Maharashtra

Nagpur

CC/211/2015

Vasantrao Madhaorao Wankhade - Complainant(s)

Versus

IFFCO Tokyo General Insurance Ltd. Through Authorized Signatory - Opp.Party(s)

Rajnish Vyas

26 Mar 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/211/2015
( Date of Filing : 27 Apr 2015 )
 
1. Vasantrao Madhaorao Wankhade
r/o 41A, Gandhi Ward Tahsil Chimur, Chandrapur
Chandrapur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. IFFCO Tokyo General Insurance Ltd. Through Authorized Signatory
Off. at, 8th floor, 701/A, Shri. Ram Tower, Besides NIT Complex, Kingsway Sadar Nagpur-440001
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:Rajnish Vyas , Advocate for the Complainant 1
 ADV. K. R. JOSHI, Advocate for the Opp. Party 1
Dated : 26 Mar 2021
Final Order / Judgement

                               आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

 

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,  त्‍याचे वाहन क्रं. MH 34 AB-8672 या वाहनाचा दि. 09.06.2014 ते 08.06.2015 या कालावधीकरिता विमामुल्‍य रक्‍कम रुपये 5,13,358/- करिता विमा पॉलिसी क्रं. 88054449 अन्‍वये विमा उतरविला होता. तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाला दि. 26.06.2014 रोजी ट्रक क्रं. MH 20/AT-4403 ने धडक दिली. त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याचा वाहन चालक राजु मिसार हा वाहन चालवित होता व त्‍याच्‍याजवळ सदर वाहन चालविण्‍याचा विहित परवाना होता. तसेच चिमूर पोलिस स्‍टेशन येथे मोटर वाहन कायदा अंतर्गत गुन्‍हा नोंदविण्‍यात आला व विरुध्‍द पक्षाला अपघाताची सूचना देण्‍यात आली. त्‍यानंतर अपघातात क्षतिग्रस्‍त झालेले वाहन दुरुस्‍तीकरिता चिमूर वरुन नागपूरला provincial Automobile Co. Pvt. Ltd. नागपूर यांच्‍याकडे दुरुस्‍तीकरिता आणण्‍यात  आले. त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाच्‍या प्रतिनिधीने  provincial Automobile Co. Pvt. Ltd.येथे जाऊन तक्रारकर्त्‍याच्‍या क्षतिग्रस्‍त वाहनाची तपासणी केली व वाहनाचे झालेल्‍या नुकसानाचे मुल्‍यांकन केले. काही दिवसानंतर तक्रारकर्त्‍याला कळविण्‍यात आले की, त्‍याने पॉलिसीच्‍या शर्ती व अटीचे उल्‍लंघन केल्‍यामुळे विमा पॉलिसी अंतर्गत वाहन दुरुस्‍ती करता येऊ शकत नाही.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने विमा पॉलिसीच्‍या शर्ती व अटीचे उल्‍लंघन केलेले नाही व विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला विमा पॉलिसीचे दावा नाकारण्‍याचे कारण कळविलेले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍याचे क्षतिग्रस्‍त वाहन स्‍वखर्चाने दुरुस्‍त केले. provincial Automobile Co. Pvt. Ltd.यांनी वाहन दुरुस्‍तीचे रुपये 5,78,000/- खर्चाचे अंदाजपत्रक दिले. तक्रारकर्त्‍याने सदरच्‍या वाहन दुरुस्‍तीपोटी रुपये 2,69,916.37 पै. अदा केले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दि. 05.11.2014 ला कायदेशीर नोटीस पाठविली व त्‍याद्वारे वाहन दुरुस्‍ती रक्‍कमेची मागणी केली. सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केली की,  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला वाहन दुरुस्‍तीपोटी रुपये 3,49,916.17 पै. देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा. 
  3.      विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी जबाबात असे नमूद केले की, तक्रारकर्ता हा बोलेरो पिकअप आय.सी.व्‍ही. या वाहनाचा मालक असून त्‍यामध्‍ये वाहन चालक व क्‍लीनरला (1+1 ) बसण्‍याची परवानगी आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या वाहनाचा दि. 09.06.2014 ते 08.06.2015 या कालावधीकरिता विमा पॉलिसी क्रं. 88054449 अन्‍वये विमा उतरविला होता व विरुध्‍द पक्षाने  तक्रारकर्त्‍याला  विमा पॉलिसी शर्ती endorsement , limitation exception च्‍या अधीन राहून निर्गमित केली होती.  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला विमा पॉलिसीच्‍या शर्त क्रं. 1 प्रमाणे त्‍वरित माहिती देणे आवश्‍यक होते व विमा कंपनीच्‍या सूचनेनुसार आवश्‍यक दस्‍तावेज पुरविणे आवश्‍यक होते.
  4.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, अपघाताच्‍या वेळी तक्रारकर्त्‍याचा  वाहन चालक श्री. राजु मिसार याच्‍याकडे वैध वाहन परवाना नव्‍हता. विरुध्‍द पक्षाला तक्रारकर्त्‍याच्‍या वाहन अपघाताची सूचना मिळताच विरुध्‍द पक्षाने वाहनाच्‍या तपासणीकरिता सर्वेअर म्‍हणून  श्री.पी.जी. भंडारी याची नियुक्‍ती केली. त्‍याप्रमाणे सर्वेअरने वाहनाची तपासणी केली व तक्रारकर्त्‍याशी चर्चा केल्‍यानंतर वाहनाच्‍या नुकसानीचे मुल्‍यांकन रु. 2,94,264/- काढले आणि तपासणी अहवाल विरुध्‍द पक्षाकडे दि. 01.06.2015 ला सादर केला होता. सदर तक्रारीचा न्‍यायनिवाडा करण्‍याकरिता सर्वेअर अहवाल अभिलेखावर दाखल केला आहे. तक्रारकर्त्‍याला वारंवांर सूचना देऊन ही तक्रारकर्त्‍याने  एफ.आय.आर.ची सत्‍यप्रत, घटनास्‍थळ पंचनामा, दुरुस्‍ती बिल / पावती लोड चालान, फिटनेस सर्टिफिकेट इत्‍यादी दस्‍तावेज सादर केले नाही. सदरचे  दस्‍तावेज तक्रारकर्त्‍याचा विमा दावा निकाली काढण्‍याकरिता आवश्‍यक आहे.
  5.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याच्‍या विमा दाव्‍याची छाननी करते वेळी असे लक्षात आले की, तक्रारकर्त्‍याच्‍या वाहन चालकाजवळ  असलेला वाहन परवाना हा LMV-Transport वाहन चालविण्‍याचा नसून HMV या वाहन चालविण्‍याचा परवाना आहे व त्‍याचा वाहन परवाना नं.  MH34/ 20080024310 आहे, ही बाब विमा पॉलिसीचे शर्त व अटीचे उल्‍लंघन करणारी आहे. तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनामध्‍ये 2 व्‍यक्‍तीनां बसण्‍याची परवानगी आहे. परंतु अपघाताच्‍या वेळी तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनामध्‍ये 3 व्‍यक्‍ती प्रवास करीत होते.  तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसीचे शर्तीचे उल्‍लंघन  केल्‍यामुळे तक्रारकर्ता विमा दावा मिळण्‍यास पात्र नाही, म्‍हणून सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विरुध्‍द पक्षाने विनंती केली आहे.
  6.    उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले व उभय पक्षांच्‍या  वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

मुद्दे                    उत्‍तर

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली कायॽ नाही

 

  1. काय आदेश ॽ                         अंतिम आदेशाप्रमाणे

  निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून  वाहन क्रं. MH 34 AB 8672 चा दि. 09.06.2014 ते 08.06.2015 या कालावधीकरिता विमामुल्‍य रक्‍कम रुपये 5,13,358/- करिता विमा पॉलिसी क्रं. 88054449 अन्‍वये विमा उतरविला होता याबाबत उभय पक्षात वाद नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाला दि. 26.06.2014 रोजी ट्रक क्रं. MH20/ AT-4403 ने धडक दिली, त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याचा वाहन चालक राजु मिसार हा वाहन चालवित होता व त्‍याच्‍याजवळ MH34/ 20080024310  हा Transport / HMV हे वाहन चालविण्‍याचा परवाना होता हे नि.क्रं. 2 (2) वर दाखल दस्‍तावजेवरुन दिसून येते.  मोटर वाहन कायदा 1988. चे Chapter II कलम 3(1) Necessity for driving licence या मथळयाखाली खालीलप्रमाणे नमूद आहे की, No person shall drive a motor vehicle in any public place unless he hold and effective licence issued to him authorising him to drive the vehicle; and no person shall so drive a transport vehicle [other than 1[a motor cab or motor cycle] hired for his own use or rented under any scheme made under sub-section (2) of section 75] unless his driving licence specifically entitles him  so to do .  

Driving licence’‘Driving licence’ means – the licence issued by a competent authority under Chapter II authorising the person specified therein to drive, otherwise than as a learner, a motor vehicle or a motor vehicle of any specified class or description; transport vehicle means a public service vehicle, a goods carriage, an educational institution bus or a private service vehicle’

  1.      यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्‍याच्‍या वाहन चालकाजवळ LMV (Light Motor Vehicle) चालविण्‍याचा वैध परवाना नसून HMV (Heavy Motor Vehicle) चालविण्‍याचा परवाना होता. म्‍हणून सदरहू वाहन चालकाकडे Effective valid licence नसल्‍याचे दिसून येते. तक्रारकर्त्‍याच्‍या वाहन  चालकाने Motor Vehicle Act मधील Chapter II मधील कलम 3 (1) चे उल्‍लंघन केले आहे. तक्रारकर्त्‍याने नि.क्रं. 2 (1)वर  दाखल दस्‍तावेजानुसार वाहनात 1+1=2 पॅसेंजर वाहून नेण्‍याची परवानगी असतांना तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनामध्‍ये अपघाताच्‍या वेळी 3 प्रवासी बसल्‍याची नोंद विरुध्‍द पक्षाने नि.क्रं. 11 (1) वर दाखल केलेल्‍या सर्वे अहवालात नमूद आहे. तसेच चिमूर पोलिसांनी केलेल्‍या घटनास्‍थळ पंचनामात अ.क्रं. 5 मध्‍ये 3 (तीन) अपघाताग्रस्‍त व्‍यक्‍तींची नांवे नमूद आहे.यावरुन तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसीच्‍या शर्ती व अटींचे उल्‍लंघन केल्‍याचे दिसून येते. सबब विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारुन कुठल्‍याही प्रकारची दोषपूर्ण सेवा दिलेली नाही असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे

     

  •            सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

ंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्याची तक्रार खारीज.

 

  1. उभय पक्षाने खर्चाचे वहन स्‍वतः सोसावे.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.