Maharashtra

Beed

CC/11/35

Ramdas Dhondiba Phad - Complainant(s)

Versus

India Oil Corporation - Opp.Party(s)

30 Nov 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/11/35
 
1. Ramdas Dhondiba Phad
Near TPS Parali Vaijanath
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. India Oil Corporation
2406 West Street Cant Pune
Pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. P. B. Bhat PRESIDENT
 HON'ABLE MR. A P Bhosrekar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक 35/2011        तक्रार दाखल तारीख –04/02/2011
                                  निकाल तारीख     – 30/11/2011    
रामदास पि.धोंडीबा फड
वय 46 वर्षे,धंदा नौकरी                                          .तक्रारदार
रा.मेस्‍को ऑ‍फीस जुने टि.पी.एस.शेजारी
परळी (वैञ) ता.परळी(वै) जि.बीड
                            विरुध्‍द
1.     सेल्‍स मॅनेजर, क्रिर्तीका अरुनन,
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.
ऑफीस नं.4 व 5, आदिती कॉमर्स,
सेंटर, पाचवा मजला,2406, पूर्व स्‍ट्रीट कॅन्‍ट,पूणे              ..सामनेवाला
2.    ए.व्‍ही.के.के.गॅस एजन्‍सी
इन्‍डेन गॅस डिस्‍ट्रीब्‍यूटर्स परळी (वै.)
टी.पी.एस.कॉलनी,परळी (वै.) ता.परळी (वै.) जि.बीड.      
              को र म - पी.बी.भट, अध्‍यक्ष
                         अजय भोसरेकर, सदस्‍य.
             तक्रारदारातर्फे                :- अँड.एन.पी.गंडले
             सामनेवाले क्र. 1 तर्फे         :- अँड.राजेश देशपांडे
             सामनेवाले क्र.2 तर्फे           ः-अँड.एम.के.पोकळे
                            निकालपत्र
            तक्रारदार यांनी प्रस्‍तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्‍द दाखल केली आहे.
            तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 व 2 चे ग्राहक  आहेत, त्‍यांचा ग्राहक नंबर 124859 आहे. मागील पाच वर्षापासून तक्रारदार सदरचा गॅसचा घरगुती वापर करीत आहेत. तक्रार ही औष्णिक विद्यूत केंद्र कर्मचारी प्रा.स. ग्राहक भांडार मर्यादित इन्‍डेन वितरक टि.पी.एस. कॉलनी शक्‍तीकूंज येथून गॅस घेऊन त्‍यांचा उपभोग घेत आहेत. त्‍यांचा कार्ड नंबर 001642 आहे.
            तक्रारदार हे औष्णिक विद्यूत केंद्रामध्‍ये सुरक्षा रक्षक म्‍हणून नौकरी करीत आहेत. त्‍यांना इंडेन गॅस हा सुध्‍दा टि.पी.एस. कॉलनीमध्‍ये असलेल्‍या सामनेवाला क्र.2च्‍या कार्यालयातून गॅसचा पुरवठा होत आहे.
            दि.08.06.2010 रोजी सामनेवाला क्र.2 यांनी पूणे येथून सामनेवाला क्र.1 यांना पत्र पाठवून असे कळविले की, जे ग्राहक टि.पी.एस. च्‍या बाहेर राहतात त्‍यांचे कनेक्‍शन बंद करण्‍यात यावे. या बाबतची माहीती सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास कळविली.
            तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 यांना विनंती अर्ज पाठवून ते बाहेर ठिकाणाचे असल्‍याने त्‍यांचे कनेक्‍शन बंद करु नये अशी विनंती केली. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदाराचे काही एक ऐकूण घेतले नाही. गॅस कनेक्‍शन बंद केलेले आहे. कनेक्‍शन बंद करण्‍यापूर्वी कोणत्‍याही प्रकारची नोटीस तक्रारदारांना दिलेली नाही. त्‍यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केलेला आहे व गॅस कनेक्‍शन बंद झाल्‍याने तक्रारदारांना मानसिक त्रास झालेला आहे.तक्रारदार हे माझी सैनिक असून ते टि.पी.एस. मध्‍ये सुरक्षा रक्षक या पदावर काम करीत आहेत. सदरची अडचण तक्रारदारांनी जिल्‍हा सैनिक कार्यालयाला सांगितली. त्‍यांनी सामनेवाला क्र.1 ला दि.29.08.2010 रोजी गॅस पुरवठा पूर्ववत करण्‍याची विनंती केली. त्‍यांचा काहीही परिणाम झाला नाही. झालेल्‍या मानसिक त्रासाची नूकसान भरपाई रक्‍कम रु.25,000/- तक्रारदारांना सामनेवालाकडून देण्‍यात यावी.
