::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या
. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांस ग्राहक सरक्षंण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
१. अर्जदार हा राजुरा येथील रहिवासी असून मारुती रिटस व्हिडीआय बी एसIV एम एच 34/ एम/3087 मालक आहे. अर्जदाराच्या मुलगा दिनांक १३ जाने. २०१४ ला लक्कडकोट वरून राजुरा कडे सदर कारने येत असताना असिफाबाद ते राजुरा रोडवर आरटीओ ऑफिस चे पुढे दोन किलोमीटर अंतरावर झाडाला ठोस लागून अपघात झाला सदर अपघातात मारुती सुझुकी चे समोरील भाग दोन्ही बाजूने चेपलेला होता तसेच समोरील व बाजूचा काच फुटला तसेच संपूर्ण इंजिन चेपलेले असून कार तूटफूट होऊन नुकसान झाले सदर कार पाच लाख रुपये किमतीची होती. सदर अपघाताची माहिती होताच सरकारतर्फे दिनांक १३ जाने २०१४ ला लेखी फिर्याद झाली. त्यानुसार पोलिस ठाणे चंद्रपूर द्वारे एफ आय आर तयार करण्यात आला त्याच प्रमाणे सदर कारच्या चालकांविरुद्ध कलम ३०४,२७९ अन्वये गुन्हा नोंदण्यात आला. सदर अपघातात कारचालक व इतर व्यक्ती मृत झाले सदर अपघात यातील कार चालकाचे ड्रायव्हिंग परवाना वैध होता. सदर अपघातातील मारुती सुझुकी कार अर्जदाराच्या मालकीची असल्यामुळे अर्जदाराने सदर कारचा सुप्रत्नाम्यावर मागितली. सदर कारचे पूर्णपणे नुकसान झालेले होते त्यामुळे सदर कार दुरुस्ती लायक नव्हती .अर्जदाराचे कारचे पाच लाखाचे नुकसान झाले व सदर कारचे इन्शुरन्स गैरअर्जदाराचे असून पॉलिसी नंबर८५९०३०१३ ही कॉम्प्रीहेन्सिवे पॉलिसी आहे .सदर कारचे नुकसानभरपाई करता अर्जदाराने दावा नंबर३३८६१५४० द्वारे गैरअर्जदाराकडे कारचे नुकसानभरपाई करता क्लेम मागितला असता, गैर अर्जदाराने सदर कारचे सर्ह्वे व सदर कारचे झालेल्या नुकसानीचे चौकशीकरता सुधीर बि कायरकर यांची नियुक्ती करून सदर कारचा सर्वे व झालेल्या नुकसानीचे चौकशी करून कारचे नुकसान ठरवून अर्जदारास सदर कार दुरुस्ती करण्या लायक नसल्यामुळे नुकसानभरपाई करता सदर कारचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यास कळविले त्या नुसार सदर कार् चे रजिस्ट्रेशन रद्द केले परंतु गैरअर्जदाराने सदरचा अर्ज दराचा क्लेम सदर कारची सिटींग कापसीटी पेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करीत असल्याने कारण दाखवून सदरचा क्लेम नामंजूर करून अर्जदारास दिनांक २३.०४.२०१५ चे पत्र दिले. सदर अपघातग्रस्त कारने प्रवास करीत असताना सदर कारच्या सिटींगकॅपसिती पेक्षा अधिक प्रवास करीत नव्हते .त्याचप्रमाणे इफ आय ऑफ मधील नोंद नमूद फिर्यादीनुसार जखमी व्यक्तीही बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे किती प्रवासी प्रवास करीत होते हे सिद्ध होत नाही .अर्जदाराच्या कारचे पाच लाखाचे रुपयाचे नुकसान झालेले असल्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार गैरअर्जदारा विरुद्ध मंचात दाखल केलेली आहे .
