तक्रारदारांतर्फे - अॅड.श्री. एस्. यु. गोळे
जाबदारांतर्फे - अॅड.श्री. आर.पी. बाफना
// निकाल //
पारीत दिनांकः- 07/12/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
(1) प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी त्यांच्या मोबाईलच्या बिलाबाबत केलेली आहे. तक्रारदारांनी दि. 20/5/2010 रोजी जाबदार यांच्याच संदेशाप्रमाणे मोबाईल बिल रक्कम रु.1,105/- भरुन पोस्टपेड सेवा ही प्रीपेड करणेसाठी Activation charges म्हणून रक्कम रु.250/- भरुनही जाबदारांनी मोबाईल सेवा चालू केली नाही. त्यासाठी तक्रारदार रक्कम रु.50,000/- नुकसानभरपाई मागतात.
(2) जाबदार यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा सिव्हील अपील नं 7687/2004 जनरल मॅनेजर, टेलिकॉम विरुध्द एम. कृष्णन व इतर या निवाडयामध्ये “In our opinion when there is a special remedy provided in Section 7-B of the Indian Telegraph Act regarding disputes in respect of telephone bills, then the remedy under the Consumer Protection Act is by implication barred.Section 7B of the Telegraph Act reads as under-
“S.7B Arbitration of Disputes-
(1) Except as otherwise expressly provided in this Act, if any dispute concerning any telegraph line, appliance or apparatus arises between the telegraph authority and the person or whose benefit the line, appliance or apparatus is, or has been provided, the dispute shall be determined by arbitration and shall, for the purpose of such determination, be referred to an arbitrator appointed by the Central Government either specifically for the determination of that dispute or generally for the determination of disputes under this section.
(2) The award of the arbitrator appointed under sub-s(1) shall be conclusive between the parties to the dispute and shall not be questioned in any court.” असे नमूद करण्यात आलेले आहे.
(3) वरील मा. वरिष्ठ न्यायालयाच्या निवाडयावरुन तक्रार नामंजुर करण्यात येत असून प्रस्तुत प्रकरणात खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.
:- आदेश :-
[1] तक्रार नामंजुर करण्यात येत आहे. तक्रारदार त्यांच्या मागण्यांसाठी योग्य
त्या अॅथोरिटी कडे प्रकरण दाखल करु शकतात.
[2] खर्चाबद्दल आदेश नाही.
[3] आदेशाची प्रत तक्रारदारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.