::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 18/03/2019)
अर्जदार हा चंद्रपूर येथील रहिवासी असून गैरअर्जदार क्र. 1 मोबाईल कंपनी असून मोबाईल सिम कार्ड पुरवण्याचा व्यवसाय गैरअर्जदार क्र. 2 करतात अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 च्या कंपनीतून मोबाईल चे सिम क्र. 9823140810 गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडून खरेदी केला सदर सिम हे पोस्टपेड असल्याने अर्जदार हा वेळोवेळी गैरअर्जदार च्या कार्यालयात जाऊन पैसे भरायचा. नोव्हेंबर 2015 मध्ये मोबाईलचे बिल रू. 1122/- गैरअर्जदाराने अर्जदारांस पाठवले ते बील 21/11/2015 पर्यंत किंवा त्या अगोदर भरायचे होते. अर्जदाराने सदर बिल चेक द्वारे रू.1125/- गैरअर्जदार क्र. 2 कडे भरले परंतु काही दिवसांनी अर्जदाराचे मोबाईल कनेक्शन खंडित करण्यात आले त्याबद्दल चौकशी केली असता बिल न भरल्यामुळे सिम बंद करण्यात आले असे सांगण्यात आले. जेव्हा की अर्जदाराने दिनांक 20/11/2015 रोजी बील भरलेले होते व त्याची पावती सुद्धा दाखवली. तसेच अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 सांगितले की ती रक्कम तुमच्या खात्यात आली नसेल तर तो चेक वापस करा मी नगदी पैसे भरतो व माझा सिम चालू करा. परंतु गैरअर्जदार क्र. 2 काहीही उत्तर दिले नाही. अर्जदार बिलाची संपूर्ण रक्कम भरण्यास आजही तयार आहेत परंतु कोणतेही कारण नसताना सिम बंद केल्याने अर्जदाराचे कधीही भरून न निघणारे नुकसान झालेले आहेत अर्जदाराने दिनांक 15/3/2016 रोजी वकिलामार्फत गैरअर्जदारांना नोटीस दिली परंतु काहीही प्रतिसाद आला नाही समोर अर्जदाराने सदर तक्रार मंच समक्ष दाखल केलेली आहे अर्जदारांची मागणी अशी आहे की अर्जदार यांचा मोबाईल क्र. 9823140810 त्वरित चालू करण्यात यावा अर्जदारांना दिलेला चेक परत करून त्याचे नगदी पैसे स्विकारावे व रू.20,000/-. नुकसानभरपाई व रू.20,000/- मोबाईल बंद पडल्यामुळे झालेल्या त्रासापोटी अर्जदार यांना देण्यात यावे तसेच नोटिसचा खर्च व तक्रारीचा खर्च रू.2250/-अर्जदाराला देण्यात यावे.
2. अर्जदाराचे तक्रार स्वीकृत करून वेळेवर क्र. 1 व 2 यांना नोटीस काढण्यात आले.
3. गैरअर्जदार क्र.1 यांनी मंचात उपस्थित राहून त्यांचे उत्तर दाखल केले त्यात त्यांनी प्राथमिक आक्षेप घेतला की अर्जदार सदर तक्रारीत अनेक गोष्टींचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. गैरअर्जदार क्र.1ही एक नामवंत कंपनी आहे. अर्जदार हा स्वतः सुशिक्षित असूनही त्याने चुकीचे तक्रार दाखल केली वोडाफोन कंपनीला आवश्यक पक्ष असूनही तक्रारी पक्ष केले नाही ही बाब नमूद करावेसे वाटत आहे की एखाद्या ग्राहकांची सेवा पेमेंट केले नाही या कारणावरून वरुन संपुष्टात आल्यानंतर त्यानंतर कंपनीचे त्या व्यक्तीशी ग्राहक म्हणून संबंध राहत नाही सबब सदर तक्रार खारीज करण्यात यावी. अर्जदार हा आधी वोडा फोनचा ग्राहक होता परंतु त्याने त्याचे कनेक्शन बदलवून ते गैरअर्जदार कंपनी आयडिया चे पोस्टपेड मध्ये दिनांक 4/8/15 रोजी केले व तेव्हापासून तो गैरअर्जदार कंपनीची सेवा घेत आहे. ही बाब स्पष्ट आहे की अर्जदार हा वोडाफोन चा ग्राहक होता व त्यानंतर जेव्हा सरेंडर किंवा सेवा खंडीत होते तेंव्हा तो नंबर आधीच्या कंपनीकडे संचित केला जातो व ट्रायच्या नियमानुसार धारक कंपनीने एखादा नंबर गेल्यानंतर सदर नंबर हा बाजारात विक्रीसाठी दिला जातो. त्याचप्रमाणे अर्जदार याने बिल न भरल्यामुळे त्याचा नंबर डिस्कनेक्ट करून सदर नंबर वोडाफोन ला दिनांक11/4/2016 रोजी वापस करण्यात आला. ही प्रक्रिया ट्रायच्या क्लॉज 15. (5) च्या दुरुस्ती रेग्युलेशन प्रमाणे करण्यात आली. सदर रेगुलेशन ची सुधारीत प्रत गैरअर्जदाराने तक्रारीत जोडलेली आहे. गैरअर्जदार क्र. 2 नि पुढे नमूद केले की मोबाईल पोस्टपेड बिल हे मुदतीत भरायचे असते व तसे न केल्यास ग्राहकांना स्मरणपत्र देऊन व काही वेळा बोलावून बिल भरण्यास सुचित करण्यात येते. सदर प्रक्रियेत बिल भरण्याचा मुदतीनंतर सात दिवस व त्यानंतर क्रेडिट लिमिट वाढवून पंधरा दिवस देखील बिलाचा भरणा न केल्यास केवळ आउटगोइंग कॉल तात्पुरते थांबवले जातात मात्र इन्कमिंग कॉल सुरू राहतात परंतु 1 महिन्यापर्यंत देखील बिलाचा भरणा न केल्यास संपूर्ण सेवा तात्पुरती खंडित केला जाते .धारकाने तरीही बिल भरून सेवा पूर्ववत करून घेतली नाही तर त्याची सेवा कायमस्वरूपी खंडित केली जाते. सदर प्रक्रिया ट्रायच्या गाइडलाइन्सनुसार राबवली जाते. प्रस्तुत प्रकरणात अर्जदार हा पहिल्यांदा वोडा फोनचा ग्राहक होता. परंतु त्यानंतर त्यांनी त्याचा नंबर पोर्टल करून गैरअर्जदार क्र. 2 यांची सेवा दिनांक ४.०८.२०१५ पासून घेतली व दिनांक ०६.११.२०१५ चे रु. ११२५/- चे बिल अर्जदाराने दिनांक २०.११.२०१५ रोजी चेक देऊन भरणा केले. परंतु सदर चेक हा बाउंस झाल्याचे अर्जदाराला कळवून देखील अर्जदाराने उपरोक्त बिल स्वतः नगदी भरले नाही. व त्यानंतर दिनांक ०६.११.२०१५ व ०६.१२.२०१५ चे बिल सुद्धा अर्जदाराने भरले नाही. सबब अर्जदाराचे कनेक्शन वरील प्रमाणे बंद करण्यात येऊन अर्जदाराचा सदर मोबाईल नंबर ट्रायच्या नियमातील क्लॉज 15 (5) नुसार धारक कंपनीला पाठवण्यात येऊन ती सेवा नियमाप्रमाणे खंडित करण्यात आली. गैरअर्जदार नमूद करतात की अर्जदाराकडे रू.1789/- चे बिल अजूनही बाकी आहे, ज्यात अर्जदाराने सेवा खंडित होईपर्यंत वापरलेल्या सेवेचे बिल आहे. तसेच दिनांक २५.१२.२०१५ नंतर अर्जदाराला गैरअर्जदाराकडून कोणतीही सेवा देण्यात आली नाही. सबब सदर तक्रार योग्य नसून ती खारीज करण्यात यावी. उलट गैरअर्जदार अर्जदारावर रिकव्हरीची प्रक्रिया दाखल करू शकतो. तसेच गैरअर्जदार पुढे नमूद करतो की ट्रायचा निर्देशनानुसार तक्रारीच्या निवारणाकरीता नोडल ऑफीसर उपलब्ध असत, मात्र अर्जदाराने सदर पर्याय न निवडता मंचासमक्ष तक्रार दाखल केली. सबब सदर तक्रार खारीज करण्यात यावी.
4. सदर प्रकरणात गैरअर्जदार क्र. 2 यांना नोटीस काढण्यात आलेले होते परंतु अहवाल प्राप्त न झाल्यामुळे दिनांक 2.8.2010 रोजी पुन्हा गैरअर्जदार क्र. 2 विरुद्ध नोटीस काढण्यात आली. परंतु त्यानंतरही काही अहवाल प्राप्त झाला नाही तसेच अर्जदाराने देखील गैरअर्जदार क्र. 2 यांना नोटीस तामिल करण्यासंबंधी कोणतीही पावले न उचलल्यामुळे सदर तक्रार दिनांक 6 3 2009 रोजी युक्तिवाद करता लावण्यात आली व तसा आदेश निशाणी क्र. 1 वर दिनांक 26.2.2019 रोजी करण्यात आलेला आहे.
5. अर्जदाराची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र गैरअर्जदार क्र. 1 यांचे लेखी म्हणणे, अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 यांच्या तोंडी युक्तीवादावरून तक्रार निकाली काढण्याकामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. प्रस्तूत तक्रार चालवण्याचा मंचाला अधिकार आहे काय ? होय
१. गैरअर्जदारक्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला सेवा पुरविण्यात
कसूर केली आहे काय ? नाही
२. आदेश काय ? आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्र. 1 बाबत :-
6. अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 कंपनीच्या पोस्टपेड मोबाईल सिम कार्ड क्र.9823140810 ची सेवा घेतली. त्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 2 चा ग्राहक आहे याबाबत वाद नाही. गैरअर्जदार क्र. 2 ने त्यांच्या उत्तरात अर्जदाराने ट्रायच्या निर्देशांनुसार तक्रारींच्या निवारणासाठी नियुक्त नोडल ऑफिसरकडे दाद न मागता मंचासमक्ष तक्रार दाखल केली व ती चालवण्याचे अधिकार मंचाला नाही असा आक्षेप घेतला मात्र ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 3 नुसार दाद मागण्याचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध करण्यात आलेला आहे व पर्याय निवडण्याचा अधिकार ग्राहकाला देण्यात आलेला आहे. त्यानुसार अर्जदाराने मंच्याकडे दाद मागण्याचा पर्याय निवडला असल्यामुळे प्रस्तुत तक्रार चालवण्याची अधिकारीता मंचास निश्चितच आह सबब मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्र. 2 बाबत :-
7. सदर प्रकरणात अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 2 चे कंपनीत स्वतःचा वोडाफोनचा नंबर पोर्टल केल्यानंतर तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे काही दिवस गैरअर्जदार क्र. 2 ची विनातक्रार सेवा घेतली, परंतु नोव्हेंबर 2015 चे रू.1125/-भरण्याकरीता अर्जदाराने दिनांक 20/11/2015 रोजी चेकद्वारे रक्कम गैरअर्जदार क्र. 1 ला दिली. परंतु सदर चेक बाउन्स झाला ही बाब अर्जदाराला माहिती असून सुद्धा अर्जदाराने गैर अर्जदाराच्या कार्यालयात जाऊन वरील बिलाचा नगदी भरणा केला नाही ही बाब अर्जदाराच्या तक्रारीत नमूद आहे. गैरअर्जदाराने त्यांच्या उत्तरात नमूद केल्याप्रमाणे पोस्टपेड सेवेच्या नियमाप्रमाणे अर्जदाराला बिल त्यानंतरही येत होते. अर्जदाराला अनेकदा सूचना देऊन सुद्धा त्याने दिनांक 21/10/2015 तसेच 6/11/15 व नंतर 6/12/2015 चे बिल न भरल्यामुळे दिनांक 25/12/2017 रोजी अर्जदाराचा मोबाईल तात्पुरता बंद करण्यात येऊन नियमाप्रमाणे दिनांक 11/2/2016 रोजी कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. ट्रायच्या गाइडलाइन्सनुसार अर्जदाराने त्याचा मोबाईल नंबर पोर्टल करून घेतल्यावर नियमानुसार क्लॉज 15 (5) प्रमाणे गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदारावर सदर कारवाई केल्याचे सिद्ध होत असल्याने अर्जदाराप्रती गैरअर्जदार क्र. 2 यांनी कोणतीही सेवेत न्युनता दिली नाही ही बाब सिद्ध होत आहे. सबब मुद्दा क्र. 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्र. 3 बाबत :-
8. मुद्दा क्र.1 व 2 च्या विवेचनावरून मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अतीम आदेश
(1) तक्रारकर्त्याची तक्रार क्र.41/2017 खारिज करण्यात येते.
(2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. श्री.अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.