निकालपत्रः- श्री.ग.ल.चव्हाण, सदस्य ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- सामनेवाला यांच्या हजगर्जीपणामुळे व त्यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदार हिचे सुमारे रक्कम रु.15,00,000/- चे नुकसान झाले. राष्ट्रीय हित लक्षात घेऊन तिच्या व्यवसायामध्ये वाढ करावयाची होती. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदार हिला तिच्या व्यवसायामध्ये वाढ करण्याच्या हेतूने मोठे कर्ज देण्याचे आश्वासन दिले. तक्रारदार हिने एकूण 9.50 लाखाच्या कर्जासाठी मागणी अर्ज सादर केला. एखाद्या प्रकरणी व्यवसायासाठी मोठे कर्ज मंजूर करताना त्याची जोखीम पत्करण्याच्या दृष्टीने कर्ज मंजूर करतेवेळी त्याबाबतची विमा पॉलीसी उतरविणे आवश्यक आहे अशा मार्गदर्शनपर सुचना असल्याने सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून तक्रारदार हिला कर्ज रक्कम रु.13,25,000/- व रक्कम रु.13,00,000/- मंजूर करताना अनुक्रमे विमा पॉलीसी उतरविण्यात आली त्यांचे क्र.121200/11/00370 आणि 121200/11/05100482 असे होते. सामनेवाला यांनी कर्जाच्या रक्कमेला संरक्षण मिळावे म्हणून विमा पॉलीसी उतरविल्यानंतर पॉलीसीच्या हप्त्याची रक्कम सामनेवाला यांचेकडून दि.14.07.2004 रोजी रक्कम रु.4,253/- व दि.01.08.2005 रक्कम रु.3,508/- वजाती करण्यात येऊन आणि ही रक्कम तक्रारदाराच्या खात्यात खर्ची टाकण्यात आली. त्याची छायांकित प्रत सोबत जोडण्यात आलेली आहे आणि मूळ प्रत सामनेवाला यांचेकडे ठेवण्यात आली आहे. रक्कम रु.13.25 लाखाच्या कर्जासाठी देण्यात आलेली विमा पॉलीसी दि.14.07.2005 रोजी संपुष्टात आली. तक्रारदाराचे म्हणणे कि, त्यानंतर, सामनेवाला यांचेकडून या संबंधीत विमा पॉलीसीचे नूतनीकरण करणे ही सामनेवाला यांची जबाबदारी होती परंतु त्यांचेकडून वेळीच विमा पॉलीसीचे नूतनीकरण करण्यात आले नाही, यामध्ये त्यांचा निष्काळजीपणा असल्याचे दिसून येते, त्यामुळे ही त्यांच्या सेवेतील कमतरता आहे असे तक्रारदार हिचे म्हणणे आहे. कारण दि.27.07.2005 रोजी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे तक्रारदार हिच्या मालाच्या साठयाचे जबरदस्त नुकसान झाले आणि पावसाच्या पाण्यात माल पडून राहिल्यामुळे तक्रारदार हिचे 100% नुकसान झाले. तक्रारदार हिच्या कंपनीचा माल ज्या ठिकाणी ठेवण्यात आला होता, त्या ठिकाणी त्या जागेचे देखील जबरदस्त नुकसान झाले, त्या ठिकाणी असलेल्या यंत्रसामुग्रीचेदेखील नुकसान झाले. संबंधीत जागेतील दारे, खिडक्यांचेही नुकसान झाले. थोडक्यात तक्रारदाराचे म्हणणे कि, त्या दिवशी पडलेल्या पावसांमुळे जबरदस्त हानी झाली. या घटनेचा वृतांत तत्काळ संबंधीत पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला तसेच त्याबाबतची माहिती सामनेवाला यांच्या संबंधीत अधिका-याला त्याचवेळी देण्यात आली. सामनेवाला क्र.2 यांनी संबंधीत घटनास्थळाला भेट देऊन नुकसानीचे निर्धारण केले. परंतु या प्रकरणी सामनेवाला यांना दि.08.02.2006 रोजी कायदेशीर नोटीस देऊन देखील आजपर्यंत तक्रारदार हिला प्रतिसाद देण्यात आलेला नाही तसेच तक्रारदार हिचे जे नुकसान झाले त्याची दखल सामनेवाला यांनी घेतलेली नाही यामध्ये त्यांच्या सेवेत कमतरता आहे असे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे तक्रारदार हिला मानसिक त्रास सहन करावा लागला व आर्थिक भूर्दंड झाला. या झालेल्या आर्थिक भूर्दंडाची