Maharashtra

Nanded

CC/09/276

Bajirao Raghunath Wakde - Complainant(s)

Versus

India Krushi seva Kendra - Opp.Party(s)

ADV. B.M. Shirphule

06 Oct 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/276
1. Bajirao Raghunath Wakde Dhavri, Tq. Loha Dist. Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. India Krushi seva Kendra Etvara Bajar, Bhaji Market, Nanded.NandedMaharastra2. Bijo Shital Seedce prv. Ltd.Bijo Shital Corner, Manda Road, Dist. jalnaNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE President B.T.Narwade ,PRESIDENTHON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,MEMBERHON'BLE MR. Member Mr. S. J. Samte ,MEMBER
PRESENT :

Dated : 06 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2009/276
                          प्रकरण दाखल तारीख - 19/12/2009
                          प्रकरण निकाल तारीख 06/10/2010
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
       मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
       मा.श्री.सतीश सामते,                 -   सदस्‍य.
 
बाजीराव पि.रघुनाथ वाकडे
वय 45 वर्षे, धंदा शेती                                  अर्जदार
रा.धावरी ता. लोहा,जि. नांदेड
     विरुध्‍द.
1. इंडिया कृषी सेवा केंद्र,
इतवारा बाजार भाजी मार्केट, नांदेड.
2.   बिजो शीतल सिडस प्रा.लि.
पि.ओ. बॉक्‍स 77, बिजो शितल कॉर्नर,
मंठा रोड, जालना.
3.   तालुका कृषी अधिकारी,
लोहा ता.लोहा जि.नांदेड                             गैरअर्जदार
4.   दैवेष ट्रेडर्स, नवा मोंढा, नांदेड.
5.   खंडेलवाल अग्रो सेंटर, बस स्‍टँड रोड, जालना.
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.प्रकाश नरवाडे
गैरअर्जदार क्र. 1  तर्फे वकील        -  अड.एम.एम.कादरी.
गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकील       - अड.अविनाश कदम.
गैरअर्जदार क्र. 3 तर्फे वकील      -   कोणीही हजर नाही.
गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील       - अड.संदिप अग्रवाल.
गैरअर्जदार क्र.5 तर्फे वकील       -   कोणीही हजर नाही.
 
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य)
 
             गैरअर्जदारांनी ञूटीची सेवा दिली म्‍हणून अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे दाखल केली आहे.
 
 
 
              अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, अर्जदाराने गैरअर्जदार  क्र.1  इंडिया  कृषी  सेवा  केंद्र  यांच्‍याकडहून  बिजो  कंपनीचे 
मिरचीच्‍या बियाणाचे चिली नं.378 व ज्‍यांचा लॉट नंबर 3821 आहे यांचे सहा मिरचीचे पाकीट विकत घेतले ज्‍यांचा बिल नंबर877 आहे. वरील बियाण्‍याची किंमत रु.1200/- असून ते दि.17.5.2009 रोजी विकत घेतले. गैरअर्जदार क्र.2 यांनी बनवलेल्‍या मार्गदर्शीकेप्रमाणे जमिनीची पूर्व मशागत केली. अर्जदाराने त्‍यांच्‍या शेत सर्व्‍हे नंबर 102 मध्‍ये मृग नक्षञाचा चांगला पाऊस पडल्‍यानंतर 2.6 2 फुट इतक्‍या अंतरावर एक ठिकाणी दोन ते तिन बियाण्‍याची लागवड 30 आर जमिनीत केली. तुषार संचाद्वारे पाणी दिले, अर्जदार यांनी मिरचीची योग्‍य त-हेने काळजी घेतली. तरीही मिरचीचे बियाणे हे दोषयूक्‍त असल्‍यामूळे मिरचीचा रंग हा काळा पउला व फळ लागून सूध्‍दा कमी प्रमाणात उगवण झाली. म्‍हणून अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे वेळोवेळी तोंडी तक्रार केंली.अर्जदाराने हिरवी मिरची बाजारात विक्री साठी नेली असता केवळ मिरचीचा रंग काळा असल्‍यामूळे ग्राहकांनी मिरची विकत घेतली नाही. गैरअर्जदार क्र.3 कृषी अधिकारी यांनी शेत सर्व्‍हे नंबर 102 मौजे धावरी ता. लोहा येथील शेतावर जाऊन पंचासमक्ष दि.20.10.2009 रोजी पंचनामा केला. पंचनामा करताना इंडिया कृषी सेवा केंद्र व बिजो कंपनी यांनी स्‍वतः हजर राहावे असे कळविले,परंतु ते हजर झाले नाही. गैरअर्जदार क्र.3 यांनी पंचनाम्‍यामध्‍ये फळधारणा 45 टक्‍के आहे व मिरचीचा काळसर हिरवा रंग असल्‍यामूळे अर्जदाराचे 65 टक्‍के नूकसान झाल्‍याचा पंचनामा केला.निकृष्‍ट प्रतीच्‍या व बोगम बियाण्‍यामूळे अर्जदारास मानसिक, शारीरिक व आर्थीक ञास झाला. अर्जदाराने लागवडीसाठी रु.3000/-खर्च केला आहे तसेच शेतात विस गाडया शेणखत रासायनीक खत व किटकनाशके यासाठी रु.20,000/- खर्च केला आहे. अर्जदाराची मागणी आहे गैरअर्जदार क्र.1,2,4 व 5 यांनी अर्जदारास एकञित व संयूक्‍तीकरित्‍या रु.10,000/- नूकसान भरपाई द्यावी. मिर्चीचे उत्‍पन्‍न सहा महिन्‍याचे असते व हिरवी मिर्चीचे उत्‍पादन हे एका पॉकेटला दर दहा दिवसाला चार क्विंटल हिरवी मिरची नीघते. याप्रमाणे दर महिन्‍याला मिरचीचे उत्‍पन्‍न 12 क्विंटल नीघू शकते. त्‍याप्रमाणे सहा महिन्‍यात एका पॉकेटला 72 क्विंटल हिरवी मिरची नीघत असते. बाजारात प्रतिक्विंटल ला भाव रु.2000/- आहे. त्‍यामूळे एक मिरची पॉकेटपासून सहा महिन्‍यात अर्जदारास रु.1,44,000/- चे एवढे उत्‍पन्‍न मिळाले असते, अर्जदाराने शेतात एकूण सहा पॉकेट मिरचीच्‍या बियाण्‍याची लागवड केली. म्‍हणजे अर्जदाराचे एकूण रु.8,65,000/- चे नूकसान झाले. म्‍हणून  अर्जदाराची  मागणी  आहे  गैरअर्जदार  क्र. 1,2, 4 व 5   यांनी
 
