मा. सदस्यांची पदे रिक्त मंच अपुरा.
तक्रारदार गैरहजर.
सा.वाले क्र 1 तर्फे वकील श्री. गणेश शिखरे हजर.
सा.वाले क्र 2 तर्फे वकील श्री. ई.पी. केशवानी हजर.
सा.वाले क्र 3 गैरहजर.
वकील श्री. केशवानी यांनी निवेदन केले की, तक्रारदार हे मागील तीन तारखांपासून सतत गैरहजर. सबब, मंचानी योग्य तो आदेश पारीत करावा.
वकील श्री. केशवानी यांचे निवेदन संचिकेप्रमाणे आहे. तक्रारदार यांना मागील तारखेला पुराव्याचे शपथपत्र सादर करणेकामी अंतिम संधी देण्यात आली होती. तरी सुध्दा तक्रारदार गैरहजर. तक्रारदार अंदाजे दिड वर्षापासून सतत गैरहजर.
मंचाचा कार्यभार विचारात घेता, प्रकरण त्याच टप्यावर तहकुब करणे योग्य होणार नाही. मंच अपुरा. सबब, योग्य आदेश पारीत करण्याकरीता प्रकरण मागे ठेवण्यात येते.
मंच पूर्ण.
त्यानंतर प्रकरण दुपारी 2.10 मिनीटांनी पुकारण्यात आले.
तक्रारदार गैरहजर.
सा.वाले गैरहजर.
यावरून असे दिसून येते की, तक्रारदार यांना तक्रार चालविण्यात स्वारसय नाही व ते त्याबाबत सजग व जागृकही नाहीत. सबब, खालील आदेश
आदेश
1.तक्रार ग्रा.सं.कायदा कलम 13(2) (सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्यात येते.
2.खर्चा बाबत आदेश नाही.
3.हाच अंतिम आदेश समजण्यात यावा.
4.या आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क टपालाने पाठविण्यात याव्यात.
npk/-