आदेशः-एम.वाय.मानकर अध्यक्ष द्वारा.
तक्रारदार यांचे वकील मिस. वंदना तिवारी हजर.
तक्रारदार यांचे वकीलांना दाखल सुनावणीकामी ऐकण्यात आले. तक्रार व त्यासोबत दाखल करण्यात आलेली कागदपत्रे पाहण्यात आली.
तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडे 1 किलो सोने गहाण ठेवून रू. 21,06,900/-,चे रिम घेतले होते. सा.वाले यांनी तक्रारदार यांना सूचित न करता, सोने सन 2014 मध्ये विकले व बाकी रकमेकरीता तक्रारदारकडे तकादा लावीत आहेत. तसेच तक्रारदारांविरूध्द धनादेश अस्विकृत झाल्यामूळे त्यांचेविरूध्द फौजदारी तक्रार दाखल केली. तक्रारदारानी ही तक्रार दाखल करून नुकसान भरपाईकरीता रू. 15,00,000/-, सन 2013 पासून 12 टक्क्यांनी मागणी केली आहे.
2. तक्रारदारानी तक्रारीचे कारण केव्हा उद्दभवले हे त्यांनी तक्रारीच्या परिच्छेद क्र 17 मध्ये नमूद केलेले नाही. तक्रारदारानी फौजदारी प्रकरणाची प्रत दाखल केली आहे. त्याप्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदार यांना माहे मार्च 2014 मध्ये नोटीस पाठविली होती व रू. 4,01,058/-, अदा करणेबाबत कळविले होते. तक्रारदारानी त्या रकमेचा धनादेश दि. 18/09/2014 ला दिला होता. यावरून, असे दिसून येते की, तक्रारदाराना त्यांचे सोने विकल्याबाबत माहे 2014 मध्येच माहिती प्राप्त झाली होती. त्यामुळे ही तक्रार माहे 2016 किंवा त्यापूर्वी दाखल करणे आवश्यक होते. परंतू ही तक्रार दि. 05/04/2017 ला दाखल करण्यात आली आहे. विलंब क्षमापित करण्याबाबत कोणताही अर्ज नाही.
3. तक्रारदारानी सा.वाले यांचेकडून रू. 21,00,000/-,चे रीम घेतले होते व रू. 15,00,000/-,ची नुकसान भरपाई म्हणून मागणी केली आहे. सेवेचे मुल्य व नुकसान भरपाईची मागणी लक्षात घेता ही रक्कम रू. 20,00,000/-,जास्त होते. ग्रा. सं. कायदयाच्या कलम 11 प्रमाणे या मंचास अधिकार क्षेत्र प्राप्त नाही.
सबब, ही तक्रार या मंचात चालविता येता नाही. याकरीता आम्ही मा. राष्ट्रीय आयोगानी प्रथम अपील क्र 1194/2016 संतोष आर्या विरूध्द इमार एम.जी.एफ लॅण्ड लि. निकाल तारीख 07/10/2016 चा आधार घेत आहोत. सबब खालील आदेश.
आदेश
1 तक्रार क्र 168/2017 ही 12 (3) प्रमाणे फेटाळण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
4. आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्य पाठविण्यात यावे.
5. अतिरीक्त संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
npk/-