            विनंती की, तक्रारदाराचा गॅस पूरवठा पूर्ववत करण्‍या बाबत सामनेवाला क्र.1 व 2 यांना आदेश करावेत. मानसिक त्रासापोटी रु.25,000/-, तक्रारीचा खर्च रु.500/- सामनेवालाकडून मिळण्‍याबाबत आदेश व्‍हावेत.
            सामनेवाला क्र.1 यांनी  त्‍यांचा खुलासा व शपथपत्र दि.07.06.2011 रोजी दाखल केला. त्‍यात तक्रारीतील त्‍यांचे विरुध्‍दचे आक्षेप त्‍यांनी नाकारलेले आहेत. कंपनीच्‍या नियम व अटीनुसार ग्राहकास गॅस पुरवठा करण्‍यात येतो. तक्रारदार हे सामनेवाला क्र.2च्‍या क्षेत्राबाहेर राहत असल्‍याने त्‍यांचा गॅस पुरवठा बंद करण्‍यात आलेला आहे. यात सामनेवाला यांची कोणतीही चूक नाही अथवा सेवेत त्रूटी नाही. करारानुसार सदरची कार्यवाही करण्‍यात आलेली आहे. अर्ज खर्चासह रदद करण्‍यात यावा.
            सामनेवाला क्र.2 ने त्‍यांचा खुलासा दि.13.04.2011 रोजी दाखल केला आहे. तक्रारीत त्‍यांचे विरुध्‍दची सर्व आक्षेप त्‍यांनी नाकारलेले आहेत.
            इंडियन ऑईल कार्पोरेशन या कंपनीची इंडेन लिक्‍वीड पेट्रोलियम गॅस डिस्‍ट्रीब्‍युटरशिप कंपनी व सामनेवाला क्र.2 यांचे दि.11.12.1995 रोजी घरगूती गॅस वितरणाकरिता वितरक म्‍हणून नेमण्‍याचा करार झालेला आहे. सदर करारात अनूक्रमांक क्र.1 मध्‍ये सामनेवाला क्र.2 यांचे गॅस वितरणाचे कार्यक्षेत्र उर्जा   नगर एस.एस.ई.बी. टाऊनशिप उर्जा नगर असे ठरवलेले आहे. सदर करारामध्‍ये असाही उल्‍लेख केलेला आहे की, सदर उर्जा नगर मधील कर्मचा-यांना गॅस वितरण करता येईल. परळी औष्णिक केंद्राचे बाहेर वास्‍तव्‍य करणा-या व परळी औष्‍णीक केंद्राच्‍या कर्मचा-याव्‍यतिरिक्‍त इतर लोकांना गॅस वितरण जोडणी देता येणार नाही.
            सन 2005 मध्‍ये तक्रारदारांना सामनेवालाकडून गॅस जोडणी दिलेले आहे. परंतु सन 2005 साली तक्रारदार हा औष्‍णीक केंद्राचा कर्मचारी नव्‍हता.परळी औष्‍णीक केंद्राने खाजगी कंत्राटदारास सुरक्षा प्रदान करणे संदर्भात करार केलेला होता.तक्रारदार हा खाजगी कंत्राटदांराचा कर्मचारी आहे. तसेच त्‍यांना सन 2005 साली कार्यरत असलेल्‍या ग्राहक भंडार तत्‍कालीन संचालकांना तक्रारदाराची अडचण लक्षात घेऊन तक्रारदारास भविष्‍यात सामनेवाला क्र.1 यांचेकडून तक्रार आल्‍यास सदर गॅस जोडणी तात्‍काळ बंद करण्‍यात येईल अशी सुचना देण्‍यात आली होती. सामनेवाला क्र.2 चे सर्व अटी व शर्ती तक्रारदाराने मान्‍य करुन गॅस जोडणी दिलेली होती. त्‍यानंतर सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांना दि.8.6.2010 रोजीच्‍या पत्राअन्‍वये आदेशीत केले की, परळी औष्‍णीक केंद्र उर्जा नगर अंतर्गत नौकरीस नसणा-या व्‍यक्‍तीस गॅस कनेक्‍शन दिल्‍याचे कळाले आहे व त्‍याबाबत आपण 15 दिवसाचे आंत गॅस कनेक्‍शन रदद करण्‍यात यावे असे आदेशीत केलेले आहे. सदर व्‍यक्‍तीचे गॅस कनेक्‍शन रदद केलेले आहे. सामनेवाला क्र.2 सोबत केलेला करार संपूष्‍टात आणून सामनेवाला क्र.2 कडे असलेले व्‍यवस्‍था काढून घेण्‍यात आली.त्‍याचप्रमाणे तक्रारदाराचे गॅस कनेक्‍शन बंद करण्‍यात आले. दि.14.08.2010 रोजी औष्‍णीक विद्यूत केंद्र कर्मचारी प्रायव्‍हेट सहकारी ग्राहक भांडार म.परळी यांनी त्‍यांची सर्वसाधारण सभा बोलावून सामनेवाला क्र.1 यांनी पाठविलेले वरील दिनांकाच्‍या पत्राबाबत सभेत चर्चा घडवून आणली.सर्वानूमते सामनेवाला क्र.1 च्‍या आदेशान्‍वये उर्जा नगरचे बाहेरील ग्राहकांचे गॅस कनेक्‍शन रदद करण्‍याचा ठराव संमत करण्‍यात आला. त्‍यानंतर सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास गॅस कनेक्‍शन रदद करण्‍या बाबत तोंडी सूचना दिली. त्‍यावेळी तक्रारदाराची होणारी अडचण लक्षात घेऊन सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 ची पूर्वपरवानगी घेऊन तक्रारदारांना परळी येथे असलेल्‍या इतर गॅस वितरण कंपनीची जोडणी घेऊन देण्‍याची तयारी दर्शवली परंतु सामनेवाला यांचे विनंती तक्रारदार यांनी धूडकाऊन लावली. खोटी तक्रार दाखल केली. आजही सामनेवाला तक्रारदारास परळी येथील इतर गॅस वितरकाचा गॅस कनेक्‍शन हस्‍तांतर करण्‍यास तयार आहेत. यात सामनेवाला यांनी सेवेत कूठेही कसूर केलेला नाही. तक्रारदारांनी खोटी तक्रार दाखल केल्‍याचे दिसून येत आहे. तक्रार खर्चासह रदद करुन सामनेवाला क्र.2 यांस विशेषबददल रु.10,000/- देण्‍या बाबत आदेश व्‍हावेत.
            तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला क्र.1 चा खुलासा, सामनेवाला क्र.2 चा खुलासा, शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.गंडले यांचा यूक्‍तीवाद ऐकला, सामनेवाला क्र.2 ची लेखी कैफियत यूक्‍तीवाद म्‍हणून वाचण्‍याबाबतची पूरशीर दाखल. सामनेवाला क्र.1 यूक्‍तीवादाचे वेळी गैरहजर.
            तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदार हे औष्‍णीक विद्यूत केंद्र येथे नौकरीत असल्‍याबददलचा कोणताही पुरावा तक्रारीत दाखल नाही. तसेच तक्रारदाराने 2005 मध्‍ये अटीवर गॅस कनेक्‍शन दिल्‍याचे सामनेवाला यांचे खुलाशावरुन दिसते.
            सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.2 यांना पत्र आलेले होते व या संदर्भात सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 शी झालेला करार दाखल केलेला आहे. सदर कराराप्रमाणे परळी औष्‍णीक विद्यूत केंद्रात जे कर्मचारी नौकरीस आहेत त्‍यांनाच सामनेवाला क्र.2 कडून गॅसचा पूरवठा करणे सामनेवाला क्र.2 यांना बंधनकारक आहे. या संदर्भात वर नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारदार या परळी औष्‍णीक विद्यूत केंद्र नौकरीत असल्‍याबददलचा पुरावा नाही व तसेच सामनेवाला क्र.2 यांचे खुलाशात नमूद केल्‍याप्रमाणे सूरक्षा रक्षक या पदावर ते खाजगी कंत्राटदाराचे कर्मचारी आहेत. सामनेवाला यांनी सदरचे विधान केल्‍याप्रमाणे तक्रारदारांनी त्‍या औष्‍णीक विद्यूत केंद्रात नौकरीस असल्‍याबददलचा पुरावा दाखल करणे आवश्‍यक होते पंरतु तसा कोणताही पुरावा नाही. तसेच तक्रारदारांनी तक्रारीतच नमूद केले आहे की, उर्जा नगर मध्‍ये राहत नाहीत.
            उर्जा नगरचे बाहेर राहत तक्रारदारांना ही बाब मान्‍य‍ असल्‍याने सामनेवाला यांनी तक्रारदारांना तोंडी सुचना देऊन गॅस कनेक्‍शन वरील कारणास्‍तव बंद केलेले आहे. यात सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्‍याची बाब कूठेही स्‍पष्‍ट होत नाही. तसेच सामनेवाला क्र.2 हे तक्रारदारांना परळी शहरातील इतर गॅस वितरण एजन्‍सीकडे सामनेवाला क्र.1 चे परवानगीने गॅस कनेक्‍शन वर्ग करण्‍यास तयार आहेत. ही वस्‍तूस्थिती लंक्षात घेता सेवेत कसूर झाल्‍याची बाब स्‍पष्‍ट होत नाही. त्‍यामुळे सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारांना त्‍यांचे ग्राहक नंबर रदद केल्‍याचे पत्र देणे उचित होईल असे न्‍यायमंचाचे मत आहे.
            सेवेत कसूरीची बाब स्‍पष्‍ट न झाल्‍याने तक्रारीत केलेल्‍या मागणीप्रमाणे मानसिक त्रासाची रक्‍कम देणे उचित होणार नाही असे न्‍यायमंचाचे मत आहे.
            सबब, न्‍यायमंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
 
                   आदेश
1.                    तक्रारदाराची तक्रार रदद करण्‍यात येते आहे.
2.                   सामनेवाला क्र.2 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारांची गॅस जोडणी परळीतील दुस-या गॅस वितरकाकडे आदेश प्राप्‍तीपासून 30 दिवसांचे आंत करुन देण्‍यात यावी.
3.                   खर्चाबददल आदेश नाही.
4.                  ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
 
 
(अजय भोसरेकर)     (पी.बी.भट)
सदस्‍य          अध्‍यक्ष
                                                    जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
 
 
 
 
 
[HON'ABLE MR. P. B. Bhat]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. A P Bhosrekar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.