तक्रार क्रमांक – 21/2009 तक्रार दाखल दिनांक – 07/01/2009 निकालपञ दिनांक – 20/03/2010 कालावधी - 01वर्ष 02महिने 13दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर श्री. नितीन बाबुराव काले रा/202, बिल्डींग नं. C/4, अन्नपुरना नगर आधरवाडी जेल रोड, कल्याण(पश्चिम), जिल्हा - ठाणे. .. तक्रारदार विरूध्द 1. दि मॅनेजर इफको-टोकियो जनरल इंशुरन्स कं. लि., ऑफिसः- एएफएल हाऊस, 2रा फ्लोर, लोक भारती कॉम्प्लेक्स, मरोल मरोशी रोड, अंधेरी(पुर्व), मुंबई - 400059. .. विरुध्दपक्ष समक्ष - सौ. भावना पिसाळ - प्र.अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल ए.बी.मोरे वि.प तर्फे वकिल श्रीमती गिता यु. पांडे आदेश (पारित दिः 20/03/2010) मा. सदस्य श्री. पी. एन. शिरसाट, यांचे आदेशानुसार 1. तक्रारदाराने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार कलम 12 अन्वये दाखल केली असुन त्यातील कथन संक्षिप्तपणे खालीलप्रमाणेः- तक्रारदाराने त्यांची मोटारसायकल नं. MH-05-AN-5252हिचा कॉम्प्रोहेन्सिव्ह विमा पॉलिसी घेतली होती. विमा पॉलिसी नंबर 38773024 असा असुन तिचा कालावधी 21/04/2008 ते 20/04/2009 पर्यंत कार्यान्वीत होता. विमा पॉलिसीचे मुल्य रु.44,000/- एवढया रकमेतचे आहे. तक्रारदाराने रु.1,056.13 एवढी रक्कम विमा प्रिमियम म्हणुन विरुध्द पक्षकारास प्रदाण केली. दिनांक 28/09/2008 रोजी दुपारी 1 वाजता श्री.क.ह.देशपांडे हे 83 वर्षिय जेष्ठ नागरिक पाय घसरुन पडल्यामुळे त्यांच्या हनुवटीला मार लागुन त्यांच्या कानातुन रक्तस्त्राव होत असल्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातुन औषधोपचार घेण्यासाठी अन्नपुर्णा नगर येथील हॉस्पीटलमध्ये भरती करण्यासाठी घेऊन गेले. परंतु तेथे डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे पारनाका येथे डॉ. कौस्तुभ कापरेकर यांचे दवाखाण्यात भरती करण्यात आले. तक्रारदाराने उभी करुन ठेवलेली त्यांची मोटार सायकल 5 मिनीटामध्येच कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेली. तक्रारदाराने त्या परिसरामध्ये त्यांचे मोटर सायकलचा .. 2 .. शोध घेतला असता शोध लागला नाही. वाहन चोरीची तक्रार बाजारपेठ पोलिस स्टेशन कल्याण येथे CR no.133/2008 भारतिय दंड संहिता 379 नुसार सदरच्या गुन्हयाची नोंद करण्यात आली. विरुध्द पक्षकाराने तपास अधिकारी यांची नेमणुक केली. विरुध्द पक्षकार यांचे दिनांक 06/11/2008 रोजीच्या पत्रातील परिच्छेद 4 नुसार विमा दावा देता येणार नाही कारण गाडीमध्येच चाबी ठेवल्यामुळे तक्रारदाराने आपल्या वाहनाची योग्य काळजी घेतली नाही. म्हणुन विमा दावा नामंजुर करण्यात आला. तक्रारदार असे कथन करतात की, ते 83 वर्षिय जेष्ठ नागरिकाला त्यांच्या जिव वाचविण्यासाठी दवाखाण्यात भरती करण्यास गेले असतांना अनवधानाने गाडीची चाबी न घेता रोगी व्यक्तीस भरती केल्यानंतर त्वरीत परत जाण्यास निघाले असता वाहन अज्ञात इसमाने चोरले त्याची रितसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सदर गुन्हयाचे माननिय न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पहिले न्यायालय कल्याण यांनी ''अ'' वर्गात समरी मंजुर होणेबाबत शिफारस केली आहे. तक्रारदाराच्या मोटार बाइकची चोरी झाली त्याची विमा रक्कम मिळण्यासाठी विरुध्द पक्षकाराने दिनांक 06/11/2008 रोजी विमा दावा नामंजुर केला तेव्हा कारण घडले व ठिकाण कल्याण येथे असल्यामुळे ते ठिकाण ठाणे मंचाचे आर्थिक व भौगोलिक सिमाक्षेत्रामध्ये येत असल्यामुळे या मंचाला हि तक्रार चालविण्याचा व निर्णयीत करण्याचा पुर्ण अधिकार आहे असे कथन केले. तक्रारदाराची प्रार्थना खालीलप्रमाणेः- 1.तक्रारदाराचा विमा दावा रक्कम रु.44,000/- त्वरीत पारीत करणे . 2.दिनांक 27/07/2007 पासुन व्याज रक्कम द.सा.द.शे 12% दराने रु.5,280/- द्यावे. 3.विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.10,000/- नुकसान भरपाई द्यावे. 4.विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास न्यायिक खर्च रु.1,200/- द्यावा.
2. वरील तक्रारीची मंचाची नोटीस निशाणी 5 नुसार विरुध्द पक्षकारास पाठविली तक्रारदाराने नोटिस अहवाल निशाणी 6 व 7 नुसार दाखल केला. विरुध्द पक्षकाराने निशाणी 8 वर वकिलपत्र दाखल केले व निशाणी 9 वर लेखी जबाब दाखल केला व प्रतिज्ञापत्र निशाणी 12 वर दाखल केले, निशाणी 14 वर लेखी युक्तीवाद व कागदपत्रे निशाणी 15 वर दाखल केले. तक्रारदाराने तक्रारीसोबत खालील कागदपत्रे दाखल केली. 1.विमा पॉलिसी 2.पोलिस अहवाल व एफ.आय.आर 3.विमा दावा व वाहनाचे कागदपत्रे, 4.साक्षिदाराचे जबाब 5.विरुध्द पक्षकाराचे नो क्लेम पत्र तसेच तक्रारदाराने प्रत्युत्तर, प्रतिज्ञापत्र व लेखी युक्तीवाद दाखल केले.
.. 3 .. विरुध्द पक्षकाराने लेखी जबाब, प्रतिज्ञापत्र, कागदपत्रे व लेखी युक्तीवाद दाखल केले. विरुध्द पक्षकाराचे लेखी जबाबातील व लेखी युक्तीवादातील कथन खालील प्रमाणे तक्रार खोटी, बनावट व तापदायक आहे. तक्रारीचे कोणतेही कारण घडले नाही.विरुध्द पक्षकार तक्रारदारास विमा पॉलिसी दिली हे कबुल करतात. परंतु तक्रारदाराने विमा पॉलिसीतील अट क्रमांक 4 चे पालण केले नाही म्हणुन विमा दावा नामंजुर केला कारण तक्रारदाराने आपल्या वाहनाची योग्य ती काळजी घेतली नाही. तक्रारदाराची कोणतीही मागणी मान्य करता येणार नाही कारण विमा पॉलिसीचे अटीचे उल्लंघन केले त्यामुळे तक्रार रद्द ठरवावी व त्याची रक्कम विरुध्द पक्षकारास द्यावी. उभय पक्षकाराने दाखल केलेल्या कागदपत्राची सुक्ष्मरितीने पडताळणी व अवलोकन केले असता न्यायिक प्रक्रियेसाठी एकमेव मुद्दा उपस्थित होतो तो योणेप्रमाणेः- अ)विरुध्द पक्षकाराने सेवेमध्ये त्रृटी, न्युनता, बेजबाबदारपणा तथा हलगर्जीपणा केला हे तक्रारदार सिध्द करु शकले?उत्तर – होय. कारण मिमांसा अ) स्पष्टिकारणाचा मुद्दाः- या तक्रारीसंबंधी विरुध्द पक्षकाराकडुन कॉम्प्रोहेन्सिव्ह विमा पॉलीसी घेतली होती. विमा पॉलिसी नं.38773024 असा असुन कालावधी 21/04/2008 ते 20/04/2009 पर्यंत कार्यावित होता. विमा पॉलिसीचे मुल्य रु.44,000/- एवढे होते. तक्रारदाराने विमा प्रिमीयम रु.1,056.13 विरुध्द पक्षकारास अदा केला होता. वरील व्यवहारावरुन उभय पक्षकारामध्ये प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रक्ट होता व आहे. तसेच त्या व्यवहारासंबंधी उभय पक्षकारामध्ये कन्सीडरेशनही झाले होते. तक्रारदाराची मोटर सायकल नं.MH-05-AN-5252 हे वाहन 83 वर्षिय जेष्ठ नागरिक श्री. देशपांडे याचा अपघात झाल्यामुळे त्यांचे कानातुन भरपुर प्रमाणात रक्त वाहत होते त्यांना दवाखाण्यामध्ये भरती करण्यासाठी डॉ.कौस्तुभ कापरेकर यांचे दवाखाण्यात नेले. तेथे वाहनात अनवधानाने घाईगडबडीत चाबी राहिल्यामुळे 5 मिनीटात परत आले असता वाहन कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेले त्यांची रितसर चौकशी केली व रितसर बाजारपेट पोलिस स्टेशन कल्याण येथे तक्रार नोंदवली व गुन्हा CR No.133/2008 भारतीय दंड संहिता 379 नुसार दाखल केला नंतर सर्व कागदपत्रे विरुध्द पक्षकारास विमा दावा मिळण्यासाठी दाखल केले. विरुध्द पक्षकाराचे तपास अधिकारी यांनी चौकशी करुन तक्रारदाराने विमा पॉलिसी अट नं.4 चे उल्लंघन केले म्हणजे योग्य काळजी घेतली नाही म्हणुन विमा दावा नामंजुर केला. सदरच्या गुन्ह्याचे माननिय न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पहिले कार्यालय कल्याण यांनी बाजारपेठ पोलिस स्टेशन कल्याण गु.र.न I133/2008 भा.दं.वि.सं.क 379 बाबत सदर गुन्ह्याची ''अ'' वर्गात मंजुर करणेबाबत शिफारस आहे. सदर गुन्ह्याची ''अ'' समरी मध्ये नोंद केली असल्यामुळे विरुध्द पक्षकाराने विमा दावा पारीत करणे कायदेशिर, न्यायोचित व विधीयुक्त कर्तव्य आहे तसेच नैसर्गिक न्यायाचे दृष्टिकोनातुनही त्यांचे कर्तव्य आहे. तक्रारदाराने गाडीमध्ये .. 4 .. चाबी ठेवली व विमा पॉलिसी अट 4 नुसार दावा नामंजुर करणे बेकायदेशिर व अयोग्य कृति होणार आहे. विरुध्द पक्षकाराने अट 2 चे पालण करण्याऐवजी अट 3(अ) चे अनुपालण करणे आवश्यक व योग्य होणार आहे. Condition no.3 Quote” The company may at its own option repair reinstate or replace the vehicle or part there of and/or its accessories or may pay in cash the amount of the loss or damage and the liability of the company shall not exceed:- a) for total loss/constructive total loss of the vehicle. The insured's declared value (IDV) of the vehicle (including accessories thereon) as specified in the schedule less the value of the wreck. विरुध्द पक्षकाराने अट नं. 3(अ) चे पालण करुन तक्रारदाराचा विमादावा मान्य करणे न्यायोचित व वि धियुक्त आहे. तक्रारीमध्ये तथ्ये आणि सत्य आढळुन आल्याने व विरुध्द पक्षकाराने "UTMOST GOOD FAITH” ''संपुर्ण विश्वास'' या तत्वाचे पालण करुन तक्रारदाराचा विमा दावा पारित करणे न्यायोचित व विधीयुक्त व नैसर्गिक न्यायाचे दृष्टिकोनातुनही आवश्यक होणार आहे. त्या प्रित्यर्थ हे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. अंतीम आदेश
1. तक्रार क्र. 21/2009 हि अंशतः मंजुर करण्यात येत आहे. 2. विरुध्द पक्षकाराने तक्रारदाराचा विमा दावा रक्कम रु. 44,000/-(रु. चवेचाळीस हजार फक्त) मंजुर करावा व वरील रकमेवर दिनांक 26/07/2007 पासून 9% द.सा.द.शे व्याज द्यावे. 3.विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास रु.3,000/- (रु.तिन हजार फक्त) मानसिक नुकसानीपोटी भरपाई द्यावी. 4. विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास रु.1,000/-(रु. एक हजार फक्त) न्यायिक खर्च द्यावा. 5. वरील आदेशाची तामिली सही शिक्कयाची प्रत मिळाल्या तारखेपासुन 30 दिवसाचे आत परस्पर करावी( Direct Payment) अन्यथा वरील रकमेवर आदेश पारीत तारखेपासून जादा दंडात्मक व्याज 3% द.सा.द.शे देय होर्दल. 6. वरील आदेशाची सही शिक्कयाची प्रत उभय पक्षकारास निशुल्क द्यावी.
दिनांक – 20/03/2010 ठिकान - ठाणे
(सौ. भावना पिसाळ )(श्री.पी.एन.शिरसाट ) प्र.अध्यक्षा सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|