निकालपत्र
(घोषीत द्वारा- सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्ष)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे गोल्डलोनचे कर्जदार आहेत. अर्जदार गैरअर्जदार यांचेकडे नियमितपणे कर्जाची परतफेड करतात. गैरअर्जदार यांनी अर्जदारास गैरअर्जदारामार्फत राबविण्यात येणा-या स्वराज गृहकर्ज योजनेची माहिती दिली. अर्जदारास घर व कोचिंगक्लाससाठी हॉल बांधण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून गृहकर्ज घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार अर्जदाराने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता गैरअर्जदार यांचेकडे केली. गैरअर्जदार यांनी अर्जदाराची मुलाखत मे,2014 मध्ये घेतली. गैरअर्जदार यांनी विचारलेली सर्व माहिती अर्जदाराने मुलाखतीच्या वेळी दिली व गैरअर्जदार यांचे समाधान झाल्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदारास नांदेड शाखेचे असिस्टंट ब्रँच मॅनेजर यांचेकडे पाठवून गृहकर्जाविषयी अनुकूल असल्यासंबंधी सांगून अर्जदारास पुन्हा कागदपत्रे देण्यास सांगितले. अर्जदाराने सर्व कागदपत्रे व औपचारीक बाबी पुर्ण केल्यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या घरी भेट देऊन राहिलेले बांधकाम पाहिले. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे गैरअर्जदार यांचे सांगण्यावरुन रक्कम रु. 1123/- चा धनादेश दिला. सदरील रक्कम गैरअर्जदार यांचे खात्यात जमा झाली. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार यांचे नांदेड शाखेकडे कर्जाबाबत विनंती केली असता त्यांनी अर्जदारास सर्व कागदपत्रे पुन्हा जमा करणेस सांगितले. त्यानुसार अर्जदाराने सर्व कागदपत्रे नांदेड शाखेत जमा केली व पुन्हा रक्कम रु. 1123/- चा धनादेश जमा करण्याची सुचना गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदारास दिली. त्यानुसार अर्जदारासने स्टेट बँक ऑफ हैद्राबाद धनादेश क्रमांक 83382,दिनांक 16.09.2014 रोजीचा रु. 1123/-चा गैरअर्जदार यांना दिला. सदरील फी गृहकर्जाची प्रोसेस फी म्हणून गैरअर्जदार यांनी जमा करुन घेतली. त्यानंतर गैरअर्जदाराचे सांगण्यानुसार ऑगस्ट,2014 मध्ये श्री अविनाश डोणगे पाटील कंपनीच्या व्हॅल्युअर व इंजिनिअर यांनी अर्जदाराचे घरी भेट दिली व व्हॅल्युएशन रिपोर्ट दिनांक 22.08.2014 रोजी नांदेड शाखेत सादर केला. त्यानंतर †òड.श्री.समीर पाटील, गैरअर्जदार यांचे लिगल †òडव्हायझर यांनी गैरअर्जदार यांचे सुचनेवरुन अर्जदाराची प्रापर्टी निर्विवाद असल्याचा टायटल व सर्च रिपोर्ट दिनांक 28.08.2014 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे दिला. सप्टेंबर,2014 मध्ये स्वप्नील ओबडवार गैरअर्जदार बँकेचे सुचनेनुसार अर्जदाराचे घराचे †òड्रेस व्हेरीफीकेशन केले व त्यासंबंधीचा रिपोर्ट गैरअर्जदार यांचेकडे सादर केला. गैरअर्जदार यांनी अर्जदारास गृहनिर्माण संस्थेचे नाहरकत प्रमाणपत्र जमा करणेस सांगितले त्यानुसार अर्जदाराने गृहनिर्माण संस्थेचे नाहरकत प्रमाणपत्रही गैरअर्जदार यांचेकडे जमा केले. त्यानंतर गैरअर्जदार याचेकडे अर्जदार कर्जाचे चौकशीसाठी गेले असता गैरअर्जदार क्र. 1 यांनी सदरील मालमत्ता मॉर्टगेज झाल्यानंतर गृहकर्जाचीची रक्कम देतो असे सांगून अर्जदारास रक्कम रु.15 लाखाचे गृहकर्ज मंजूर झालेले आहे असे सांगून सदरील रक्कम ही त्यांचे कार्यालयाच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर अर्जदारास दाखविली. गैरअर्जदार क्र. 1 कडे विनंती करुनही गैरअर्जदार यांनी अर्जदारास गृहकर्जाची रक्कम दिलेली नाही. अर्जदार हा सदरील मालमत्ता मॉर्टगेज करणेस तयार