नुकसान भरपाई रक्कम रु.15,00,000/- हे सामनेवाला यांनी द्यावेत अशी वारंवार विनंती सामनेवाला यांना केली. परंतु त्यांच्या कडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे तक्रारदार हिला न्याय मिळावा म्हणून या मंचाकडे तक्रार अर्ज दाखल करावा लागला. तक्रारदार हिने या प्रकरणी खालीलप्रमाणे विनंत्या केलेल्या आहेत. अ सामनेवाला यांच्या सेवेत निष्काळजीपणा व त्यांच्या सेवेत कमतरता असल्याचे घोषित करण्यात यावे. ब तक्रारदार हिच्या यंत्रसामुग्रीचे व संबंधीत जागेतील जे आतोनात, सामनेवाला क्र.1 व 2 यांच्या निष्काळजीपणामुळे, नुकसान झाले त्यापोटी रक्कम रु.15लाख मिळावेत. क वरील रक्कमेवर दि.25.08.2005 पासून 25% व्याज मिळावे. ड या अर्जाचा खर्च व अन्य दाद मिळावी. 2 सामनेवाला यांनी कैफियत दाखल करुन तक्रारीतील आरोप नाकारले. सदरहू तक्रार खोटी, बिनबुडाची, बेकायदेशीर, गैरसमजुतीवर आधारलेली तसेच या मंचासमोर चालणारी नसल्यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे. त्यांचे म्हणणे कि, त्यांच्या सेवेत कमतरता नाही किंवा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. विमा पॉलीसीचे विहीत कालाधींत नुतनीकरण करणे तसेच त्यासाठी विम्याच्या हप्त्याची रक्कम भरणे ही सामनेवाला यांची जबाबदारी नसून तक्रारदार हीची जबाबदारी आहे, त्यामुळे या प्रकरणी झालेल्या घटनेला सामनेवाला हे जबाबदार नाहीत किंवा सामनेवाला यांचा यामध्ये निषकाळजीपणा नाही, म्हणून तक्रारदार ही सामनेवाला यांना दोष देऊ शकत नाही, तक्रारदार हिने ब-याच गोष्टी मंचापासून लपवून ठेवून मंचाची दिशाभुल केली आहे. या तक्रारीबाबत काहीही कारण घडलेले नसताना अनावश्यक बोगस तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. ही तक्रार सामनेवाला यांना केवळ त्रास देण्यासाठी दाखल केली आहे. 3 तक्रारदार हिचे सामनेवाला यांचेकडे चालू खाते कार्यन्वित असून तक्रारदार ही सामनेवाला यांच्या चालू खात्याची खातेदार आहे. तिच्या विनंतीनुसार, सामनेवाला यांचेकडून सुरुवातीला रु.4,00,000/- पत सुविधा (क्रेडिट फॅसिलिटी) देण्यात आली व त्यानुसार, कंपनीची मालकीण म्हणून 2.50लाखाचे मर्यादित कर्ज दि.24.07.2003 रोजी मंजूर करण्यात आले, त्यानंतर, तक्रारदार हिच्या विनंतीनुसार, पत सुविधेमध्ये वाढ करुन 4 लाखावरुन पत 7 लाखापर्यंत वाढविण्यात आली. दि.26-27.07.2005 रोजी मुंबईत कोसळलेल्या मुसळधार पावसांमुळे तक्रारदार हिच्या कंपनीचे नुकसान झाले त्यावेळी तक्रारदार हिच्या विनंतीनुसार, पतसुविधेमध्ये वाढ करुन अल्प मुदतीसाठी रु.3,00,000/- चे कर्ज मंजूर करण्यात आले व त्यानंतर, पत सुविधेमध्ये सहानुभुती म्हणून पत सुविधा रु.10,00,000/- पर्यंत वाढवण्यात आली परंतु निष्काळजीपणाने तक्रारदार हिच्याकडून पत सुविधेचा वापर कमी करण्यात येऊन परतफेडीच्या रक्कमेमध्ये तक्रारदार हिच्याकडून अनियमितपणा होऊ लागला, यामध्ये सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता नाही असे त्यांचे म्हणणे आहे. 