 
एकञितरित्‍या व संयूक्‍तीकरित्‍या अर्जदारास झालेल्‍या नूकसानी बददल बियाण्‍याची किंमत रु.1200/-,, लागवड खर्च रु.3000/-, शेणखत, रासायनिक खत व किटकनाशके यासाठी रु.20,000/- उत्‍पनाचे रु.8,65,000/-, मानसिक ञासापोटी रु.10,000/-व दावा खर्च म्‍हणून रु.5,000/- असे एकूण रु.9,04,200/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
              गैरअर्जदार क्र.1 हे वकीलमार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे.  गैरअर्जदार क्र.1 यांचे विरोधात तक्रार दाखल करण्‍याचा अर्जदारास कोणताही अधीकार नाही. गैरअर्जदार हा बियाणांचा उत्‍पादक नसून किंवा नांदेड जिल्‍हाचा वितरक पण नाही. अर्जदाराने नांदेड जिल्‍हाचे अधिकृत विक्रेते दैवेष ट्रेडर्स यांना पार्टी न केल्‍यामूळे आवश्‍यक पार्टी अभावी तक्रार फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.अर्जदाराने गैरअर्जदार यांच्‍याकडे बियाण्‍यांच्‍या निकृष्‍ट दर्जा बददल कधीच तोंडी माहीती पण न दिल्‍याने तक्रार अमान्‍य आहे.अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी असे म्‍हटले आहे.
              गैरअर्जदार क्र.2 हे वकीलमार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांच्‍याकडून सेवेमध्‍ये कमतरता झाली नाही.जोपर्यत संबंधीत बियाणे प्रयोगशाळेमध्‍ये पाठवून त्‍यांची तपासणी होत नाही तोपर्यत बियांण्‍यात दोष आहे हे सिध्‍द होत नाही.कृषी अधिका-याने किंवा समितीने तर्काच्‍या आधारावर व कोणतेही शास्‍ञोक्‍त कारण न देता आपला अभिप्राय दिला आहे जो कायदयास अमान्‍य आहे.महाराष्‍ट्र शासनानें प्रत्‍येकी जिल्‍हयामध्‍ये तज्ञ व्‍यक्‍तीची सिड समिती स्‍थापन केली आहे. सीड कमीटीने संपूर्ण कारण लिहून आपला अर्भीप्राय देणे आवश्‍यक आहे. अहवालामध्‍ये सिड कमी दर्जाचे आहे किंवा सिडमध्‍ये दोष आहे असे कूठेही लिहीलेले नाही.तालूका कृषी अधिकारी किंवा इतर कोणीही अर्जदाराच्‍या शेतावर जाण्‍यापूर्वी गैरअर्जदार यांना नोटीस/सूचना दिलेली नाही. अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार सदरचे बियाणे गैरअर्जदार क्र.1 यांच्‍याकडून दि.17.5.2009 रोजी विकत घेतलेले आहे पण बियाण्‍याची लागवड केली हयांचा उल्‍लेख आपल्‍या तक्रारीत केलेला नाही. पंचनामा दि.20.10.2009 रोजी केलेला आहे. मिरचीची लागवड ही जून ते जूलै पर्यत करणे जरुरी आहे. अर्जदाराने लागवड केलेले बियाणे हे गेरअर्जदार क्र.2 कंपनीचे नाही कारण अर्जदाराने जो लॉट नंबर 3821 दिलेला आहे तो त्‍यांचा नाही कारण त्‍यांचे कंपनीचे लॉट नंबर हे सहा, आठ,दहा अक्षरी असतात. जसे की, 83829,82388 या प्रकारचे लॉट क्रमांक असतात. गैरअर्जदाराने आता पर्यत हजारो मिरचीचे बियाणे विक्री केलेले आहे पण आता पर्यत एकही तक्रार
 
 
आलेली आहे. अर्जदाराने खरेदी केलेले मिरचीची बियाणे रु.1200/- दि.17.5.2009 रोजी खरेदी केले हे माहीती अभावी अमान्‍य केले आहे. अर्जदाराने सदर कंपनीचे बियाणे हे अधिकृत विक्रेत्‍याकडून विकत घेतलेले नसल्‍यामूळे सदर बियाणे हे गैरअर्जदार क्र.2 कंपनीचे आहे हे म्‍हणणे चूकीचे आहे.लागवड 30 आर जमिनीत शेत सर्व्‍हे नंबर 102 मध्‍ये केली हे म्‍हणणे चूकीचे आहे. गैरअर्जदार क्र.2 यांना कोणत्‍याही प्रकारची तक्रार मिळालेली नाही.अर्जदाराने वर्ष 2009-2010 ची सातबाराची प्रत मंचासमोर दाखल केलेली नाही. दाखल केलेल्‍या सातबारा मध्‍हये मिरचीच्‍या बियाची लागवड केल्‍या बददल नोंद नाही.गैरअर्जदाराचे बियाणे दोषपूर्ण नव्‍हते. अर्जदाराने गेरअर्जदार क्र.2 यांचे बियाणे वापरलेले नसल्‍यामूळे मानसिक, शारीरिक व आर्थीक नूकसान झाले हे म्‍हणणे चूक आहे. हे म्‍हणणे चूक आहे की, अर्जदाराचे रु.8,65,000/-चे नूकसान झाले.अर्जदाराच्‍या नांवाने कोणतेही शेत नसल्‍याकारणाने त्‍यांस नूकसान झाले असे म्‍हणण्‍याचा अधिकार नाही.म्‍हणून अर्जदाराची तक्रार ही खर्चासह खारीज करावी असे म्‍हटले आहे.
              गैरअर्जदार क्र.4 हे वकीलमार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे.     अर्जदाराची तक्रार ही खोटी असल्‍यामूळे ति फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे. अर्जदार यांनी दिलेला लॉट व गैरअर्जदार यांचा लॉट नंबर यामध्‍ये तफावत आहे. पंचनामा हा गॅझेट नोटीफिकेशन दि.1.7.1998 प्रमाणे नाही. गैरअर्जदार यांनी पॅकड पॉकेट ची विक्री केलेली आहे.त्‍यामूळे अर्जदाराची तक्रार ही खोटी असून ती खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
              गैरअर्जदार क्र.3 व 5 यांना मंचाने नोटीस पाठविलेली नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फा करण्‍यात आले.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                       उत्‍तर
1.   अर्जदार ग्राहक होतात का ?                       लाभार्थी ग्राहक
2.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द होते काय ?        होय, अंशतः
3.   अर्जदार किती रक्‍कम मिळण्‍यास पाञ आहे ?         आदेशाप्रमाणे 4. काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
 
 
 
 
 
मूददा क्र.1 ः-
 
              अर्जदार हे धावरी ता. लोहा येथील शेत सर्व्‍हे नंबर 102 मध्‍ये बियाणे पेरले आहे. बियाणे विकत घेतल्‍याचे पावतीवर नांव अर्जदार यांचेच आहे. परंतु 7/12 वरील नांव रघूनाथ भाऊराव वाकडे  यांचे नांवाने जमिन असल्‍याची नोंद आहे. अर्जदाराने असे म्‍हटले आहे की, ते त्‍यांचे वडील आहेत.हिंदू एकंञित कूटूंब व मूलगा हा त्‍यांचा वारस असल्‍याकारणाने जमीन वडिलांच्‍या नांवाने जरी असली तरी मूलगा हा लाभार्थी आहे म्‍हणून त्‍यांना ही तक्रार दाखल करण्‍याचा अधिकार प्राप्‍त होतो. म्‍हणून मूददा क्र.1 चे उत्‍तर सकारात्‍मक देण्‍यात आले.
मूददा क्र.2 ः-
               अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून बिजो कंपनीचे मिरचीचे बियाणे चिली नंबर 378 त्‍यांचा लॉट नंबर 3821 बिल नंबर 877 याप्रमाणे दि.17.5.2009 रोजी विकत घेतले. त्‍या बिलाचे अवलोकन केले असता बिजो कंपनीचे बियाणे लॉट नंबर 3821 त्‍यावर लिहीलेला आहे. गैरअर्जदार क्र.1 म्‍हणतात त्‍यांनी ते बियाणे गैरअर्जदार क्र.4 यांचेकडून घेतले आहे व त्‍यांचे बियाण्‍याचे अवलोकन केले असता यात लॉट नंबर 83821 हा असा होता. म्‍हणजे गैरअर्जदार क्र.1 यांनी लॉट नंबर चूकीचा लिहीला आहे. त्‍यामधील 8 हा क्रमांक त्‍यांनी गाळला हेच कारण धरुन गैरअर्जदार क्र.2 यांनी हया लॉटचे बियाणे त्‍यांचे नाही असा आक्षेप घेतला आहे. बियाण्‍याचा लॉट नंबर हा 5 अक्षरी असतो. गैरअर्जदार क्र.1 यांनी आक्षेप जरी घेतला असला तरी अर्जदार यांनी बियाण्‍याचे लेबल दाखल केले व बियाणे हे बिजो शितल सिडस कंपनीचेच आहे असे त्‍यावर प्रिंट आहे. त्‍यामूळे अर्जदार यांनी घेतलेले बियाणे हे त्‍यांच कंपनीचेच आहे व गैरअर्जदार क्र.1 यांनी लॉट नंबर चूकीचा लिहीला. शेतक-याला बियाणे विकताना लॉट नंबर हा बरोबर लिहीणे हे विक्रेत्‍याची जबाबदारी असते. हया जबाबदारीतून त्‍यांनी निष्‍काळजीपणा केल्‍याचे दिसून येते. म्‍हणून यासाठी ते दंडास पाञ आहेत. अर्जदाराच्‍या तक्रारीनुसार गैरअर्जदार क्र.2 यांचे सूचनेप्रमाणे मिरची बियाण्‍याची लागवड 30 आर जमिनीत केली. रोपाची योग्‍य ती काळजी घेतली परंतु फळधारणा झाल्‍यानंतर मिरचीची बियाणे हे दोषयूक्‍त असल्‍यामूळे फळाचा रंग काळा पडला व कमी प्रमाणात उगवण झाली असे त्‍यांनी गैरअर्जदार यांचेकडे तक्रार केली. अर्जदार असेही म्‍हणतात की ही मिरची  काळी  असल्‍यामूळे बाजारात  विकल्‍या गेली  नाही  म्‍हणून त्‍यांचे
 
