भांडुप(पश्चिम)

   मुंबई-400078,

3. श्री.हरीष जयप्रकाश दिक्षीत,

4. श्री.जयप्रकाश वामन दिक्षीत,                         सामनेवाला

5. सौ.मंदा वामन दिक्षीत,                          (नं.1 ते 8 एकतर्फा)

6. सौ.मोनाली हरीष दिक्षीत,

   नं.1 ते 5 रा.फ्लॅट नं.2,

   जयहरी अपार्टमेंट,

   ओम नगर, हिरावाडी रोड,पंचवटी,

   नाशिक-3.

7. श्री.दिपक व्‍ही.पवार,                                      

  रा.भारत प्रॉडक्‍ट समोर,                       

  खैरे गल्‍ली, तिवंधा लेन, नाशिक.

8. श्रीमती दिपाली करंजकर,

  रा.विजयनगर, महानगरपालिकेच्‍या गार्डन शेजारी,

                                                                   तक्रार क्र.281/2011

हिरावाडी, पंचवटी, नाशिक.

           (मा.सदस्‍या अँड.सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)

 

                      नि  का      त्र      

                       

अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून रक्‍कम रु.9,00,000/- मिळावी, या रकमेवर पावत्‍यांची मुदत संपल्‍यापासून 15% दराने व्‍याज मिळावे, पावतीचे रु.25,000/- मिळावेत, मानसिक, शारिरीक व आर्थीक त्रासापोटी रु.1,00,000/- मिळावेत व अर्जाचे खर्च रु.5000/- मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.

     सामनेवाला क्र.8 यांनी पान क्र.28 लगत लेखी म्‍हणणे व पान क्र.30 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.7 यांनी केस क्र.276/11 मध्‍ये दाखल केलेला जबाब हा या केसमध्‍ये वाचण्‍याबाबतची पुरसीस पान क्र.27 लगत दाखल केलेली आहे.  सामनेवाला क्र.1 ते 6 हे याकामी गैरहजर राहिलेले आहेत. त्यामुळे त्‍यांचेविरुध्‍द दि.01/03/2012 रोजी एकतर्फा आदेश करण्‍यात आलेले आहेत.

     अर्जदार यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः

 

मुद्देः

 

1.  अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय

2.  सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यात कमतरता केली आहे काय?-

    होय. सामनेवाला क्र.1 ते 6 यांनी सेवा देण्‍यात कमतरता केलेली आहे.

3.  अर्जदार हे सामनेवाला क्र.1 ते 6 यांचेकडून रक्‍कम व्‍याजासह वसूल होऊन

    मिळणेस पात्र आहेत काय?—होय.

4.  अर्जदार हे सामनेवाला क्र.1 ते 6 यांचेकडून मानसिक  त्रासापोटी व अर्जाचे

    खर्चापोटी   रक्‍कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय? ---होय.

5.  अंतीम आदेश?  -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.1 ते 6  

    यांचेविरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे व सामनेवाला क्र.7 व 8

    विरुध्‍द तक्रार अर्ज नामंजूर करण्‍यात येत आहे.

 

 

 

                                               तक्रार क्र.281/2011

विवेचनः

अर्जदार यांनी याकामी पान क्र.25 लगत युक्‍तीवादाबाबत पुरसीस दाखल केलेली  आहे.

सामनेवाला क्र.7 यांनी केस क्र.276/11 मध्‍ये दाखल केलेले म्‍हणणे वाचण्‍याबाबतची पुरसीस पान क्र.27 लगत दाखल केलेली आहे. ग्राहक तक्रार क्र.276/2011 मध्‍ये सामनेवाला नं.7 हे सामनेवाला इमु कंपनीत नोकरी करीत असल्‍यामुळे त्‍यांचेविरुध्‍दची तक्रार रद्द करण्‍याबाबत आदेश करण्‍यात आलेले आहेत. त्यामुळे या तक्रारीतही सामनेवाला नं.7 विरुध्‍द तक्रार रद्द करण्‍याबाबतचे आदेश करणे उचित होईल असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाला क्र.8 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे व प्रतिज्ञापत्रामध्‍ये सामनेवाला कंपनीच्‍या ऑफीसमध्‍ये नोकरी करीत होते त्‍यामुळे अर्जदार यांची कोणतीही रक्‍कम देण्‍याची जबाबदारी येत नाही. असे म्‍हटलेले आहे. सामनेवाला नं.8 हे नोकरीस असल्‍यामुळे त्‍यांचेवर अर्जदार यांची कोणतीही रक्‍कम देण्‍याची जबाबदारी येत नाही. त्‍यामुळे त्‍यांचेविरुध्‍दची तक्रार रद्द करणे उचित होईल असे या मंचाचे मत आहे.

याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्‍ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे.

1(2007) सि.पी.जे. राष्‍ट्रीय आयोग.  पान 55.  रणजितसिंग विरुध्‍द  हॉफलँड शेअर शॉपी लि. आणि इतर

अर्जदार यांनी या कामी पान क्र.7 व पान क्र.8 लगत रक्‍कम भरल्‍याची पावती व पान क्र.9 लगत सामनेवाला यांनी बोनससह मिळणा-या रकमेची मुदतीची पावती हजर केलेली आहे. सामनेवाला यांनी ही कागदपत्रे म्‍हणणे दाखल करुन स्‍पष्‍टपणे नाकारलेली नाहीत.  वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 ते 6 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.

अर्जदार यांनी पान क्र.7 ते पान क्र.9 लगत हजर केलेल्‍या कागदपत्रांचा विचार होता अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे रक्‍कम गुंतवलेली होती.  सामनेवाला यांनी अर्जदार यांना गुंतविलेली रक्‍कम व बोनस परत केलेला नाही ही बाब वरील सर्व कागदपत्रांवरुन स्‍पष्‍ट होत आहे.  वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला क्र.1 ते 6 यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.

 

 

 

                                          तक्रार क्र.281/2011

पान क्र.7 ते पान क्र.9 लगतच्‍या पावत्‍यांचा विचार होता अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे जी रक्‍कम गुंतवलेली होती त्‍या रकमेपोटी अर्जदार हे सामनेवाला क्र.1 ते 6 यांचेकडून वैयक्‍तीक व संयुक्‍ती‍क रित्‍या रक्‍कम रु.9,00,000/- इतकी रक्‍कम वसूल होवून मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

रक्‍कम रु.9,00,000/- इतकी मोठी अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून योग्‍य त्‍या वेळेत परत मिळालेली नाही यामुळे निश्चितपणे अर्जदार यांना आर्थीक नुकसान सहन करावे लागलेले आहे.  गुंतवलेली सर्व रक्‍कम अर्जदार यांना दि.21/01/2011 या तारखेपर्यंत बोनससह परत मिळणार होती.  याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 ते 6 यांचेकडून वैयक्‍ती‍क व संयुक्‍तीक रित्‍या आर्थीक नुकसान भरपाई म्‍हणून मंजूर रक्‍कम रु.9,00,000/- या रकमवेर दि.22/01/2011 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्‍याज मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाले यांचेकडून रक्‍कम वसूल होऊन मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवाले यांचेविरुध्‍द या मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे व त्‍याकरीता तक्रार अर्ज दाखल करावा लागलेला आहे. या कारणामुळे निश्चितपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्‍याकरीता खर्चही करावा लागलेला आहे.  वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार  हे  सामनेवाले क्र.1 ते 6 यांचेकडून वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्‍कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, युक्‍तीवादाबाबतची पुरसीस, तसेच मंचाचे वतीने आधार घेतलेले व वर उल्‍लेख केलेले वरीष्‍ठ कोर्टाचे निकालपत्र आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेः

 

                          आ दे श

 

1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.7 व 8 विरुध्‍द नामंजूर करण्‍यात येत आहे.

 

 

                                               तक्रार क्र.281/2011

2) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.1 ते 6 यांचेविरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

3) आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाले क्र.1 ते 6 यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍ती‍करित्‍या अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रक्‍कम द्यावी.

 (अ) रक्‍कम रु.9,00,000/-दयावेत. व या मंजूर रकमेवर दि.22/01/2011

    पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्‍याज द्यावे.

4) अर्जदार यांना एकत्रीतरित्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.15,000/-दयावेत.

5) अर्जदार यांना एकत्रीतरित्‍या अर्जाचे खर्चापोटी  रु.1000/- दयावेत.

 

 

 

 

 

              (आर.एस. पैलवान)              (अँड.सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी)     

              अध्‍यक्ष                                               सदस्‍या                  

ठिकाणः- नाशिक.

दिनांकः-30/03/2012

 

 

 

 

 

 

 

 

 
 
[HON'ABLE MR. R.S.Pailwan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.V.Dani]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.