4 तक्रारदार हिला मंजूर करण्यात आलेल्या पत सुविधेनुसार सामनेवाला यांचेकडून घेतलेल्या रक्कमेची विहीत कालावधीत परतफेड करणे ही तक्रारदार हीची जबाबदारी होती परंतु त्यामध्ये अनियमितता दिसून आल्यामुळे तक्रारदार हिला दि.18.11.2006 रोजी कायदेशीर नोटीस देण्यात आली परंतु तक्रारदार हिच्याकडून देय कर्जाच्या रक्कमेची परतफेड विहीत कालावधीत करण्यात आलेली नाही, म्हणून तिच्या विरुध्द न्यायालयीन कार्यवाही करणे भाग पडले. तक्रारदार हिने तिच्या मालाच्या व यंत्रसामुग्रीच्या संरक्षणाच्या अनुषंगाने घेतलेल्या विमा पॉलीसीचे नूतनीकरण केले नाही व विम्याच्या हप्त्याची रक्कम देय तारखेला विमा कंपनीला प्रदान केली नाही, यासाठी सामनेवाला हे जबाबदार नसून तक्रारदार ही जबाबदार आहे. त्यामुळे, ही तक्रार या मंचासमोर चालू शकणार नाही हे सुर्यप्रकाशा इतके स्पष्ट आहे. विमा पॉलीसीच्या नूतनीकरणाच्या वेळी तक्रारदार हिच्याकडे अधिकच्या कर्जाच्या रक्कमेची (over draft ) वसूली थकीत असल्यामुळे ती वेळीच परतफेड करणे ही तक्रारदार हिची जबाबदारी होती. ती तिने पूर्ण केली नाही. सदरहू तक्रार ही बोगस तक्रार असून स्वतःच्या चुका लपवून ठेवून सामनेवाला यांना तक्रारदार हीने जबाबदार ठरले आहे हे बरोबर नाही, म्हणून त्याबाबतचा आरोप त्यांनी नाकारला. तक्रारदार हिने तिच्या मालाच्या संरक्षणासाठी तसेच यंत्रसामुग्रीच्या संरक्षणासाठी विमा पॉलीसी उतरविणे व तिचे वेळोवेळी नूतनीकरण करणे हे तक्रारदार हिची जबाबदारी असून त्यानुसार विमा उतरविल्यानंतर त्याबाबतची कागदपत्रं सुरक्षा अमानत म्हणून सामनेवाला यांचेकडे ठेवणे ही देखील तक्रारदार हिची जबाबदारी आहे, म्हणून अशी कागदपत्रे सामनेवाला यांचेकडे ठेवण्यात आली आहेत, म्हणून त्याबाबतच्या नूतनीकरणाची जबाबदारी तक्रारीच्या म्हणण्याप्रमाणे सामनेवाला यांची नाही. 5 वरील परिस्थितीत, सदरहू तक्रार या मंचासमोर चालणारी नसल्यामुळे तक्रार अर्ज रद्दबातल करण्यात यावा अशी सामनेवाला यांची विनंती आहे. 6 तक्रार अर्ज, त्यासोबत जोडण्यात आलेली अनुषांगिक कागदपत्रं, प्रतिनिवेदन, विमा पॉलीसी प्रत, त्याबाबतच्या अटीं व शर्ती, लेखी युक्तीवाद, पुरावा शपथपत्र तसेच सामनेवाला यांची कैफियत, लेखी युक्तीवाद, इत्यादी कागदपत्रांची पाहणी व अवलोकन करुन वाचन केले. उभय पक्षकारांचा युक्तीवाद ऐकला. 7 तक्रारदार हिचे सामनेवाला यांचेकडे तिच्या कंपनीच्या नावे खाते असून कंपनीची मालक म्हणून सदरहू चालू खात्याचा व्यवहार मालक या नात्याने तक्रारदार हिच्याकडून करण्यात येतो. थोडक्यात, तक्रार अर्जात नमूद केलेल्या कंपनीची मालकीण म्हणून तक्रारदार ही सामनेवाला यांच्या बँकेत चालू खात्याचा व्यवहार हाताळते. तक्रारदार हिच्या विनंतीनुसार सामनेवाला –बँकेकडून पत सुविधा (क्रेडिट फॅसिलिटी) देण्यात आली होती. या सुविधेमध्ये तक्रारदार हिच्या विनंतीनुसार वाढ करण्यात आली. तक्रारदार हिच्या व्यवसायाच्या अनुषंगाने विमा पॉलीसीचे संरक्षण मिळावे म्हणून तिने विमा पॉलीसी घेतलेली होती. या विमा पॉलीसीची कगदपत्रं सामनेवाला यांच्याकडून घेण्यात आलेल्या पत सुविधेच्या कारणास्तव, सुरक्षा अनामत म्हणून सामनेवाला यांचेकडे ठेवण्यात आलेली होती. विमा पॉलीसीच्या नूतनीकरणाची रक्कम सामनेवाला यांचेकडे असलेल्या चालू खात्यातून प्रदान करण्यात येत होती असे तक्रार अर्जात नमूद करण्यात आलेले आहे. तक्रारदार हिने विमा कंपनीकडून घेतलेल्या विमा पॉलीसी मुदत दि.14.07.2005 रोजी संपुष्टात आली होती. तक्रारदार हिने सामनेवाला यांचेकडून घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात सुरक्षा ठेव म्हणून संबंधीत पॉलीसीची कागदपत्रं सामनेवाला यांचेकडे सुरक्षित ठेवण्यात आलेली होती. मुदत संपुष्टात आल्यानंतर सदरहु पॉलीसीचे नूतनीकरण सामनेवाला यांनी करुन घेणे ही सामनेवाला यांची जबाबदारी होती असे तक्रारदार हिचे म्हणणे आहे. हे म्हणणे सामनेवाला यांनी कैफियतीसोबत आवश्यक ती कागदपत्रे दाखल करुन नाकारले आहे. तक्रारदार हिने तिच्या म्हणण्याच्या पृष्ठर्थ कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही, त्यामुळे तिच्या म्हणण्यात तथ्य असल्याचे दिसून येत नाही. 8 जुलै, 2005 च्या दि.25-26 तारखेला अतिवृष्टीमुळे मुंबईत महापुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी तक्रारदार हिच्या कारखान्यातील मालाचे व यंत्रसामुग्रीचे अतिवृष्टीचे पाणी कारखान्यात शिरुन तुंबलेल्या पाण्यामुळे जबरदस्त नुकसान झाले, त्यामुळे तक्रारदार हिला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला असे तिचे म्हणणे आहे. तक्रारदार हिने अशा आत्पकालीन परिस्थितीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून विमा पॉलीसी घेतलेली होती आणि या पॉलीसीची संबंधीत कागदपत्रे सामनेवाला यांचेकडे कर्जाच्या अटी व शर्तीनुसार त्यांचेकडे सुरक्षित ठेवण्यात आली होती. विमा पॉलीसीची मुदत दि.14.07.2005 रोजी संपुष्टात आल्यानंतर सामनेवाला यांनी पॉलीसीचे नूतनीकरण वेळीच केले असते तर विमा कंपनीकडून विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारदार हिला नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपनीकडून नियमानुसार मिळाली असती परंतु सामनेवाला यांनी पॉलीसीचे नूतनीकरण त्यांचेकडे संबंधीत कागदपत्रे असताना केलेली नाही, ही त्यांची चुकीची कृती आहे. सामनेवाला यांच्या या चुकीमुळे तक्रारदार हिला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई वरील परिस्थितीत सामनेवाला यांचेकडून मिळावी अशी तिची विनंती आहे परंतु विमा पॉलीसीचे नूतनीकरण निश्चितपणे कोणी करावे हे तक्रारदार हिने कागदोपत्री पुराव्यानिशी दाखवून दिलेले नाही किंवा तशी कागदपत्रं दाखल केली नाहीत. 9 सामनेवाला यांनी त्यांच्या कैफियतीसोबत तक्रारदार हिच्या कंपनीसोबत करण्यात आलेल्या कराराच्या प्रतीं दाखल केलेल्या आहेत तसेच काही पत्रव्यवहाराच्या प्रतीं दाखल केलेल्या आहेत. सामनेवाला यांच्या दि.15.06.2006 च्या पत्रात सामनेवाला यांनी विमा पॉलीसीचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी त्यांची नाही असे स्पष्ट केले आहे. सामनेवाला यांचे हे म्हणणे तक्रारदार हिने नाकारले आहे. परंतु त्यासाठी पॉलीसीचे नूतनीकरण हे सामनेवाला यांनीच करावे याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. उलट पक्षी, सामनेवाला यांनी त्यांच्या कैफियतीसोबत तक्रारदार हिला पत सवलत देवून कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी ज्या प्रकारे करारपत्र केलेली आहेत, त्यांच्या छायांकित प्रतीं सोबत दाखल केलेल्या आहेत. त्यातील महत्वाचा मजकुरक्र.10 खालीलप्रमाणे आहे. (Extract From (1) Agreement For Demand Loan,and (2) Agreement of Hypothecation ) 10. “The Borrower shall at the Borrower’s expense keep the hypothecated goods in marketable and good condition and shall insure the same against fire and such other risks as the Bank shall from time to time require for the full market value in one or more insurance office approved by the Bank and shall deliver to the Bank the policies of Insurance duly assigned to the Bank and shall keep such insurance in force throughout the continuance of the security and deliver to the Bank renewal receipts. In default the Bank may (but shall not be bound to) put the goods in marketable condition and effect or renew such insurance. Any premium paid by the Bank and any costs charges and expenses incurred by the Bank shall be paid on demand forthwith and shall until repayment with the interest as the rate aforesaid be a charge on the hypothecated goods. All sums received under such insurance shall be applied in or towards liquidation of the amount for the time being due to the Bank”. 10 अशाच प्रकारची तरतुद Agreement of Hypothecation च्या परिच्छेद-एच मध्ये दाखविण्यात आलेली आहे. Agreement For Demand Loan, and Agreement of Hypothecation यातील तरतुदीं लक्षात घेता, तक्रारदार हिने त्यांच्या मालाच्या व यंत्रसामु्ग्रीच्या प्रकरणी एखाद्या वेळी आत्पाकालीन परिस्थिती निर्माण झाली तर अशा वेळी नुकसान भरपाई मिळावी या हेतुने संबंधीत विमा कंपनीकडून त्यासाठी विमा पॉलीसी उतरविणे बंधनकारक आहे, अशी विमा पॉलीसी उतरविल्यानंतर त्याबाबतची संबंधीत कागदपत्रं बॅंकेकडून घेतलेल्या कर्जापोटी त्यांच्या अटी व शर्तीनुसार बँकेकडे सुरक्षित म्हणून ठेवणे ही विमा उतरविणा-याची जबाबदारी आहे. त्याप्रमाणे, सामनेवाला यांनी तक्रारदार हिच्या कंपनीला कर्ज दिलेले असल्यामुळे विम्याची कागदपत्रं त्यांचेकडे अनामत म्हणून ठेवणे ही तक्रारदार हिची जबाबदारी असल्याचे संबंधीत करारनाम्याच्या तरतुदींवरुन दिसून येते. परंतु या करार नाम्यात नमूद केल्याप्रमाणे विमा पॉलीसीचे त्या त्या वेळी नूतनीकरण करुन घेण्याची जबाबदारी ही कोठेही सामनेवाला यांची आहे असे दिसून येत नाही. नूतनीकरण करुन घेण्याची जबाबदारी ही विमा पॉलीसी घेण्या-याची म्हणजे तक्रारदार हिची असल्याचे, उपलब्ध कागदपत्रांची पाहणी व अवलोकन केले असता, नाकारता येणार नाही. त्यामुळे या प्रकरणी नूतनीकरणाच्या कार्यवाहीसाठी सामनेवाला यांना जबाबदार धरता येणार नाही, त्यामुळे या प्रकरणी सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता आहे असे म्हणता येणार नाही. 11 तक्रारदार हिने सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता असल्याचे कागदोपत्री पुराव्यानिशी सिध्द केलेले नाही. उलट पक्षी, सामनेवाला यांनी त्यांच्या उत्तरासोबत तक्रारदार हिच्या व्यवसायाच्या अनुषंगाने जे कर्ज उपलब्ध करुन दिलेले आहे, त्यासाठी जी करारपत्रं करण्यात आलेली आहेत, त्यातील तरतुदी लक्षात घेता, विमा पॉलीसीचे नूतनीकरण हे पॉलीसी घेणा-याने म्हणजे तक्रारदार हिने करुन घेणे ही तक्रारदार हिची जबाबदारी आहे असे सकृतदर्शनी दिसून येते, म्हणून या ठिकाणी सामनेवाला यांना जबाबदार धरता येणार नाही. उक्त विवेचन लक्षात घेता, तक्रारदार हिला सामनेवाला यांच्या सेवेत कमतरता असल्याचे कागदोपत्रीं पुराव्यानिशी सिध्द करता आलेले नाही, त्यामुळे तक्रार अर्जातील कोणतीही मागणी सामनेवाला यांचेकडे मागता येणार नाही असे मंचाचे मत आहे, त्यामुळे या प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश (1) तक्रार क्र.219/2006 रद्दबातल करण्यात येते. (2) या प्रकरणी उभय पक्षकारांनी आपापला खर्च सोसावा. (3) आदेशाच्या प्रमाणिंत प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |