Maharashtra

Thane

CC/09/453

MANGILAL V. CHOUDHARY - Complainant(s)

Versus

IFCO TOKIO GEN INS CO. LTD. - Opp.Party(s)

03 Apr 2010

ORDER


.
CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, THANE. Room No.214, 2nd Floor, Collector Office, Court Naka, Thane(W)
consumer case(CC) No. CC/09/453

MANGILAL V. CHOUDHARY
...........Appellant(s)

Vs.

IFCO TOKIO GEN INS CO. LTD.
...........Respondent(s)


BEFORE:


Complainant(s)/Appellant(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):




ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

तक्रार क्रमांक – 453/2009

तक्रार दाखल दिनांक – 01/07/2009

निकालपञ दिनांक – 03/04/2010

कालावधी - 00वर्ष 09महिने 02दिवस

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर

श्री. मां‍गीलाल वरदाजी चौधरी

रा. जगदंबा प्रोव्‍हीजन स्‍टोर्स, शॉप नं. 3,

जानकी पॅलेस को. ऑप. हौ.सो लि,.

खारेगाव, कळवा, ठाणे 400 605. .. तक्रारदार

विरूध्‍द

जनरल मॅनेजर

इफको टाकीया जनरल इन्‍शुरन्‍स कं.लि.,

एएफएल हाऊस, 2रा मजला, लोकभारती कॉम्‍प्‍लेक्‍स

मरोळ मरोशी रोड, अंधेरी (पुर्व),

मुंबई 400 059.. .. विरुध्‍दपक्ष

समक्ष - सौ.शशिकला श.पाटील - अध्‍यक्षा

श्री. पी. एन. शिरसाट - सदस्‍य

उपस्थितीः- .‍क तर्फे वकिल सुधाकर पवार

वि.प तर्फे वकिल श्री.के. के. अगरवाल

आदेश

(पारित दिः 03/04/‍2010)

मा. सदस्‍य श्री. पी. एन. शिरसाट, यांचे आदेशानुसार

1. तक्रारदाराने हि तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार कलम 12 अन्‍वये दाखल केली असुन त्‍यातील कथन संक्षिप्‍तपणे खालीलप्रमाणेः-

तक्रारदाराने मेसर्स रणजित मोटर्स याचे कडुन हिरोहोंडा करिष्‍मा हे दुचाकी वाहन रु.85,538/- एवढया किमतीस दि.13/09/2008 रोजी खरेदी केले. वाहनाचा नोंदणी क्र. एमएच-04-डी-व्‍ही-0008 असा आहे. सदर वाहनाचा रु.72,719/- एवढया रकमेचा विमा उतरविला होता. प्रिमियम रु.1,411.1‍67 एवढी रक्‍कम दि.15/09/2008 रोजी विरुध्‍द पक्षकारास प्रदाण केली होती. विमा पॉलिसी नंबर 39770623.‍ विम्‍याचा कालावधी दि.13/09/2008 ते दि.12/09/2009 असा होता.

दि.08/11/2008 रोजी सदरील वाहन तक्रारदाराचे दुकानासमोर उभे केले असता कुणीतरी अज्ञात इसमाने वरील वाहन चोरुन नेले. त्‍याची रितसर तक्रार कळवा पोलिस स्‍टेशनमध्‍ये क्र I 257/2008 नुसार कलम 379 भारतीय दंड संहिता अन्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी सदर वाहन शोधण्‍याचा प्रयत्‍न केला परंतु वाहन मिळुन आले नाही.


 


 

.. 2 ..

विरूध्‍द पक्षकाराने श्री.सतिश डी.ठाणेकर यांची इन्‍शुरन्‍स क्‍लेम इनव्‍हेस्टिगेटर म्‍हणुन नेमणुक केली त्‍यांनी मागणी केलेल्‍या कागदपत्राची तक्रारदाराने पुर्तता केली व विमा दावा रक्‍कम मंजुर होण्‍यासाठी विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्षकाराने विमा पॉलिसी अट नं. 4 नुसार विमा दावा नामंजुर केला.

विरुध्‍द पक्षकाराचे तृटीयुक्‍त व बेजबाबदार वागणुकीमुळे व विमा दावा रक्‍कम न मिळाल्‍यामुळे तक्रारदाराने या मंचामध्‍ये तक्रार दाखल केली व कथन केले की तक्रारीचे कारण दि.24/11/2008 रोजी विमा दावा रक्‍कम मिळावी तेव्‍हा घडली. त्‍यामुळे हि तक्रार मुदतिच्‍या सिमेत आहे व या मंचाला हि तक्रार चालविण्‍याचा व निर्णयीत करण्‍याचा पुर्ण अधिकार आहे. तक्रारदाराची प्रार्थना खालील प्रमाणेः-

1.विमा दावा रक्‍कम रु.72,917/- मिळावी व त्‍यावर 18% .सा..शे दराने दि. 24/11/2008 पासुन व्‍याज मिळावे.

2.मानसिक त्रासापोटी व इतर न्‍यायिक खर्च रू.30,000/- मिळावा.


 

2. वरील तक्रारीची मंचाची नोटीस निशाणी 5 नुसार विरुध्‍द पक्षकारास मिळाली. निशाणी 6 नुसार विरुध्‍द पक्षकाराचे वकिलाने वकिलपत्र दाखल करण्‍यास हमीपत्र लिहुन दिले. निशाणी 7 नुसार वकिलपत्र दाखल केले. निशाणी 8 वर लेखी जबाब दाखल करण्‍यास अवधी मिळावा अशी विनंती केली. निशाणी 9 वर कागदपत्रे दाखल केले निशाणी 10 वर लेखी जबाब दाखल केला व निशाणी 11 वर प्रतिज्ञापत्र दाखल केले. तक्रारदाराने निशाणी 12 वर प्रत्‍युत्‍तर दाखल करण्‍याचा अर्ज दाखल केला व तो मंजुर करण्‍यात आला. तक्रारदाराने निशाणी 13 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला. निशाणी 14 वर विरुध्‍द पक्षकाराने त्‍याचा लेखी जबाब हाच लेखी युक्‍तीवाद समजावा अशी पुरशीस दाखल केली. विरुध्‍द पक्षकाराचे लेखी जबाबातील कथन खालील प्रमाणेः-

तक्रारदाराची तक्रार संपुर्ण पणे अमान्‍य करण्‍यात येत आहे. तक्रार खोटी, खोडसाळ व तापदायक आहे. कायद्याच्‍या आघारे तक्रार चालण्‍यासारखी नाही. तक्रारीस कोणतेही कारण घडले नाही. विरुध्‍द पक्षकाराकडुन पैसे उकळण्‍यासाठी तक्रार दाखल केली. विरुध्‍द पक्षकाराने कोणती‍ही सेवेमध्‍ये त्रृटी केली नाही. विरुध्‍द पक्षकराने विमा अट नं.4 नुसार विमा दावा नामंजुर केला ते बरोबर आहे. तक्रारदाराने विमा पॉलिसीच्‍या अटीचे पालन केले नाही.

3. तक्रारदाराने तक्रारीसोबत खालील कागदपत्रे दाखल केली

उदाः-1.दि.10/09/2008 चा मेसर्स रणजित मोटर्सचा प्रोफॉर्मा इनव्‍हॉईस

2.रु.85,538 भरल्‍याची पावती दाखल.

3.वाहन नोदणी सर्टीफिकेट

.. 3 ..

4.विमा पॉलिसी कव्‍हर नोट

5.दि.15/11/2008 चा एफ.आय.आर दाखल.

6.मोटार क्‍लेम फॉर्म

7.दि.17/12/2008 रोजी आर.टी.ओ ला दिलेले पत्र

8.श्री.सतिश डी. ठाणेकर (इन्‍शुरन्‍स क्‍लेम इन्‍व्‍हेस्टिगेटर) यांचे पत्र

9.विरुध्‍द पक्षकार यांचे दि.13/01/2009 चे विमा दावा नामंजुर करण्‍याचे पत्र तक्रारदाराचा लेखी युक्‍तीवाद तसेच विरुध्‍द पक्षकाराचे दाखल केलेले लेखी जबाब कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र, इत्‍यादी सुक्ष्‍मरितीने अवलोकन व पडताळणी केली असता न्‍यायिक प्रक्रियेसाठी खालील एकमेव मुद्दा उपस्थित होतो तो येणेप्रमाणेः-

) तक्रारदार म्‍हणतात त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षकाराने तक्रारदाराचा विमा दावा अट नं.4 नुसार विमा दावा नाकरणे न्‍यायोचित, विधियुक्‍त व कायदेशीर आहे काय?

या प्रश्‍नाचे उत्‍तर हे मंच नकारार्थी देत आहे. त्‍या प्रित्‍यर्थ खालील प्रमाणे कारण मिमांसा देत आहे.

कारण मिमांसा

)स्‍पष्टिकारणाचा मुद्दाः- तक्रारदाराने मे. रणजित मोटर्स कडुन हिरोहोंडा करिष्‍मा हि दुचाकी गाडी दि.13/09/2008 रोजी रु.85,538/- खरेदी केली गाडीचा नोंदणी क्र.एमएच-04-डीव्‍ही-0008 असा आहे सदर वाहनाचा रु.72,917/-चा कॉप्रोहेन्सिव्‍ह विमा पॉलीसी काढली व त्‍याप्रित्‍यर्थ रु.1,411.67 एवढी विमा प्रिमियम रक्‍कम दिली. विमा पॉलिसी नं.39770623 व त्‍या विम्‍याचा कालावधी दि.13/09/2008 पासुन दि.12/09/2009 पर्यंत कार्यान्‍वीत आहे. परंतु सदरील वाहन दि.08/11/2008 रोजी तक्रारदाराचे दुकानासमोर उभे करुन ठेवले असता कोणीतरी अज्ञात इसमाने ते वाहन चोरुन नेले त्‍याची रितसर पोलिस तक्रार कळवा पोलिस स्‍टेशनमध्‍ये I 257/08 नुसार भारतीय दंड व‍िधान कलम नं.379 नुसार गुन्‍हा नोंदणी केली आहे. पोलिसांनी प्रयत्‍न करुनही वाहन म‍िळुन न आल्‍यामुळे तक्रारदाराने विमा दावा रक्‍कम मिळण्‍यासाठी दि.24/11/2008 रोजी अर्ज केला परंतु विरुध्‍द पक्षकाराने त्‍याचे पत्र क्र.काही नाही दि.13/01/2009 नुसार विमा दावा अट नं.4 नुसार नामंजुर केला. अट नं.4 quote “The Insured shall take all reasonable steps to safeguard the vehicle from loss or damage and to maintain it in efficient condition and the company shall have at all times free and full access to examine the vehicle or any part thereof or any driver or employee of the insured. In the event of any accident or breakdown, the vehicle shall not be left unattended without proper precautions being taken to prevent further damage or loss and if the vehicle be driven before the

.. 4 ..

necessary repairs are affected any extension of the damage or any further damage to the vehicle shall be entirely at the insured own risk”

विरुध्‍द पक्षकाराने वरील विमा अट हि चुकुन तक्रारदाराच्‍या विमा दाव्‍यासंबंधी लावली आहे. या ठिकाणी असे नमुद करावेसे वाटते की श्री. सतिष डी. ठाणेकर चौधरी अधिकारी यांचे अहवालानुसारही तक्रारादराने पुरेपुर सहकार्य करुन कागदपत्रे दाखल केली आहेत तक्रारदाराचे वाहन चोरीला गेले त्‍याची रितसर तक्रार कळवा पोलिस स्‍टेशन आणि ठाणे आरटीओ येथे दिली आहे. तक्रारदाराचे त्‍याचा वाहनाची पुरेपुर काळजी घेतली आहे. श्री.ठाणेकर विमा चौकशी अधिकारी यांचे पत्र दि.18/12/2008 नुसार परिच्‍छेद 16 मध्‍ये स्‍पष्‍टपणे उल्‍लेख केला आहे तो खालील प्रमाणे.

Quote - Para 16 “ At last my investigation leads me to believe that the said bike has been stolen when it was parked near the insured shop-cum-residence. The Kalwa police have taken cognizance of theft of the said bike. The insured has not given false alarm of the said claim.”

Para 17 Quote - “The aforesaid report is made for the purpose of Insurance company and is based on the information gathered by me during the course of investigation. The Insurance company may take any decision as per term and conditions of the said policy.”

श्री. ठाणेकर (विमा चौकशी अधिकारी) याचे अ‍हवालानुसार सदरचे वाहन चोरीला गेले व अजुन मिळुन आले नाही तरी विमा अट नं.4 या विमा दाव्‍यासंबंधी लागु होत नाही. विमा अट नं.4 चुकीच्‍या पध्‍दतीने लावल्‍यामुळे विरुध्‍द पक्षकाराने सेवेमध्‍ये त्रृटी, बेजबाबदारपणा व हलगर्जीपणा केला आहे हे स्‍पष्‍टपणे सिध्‍द होते. वरील अटीनुसार विमा दावा नामंजुर करणे म्‍हणजे कायद्य्याच्‍या व नैसर्गिक न्‍यायाच्‍या दृष्टिकोनातुनही गैरलागु होणार आहे. सबब विमा दाव पारीत करणे न्‍यायोचित, व विधीयुक्‍त आहे सबब विमा दावा त्‍वरीत पारीत करावा.

दुसरी महत्‍वाची बाब म्‍हणजे श्री.ठाणेकर विमा चौकशी अधिकारी यांनी श्री.भुराराम चौधरी, श्री.रमेश पी रावल व श्री.मदन एल रावल यांचे लेखी जबाब लिहुन घेतले आहेत त्‍यामध्‍ये स्‍पष्‍टपणे असा उल्‍लेख आहे की दि.08/11/2008 रोजी मोटर सायकल नं.एमएच-04-डिव्हि-0008 जगदंबा प्रोव्हिजन जनरल स्‍टोअर्स के सामने से दोपहरके वक्‍त चोरी हो गयी! मोटर सायकल चोरीकी कम्‍लेंट कळवा पोलिस स्‍टेशन मे श्री.मांगिलाल चौधरीने दर्ज की है यह जानकारी हमे है यह जानकारी हम इन्‍शुरन्‍स कंपनी को राजीखुषी देते हे !

.. 5 ..

वरील निवेदनानुसारही सदरचे दुचाकी वाहन चोरीला गेले आहे पोलीसमध्‍ये तक्रार दाखल केली वाहन मिळाले नाही त्‍यामुळे तक्रारदाराचा विमा दावा मंजुर करणे कायदेशिर व न्‍यायोचित होणार आहे. म्‍हणुन हे मंच खालील आदेश पारीत करीत आहे.

    अंतीम आदेश

    1. तक्रार क्र. 453/2005 हि अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

    2. विरुध्‍द पक्षकाराने तक्रारदाराचा विमा दावा रक्‍कम रु. 72,917/-(रु. बहात्‍तर हजार नौशे सतरा फक्‍त) मंजुर करावा व वरील रकमेवर दिनांक 24/11/2008 पासून 9% .सा..शे व्‍याज संपुर्ण रक्‍कम फिटे पर्यंत द्यावे.

    3.विरुध्‍द पक्षकाराने तक्रारदारास रु.5,000/-(रु.पाच हजार फक्‍त) मानसिक नुकसानीपोटी व न्‍यायिक खर्च द्यावा.

    5. वरील आदेशाची तामिली सही शिक्‍कयाची प्रत मिळाल्‍या तारखेपासुन 30 दिवसाचे आत परस्‍पर करावी( Direct Payment).

    6. ‍वरील आदेशाची सही शिक्‍कयाची प्रत उभय पक्षकारास निशुल्‍क द्यावी.

    दिनांक – 03/04/2010

    ठिकान - ठाणे

     


 

(श्री.पी.एन.शिरसाट ) (सौ.शशिकला श. पाटील )

          सदस्‍य अध्‍यक्षा

    जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे