Maharashtra

Kolhapur

CC/20/84

Hotel Raj Executive - Complainant(s)

Versus

Iffco Tokio Gen Insu Co. and Other - Opp.Party(s)

D.B Patil

20 Jan 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/20/84
( Date of Filing : 07 Feb 2020 )
 
1. Hotel Raj Executive
Udagoan, Tal.Shirol
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Iffco Tokio Gen Insu Co. and Other
Shivajinagr, Sa
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 20 Jan 2023
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

(व्‍दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्‍या)

 

1.     तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे—

  

      मिळकतीचे वर्णन – जिल्‍हा सांगली, ता.शिरोळ पैकी उदगाव गावच्‍या हद्दीतील गट नं. 1463 व ग्रामपंचायत मिळकत नं. 2718 पैकी 4000 चौ.फू.मिळकत, बिगर शेती क्र. 1429/2017 या मिळकतीमध्‍ये तक्रारदार यांनी हॉटेल राज एक्झिक्‍यूटीव्‍हचे बांधकाम केले आहे.  सदर मिळकतीवर तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांचेकडून कर्ज घेतले होते.  सदर मिळकत ही महापुराने बाधीत झालेली असून तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 विमा कंपनीकडून विमा उतरविलेला होता. तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांचेकडून अटी  व शर्तीवर कर्ज घेवून रक्‍कम रु.20 लाख रकमेकरिता वादातील मिळकत तारण दिलेली होती.  संपूर्ण हॉटेल राज एक्झिक्‍यूटीव्‍हचा प्रकल्‍प रु.34,19,000/- इतक्‍या खर्चामध्‍ये निर्माण केलेला आहे.  या सर्वांमध्‍ये इमारतीचे संपूर्ण बांधकाम, प्‍लंबींग, फिटींग, प्‍लास्‍टर ऑफ पॅरिस याव्‍यतिरिक्‍त अंतर्गत हॉटेलच्‍या स्‍वयंपाक घरातील साहित्‍य, फर्निचर, इलेक्‍ट्रीक फीटींग, व कौशल्‍यावर आधारित नक्षीकाम इ. चा समावेश आहे.  तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांचेकडून सदर मिळकतीवर कर्ज घेतले असलेमुळे कर्जाच्‍या परतफेडीपोटी वि.प.क्र.2 यांनी आग, सुनामी, महापूर अशा कारणांकरिता वि.प.क्र.1 कंपनीकडून या प्रकल्‍पावर सन 2018 ते 2019 याकरिता विमा पॉलिसी नं. 12055167 अंतर्गत विमा उतरविलेला होता.  तक्राअर्जात नमूद वाद मिळकतीमध्‍ये ता. 6/8/2019 ते 15/8/19 मध्‍ये आलेल्‍या कृष्‍णा नदीच्‍या महापुरामुळे उपरोक्‍त साहित्‍य वाहून गेले व प्रकल्‍पाचे नुकसान होवून प्रचंड हानी झाली. सदरच्‍या प्रलयकारी महापुरामुळे प्रोजेक्‍ट/ हॉटेल पाण्‍याखाली नऊ दिवस होते.   तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 यांचेकडून नैसर्गिक आपत्‍ती, महापूर, आग, पाऊस, ऊन, वारा व त्‍याव्‍यतिरिक्‍त अनेक अपघाताकरिता विमा उतरविलेला होता.  सदरच्‍या महापुरामध्‍ये तक्रारदार यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.  त्‍याकरिता तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे नुकसान भरपाईची मागणी केली असता वि.प. यांनी रक्‍कम रु.4,00,913/- इतके देण्‍याचे मान्‍य केले.  परंतु प्रत्‍यक्षात नुकसानीची अत्‍यंत तोकडी रक्‍कम असलेमुळे तक्रारदार यांनी स्‍वीकारली नाही.  सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांच्‍याकडून संपूर्ण वाद मिळकतीचा विमा हप्‍ता स्‍वीकारुन देखील तक्रारदार यांना वाद मिळकतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असताना देखील सदरची नुकसान भरपाई विचारात न घेता अत्‍यंत अपुरी/तोकडी रक्‍कम देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली.  म्‍हणून तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.  सबब, तक्रारदार यांना रक्‍कम रु.20 लाख नुकसान भरपाई म्‍हणून वि.प.कडून मिळावेत अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. 

 

2.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत गट नं.1463 चा सातबारा उतारा, तक्रारदार यांचा परवाना, बिनशेती दंडाचा आदेश, विमा पॉलिसी, तक्रारदार यांनी नुकसानीबाबत केलेला अर्ज व नुकसानीचा तपशील, कर्ज खाते उतारा, टॅक्‍स इन्‍व्‍हॉईस, बिले इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

3.    वि.प. यांनी याकामी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्‍हणणे दाखल केले आहे.  वि.प. यांचे कथनानुसार, वि.प. क्र.2 यांनी सन 2018 ते 19 सालाकरिता हॉटेलची इमारत, फर्निचर इ. चा विमा वि.प. क्र.1 यांचेकडे उतरविलेला होता ही बाब मान्‍य केलली आहे.  तक्रारदार यांच्‍या क्‍लेमप्रमाणे वि.प. क्र.1 यांचे सर्व्‍हेअर मिलिंद मोडक यांनी दि.15/8/19 रोजी वाद मिळकतीची पाहणी केली.  मिलिंद मोडक यांनी केले सर्व्‍हेप्रमाणे तक्रारदार यांच्‍या हॉटेलमध्‍ये झाले इमारत, लाईट फिटींग याची  नुकसानीचे मूल्‍यांकन रु.6,08,603/- केले असून त्‍यामधून भंगाराची रक्‍कम रु. 5,503/- व दरवर्षी 10 टक्‍केप्रमाणे 3 वर्षाचे घसा-याची किंमत रु.1,80,910/- व मागणी रकमेवर 5 टक्‍के जादा रक्‍कम रु.21,109/- एवढी वजा करुन रक्‍कम रु. 4,01,182/- इतक्‍या रकमेच क्‍लेम मंजूर केला.  तसेच हॉटेलमध्‍ये चार-पाच दिवस थांबले पाण्‍यामुळे हॉटेलच्‍या भिंतीचे 8 ते 9 फूटापर्यंत नुकसान झाले.  या सर्व बाबी रिपेअरिंगकरिता येणे अशक्‍य असलेने त्‍या त्‍या रिपेअरिंगचा खर्च सर्व्‍हेअर यांनी मंजूर केला.  तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या इमारतीच्‍या भिंती प्‍लास्‍टर ऑफ पॅरीस व जमीनीच्‍या टाईल्‍सच्‍या एकूण दुरुस्‍तीची रक्‍कम रु. 5,45,514/- व त्‍यावरील जी.एस.टी. रु.98,193/- ची मागणी केली होती.  तथापि सर्व्‍हेअर यांनी प्रत्‍यक्ष जागेवर पाहणी करुन दुरुस्‍तीचा खर्च रु. 2,52,998/- देण्‍याची शिफारस केली आहे.  तक्रारदार यांच्‍या मागणीप्रमाणे रु.98,191/- अगर अन्‍य कोणतीही टॅक्‍सची रक्‍कम विमा देय होत नसलेने सदर टॅक्‍सची रक्‍कम नामंजूर केली आहे.  सबब, सर्व्‍हेअर यांनी तक्रारदार यांनी दाखविलेली कागदपत्रे व दुरुस्‍त करता येणा-या खुर्च्‍या व टेबल यांची पावडर कोटींग व दुरुस्‍ती करणे शक्‍य असलेने त्‍यांची दुरुस्‍तीची रक्‍कम रु.21,600/- देणेची शिफारस केली आहे. तसेच टेबल काऊंटरची मागणी  रक्‍कम रु. 1,10,000/- ऐवजी रक्‍कम रु. 90,000/- मंजूर केली आहे तसेच हॉटेलमधील पिकअप काऊंटर, टेबल, फ्रीज इ. ची पाहणी करुन रक्‍कम रु. 85,000/- तसेच हॉटेलचे एकूण स्‍वच्‍छतेसाठी रु. 10,000/- व फॅब्रिकेशनसाठी रु. 70,000/- एवढया रकमेची शिफारस केली आहे.   तसेच हॉटेलचे इमारतीची लागणारी दुरुस्‍तीचा खर्च, लाईट फिटींगची दुरुस्‍ती तसेच लागणारे नवे साहित्‍य, अल्‍युमिनियमचे फिटींग व पावडर कोटींग तसेच दुरुस्‍ती या सर्व बाबींचा विचार करुन प्रत्‍येक आयटेमप्रमाणे खर्च मंजूर केला असून तसा सर्व्‍हे रिपेार्ट दिला आहे,  सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्‍यात यावा अशी मागणी वि.प.क्र.1 यांनी केली आहे.

 

4.    वि.प. क्र.2 यांना प्रस्‍तुत तक्रारअर्जाची नोटीस लागू होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत व त्‍यांनी आपले म्‍हणणे दाखल केले नाही.  सबब, वि.प.क्र.2 यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश दि. 30/3/2021 रोजी पारीत करणेत आला.

 

5.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.यांचे म्‍हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्‍याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?     

होय.

3

तक्रारदार हे विमा रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

4

तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

5

अंतिम आदेश काय ?

अंशतः मंजूर.

 

 

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र. 1

 

6.    मिळकतीचे वर्णन – जिल्‍हा सांगली, ता.शिरोळ पैकी उदगाव गावच्‍या हद्दीतील गट नं. 1463 व ग्रामपंचायत मिळकत नं. 2718 पैकी 4000 चौ.फू.मिळकत, बिगर शेती क्र. 1429/2017 या मिळकतीमध्‍ये तक्रारदार यांनी हॉटेल राज एक्झिक्‍यूटीव्‍हचे बांधकाम केले आहे.  सदर मिळकतीवर तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांचेकडून कर्ज घेतले होते.  सदर मिळकत ही महापुराने बाधीत झालेली असून तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 विमा कंपनीकडून विमा उतरविलेला होता. तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांचेकडून अटी  व शर्तीवर कर्ज घेवून रक्‍कम रु.20 लाख रकमेकरिता वादातील मिळकत तारण दिलेली होती.  संपूर्ण हॉटेल राज एक्झिक्‍यूटीव्‍हचा प्रकल्‍प रु.34,19,000/- इतक्‍या खर्चामध्‍ये निर्माण केलेला आहे.  या सर्वांमध्‍ये इमारतीचे संपूर्ण बांधकाम, प्‍लंबींग, फिटींग, प्‍लास्‍टर ऑफ पॅरिस याव्‍यतिरिक्‍त अंतर्गत हॉटेलच्‍या स्‍वयंपाक घरातील साहित्‍य, फर्निचर, इलेक्‍ट्रीक फीटींग, व कौशल्‍यावर आधारित नक्षीकाम इ. चा समावेश आहे.  तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांचेकडून सदर मिळकतीवर कर्ज घेतले असलेमुळे कर्जाच्‍या परतफेडीपोटी वि.प.क्र.2 यांनी आग, सुनामी, महापूर अशा कारणांकरिता वि.प.क्र.1 कंपनीकडून या प्रकल्‍पावर सन 2018 ते 2019 याकरिता विमा पॉलिसी नं. 12055167 अंतर्गत विमा उतरविलेला होता.  त्‍याअनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत  अ.क्र.4 ला ता. 14/11/2018 रोजीची वि.प. विमा कंपनी यांचेकडे उतरविलेल्‍या विमा पॉलिसीची प्रत दाखल केलेली असून अ.क्र.8 ला वि.प. क्र.2 बँकेकडील ता. 13/12/2019 रोजीचा कर्ज खातेउतारा दाखल केलेला आहे.  सदरची कागदपत्रे वि.प. यांनी नाकारलेली नाहीत.  सबब, तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांचेकडे वादातील मिळकत तारण ठेवून कर्ज घेतले होते व सदर कर्जासाठी वि.प. क्र.1 यांचेकडून वि.प. क्र.2 मार्फत विमा उतरविलेला होता ही बाब दिसून येत असलेमुळे तक्रारदार हे वि.प.क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.   सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.2

 

7.    उपरोक्‍त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत.  प्रस्‍तुतकामी तक्राअर्जात नमूद वाद मिळकतीमध्‍ये ता. 6/8/2019 ते 15/8/19 मध्‍ये आलेल्‍या कृष्‍णा नदीच्‍या महापुरामुळे उपरोक्‍त साहित्‍य वाहून गेले व प्रकल्‍पाचे नुकसान होवून प्रचंड हानी झाली. सदरच्‍या प्रलयकारी महापुरामुळे प्रोजेक्‍ट/ हॉटेल पाण्‍याखाली नऊ दिवस होते.   तक्रारदार यांनी वि.प. क्र.1 यांचेकडून नैसर्गिक आपत्‍ती, महापूर, आग, पाऊस, ऊन, वारा व त्‍याव्‍यतिरिक्‍त अनेक अपघाताकरिता विमा उतरविलेला होता.  सदरच्‍या महापुरामध्‍ये तक्रारदार यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.  त्‍याकरिता तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे नुकसान भरपाईची मागणी केली असता वि.प. यांनी रक्‍कम रु.4,00,913/- इतके देण्‍याचे मान्‍य केले.  परंतु प्रत्‍यक्षात नुकसानीची अत्‍यंत तोकडी रक्‍कम असलेमुळे तक्रारदार यांनी स्‍वीकारली नाही.  सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांच्‍याकडून संपूर्ण वाद मिळकतीचा विमा हप्‍ता स्‍वीकारुन देखील तक्रारदार यांना वाद मिळकतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असताना देखील सदरची नुकसान भरपाई विचारात न घेता अत्‍यंत अपुरी/तोकडी रक्‍कम देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ?  हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  सदर मुद्याचे अनुषंगाने वि.प. यांनी दाखल केलेल्‍या म्‍हणण्‍याचे अवलोकन करता वि.प. क्र.2 यांनी सन 2018 ते 19 सालाकरिता हॉटेलची इमारत, फर्निचर इ. चा विमा वि.प. क्र.1 यांचेकडे उतरविलेला होता ही बाब मान्‍य केलली आहे.  तक्रारदार यांच्‍या क्‍लेमप्रमाणे वि.प. क्र.1 यांचे सर्व्‍हेअर मिलिंद मोडक यांनी दि.15/8/19 रोजी वाद मिळकतीची पाहणी केली.  मिलिंद मोडक यांनी केले सर्व्‍हेप्रमाणे तक्रारदार यांच्‍या हॉटेलमध्‍ये झाले इमारत, लाईट फिटींग याची  नुकसानीचे मूल्‍यांकन रु.6,08,603/- केले असून त्‍यामधून भंगाराची रक्‍कम रु. 5,503/- व दरवर्षी 10 टक्‍केप्रमाणे 3 वर्षाचे घसा-याची किंमत रु.1,80,910/- व मागणी रकमेवर 5 टक्‍के जादा रक्‍कम रु.21,109/- एवढी वजा करुन रक्‍कम रु. 4,01,182/- इतक्‍या रकमेच क्‍लेम मंजूर केला.  तसेच हॉटेलमध्‍ये चार-पाच दिवस थांबले पाण्‍यामुळे हॉटेलच्‍या भिंतीचे 8 ते 9 फूटापर्यंत नुकसान झाले.  या सर्व बाबी रिपेअरिंगकरिता येणे अशक्‍य असलेने त्‍या त्‍या रिपेअरिंगचा खर्च सर्व्‍हेअर यांनी मंजूर केला.  तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या इमारतीच्‍या भिंती प्‍लास्‍टर ऑफ पॅरीस व जमीनीच्‍या टाईल्‍सच्‍या एकूण दुरुस्‍तीची रक्‍कम रु. 5,45,514/- व त्‍यावरील जी.एस.टी. रु.98,193/- ची मागणी केली होती.  तथापि सर्व्‍हेअर यांनी प्रत्‍यक्ष जागेवर पाहणी करुन दुरुस्‍तीचा खर्च रु. 2,52,998/- देण्‍याची शिफारस केली आहे.  तक्रारदार यांच्‍या मागणीप्रमाणे रु.98,191/- अगर अन्‍य कोणतीही टॅक्‍सची रक्‍कम विमा देय होत नसलेने सदर टॅक्‍सची रक्‍कम नामंजूर केली आहे.  सबब, सर्व्‍हेअर यांनी तक्रारदार यांनी दाखविलेली कागदपत्रे व दुरुस्‍त करता येणा-या खुर्च्‍या व टेबल यांची पावडर कोटींग व दुरुस्‍ती करणे शक्‍य असलेने त्‍यांची दुरुस्‍तीची रक्‍कम रु.21,600/- देणेची शिफारस केली आहे. तसेच टेबल काऊंटरची मागणी  रक्‍कम रु. 1,10,000/- ऐवजी रक्‍कम रु. 90,000/- मंजूर केली आहे तसेच हॉटेलमधील पिकअप काऊंटर, टेबल, फ्रीज इ. ची पाहणी करुन रक्‍कम रु. 85,000/- तसेच हॉटेलचे एकूण स्‍वच्‍छतेसाठी रु. 10,000/- व फॅब्रिकेशनसाठी रु. 70,000/- एवढया रकमेची शि      फारस केली आहे.   तसेच हॉटेलचे इमारतीची लागणारी दुरुस्‍तीचा खर्च, लाईट फिटींगची दुरुस्‍ती तसेच लागणारे नवे साहित्‍य, अल्‍युमिनियमचे फिटींग व पावडर कोटींग तसेच दुरुस्‍ती या सर्व बाबींचा विचार करुन प्रत्‍येक आयटेमप्रमाणे खर्च मंजूर केला असून तसा सर्व्‍हे रिपेार्ट दिला आहे असे वि.प. क्र.1 यांनी म्‍हणणे दाखल केले आहे.

 

8.    सबब, तक्रारदारांची तक्रार व त्‍यासोबतचे कागदपत्रे यांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वाद मिळकतीचा सातबारा उतारा, तक्रारदार यांचे नावचे परवान्‍याचे नूतनीकरणाचे पत्र व तक्रारदार यांनी मा.तहसिलदार यांचेकडील अनाधिकृत बिनशेतीचा दंडाचा आदेश हे कागदपत्रे दाखल केले आहेत.  प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या ता. 9/11/2019 रोजीच्‍या मिलिंद मोडक यांच्‍या सर्व्‍हे रिपोर्टचे अवलोकन करता

      -    The reported damages/loss of building, furniture and equipment due to flood

                  occurred 6/8/19

  • First visit  15/8/19   -  
  • Equipments furniture and building was affected due to flood water.  Flood water inside the premises is about 8 to 9 ft.    The hotel was flooded with water for 4 to 5 days.

 

  • At the time of first visit some furniture which were lying on an open space are flown away in the flood water.

 

  • Insured location is very near to river side and hence flow of water is very high, in which even metal equipments also flown away from the building in the nearby farm. To locate the equipment is very difficult to search as all farms are sugarcane farms.    

 

सबब, तक्रारदार यांच्‍या वादातील मिळकतीमध्‍ये ता.6/8/2021 रोजी महापूर आलेला असून वि.प. क्र.1 यांचे सर्व्‍हेअर यांनी सदर मिळकतीमध्‍ये दि.15/8/19 रोजी पहिली भेट दिलेली आहे. सदर दिवशी महापुराची पाणी पातळी सदर मिळकतीमध्‍ये 8 ते 9 फूट होती.  तसेच वादातील मिळकत ही नदीच्‍या जवळ असून पाण्‍याचा प्रवाह जास्‍त असलेमुळे लोखंडी साहित्‍य देखील सदर प्रवाहाबरोबर मिळकतीच्‍या शेजारी शेतामध्‍ये वाहून गेलेले असून सदरचे साहित्‍य ऊसाचे शेत जवळ असलेमुळे मिळून आलेले नाही असे सदर सर्व्‍हे रिपेार्टमध्‍ये नमूद आहे. सदर सर्व्‍हे रिपोर्टच्‍या अनुषंगाने तक्रारदार यांनी दि.30/3/2021 रोजी दाखल केलेल्‍या पुरावा शपथपत्राचे अवलोकन करता, 

 

      वि.प. क्र.1 यांनी माझे हॉटेलचे झालेले नुकसान हे समजून घेतले नाही कारण प्रलयकारी हॉटेल पाण्‍याखाली नऊ दिवस होते. परंतु सर्व्‍हेअर मोडक यांनी फक्‍त 6 दिवस घेतला आहे. पाणी पातळी जमीनीपासून 11 फूट इतक्‍या उंचीवर होती. यास्‍तव प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.  ते खालीलप्रमाणे -

 

1) फर्निचर, फिक्‍चर व फिटींग -

महापुराचे पाणी वाहते असलेमुळे हॉटेलपर्यंत जाणे अशक्‍य होते, त्‍यामुळे हॉटेलमधील आतील व बाहेरील साहित्‍य वाचवणे अथवा थांबवणे अशक्‍य होते.  तरीसुध्‍दा मला सदरचे साहित्‍य वाचविण्‍याची संधी मिळाली नाही.  हॉटेलमधील इलेक्‍ट्रीकल साहित्‍य, किचन आयटेम्‍स/साहित्‍य, बिअर व दारुच्‍या बाटल्‍या इ. साहित्‍य महापुरामध्‍ये वाहून गेले तर हॉटेलच्‍या भिंती व लाकडी फर्निचर, पीओपी, इलेक्‍ट्रीकल साहित्‍याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.  महापूर ओसरल्‍यानंतर सदरच्‍या वस्‍तू शोधण्‍याचा प्रयत्‍न केला व मिळून आल्‍या नाहीत.

 

2)  इलेक्‍ट्रॉनिक व इलेक्‍ट्रीक फिटींग –

इन्‍व्‍हर्टर, बॅटरी, महागडे लाईट, बल्‍ब्‍स, छताला बसवलेले झुंबर, रंगीबेरंगी एलईडी बल्‍ब्‍स, गिझर, वॉटर प्‍युरिफायर, आटा चक्‍की,  मिक्‍सर अशा प्रकारचे साहित्‍य महापुरामध्‍ये 10 ते 11 दिवसा राहिल्‍यामुळे त्‍यांचे प्रचंड नुकसान झाले.

 

3)  इमारत

      इमारतीमधील प्‍लोटींग, भिंती व भिंतीवर केलेल्‍या कलाकुसरी, वॉलपुट्टी, आकर्षक कलर, छताखालील पीओपी हे सर्व मटेरियल तूटून खराब झाले, इमारत काळया जमीनीवर उभी असल्‍यामुळे पाण्‍याच्‍या प्रेशरमुळे भिंती एकमेकांपासून सुटलेल्‍या होत्‍या. सदरच्‍या भिंती डागडुजी करुन दुरुस्‍त होण्‍यासारख्या नाहीत.

 

4) अॅल्‍युनिमिनिअम फिटींग –

इमारतीच्‍या चारी बाजूला असणा-या खिडक्‍या, ज्‍यासाठी वापरणेत आलेल्‍या काचा, अल्‍युमिनिअमच्‍या फ्रेम, त्‍यासाठी केलेल पावडर कोटींग व पीओपी साठी केलेले अल्‍युमिनिअम, त्‍याचे पुरामध्‍ये तुटून मोडतोड झालेली आहे, ती आहे त्‍या परिस्थितीत वापरणेस योग्‍य नाही. 

 

असे तक्रारदार यांनी शपथपत्रामध्‍ये नमूद केले असून सदर नुकसान भरपाईपोटी अंदाजे रक्‍कम 30,38,651/- नमूद केलेली आहे.  सबब, दाखल सर्व्‍हे रिपोर्ट व तक्रारदारांचे पुराव्‍याचे शपथपत्र याचे अवलोकन करता वाद मिळकतीमधील प्रलयकारी महापुरामुळे पाणी जमीनीपासून जास्‍त उंचीवर राहिलेमुळे तक्रारदार यांच्‍या साहित्‍याचे नुकसान झालेले असून सदरच्‍या साहित्‍यामधील काही साहित्‍य हे सदरच्‍या पुरामध्‍ये वाहून गेलेले असून ते अद्याप सापडलेले नाही ही बाब सिध्‍द होते. 

 

      प्रस्‍तुतकामी सदर सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये,

      Estimated loss /damage

      The insured estimated the loss as under :

      Furniture  Rs.10,20,000/-

            Electrical fitting Rs.80,000/-

            Building Rs.7,16,788/-

            Kitchen items Rs.5,95,108/-

 

असे नमूद असून असेसमेंटमध्‍ये

 

Assessment

 

After inspection of the affected hotel, verification of record, physical verification of debris and discussion with insured, we have assessed the loss

 

Gross loss assessed – Rs.6,86,003/-

Less salvage –             Rs.5,503/-

Total                            Rs.6,31,000/-

 

असे नमूद आहे.  सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांचा वाद मिळकतीची नुकसानभरपाई ही रु.4,10,062/- इतकी मान्‍य केली आहे.  तथापि सदर सर्व्‍हे रिपोर्टच्‍या अनुषंगाने तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी अ.क्र.9 ला तक्रारदार यांनी हॉटेलकरिता जयदत्‍त अल्‍युमिनिअम, इचलकरंजी, यांचेकडून खरेदी घेतलेल्‍या मालाची इन्‍व्‍हॉईसची अस्‍सल प्रत दाखल केलेली आहे.  अ.क्र.11 ते 15 ला मे. के.जी.हरळीकर यांचेकडून खरेदी केलेले पेंट व त्‍याअनुषंगिक साहित्‍याची टॅक्‍स इन्‍व्‍हॉइस दाखल केलेल असून त्‍याप्रमाणे बिले दिल्‍याबाबतची संगणकीय सही दिसून येते.  अ.क्र.16 ला वाद मिळकतीचे न्‍यू प्‍लॅनेट कॉन्‍ट्रॅक्‍टर नसीबुल्‍ला खान यांचेकडून पी.ओ.पी. करुन घेतलेचे बिल दाखल केले आहे. अ.क्र.17 व 18 ला डायनॅमिक इंजिनिअरिंग वर्क्‍स यांचेकडील अस्‍सल इन्‍व्‍हॉइसचे बिल दाखल केले आहे.  अ.क्र.19 ते 21 ला सिध्‍दनाथ फॅब्रिकेटर्स यांनी हॉटेलच्‍या केलेल्‍या कामाची बिले दाखल केलेली असून त्‍यावर त्‍यांची सही व शिक्‍का आहे.  अ.क्र.22 ते 26 ला मयूर फर्निचर्स माधवनगर यांचेकडील हॉटेलमध्‍ये केलेल्‍या फर्निचरची बिले दाखल असून त्‍यावर मयूर फर्निचर प्रोप्रायटर यांची सही व शिक्‍का आहे.  अ.क्र.27 ते 32 ला जिनेश्‍वर प्‍लायवूड सेंटर यांचेकडे सदर हॉटेलसाठी खरेदी केलेल्‍या खुर्च्‍या, प्‍लायवूड, टेबल, काऊंटरची अस्‍सल बिले दाखल केली असून त्‍यावर स्‍वीकारणार म्‍हणून त्‍यांची सही व शिक्‍का आहे.  अ.क्र.33 ते 39 पर्यंत आग्रवार आणि कंपनी सांगली यांचेकडे हॉटेलचे स्‍वयंपाकघर साठी खरेदी केलेल्‍या मिक्‍सर, गिझर, कुकर, आटा ग्राईंडर अशा प्रकारचे साहित्‍य अस्‍सल बिले दाखल केली आहेत.  अ.क्र.40 ला सी. इंजिनिअर अॅण्‍ड कॉन्‍ट्रॅक्‍टर, पुणे यांचेकडून महापुरामुळे झालेल्‍या नुकसानीबाबत करुन घेतलेल्‍या दुरुस्‍तीचे बिल हजर केले आहे, त्‍यावर सही शिक्‍का आहे.  सदरची कागदपत्रे तक्रारदार यांनी पुरावा शपथपत्रावर कथन केली आहेत.  प्रस्‍तुतकामी अ.क्र. 4 ला वि.प. यांनी तक्रारदार यांना सन 2018 ते 19 सालामध्‍ये विमा पॉलिसी उतरविल्‍याचे मान्‍य केले असून सदर पॉलिसीचे अवलोकन करता -

 

                                             Sum insured Rs.

Material damage –                        4400000/-

Building                                        3100000/-

Furniture, Fixture and fittings             900000/-

Plant, machinery and accessories          400000/-

 

सबब, सदर पॉलसी अंतर्गत वि.प. यांनी इमारत, फर्निचर, अंतर्गत साहित्‍य, फिटींग, प्रकल्‍प, मशीन व त्‍याबाबतच्‍या पार्टकरिता विमा उतरविलेला होता ही बाब दिसून येते.  तसेच महापुर, आग, शॉक, अंतर्गत संपूर्ण साहित्‍य हे सदर पॉलिसी अंतर्गत कव्‍हर होत असलेची बाब दिसून येते. 

 

9.    प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारदारतर्फे विनायक राजाराम यादव, हॉटेल मॅनेजर यांचे शपथपत्र दाखल केलेले असून सदर शपथपत्राचे अवलोकन करता

       हॉटलेच्‍या आतमध्‍ये लागडी  फर्निचर, पीओपी स्‍ट्रक्‍चर, इलेक्‍ट्रीक मोटर, इलेक्‍ट्रॉनिक साहित्‍य उदा. एलईडी बल्‍ब स्‍ट्रीप, किचनमधील साहित्‍य, देशी विदेशी मद्य, हॉटेलमधील स्‍वयंपाकघरातील मिक्‍सर ग्राईंडर, कचरा स्‍वच्‍छता मशीन, राईस कुकर, आटा ग्राईंडर, तंदूर भट्टी, गॅस शेगडया व सिलेंडर या व्‍यतिरिक्‍त फॅब्रिकेशन मटेरियल, हॉटेल बाहेर व हॉटेलमध्‍ये केलेली वेगवेगळया साहित्‍यांची सजावळ या व्‍यतिरिक्‍त टेबल, खुर्च्‍या, लागडी काऊंटर असे सर्व प्रकारचे साहित्‍य दुर्दैवाने दि. 6/8/2019 ते 15/08/2019 मध्‍ये आलेल्‍या कृष्‍णा नदीच्‍या महापुराने वाहून गेले व प्रकल्‍पाची इमारत अंतर्गत व बाहय साहित्‍य यांचे नुकसान होवून प्रचंड प्रमाणात हानी झालेली आहे.  सदरचे नुकसान माझे समक्ष झालेले आहे. वि.प. क्र.1 यांनी झालेले नुकसान हे समजून घेतले नाही कारण प्रलयकारी महापुरामुळे सर्व हॉटेल पाण्‍याखाली 9 दिवस होते परंतु सर्व्‍हेअर मोडक यांनी फक्‍त 6 दिवस घेतला आहे. पाणी पातळी जमीनीपासून 11 फूट इतक्‍या उंचीवर होती.  या कारणाने सदर मिळकतीमध्‍ये फर्निचर, फिक्‍चर व फिटींग्‍ज, इलेक्‍ट्रॉनिक व इलेक्‍ट्रीक फिटींग, इमारत, अल्‍युमिनिअम फिटींग याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे.  तक्रारदार यांनी हजर केलेले सर्व कागद मी पाहिले असून त्‍यावर प्रत्‍यक्ष ज्‍या त्‍या संबंधीत कंपनीचा, फॅबिक्रटर्स, अॅथोराईज्‍ड सिग्‍नेटरी, वस्‍तू व माल देणा-या दुकानदार कंपनी यांच्‍या यांची सही व शिक्‍का असून त्‍यातील मजकूर खरा व बरोबर आहे असे पुरावा शपथपत्र तक्रारदारतर्फे साक्षीदार विनायक राजाराम यादव यांनी दाखल केले आहे.  सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता सदरची मिळकत ही 9 दिवस पाण्‍याखाली असून पाणी पातळी जमीनीपासून 11 फूट इतक्‍या उंचीवर असून त्‍यामुळे मिळकतीमध्‍ये असणा-या सर्व मालाचे व इमारतीचे नुकसान झालेची बाब नाकारता येत नाही.  प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी ता. 29/8/2019 रोजीचा महसूल अधिका-यांनी त्यांच्‍या मिळकतीबाबत नुकसान झालेल्‍या वस्‍तुस्थितीचा पंचनामा तसेच सदर महापुरातील वस्‍तुस्थिती दर्शविणारा फोटो दाखल केलेला आहे.

 

10.   सदर पंचनाम्‍यासोबत तक्रारदार यांनी तलाठी यांना पुराचे पाणी व्‍यवसायाच्‍या ठिकाणी शिरल्‍याने  नुकसानीबाबत तपशील दिलेला असून सदर तपशीलामध्‍ये तक्रारदार यांनी सदर हॉटेलमध्‍ये झालेल्‍या एकूण नुकसानभरपाईची रक्‍कम रु.21,18,330/- ची मागणी केलेली आहे. तथापि सदर पंचनाम्‍याचे अवलोकन करता तलाठी यांनी सदर पंचनाम्‍यामध्‍ये

 

      नुकसानीचा तपशील आणि पंचनाम्‍यातील नुकसनीची रक्‍कम

 

      फर्निचर, डायनिंग टेबल, खुर्च्‍या     रु.4,15,000/-

पीओपी स्‍ट्रक्‍चर                  रु.  65,000/-

इलेक्‍ट्रीकल मोटर                रु.4,65,000/-

इलेक्‍ट्रीकल फिटींग साहित्‍य        रु.  75,000/-

सिलेंडर दोन                    रु.   6,000/-

अन्‍न धान्‍य                     रु.  75,000/-

     एकूण नुकसानभरपाई रक्‍कम रु.16,01,000/-

नमूद केलेली असून सदर पंचनाम्‍यावर पंच म्‍हणून शिवाजी गणपती कोळी आणि विनायक राजाराम यादव यांची सही आहे तसेच तलाठी व ग्रामसेवक यांची सही आहे.  तसेच शिवाजी गणपती कोळी, पंच यांचे पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले असून सदर पुरावा शपथपत्राचे अवलोकन करता

महापुरामध्‍ये सदर हॉटेलसमोर 20 टन लोड कंटेनर वाहून गेलाहोता त्‍यामुळे तक्रारदार यांच्‍या हॉटेलमधील संपूर्ण साहित्‍य दारु बाटल्‍या वाहून गेले.  प्रकल्‍पाच्‍या इमारतीच्‍या अंतर्गत व बाहय साहित्‍य व भिंतींचे प्रचंड नुकसान झाले होते.  महापुरामुळे व्‍यवसायाचे नुकसान झालेले आहे त्‍याकरिता महसूल वि भागाच्‍या अधिका-यांनी महाराष्‍ट्र  शासनाला झालेल्‍या नुकसानीबाबत पंचनामा करण्‍याचे आदेश दिले होते.  त्‍यावेळी तक्रारदार यांच्‍या गट नं.1463 म्‍हणजे मिळकत नं. 2718 ची मिळकत इमारत साहित्‍य पंचनामा केला त्‍यावेळी मी स्‍वतः आणि हिदायत अहमद नदाफ पंच म्‍हणून काम पाहिले. तो पंचनामा मी हजर केला आहे.  सदर पंचनामेवर गावकामगार तलाठी व तत्‍कालीन ग्रामसेवक यांची सही आहे.  तक्रारदार यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे त्‍याप्रमाणे त्‍यांची नुकसान भरपाईकरिता केलेली मागणी योग्य व बरोबर आहे. 

 

असे नमूद असून सबब, सदर पंचनाम्‍यानुसार तक्रारदार यांना सदर महापुरापोटी एकूण नुकसान भरपाई रक्‍कम रु.16,01,000/- पंचनाम्‍यात मान्‍य केलेली आहे.

 

11.   प्रस्‍तुतकामी सदर सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये तक्रारदार यांनी झालेल्‍या नुकसानीचे इस्‍टीमेट नमूद आहे.  तथापि सर्व्‍हेअर यांनी खुर्च्‍या, टेबल, पावडर कोटींग व इतर साहित्‍य यांची दुरुस्‍ती करणे शक्‍य असलेने केवळ दुरुस्‍तीच्‍या खर्चाची रक्‍कम मंजूर केली आहे तसेच हॉटेलच्‍या इमारतीसाठी लागणारे दुरुस्तीचा खर्च तसेच लाइट फिटींग, अॅल्‍युमिनिअम व पावडर कोटींग या सर्व गोष्‍टींचा दुरुस्तीचा खर्च नमूद असून असून त्‍याप्रमाणे नुकसान निश्चित करताना तीन वर्षाचा घसारा तसेच भंगाराची रक्‍कम विचारात घेतली आहे.  तथापि वरील सर्व कागदपत्रांचा बारकाईने विचार करता तक्रारदार यांच्‍या वाद मिळकतीपासून नदी जवळ असलेने तसेच महापुरातील पाण्‍याचा प्रवाह हा जास्‍त असलेने मिळकतीमधील लोखंडी साहित्‍य देखील सदर मिळकतीमधून जवळ असणा-या शेतामध्‍ये वाहून गेलेले आहे.  वाद मिळकतीजवळ ऊसाचे शेत असलेमुळे सदरचे साहित्‍य मिळणे अत्‍यंत अडचणीचे असलेचे सदरच्‍या सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये सर्व्‍हेअर यांनी मान्‍य केलेले आहे.  तसेच तक्रारदार यांनी व साक्षीदार यांनी त्‍यांचे पुरावा शपथपत्रामध्‍ये वाद मिळकतीतील फर्निचर, फिटींग इ. चे महापुराचे पाणी साधारणतः 10 ते 11 दिवस राहिल्‍यामुळे प्रचंड नुकसान झालेचे नमूद केले आहे.  या सर्व बाबींचा विचार करता सदर सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये सर्व्‍हेअर यांनी तक्रारदार यांनी एकूण नुकसान भरपाईच्‍या अनुषंगाने इस्टिमेट दिलेले असून सर्व्‍हेअर यांनी वाद मिळकतीतील नुकसान भरपाईचे असेसमेंटमध्‍ये Gross loss assess हे केवळ तक्रारदार यांनी सदर सर्व्‍हेअर यांनी दाखविलेल्‍या कागदपत्रांवरुन दुरुस्‍त करता येणा-या वस्‍तूंच्‍या दुरुस्‍तीचा खर्च मंजूर करुन केलेला आहे.  सबब, सदरचे तक्रारदार यांचे मिळकतीमध्‍ये झालेले संपूर्ण नुकसान हे केवळ तक्रारदार हे दुरुस्‍त करुन घेतील असा अंदाज बांधून सदर सर्व्‍हेअरने दुरुस्‍ती खर्च मंजूर केला आहे तथापि दाखल कागदपत्रांवरुन सदर मिळकतीमध्‍ये तक्रारदार यांचे प्रचंड नुकसान झालेचे दिसून येते.  त्‍याकारणाने केवळ दुरुस्‍त खर्च मंजूर करणे या आयेागास न्‍यायोचित वाटत नाही.  तसेच वि.प. यांचे विमा पॉलिसीचे अटी व शर्तीमध्‍ये विमाधारकास झालेल्‍या नुकसानीपोटी केवळ सदरचे नुकसानीची दुरुस्‍ती अदा करणे असे नमूद नाही. त्‍याकारणाने सर्व्‍हेअर यांनी तक्रारदारास सदर महापुरात नुकसानीपोटी केवळ नुकसानग्रस्‍त वस्‍तूंचे दुरुस्‍ती रक्‍कम अदा करणे अयोग्‍य आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  तथापि तक्रारदार यांनी सदर तक्रारीसोबत दाखल केलेली टॅक्‍स इन्‍व्‍हॉईस व बिले ही सदरचा महापूर येण्‍यापूर्वीची सन 2017 ची असलेने सदरच्‍या बिलावरुन तसेच सदर कामी दाखल केलेल्‍या पंचनाम्‍यावरुन वादातील मिळकतीचे नुकसान हे पंचनाम्‍यामध्‍ये नमूद फर्निचर, डायनिंग टेबल्‍स, खुर्च्‍या, इलेक्‍ट्रीक फिटींग, साहित्‍य,  सिलेंडरचे दोन नग यांचा विचार करता रु.16,01,000/- इतकी रक्‍कम सदर पंचनाम्‍यामध्‍ये नमूद आहे. तथापि दारुचा स्‍टॉक हा सदर विमा पॉलिसी अंतर्गत नसलेने सदरची रक्‍कम वजा करुन तक्रारदार हे रु.15,51,000/- इतकी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत. 

 

12.   प्रस्‍तुतकामी वि.प. यांनी न्‍यायनिवाडा दाखल केला असून

 

National Consumer 24 May 2020

Tarun Parikh

    Vs.

Divisional manager, Oriental Insurance Co.Ltd.

 

Further it is settled position that the report submitted by a surveyor is an important evidence and has though it is not sacrosanct and can be ignored provided that there is cognate evidence otherwise.  In absence of any evidence, to the contrary, the amount assessed by surveyor as has been accepted by opp. party insurance is to be accepted. 

 

सबब, सदर निवाडयाचा विचार करता प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी वाद मिळकतीतील नुकसान भरपाई झाल्‍याच्‍या अनुषंगाने इन्‍व्‍हॉईस टॅक्‍स व पावत्‍या तक्रारीसोबत दाखल केलेले आहेत.  सदरच्‍या पावत्‍या वि.प. यांनी नाकारलेल्‍या नाहीत.  सबब, या सर्व बाबींचा विचार करता सदर कामी तक्रारदार यांनी प्रस्‍तुतकामी cognate evidence/ टॅक्‍स इन्‍व्‍हॉईस, पावत्‍या तसेच पंचनामा व त्‍यासोबतचे पंचाचे पुरावा शपथपत्र दाखल केले असल्यामुळे सदरचा निवाडा या तक्रारीस लागू होत नाही.  सबब, प्रस्‍तुतकामी सदर दाखल टॅक्‍स इन्‍व्‍हॉईस व पावत्‍यांवरुन तक्रारदार यांनी वादातील साहित्‍य हे 2017 मध्‍ये खरेदी केलेचे दिसून येते.  त्‍या कारणाने तक्रारदार हे एकूण नुकसान भरपाई रु.15,51,000/- व दरवर्षीप्रमाणे 10 टक्‍के प्रमाणे दोन वर्षाच्‍या घसा-याची किंमत वजा जाता उर्वरीत रक्‍कम मिळणेस पात्र आहेत.   सबब, वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांच्‍याकडून संपूर्ण वाद मिळकतीचा विमा हप्‍ता स्‍वीकारुन देखील तक्रारदार यांना वाद मिळकतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असताना देखील सदरची नुकसान भरपाई विचारात न घेता अत्‍यंत अपुरी/तोकडी रक्‍कम देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.  तथापि तक्रारदार यांनी प्रस्‍तुतकामी वि.प.क्र.2 यांचेकडून मिळकतीवर कर्ज घेतले असलेमुळे कर्जाच्‍या परतफेडीपोटी वि.प.क्र.2 यांनी आग, सुनामी, महापूर अशा कारणाकरिता वि.प.क्र.1 यांचेकडून विमा उतरविलेला होता.  त्‍याकारणाने महापुरापोटी झालेल्‍या नुकसानीची जबाबदारी ही वि.प.क्र.1 विमा कंपनी यांचीच आहे तसेच तक्रारदार यांनीही सदर तक्रारीत वि.प.क्र.1 यांचेकडूनच नुकसान भरपाईच्‍या रकमेची मागणी केलेली आहे. सबब, केवळ वि.प.क्र.2 यांच्‍याकडून कर्ज घेतले असलेमुळे तक्रारदार यांनी वि.प.क्र.2 यांना आवश्‍यक पक्षकार केलेले असलेमुळे हे आयोग वि.प.क्र.2 यांना याकामी जबाबदार धरत नाही.

 

13.   सबब, तक्रारदार हे वि.प. क्र.1 यांचेकडून रक्‍कम रु. 15,51,000/- मिळणेस पात्र आहेत.  तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 10/02/2020 पासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के प्रमाणे व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.4

 

14.   वि.प. क्र.1 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने सदरच्‍या महापुरामुळे तक्रारदार यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले तसेच तक्रारदार हे वि.प. क्र.2 या वित्‍तीय संस्‍थेचे हप्‍ते भरु शकले नाहीत त्‍या कारणाने झालेल्‍या मानसिक त्रासापोटी तक्रारदार हे वि.प. क्र.1 यांचेकडून रक्‍कम रु.20,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.10,000/- मिळणेस पात्र आहेत.  सबब, मुद्दा क्र.4 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.5  -  सबब आदेश.

 

 

- आ दे श -

 

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो. 

 

  1. वि.प.क्र.1 विमा कंपनीने तक्रारदार यांना विमा पॉलिसी क्र. 12055167 अं‍तर्गत एकूण नुकसान भरपाईची रक्‍कम रु.15,51,000/- मधून दरवर्षीप्रमाणे 10 टक्‍के प्रमाणे दोन वर्षाच्‍या घसा-याची किंमत वजा जाता उर्वरीत संपूर्ण रक्‍कम अदा करावी व सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 10/02/2020 पासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.

 

  1. वि.प. क्र.1 विमा कंपनी यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.20,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.10,000/- अदा करावी. 

 

  1. वि.प.क्र.2 यांचेविरुध्‍द कोणतेही आदेश नाहीत.

 

  1. वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प.क्र.1 यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

  1. विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींअन्‍वये वि.प. विरुध्‍द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

  1. आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.