मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर दरखास्त अर्ज क्रमांक : 17/2008 (कलम 27) मूळ तक्रार अर्ज क्र.56/2007 दरखास्त अर्ज दाखल झाल्याचा दि.10/09/2008 दरखास्त अर्ज निकाली झाल्याचा दि.18/02/2011 श्री.एम.एम.गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या श्री.नौशाद हुसेन खान रा.मु.पो.कोंडीवरे, ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द सौ.जुलेखा अ. रज्जाक पावसकर तर्फे मुखत्यार श्री.इक्बाल अहमद फोडकर घर नं.2383, कॉन्व्हेंट स्कूलजवळ, शहर पोलीस स्टेशनमागे, ता.जि.रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.के.जी.आवटे सामनेवालेतर्फे: विधिज्ञ श्रीमती एस.आर.ढेकणे -: नि.1 वरील आदेश :- 1. मंचाने मूळ तक्रार क्र.56/2007 मध्ये पारीत केलेल्या निकालपत्रातील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्षकाराने न केल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 27 अंतर्गत सदरचे दरखास्त प्रकरण दाखल करण्यात आले आहे. 2. सदर दरखास्त प्रकरणाची नोटीस विरुध्द पक्षाला बजावण्यात आली, परंतु स्वतः विरुध्द पक्षकार/आरोपी या मंचासमोर हजर झाल्या नाहीत, तर त्यांचे मुखत्यार म्हणून श्री.इक्बाल अहमद फोडकर हे मंचासमोर हजर झाले. दरम्यान विरुध्द पक्षकार / आरोपी या मंचासमोर हजर न झाल्यामुळे त्यांचे विरुध्द वॉरंटची कारवाई करण्यात आली. त्यानुसार आरोपीने पोलीस स्टेशन रत्नागिरी येथे रु.2,000/- (रु.दोन हजार मात्र) चा जामीनमुचलका भरुन दिला. त्यानंतर देखील आरोपी मंचासमोर हजर न झाल्यामुळे जामीनदाराचेविरुध्द जमानत जप्तीची नोटीस काढण्यात आली. त्यानुसार मंचाने जामीनदाराकडून रक्कम रु.2,000/- (रु.दोन हजार मात्र) भरणा करुन घेवून जामीनमुचलका जप्त केला. 3. दरम्यान सदरचे दरखास्त प्रकरण आरोपीविरुध्दचे वॉरंट परत येण्यावर व तक्रारदाराने तजवीज करणेवर मंचासमोर ठेवण्यात आले होते. त्यानुसार आज मंचासमोर तक्रारदाराची मुखत्यार पत्नी व त्यांचे वकिल हजर झाले असून त्यांनी नि.112 वर अर्ज दाखल केला. 4. तक्रारदार व त्यांचे वकिलांनी नि.112 वरील अर्जात नमूद केल्यानुसार या दरखास्त प्रकरणातील विरुध्द पक्षकार / आरोपी नामे श्रीमती जुलेखा अ. रज्जाक पावसकर यांचे दि.17/02/2011 रोजी निधन झाल्याचे स्पष्ट केले. तसेच सदरचे प्रकरण पुढे चालवावयाचे नसल्यामुळे प्रकरण निकाली करावे अशी विनंती केली. त्यामुळे आम्ही सदरचे प्रकरण निकाली काढण्याच्या दृष्टीकोनातून खालील आदेश पारीत करीत आहोत. आदेश - तक्रारदाराचे मुखत्यार पत्नीने व त्यांचे वकिलांनी नि.112 वर दिलेल्या अर्जानुसार सदर प्रकरणातील आरोपी नामे श्रीमती जुलेखा अ.रज्जाक पावसकर हिचे दि.17/02/2011 रोजी निधन झाल्यामुळे सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येते.
- आरोपीचे बेलबॉंड रद्द करण्यात येतात.
- प्रकरण नस्तीबध्द करण्यात येते.
रत्नागिरी दिनांक : 18/02/2011 (एम.एम.गोस्वामी) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. M. M. Goswami] PRESIDENT | |