तक्रारदार यांचे वकील श्री. तानाजी लोंढे हजर.
सा.वाले तर्फे वकील श्री. गमरे हजर.
एम.ए. क्र 31/2017 व एम.एम.क्र 32/2017 वर एकत्रितपणे आदेश.
1. तक्रारदारानी सा.वाले यांचेविरूध्द विविध मागण्याकरीता ही तक्रार दाखल केली. सा.वाले यांना नोटीस काढण्यात आली. सा.वाले तर्फे वकील श्री. चंद्रमणी गमरे दि. 18/11/2016 ला मंचासमक्ष उपस्थित झाले व त्यांनी सा.वाले क्र 1 व 2 करीता वकीलपत्र सादर केले व लेखीकैफियत सादर करणेकामी मुदत मिळण्याकरीता लेखी अर्ज सादर केला. त्या अर्जाला आदेश पारीत करतांना अनु क्र. एम.ए 31/2017 देण्यात आला. त्या अर्जावर तक्रारदारानी आपला जबाब सादर केला. त्यानंतर, सा.वाले यांनी अतिरीक्त निवेदन करणेकामी अर्ज सादर केला. त्याला आदेश पारीत करतांना अनु क्र. एम. ए. 32/2017 देण्यात आला. तक्रारदारानी या अर्जाला सविस्तर जबाब सादर केला.
2. वकील श्री. गमरे व वकील श्री. लोंढे यांना अर्जासंबधी ऐकण्यात आले.
3. सा.वाले क्र 1 यांना मंचाची नोटीस दि. 15/10/2016 ला प्राप्त झाली होती व सा.वाले क्र 2 यांना मंचाची नोटीस दि. 18/10/2016 ला प्राप्त झाली होती. ते मंचासमक्ष दि. 18/11/2016 ला उपस्थित झाले. त्यादिवशी दोन्ही सा.वाले यांची 30 दिवसांची विहीत मुदत संपलेली होती. त्यामुळे या मंचास आमच्या मते वाढीव मुदत देण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. परंतू, सा.वाले यांची दि. 18/11/2016 ला 45 दिवसाची मुदत संपलेली नव्हती. त्याकरीता आम्ही मा. सर्वोच्च न्यायालयानी डि नं 2365/2017 रिलायंस जनरल इंन्शुरंन्स कं. लि. विरूध्द माम्पी टिंबर्स अॅण्ड हॉर्डवेअर्स प्रा.लि निकाल तारीख 10/02/2017 चा आधार घेत आहोत.
4. मा. सर्वोच्च न्यायालयानी आदेशीत केल्याप्रमाणे या मंचास 45 दिवसानंतर सुध्दा अटी व शर्ती लादून लेखीकैफियत स्विकारण्याचे अधिकार दिलेले आहेत. सबब, या मंचासमक्ष असलेल्या बाबी व मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेता, खालील आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1. सा.वाले क्र 1 व 2 यांनी आजपासून 10 दिवसाच्या आत आपली लेखीकैफियत मंचात तक्रार नमूद करून दाखल करावी व प्रत परस्पर तक्रारदार यांना पाठवावी.
2. तक्रारदार यांना प्रत प्राप्त झाल्यास त्यांनी त्यांचे पुराव्याचे शपथपत्र सादर करावे.
3. एम.ए.क्र. 31/2017 व 32/2017 निकाली काढण्यात आले. ते वादसूचीमधून काढून टाकण्यात यावे.
npk/-