असतांनाही कुठलेही संयुक्तीक कारण नसतांना गैरअर्जदार यांनी अर्जदारास मंजूर केलेली गृहकर्जाची रक्कम न देऊन सेवेत त्रुटी दिलेली आहे. त्यामुळे अर्जदारास मानसिक ,आर्थिक व शारिरिक त्रास झालेला आहे. अर्जदाराने दिनांक 27.11.2014 रोजी गैरअर्जदार क्र. 1 यांना कायदेशीर नोटीस पाठविली. त्यामुळे अर्जदाराने सदरील तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराने तक्रारीमध्ये गैरअर्जदार यांचेकडून गृहकर्जाची रक्कम रु.15 लाख ची मागणी केलेली आहे. तसेच अर्जदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासाबद्दल रक्कम रु. 3 लाखव दावा खर्चापोटी रक्कम रु. 2 लाख गैरअर्जदार यांचेकडून देण्याचा आदेश करावा अशी मागणी तक्रारीद्वारे अर्जदार यांनी केलेली आहे.
3. तक्रार दाखल केल्यानंतर गैरअर्जदार यांना आर.पी.ए.डी.व्दारे नोटीस पाठविली. गैरअर्जदार यांना नोटीस प्राप्त होऊनही गैरअर्जदार क्र. 1 नोटीस घेणेस नकार(Refused) या शे-यासह नोटीस परत आल्याने गैरअर्जदार यांनी अर्जदाराची नोटीस घेणेस नकार दर्शविलेला असल्याने सदर नोटीस गैरअर्जदार यांना तामील झालेली आहे असे गृहीत धरणेत आले. गैरअर्जदार क्र. 2 यांना दिनांक 17.01.2015 रोजी नोटीस प्राप्त झाल्याचा अहवाल पोस्टाव्दारे प्राप्त झालेला आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना नोटीस तामील होऊनही तक्रारीत हजर झालेले नाहीत. त्यामुळे दिनांक 06.04.2015 रोजी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेविरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारीत करण्यात आला व दिनांक 16.04.2015 रोजी अर्जदाराचा युक्तीवाद ऐकला. अर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
4. अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेके रक्कम रु.15 लाखाचे गृहकर्ज मिळणेसाठी अर्ज केलेला असून त्यासाठी लागणारी प्रोसेस फीची रक्कम रु. 1123/- दोन वेळा गैरअर्जदार यांचेकडे जमा केलेली असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा प्रॉपर्टी व्हॅल्युएशन रिपोर्ट व टायटल व सर्च रिपोर्ट करुन घेतलेला आहे. सदरील रिपोर्टचे अवलोकन केले असता त्यामध्ये कुठलाही आक्षेप नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या गृहकर्जासाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रांची पुर्तता अर्जदाराकडून करुन घेतलेली असल्याचे अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन दिसून येते. कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर गैरअर्जदार यांनी अर्जदारास गृहकर्ज मंजूर केलेले असल्याचे अर्जदाराने तक्रारीमध्ये शपथपत्राव्दारे सांगितलेले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे सदरील म्हणणे खोडून काढलेले नाही. तसेच गैरअर्जदार हे तक्रारीमध्ये हजर होऊन तक्रारीवर कुठलाही आक्षेप नोंदविलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदाराला अर्जदाराची तक्रार पुर्णपणे मान्य असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार बॅकेने मंजूर केलेल्या गृहकर्जाची रक्कम अर्जदारास न देऊन सेवेत त्रुटी दिलेली आहे गैरअर्जदार यांनी मंजूर केलेली गृहकर्जाची रक्कम न दिल्यामुळे अर्जदारास निश्चितच मानसिक त्रास झाला आहे असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास गृहकर्जाची रक्कम रु.15 लाख आदेश तारखेपासून 30 दिवसाच्या आत दयावेत.
3. गैरअर्जदाराने अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व दावा खर्चापोटी रु.5,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.
:MR'> नांदेड
कोळी लघुलेखक(नि.श्रे.)