निकालपत्र :- (दि.21.12.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) आजरोजी तकारदार व त्यांच्या वकिलांना पुकारले असता ते गैरहजर आहेत. मागील तारखेसही तक्रारदार व त्यांचे वकिल गैरहजर होते. आजरोजी सामनेवाला बँकेचे वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार क्र.1 यांनी सामनेवाला बँकेकडून सप्टेंबर 2009 मध्ये रुपये 1,50,000/- इतक्या शैक्षणिक कर्जाची मागणी केली. त्यावेळेस सामनेवाला बँकेने घराचे तारण देण्याची जबरदस्ती केली तसेच पगारदार व आर्थिक संपन्न असा जामिनदार आणण्यास सांगितले. सदरचे कर्ज वितरण करण्यास चार ते पाच महिने घेतले. तसेच, गरज नसतानाही घर तारणाची कागदपत्र शैक्षणिक कर्जास मागणी केली ही सामनेवाला बँकेच्या सेवेतील त्रुटी आहे. सबब, मानसिक त्रासापोटी रुपये 1,50,000/-, अपमानास्पद वागणुक-पाणउतारा याकरिता रुपये 1,00,000/-, शारिरीक त्रासापोटी रुपये 1,50,000/-, व्यवसायाचे आर्थिक नुकसान रुपये 60,000/-, बँकेने करावयास लावलेला खर्च रुपये 13,000/-, बँकेकडे माराव्या लागलेल्या फे-यां व फोनपोटी रुपये 10,000/- देणेबाबत सामनेवाला यांना आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत खाते पासबुक, शैक्षणिक कर्ज माहिती, इंडियन बॅक्स असोसिएशनची माहिती इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला बँकेने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांना रुपये 1,50,000/- इतके शैक्षणिक कर्ज मंजूर केले आहे. सदर कर्ज मंजूर करीत असताना नियमानुसार कागदपत्रे घेतलेली आहेत. सामनेवाला बँकेच सेवेत त्रुटी नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व सामनेवाला बँकेची बदमानी केली म्हणून रुपये 1 लाख व सामनेवाला बँकेस नाहक आर्थिक पेचात टाकलेबाबत प्रत्येकी रुपये 10,000/- देणेबाबत तक्रारदारांना आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला बँकेने त्यांच्या म्हणण्यासोबत शैक्षणिक कर्जाचे मंजुरी तिकीट, तक्रारदारांचा शैक्षणिक कर्जाचा अर्ज, सामनेवाला यांचे दि.30.07.10 चे राजारामबापू बँकेस पत्र, डी.वाय.पाटील कॉलेजने तक्रारदारांना दिलेले एस्टीमेट, तक्रारदारांनी शैक्षणिक कर्जासाठी व रिपेमेंटसाठी दिलेले डिक्लेरेशन, तक्रारदारांनी कर्ज रिलीज करणेबाबत दिलेले पत्र, डी.वाय.पाटील यांनी दिलेली रिसीट इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (6) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले आहे. सामनेवाला बँकेने तक्रारदार क्र.1 यांना शैक्षणिक कर्ज मंजूर केले आहे. त्यासाठी सामनेवाला बँकेने सदर कर्जास तारण म्हणून स्थावर मिळकत घेणे, त्यास चांगला जामीनदार घेणेयाबाबत केलेली प्रक्रिया हा सामनेवाला बँकेचा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामध्ये या मंचास हस्तक्षेप करता येणार नाही. तसेच, तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार ही संदिग्ध स्वरुपाची असल्याचे दिसून येते. तसेच, तक्रारदारांच्या तक्रारीत कोणतीही गुणवत्ता नसल्याचे या मंचास दिसून येते. सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. सदरचा आदेश ओपन कोर्टात अधिघोषित करणेत आला.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |