न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. प्रस्तुतची तक्रार स्वीकृत होवून जाबदार यांना नोटीस आदेश झाले. जाबदार यांनी मंचासमोर हजर होवून आपले म्हणणे दाखल केले. तक्रारदार यांनी आपले रॉयल इनफिल्ड बुलेट गाडी नं. एम.एच.09-डीएन-2009 या वाहनाचा विमा जाबदार क्र.2 यांचेकडे उतरविला होता. दि. 18/6/2018 रोजी सदरचे वाहन तक्रारदार यांचे गावातील जुन्या घराच्या ठिकाणी रात्री 9.30 ते 10.30 चे दरम्यान व्यवस्थितरित्या लावून तक्रारदार हे रामनगर येथील घरी गेले. तक्रारदार दुस-या दिवशी म्हणजे दि.19/6/2018 रोजी सदरचे वाहन घेणेसाठी गेले असता तेथे त्यांना वाहन दिसून आले नाही. म्हणून तक्रारदारांनी आजूबाजूला तसेच मित्र व नातेवाईक यांचेकडे चौकशी केली. परंतु तक्रारदार यांना वाहन मिळून आले नाही. म्हणून तक्रारदाराने कागल पोलिस ठाणे येथे दि. 20/6/2018 रोजी वाहन चोरीची फिर्याद नोंदविली. तदनंतर तक्रारदाराने जाबदार क्र.2 यांचेकडे विमा क्लेम दाखल केला. परंतु तक्रारदार यांचा व्हॅलिड व बोनाफाईड क्लेम जाबदार यांनी कोणतेही सबळ कारण न देता नो क्लेम या शे-यानिशी नाकारल्याचे दि. 16/8/2018 चे पत्राने जाबदार यांनी तक्रारदारास कळविले आहे. अशा प्रकारे क्लेम नाकारुन जाबदार यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे. सबब, तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले असे तक्रारदाराचे कथन आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी आपले रॉयल इनफिल्ड बुलेट गाडी नं. एम.एच.09-डीएन-2009 या वाहनाचा विमा जाबदार क्र.2 यांचेकडे उतरविला होता. सदर विम्याचा कालावधी दि. 27/1/2018 ते 26/1/2019 असा होता व पॉलिसी क्र. 26320044 असा आहे. सदर विम्याअंतर्गत जाबदार यांनी रु.77,019/- ची जोखीम स्वीकारली होती. दि. 18/6/2018 रोजी सदरचे वाहन तक्रारदार यांचे गावातील जुन्या घराच्या ठिकाणी रात्री 9.30 ते 10.30 चे दरम्यान व्यवस्थितरित्या लावून तक्रारदार हे रामनगर येथील घरी गेले. तक्रारदार दुस-या दिवशी म्हणजे दि.19/6/2018 रोजी सदरचे वाहन घेणेसाठी गेले असता तेथे त्यांना वाहन दिसून आले नाही. म्हणून तक्रारदारांनी आजूबाजूला तसेच मित्र व नातेवाईक यांचेकडे चौकशी केली. परंतु तक्रारदार यांना वाहन मिळून आले नाही. म्हणून तक्रारदाराने कागल पोलिस ठाणे येथे दि. 20/6/2018 रोजी वाहन चोरीची फिर्याद नोंदविली. तदनंतर तक्रारदार यांनी जाबदार क्र.2 यांचेकडे विमा क्लेम दाखल केला. परंतु तक्रारदार यांचा व्हॅलिड व बोनाफाईड क्लेम जाबदार यांनी कोणतेही सबळ कारण न देता नो क्लेम या शे-यानिशी नाकारल्याचे दि. 16/8/2018 चे पत्राने जाबदार यांनी तक्रारदारास कळविले आहे. अशा प्रकारे क्लेम नाकारुन जाबदार यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली आहे. सबब, जाबदार विमा कंपनीकडून विमाक्लेमची रक्कम रु.77,019/- व सदर रकमेवर द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी प्रत्येकी रु.50,000/- व तक्रारीचा खर्च रु.25,000/- जाबदार यांचेकडून मिळावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत वाहनाचे इन्व्हॉईस, विम्याची कागदपत्रे, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, तक्रारदाराचा वाहन चालविण्याचा परवाना, पोलिस स्टेशनमध्ये नोंदविलेली फिर्याद, जाबदारांचे क्लेम नाकारलेचे पत्र, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. जाबदार यांना नोटीस लागू झालेनंतर जाबदार यांनी मंचासमोर हजर होवून आपले लेखी म्हणणे दाखल केले. जाबदार यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराचे तक्रारअर्जातील संपूर्ण मजकूर नाकारला आहे. त्यांचे कथनानुसार, तक्रारदार यांना त्यांचे वाहनाचे चोरीची माहिती दि. 19/6/2018 रोजी सकाळी समजली. सदरची बाब त्यांनी जाबदार कंपनीस ताबडतोब कळविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी सदरची बाब दि. 20/6/2018 रोजी जाबदारांना प्रथमतः कळविली. तक्रारदारांने दोन दिवस वेळाने सदरची बाब कळविलेने जाबदार यांना चोरीचे खरेपणाबाबत व वस्तुस्थितीबाबत वेळेत योग्य ती छाननी करता आली नाही. तसेच तक्रारदाराने प्रथम वर्दी रिपोर्टही वेळाने दिलेचे आढळून आले. तक्रारदारांनी त्यांचे मोटार सायकल ही लॉक करुन त्याची चावी ही योग्य व सुरक्षित ठिकाणी ठेवणे जरुर होते. तक्रारदारांनी त्यांची मोटार सायकल ही जुन्या घरासमोर उघडयावर कोणतीही पार्कींगची व्यवस्था नसताना लॉक न करता व कुणीही सुरक्षा रक्षक नसताना निष्काळजीपणाने ठेवलेली होती. सबब, वाहनाची चोरी ही तक्रारदाराचे निष्काळजीपणाने झाली असलेचे आढळून आले. तक्रारदारांनी पोलिसांकडे दिले जबाबात हे मान्य केले आहे. सबब, तक्रारदाराने विमा पॉलिसीचे अट क्र. 4 व 8 चा भंग केलेने तक्रारदाराचा क्लेम जाबदारांनी नाकारला आहे. जाबदार यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. तक्रारदारांनी मोटार सायकल खरेदीसाठी दि आजरा अर्बन को-ऑप बँकेकडून कर्ज घेतले असलेने सदर बँकेस त्यांनी याकामी पक्षकार करणे जरुर होते. सबब, सदर बँकेस आवश्यक पक्षकार म्हणून सामील करणेबाबत तक्रारदारांना आदेश व्हावा, तक्रारदारांचा क्लेम जाबदार यांनी योग्य कारणास्तव नाकारलेला आहे. सबब, तक्रारअर्ज नामंजूर करावा अशी मागणी जाबदार यांनी केली आहे.
5. जाबदार यांनी याकामी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, दाखल पुरावे व युक्तिवाद तसेच जाबदार यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | जाबदार यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
7. तक्रारदाराने आपले रॉयल इनफिल्ड बुलेट गाडी नं. एम.एच.09-डीएन-2009 या वाहनाचा विमा जाबदार क्र.2 मार्फत उतरविला होता व सदरचे वाहनाचा विमा कालावधी दि. 27/1/18 ते 26/1/19 असा होता व आहे. तशी विमा पॉलिसीची कागदपत्रे याकामी दाखल आहेत व उभय पक्षांमध्येही वादाचा मुद्दा नाही. सबब, तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये सेवा घेणार व सेवा देणार हे नाते प्रस्थापित झालेने तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1)(ड) खाली जाबदार यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4 एकत्रित
8. तक्रारदाराने जाबदार क्र.2 यांचेमार्फत आपले रॉयल इनफिल्ड बुलेट गाडी नं. एम.ए.09-डीएन-2009 या दुचाकी वाहनाचा विमा उतरविला होता व सदर विम्याचा कालावधी दि. 27/1/2018 ते 26/1/2019 असा होता व पॉलिसी क्र. 26320044 असा आहे. सदर विम्याअंतर्गत जाबदार यांनी रु.77,019/- ची जोखीम स्वीकारली होती. यामध्ये उभय पक्षांमध्ये वाद नाही.
9. तक्रारादाराची थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी दि. 18/6/2018 रोजी त्यांचे गावातील जुन्या घराच्या ठिकाणी रात्री 9.30 ते 10.30 चे दरम्यान व्यवस्थितरित्या लावून तक्रारदार हे रामनगर येथील घरी गेले. तक्रारदार दुस-या दिवशी म्हणजेच दि. 19/6/18 रोजी जुन्या घरासमोरील लावलेले वाहन घेणेसाठी गेले असता घरासमोर लावलेले वाहन तक्रारदार यांना दिसून आले नाही. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला मित्र व नातेवाईकांकडे वाहनाबाबत विचारपूस केली असता तक्रारदार यांचे वाहनाचा पत्ता मिळून आला नाही. सबब, वाहन चोरीस गेलेची खात्री झालेनंतर दि. 20/6/2018 ला कागल पोलिस ठाणे यांचेकडे वाहन चोरीची फिर्यादी नोंदविली व तिचा गु.र.नं. 98/18 असा आहे. तथापि तक्रारदाराने जाबदार क्र.2 यांचेकडे सर्व आवश्यक कागदपत्रांसह क्लेम दाखल केला. मात्र तक्रारदार यांना कारण न देता कायदेशीर व्हॅलीड व बोनाफाईड क्लेम नो क्लेम या शे-यानिशी नाकारला आहे व तसेच दि. 16/8/2018 रोजी पत्राने कळविले आहे. सबब, सदरचे जाबदार यांची कृती अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करणारी आहे असे तक्रारदाराचे कथन आहे.
10. जाबदार यांचे कथनानुसार तक्रारदार यांची मोटार सायकल दि. 18/6/2018 रोजी चोरीस जाऊनही पोलिस स्टेशनला उशिराने म्हणजे दि. 20/6/2018 रोजी कळविले. सदरची गाडी ही पार्कींगची व्यवस्था व्यवस्थित नसताना व सुरक्षिततेची काळजी घेतली नसलेने मोटार सायकल चोरीस गेली. तक्रारदाराने दि आजरा अर्बन को-ऑप. बँक शाखा यांचे कर्ज घेतले असून सदर बँकेची हायपोथिकेशनची नोंद सदर मोटार सायकलचे आर.सी. बुकास आहे. त्याकामी तक्रारदाराने बँकेस आवश्यक पक्षकार केलेले नाही. सबब, तक्रारअर्ज नामंजूर करावा.
11. तक्रारदार व जाबदार यांनी यासंदर्भात पुराव्याची शपथपत्र तसेच काही मा. वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिर्णयही दाखल केले आहेत. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांचे विवेचनाचा विचार करता तक्रारदाराने सदरचे वाहन आपल्या गावातील राहत्या घरासमोर व्यवस्थितरित्या पार्क केले आहे. त्यामुळे जाबदार कथन करतात, त्याप्रमाणे कोणताही निष्काळजीपणा केलेला नाही तसेच पोलिस स्टेशनला दि. 20/6/18 रोजीच कळविलेले आहे. म्हणजेच वाहन चोरीस गेलेचे दुसरे दिवशीच कळविलेले आहे. सबब, यामध्ये तक्रारदार यांनी कोणताही विलंब केलेचे दिसून येत नाही.
12. यासंदर्भात जाबदार यांनी मा. वरिष्ठ न्यायालयाचे काही न्यायनिर्णय दाखल केले आहेत.
- 1(2018) CPJ 190 NC
- 3 (2018) CPJ 189 NC
- 3 (2018) CPJ 15B(CN) (WB)
- 1(2017) CPJ 493 NC
- 1(2015) CPJ 387 NC
- Rev.Petition No. 1896 of 2008
- Rev. Petition No. 3049 of 2014
- Rev. Petition No. 3182 of 2014
- 3(2018) CPJ 169 NC
वरील सर्व मा. वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिर्णय विचारात घेता,
- 1(2018) CPJ 190 NC – यामध्ये 38 दिवसांचे उशिर झालेला दिसून येतो.
-
- 3 (2018) CPJ 189 NC – intentionally left the vehicle unattended and negligence of driver असलेचे दिसून येते.
- 3 (2018) CPJ 15B(CN) (WB) – Here insured not taken reasonable step.
- 1(2017) CPJ 493 NC – No reasonable worthwhile explanation given for delay of 7 days in reporting theft.
- 1(2015) CPJ 387 NC – Here keys of ignition locks were left in vehicle on account of which vehicle is stolen.
सबब, वर नमूद मा. वरिष्ठ न्यायनिर्णयांचा विचार करता सदरचे तक्रार अर्जातील नमूद वाहन हे चोरीस दि. 18/6/2018 रोजी चोरीस गेले व लगेचच दुसरेच दिवशी म्हणजेच दि. 19/6/18 रोजीच पोलिस स्टेशनला कळवून गुन्हा नोंद झाला आहे. सबब, जाबदार कंपनीने “कळविणेस उशिर झाला” हा तक्रारदार यांचेविरुध्द घेतलेला आक्षेप हे मंच फेटाळून लावत आहे.
13. मात्र तक्रारदारानेही दाखल केले काही मा. वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिर्णय हे मंच विचारात घेत आहे.
- Sukhram Kashyap Vs. National Insurance Co.Ltd.
Chattisgarh State Commission
यामध्ये मा. राष्ट्रीय आयोगाने काही वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिर्णय विचारात घेतले आहेत.
In the case of National Insurance Co.Ltd. Vs. Kamal Sinnghal, IV (2010) CPJ (NC) Hon’ble National Commission has held that there has been catena of decisions of the National Commission and also Hon’ble Apex Court and the issue is no longer res integra that in case of theft of vehicle, issue of breach of policy condition was not germane to the issue and we profitably refer to for decisions of the National Commission in the maters of (1) National Insurance Co.Ltd. Vs. J.P. Leasing Company Ltd. (R.P.No. 643/2005) (2)Punjab Chemical Agency Vs. National Insurance Co.Ltd. (R.P. No. 2097) (3) New India Assurance Co.Ltd. Vs. Sou. Bharati Rajiv Bankar (RP No. 3294/2009) and (4) National Insurance Company Ltd. Vs. Jeetmal (RP No. 3366/2009)
तसेच In case of M/s New India Assurance Co.Ltd. Vs. Sh. Ajit Kumar, 2013 (4) CPR, 4 (NC) Hon’ble National Commission has observed that from the factual matrix of the case, it becomes abundantly clear that the complainant has violated the terms and conditions of the policy, by leaving the car unlocked on the road side in the late hours of the night. As per the version contained in the complainant, he took away the ignition key with him and the duplicate key was in a briefcase inside the car.
वरील सर्व मा. वरिष्ठ न्यायालयांचे निर्णय विचारात घेता.
In the instant case, the vehicle has been snatched or stolen.In the case of theft of vehicle breach of condition is not germane.The appellant insurance company is liable to indemnify the owner of the vehicle when the insurer has obtained comprehensive policy for the loss caused to the insurer.The respondent submitted that even assuming that there was a breach of condition of the insurance policy, the appellant insurance company ought to have settled the claim on non-standard basis.The insurance company cannot repudiate the claim in toto in case of loss of vehicle due to theft.In the instance case, the State Commission allowed the claim only on non-standard basis, which has been upheld by the National Commission.On consideration of the totality of the facts and circumstances in the case, the law seems to be well settled that in case of theft of vehicle, nature of use of the vehicle cannot be looked into and the insurance company cannot repudiate the claim on that basis.
14. सबब, तक्रारदाराची वस्तुस्थिती या पध्दतीची असलेने सदरचे न्यायनिर्णय हे या या तक्रारअर्जास लागू होत असलेने सदरचा तक्रारदाराचा क्लेम हा non-standard basis वर मंजूर करणेचे निर्णयाप्रत हे मंच येत आहे. म्हणजेच सदरचा विमा दावा हा विमा दावेचे 75 टक्के (रक्कम रु. 77,019/-) देणेचे आदेश हे मंच जाबदार विमा कंपनीस करीत आहेत. तसेच तक्रारदाराने मागितलेली शारिरिक व मानसिक त्रसाची रक्कम रु. 50,000/- व तक्रारअर्जाचे खर्चाची रक्कम रु. 25,000/- ही या मंचास संयुक्तिक वाटत नसलेने मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.3,000/- देणेचा आदेश जाबदार विमा कंपनीस करणेत येतो. सबब, हे मंच खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांना विमादावेची रक्कम रु.77,019/- चे 75 टक्के रक्कम अदा करणेचे आदेश करणेत येतात.
3. तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे आदेश जाबदार यांना करणेत येतात.
4. वर नमूद आदेशांची पूर्तता जाबदार यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत जाबदार यांनी आदेशाची पूर्तता न केलेस तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 खाली दाद मागणेची मुभा राहिल.
6. जर यापूर्वी जाबदार यांनी विमाक्लेमपोटी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची जाबदार यांना मुभा राहील.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.