अर्जदारांची मागणी अशी आहे की नुकसान भरपाई म्हणून अर्जदारास ३,५०,०००/- नुकसानभरपाई द्यावी असा आदेश पारित करावा तसेच अर्जदारांला झालेल्या मानसिक ना शारिरीक त्रासापोटी गैरअर्जदाराने अर्जदारास१,००,०००/- द्यावे तसेच तक्रारीचा खर्च १०,०००/- रुपये गैरअर्जदाराने अर्जदारास द्यावा
२. तक्रार स्वीकृत करून गैर अर्जदाराला नोटीस काढण्यात आले गैरअर्जदाराने त्यचे उत्तर दाखल करुन पुढे कथन केले की अर्जदाराने सादर केलेले दास्तेएवज व तक्रार त्यातील मजकूर एकमेकांशी विसंगत आहेत. अर्जदाराने दाखल केलेल्या दस्त यावरून स्पष्ट होते की अपघात ग्रस्तांना वाहनाची क्षमता पाचची असून त्यात सहा प्रवाशी प्रवास करीत होते. सदर अपघात अर्जदाराचा मुलगा पियुष वय 19 वर्षे हा चालवीत होता व त्याच्या सुद्धा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला यावरून स्पष्ट होते की अपघाताच्या वेळी अपघातग्रस्त वाहनांत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होती. त्यामुळे अर्जदारांनी विमा अटी व शर्ती चे उल्लंघन केले आहे तसेच अर्जदाराचा मुला कडे अपघातग्रस्त वाहनाचा किंवा कोणतेही वाहन चालवण्याचा परवाना नव्हता ही बाब अर्जदाराला माहीत होती ,तरीही अर्जदार जाणीव पूर्वक खोटया कागदपत्राच्या आधारे नुकसानभरपाई मिळवण्या करिता बेकायदेशीर मागणी करीत आहे व त्याकरिता प्रस्तुत अर्ज दाखल केलेलाआहे. अर्जदाराचा मुलगा हा राजुरा येथे शिकत होता व त्याला अपघात वाहन चालवणे येत नव्हते ही बाब माहित असून सुद्धा माहित असून सुद्धा अर्जदाराने खोटे व बनावट दस्त गोळा करुन बेकायदेशीरित्या प्रस्तुत चा अर्ज दाखल केलेला आहे सबब विमा कंपनी च्या अटी व शर्ती चे उल्लंघन केलेले असल्यामुळे सदरचा अर्ज खारीज करण्यास होण्यास पात्र आहे
३.. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवाद तसेच गैरअर्जदाराचा यांचा लेखी जवाब, कागदपत्रे, लेखी युक्तिवादाबाबत पुरसिस व उभय पक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे कायम करण्यांत येतात.
मुद्दे निष्कर्ष
१. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास कराराप्रमाणे
सेवासुविधा पुरविण्यात कसूर व अनुचीत व्यापारी
पद्धतीचा अवलंब केल्याची बाब तक्रारदार सिद्ध
करतात काय ? नाही
२. गैरअर्जदार तक्रारदारास नुकसानभरपाई अदा
करण्यास पात्र आहेत काय ? नाही
३. आदेश ? आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्र. १ व २ :
४. अर्जदार यांच्या मालकीची तक्रारीत नमूद असलेले वाहन असून अर्जदाराने सदर
सदर गाडीचा इन्शुरन्स गैरअर्जदार यांच्याकडून काढलेला आहे. दिनांक १३.जानेवारी २०१४ रोजी अर्जदार याचा मुलगा लक्कडकोट वरून राजुरा कडे सदर वाहन चालवीत असताना झाडाला ठोस लागून गाडीचा अपघात झाला व गाडीचे नुकसान झाले. सदर घटना झाल्यानंतर सदर अपघाताची नोंद पोलिस स्टेशन येथे झालेली आहे व त्याबद्दलचे दस्तावेज तक्रारी दाखल आहे अर्जदाराने गाडीला झालेल्या नुकसान भरपाई बद्दल गैरअर्जदाराकडे विमा दावा दाखल केला. परंतु गैरअर्जदाराने बैठक क्षमते बद्दल आक्षेप घेऊन विमा नाकारला त्याबाबत अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने तक्रारित दाखल कागदपत्राचे अवलोकन केले असता असे स्पष्ट होत आहे की कारची बैठक क्षमता ५ असूनही अर्जदाराच्या मुलाने त्यात संख्येपेक्षा जास्त व्यक्ती बसवून गैरअर्जदार विमा कंपनीचा अटी व शर्ती चे उल्लंघन केले आहे. तसेच अर्जदारांचा मुलगा पियुष चे वय १९ होते व त्याच्या जवळ सदर गाडी चालवण्याचा परवाना नव्हता हा आक्षेप गैरअर्जदाराने घेतलेला आहे, त्याबद्दल अर्जदाराने दिनांक ३०.०६.२०१७ रोजी तक्रारीत पियुश चे लायसन दाखल केलेले केले सदर दस्तावेजाचे अवलोकन केले असता सदर परवाना नागालँड येथून दिनांक ०३.११.२०१० नोंदणी केला आहे अर्थात २०१० मध्ये पियुष चे वय हे अठरा वर्षांपेक्षा कमी होते. सबब त्याला परमनंट लायसन्स मिळणे अशक्य बाब आहे. भारतातील कोणत्याही राज्यात १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय परमंट लायसन मिळणे कायद्यानुसार अशक्य बाब असल्यामुळे अर्जदाराने दाखल केलेले दस्तावेज हे ग्राह्य धरण्या सारखे नाही . सबब अर्जदाराच्या मुलाने प्रस्तुत वाहनाचा परवाना नसताना व क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती वाहनात बसून गैरअर्जदार कंपनीच्या अटी व शर्ती चे उल्लंघन केलेले आहे ही बाब सिद्ध होत असल्यामुळे मुद्दा क्रमांक १ व २ चे उत्तर नकरार्थी नमूद करण्यात येत आहे .
.
५. मुद्दा क्रं. १ व २ च्या विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
१. ग्राहक तक्रार क्र. २०९/२०१५ अमान्य करण्यात येते.
२. दोन्ही पक्षांनीतक्र आपापला खर्च सहन करावा .
३ . उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी.
श्रीमती. कल्पना जांगडे श्री. उमेश वि. जावळीकर श्रीमती. किर्ती वैद्य (गाडगीळ)
(सदस्या) (अध्यक्ष) (सदस्या)