 
नूकसान झाले. यासंबंधी अर्जदाराच्‍या सूचनेवरुन दि.20.10.2009 रोजी पंचनामा केला. हया पंचनाम्‍याचे अवलोकन केले असता शेतक-याच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे दि.22.6.2009 रोजी मिरची रोपाची लागवण केल्‍यानंतर  सदर बियाण्‍याची उगवण ही 90 टक्‍के चांगली झाल्‍याचे म्‍हटले आहे परंतु मिरचीचा रंग हा गडद हिरवा आहे व फळ धारणा ही 45 टक्‍के झाल्‍याचे म्‍हटले आहे. म्‍हणजे शेतक-याचे 65 टक्‍के चे उत्‍पन्‍न घटल्‍याचे म्‍हटले आहे. अर्जदाराच्‍या 7/12 वर मिरची लागवड केल्‍या बददलची नोंद नाही परंतु तलाठयाने केलेल्‍या सर्व्‍हेनुसार 30 आर मिरचीची लागवड वर्ष 2007-08 साली केल्‍याचे म्‍हटले आहे. पंचानी अर्जदार हा रघूनाथ यांचा मूलगा असल्‍याचे प्रमाणपञ दिलेले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी आपले म्‍हणण्‍यात आक्षेप घेतला आहे की, संबंधीत लॉटचे बियाणे त्‍यांचे नाही परंतु त्‍यांला कंपनीचे प्रिटेंड लेबल आहे. त्‍यामूळे हे बियाणे कंपनीचेच आहे. दूसरा आक्षेप असा आहे की, जिल्‍हा तज्ञ कमिटीने त्‍यांचा पंचनामा केलेला नाही म्‍हणून त्‍यांना तो मान्‍य नाही परंतु असे जरी असले तरी पंचनामा हा कृषी अधिकारी जिल्‍हा परीषद च्‍या अंतर्गत केलेला आहे व तो जिल्‍हा कृषी विकास अधिका-याने प्रमाणीत केलेला आहे. म्‍हणून तो ग्राहय मानन्‍यात येतो. कमिटीचे सर्व सदस्‍य पंचनामा करण्‍यासाठी एकाचवेळी उपस्थित होणे हे बहूधा शक्‍य नसते म्‍हणून हा प्रकार झाला असावा. गैरअर्जदार क्र.2 यांचा दूसरा आक्षेप की, दोषयूक्‍त बियाणे हे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्‍यात आलेले नाही, परंतु  पंचनामा करताना फक्‍त मिरचीचा रंग काळा होता हे पाहण्‍यासाठी प्रयोग शाळेत बियाणे पाठविण्‍याची गरज नाही. गैरअर्जदार क्र.5 यांनी गैरअर्जदार क्र.4 यांना बियाणे विकले व गैरअर्जदार क्र.4 यांनी ते गैरअर्जदार क्र.1 यांना विकले. हे बियाणे विक्रेते असले तरी गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्‍पादन केलेले आहे. त्‍यामूळे गैरअर्जदार क्र,1,4 व 5 हे विक्रेते आहेत त्‍यांनी जशेच्‍या तसे बियाणे विकलेले आहेत. म्‍हणून त्‍यांचा रोल फक्‍त विक्री करण्‍याचा आहे. त्‍यामूळे नूकसानीसाठी    ते जबाबदार राहणार नाहीत. परंतु गैरअर्जदार क्र.2 हे उत्‍पादित कंपनी असल्‍याचे कारणामूळे दोषयूक्‍त बियाणे त्‍यांनी पूरविले असल्‍यामूळे झालेल्‍या नूकसानीस ते जबाबदार राहतील. पंचनाम्‍याप्रमाणे हे अतीशय स्‍पष्‍ट झाले आहे की, मिरचीचा रंग हा काळसर हिरवा होता, यात अर्जदार यांनी ते बियाणे बाजारात विकल्‍याच गेले नाही असे म्‍हटले आहे, असे होणार नाही अर्ध्‍या किंमतीत का होईना ते बियाणे विकल्‍या जाऊ शकतात, परंतु असेही झाले नसले तर काळया रंगाच्‍या मिरचीचा देखील घरात वापरासाठी ती मिरची उपयोगात घेतल्‍या जाऊ शकते. त्‍यामूळे अर्जदाराचे पूर्णतः नूकसान झाले असे म्‍हणता येणार नाही.
 
 
 
मूददा क्र. 3 ः-
                       अर्जदाराची मागणी फार मोठी आहे, त्‍यांनी        बियाण्‍याची किंमत रु.1200/-, लागवड खर्च रु.3000/-, शेणखत, रासायनिक खत व किटकनाशके यासाठी रु.20,000/- उत्‍पनाचे रु.8,65,000/-, मानसिक ञासापोटी रु.10,000/-व दावा खर्च म्‍हणून रु.5,000/- असे एकूण रु.9,04,200/- मागितले आहेत, अर्जदार जेव्‍हा मिरचीच्‍या विक्रीची किंमत मागतो तेव्‍हा बियाण्‍याची किंमत, लागवडीचा खर्च, खते ही त्‍यात आली, त्‍यामूळे त्‍यांचा खर्च परत वेगळा मागता येणार नाही. उत्‍पन्‍ना वीषयी अर्जदार म्‍हणतात एका पाकीटाला दर महिन्‍याला मिरचीचे उत्‍पन्‍न 12 क्विंटल नीघू शकते. त्‍याप्रमाणे सहा महिन्‍यात एका पॉकेटला 72 क्विंटल हिरवी मिरची नीघत असते. बाजारात प्रतिक्विंटलला भाव रु.2000/- आहे. त्‍यामूळे एक मिरची पॉकेटपासून सहा महिन्‍यात अर्जदारास रु.1,44,000/- चे एवढे उत्‍पन्‍न मिळाले असते. सहा पाकीट हे जवळपास पाऊन एकरामध्‍ये बियाण्‍याची लागवड केली आहे. (म्‍हणजे 30 आर मध्‍ये) समजा एक एकर मिरची बियाण्‍याचे उत्‍पन्‍न 12 क्विंटल धरल्‍यास ते विक्री योग्‍य झाल्‍यानंतर बाजार भाव रु.2000/- प्रमाणे रु.24,000/- चे नूकसान होऊ शकते. यातील मिरचीचा उपयोग घरीही घेतल्‍या जाऊ शकतो तेव्‍हा त्‍यांचे काळी मिरची जरी असली तरी वाळल्‍यानंतर तिचा रंग लालच होईल. त्‍यामूळे समजा अशी मिरची बाजारात विकल्‍या गेली नाही तरी तिची अर्धी किंमत येऊ शकते त्‍यामूळे 50 टक्‍के कमी जरी पकडले तरी रु.12,000/- नूकसान भरपाई मिळण्‍यास अर्जदार पाञ आहेत.
 
              2008(1) CPR 459 (NC) National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi, National Seeds Corporation Ltd. Vs.Bheem Reddy Mally Reddy   यात कृषी अधिका-याने पंचनामा केला, यात क्रॉप ईल्‍ड कमी आले आहे. या प्रकरणात देखील मिरचीचे पिक कमी येईल असे म्‍हटले आहे.
              2008(3) CPR 59 (NC) National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi, M/s India Seed House Vs. Ramjilal Sharma & anr. यात ईल्‍ड आलेले नाही, तक्रार मंजूर केलेली आहे.
              1986-2004 Consumer 8389 (NS) Supreme Court of India, H.N. Shankara Shastry Vs. The Asstt. Director of Agriculture Karnataka ,      यात  germinate   हे सायटेशन लागू होणार नाही. तक्रार Defective Seed  ची आहे. सायटेशन उगवणी बददल आहे.
              In the Supreme Court of India , M/s Maharashtra Hybrid Seeds Co. Ltd. Vs. Alavalapati Chandra Reddy & ors.  यात लॅब टेस्‍ट केली नाही, तरी क्‍लेम दिला, कारण Sr. Agri. Officer चा रिपोर्ट आहे.
 
 
 
              1986-2005 Consumer 8806 (NS) National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi, Maharashtra Hybrid Seed co.Ltd. Vs. Annapureddy Vijender Reddy and another
              1986-2004 Consumer 7618 (NS)  National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi, M/s National Seeds Coporation Ltd. Vs. Nemmipati Nagar Reddy 
 यादोन्‍ही केस लॉ मध्‍ये  proper yield नाही, या प्रकरणात देखील Yield कमी म्‍हटले आहे.
                   I (2007) CPJ 258, Maharashtra State Consumer Disputes Redressal Commission, Mumbai, Maharashtra State Seeds Corpr. Ltd & anr. Vs. Narendra Motiramji Burade & anr. यात  improper Germination  या प्रकरणास लागू होणार नाही, यात उगवण झाली आहे.         
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                             आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
2.                                         हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र.1 यांनी बिल लिहीतांना निष्‍काळजीपणा केला त्‍यामूळे अर्जदार यांना ञास झाला,  लॉट नंबर चूकीचा लिहीला यासाठी दंड म्‍हणून रु.5,000/- अर्जदार यांना दयावेत.
3.                                         गैरअर्जदार क्र.2 उत्‍पादित कंपनी यांनी दोषयूक्‍त बियाणे बददल शेतक-याच्‍या नूकसान भरपाई पोटी अर्जदारास रु.12,000/- प्रकरण दाखल केलेली दि.19.12.2009 पासून 9 टक्‍के व्‍याजाने पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत व्‍याजासह दयावेत.
4.                                         गैरअर्जदार क्र.2 यांनी मानसिक ञासाबददल रु.3,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.2000/- दयावेत.
5.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                               श्रीमती सुवर्णा देशमूख                                 श्री.सतीश सामते   
   अध्‍यक्ष                                                                                  सदस्‍या                                                      सदस्‍य.
 
 
 
 
 
जयंत पारवेकर
लघूलेखक

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT[HON'BLE MR. Member Mr. S. J. Samte] MEMBER