Maharashtra

Nagpur

CC/334/2017

Anjum Shakil Sayeed - Complainant(s)

Versus

IDBI Bank Ltd. - Opp.Party(s)

Adv. Raziyz Khan

10 Feb 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/334/2017
( Date of Filing : 05 Aug 2017 )
 
1. Anjum Shakil Sayeed
R/o. Mominpura, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. IDBI Bank Ltd.
IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai 400005
Mumbai
Maharashtra
2. IDBI Bank Ltd., Through its Manager
Civil Lines Branch, Near Akashwani Square, Civil Lines, Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Karvy Computer Share Pvt. Ltd., Unit IDBI Bonds Department
Karvy Selenium Tower B, Plot No. 31-32, Gochibowli, Financial District, Nankramguda, Hyderabad, 500 032
Hyderabad
Andhra Pradesh
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 10 Feb 2021
Final Order / Judgement

आदेश

 

मा. अध्‍यक्ष, श्री. संजय वा. पाटील यांच्‍या आदेशान्‍वये -

 

      तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून  रुपये 10,000/- चा Promissory Note  च्‍या स्‍वरुपातील regd. Folio No.  IFD035628  आणि Certificate No. 260019  चा बॉन्‍ड दि. 19.11.1198 रोजी खरेदी केला होता व त्‍याची मुदत 17 वर्षे 6 महिने होती आणि तक्रारकर्त्‍याला मुदतीनंतर रुपये 1,00,000/- मिळणार होते व  त्‍याची मुदत दि. 19.05.2016 रोजी संपली होती. म्‍हणून तक्रारकर्ता हा मार्च 2017 मध्‍ये विरुध्‍द पक्षाच्‍या सिव्‍हील लाईन येथील शाखेत गेला असता तेथील  बॅकेच्‍या अधिका-यांनी त्‍याला केवळ रुपये 23,470/- मिळतील असे सांगितले. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने दि. 03.07.2017 रोजी विरुध्‍द पक्षांना नोटीस पाठविली आणि त्‍यानंतर वर्तमान तक्रार दाखल केली.

       तक्रारकर्त्‍याने दि. 04.08.2017 पासून या अंतिम आदेशाच्‍या दिनांकापर्यंत  विरुध्‍द पक्षाला नोटीस बजावणीबाबतची कार्यवाही केलेली नाही. सबब आम्‍ही खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावर निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविलेले आहे.

 

अ.क्रं.    मुद्दा                                   उत्‍तर

 1.  तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर करण्‍यात योग्‍य

     आहे काय ?                                 नाही

 

 2.  काय आदेश ?                          अंतिम आदेशाप्रमाणे

 

निष्‍कर्ष

मुद्दा क्रमांक 1 बाबत -   वर्तमान प्रकरणात तक्रारकर्त्‍याने दि. 04.08.2017 रोजी तक्रार दाखल केली होती. परंतु सुरुवातीपासूनच तक्रारकर्त्‍याचे वकील हे सतत गैरहजर होते. वारंवांर शेवटची संधी देऊन ही तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी प्राथमिक सुनावणीकरिता हजर झाले नाही. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याचे वकील शेवटी दि. 29.11.2017 रोजी मंचासमक्ष  हजर झाल्‍यावर त्‍यांचा प्राथमिक युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर  विरुध्‍द पक्षाला नोटीस काढण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला. परंतु त्‍यानंतर पुन्‍हा तक्रारकर्ता व त्‍यांचे वकील आजपर्यंत गैरहजर आहे आणि वर्तमान प्रकरणात त्‍यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. म्‍हणून विरुध्‍द पक्ष यांना त्‍यांचा जबाब देण्‍याची संधी मिळालेली नाही.  तसेच तक्रारकर्त्‍याने सदरहू मुळ बॉन्‍ड वर्तमान तक्रारीत दाखल केलेला नाही. म्‍हणून सदरहू बॉन्‍डची रक्‍कम त्‍यांनी स्‍वीकारली अथवा नाही हे आयोगाला समजू शकत नाही. बॅंकेकडून जेव्‍हा पेमेंट करण्‍यात येते, तेव्‍हा मुळ बॉन्‍ड परत घेण्‍यात येतो. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने जर त्‍याला रक्‍कम मिळाली नाही तर त्‍याने मुळ बॉन्‍ड या आयोगा समक्ष सादर करणे आवश्‍यक होते. सबब वरील कारणास्‍तव तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर करण्‍या योग्‍य नाही असे आमचे मत आहे. म्‍हणून मुद्दा क्रमांक 1 वर नकारार्थी उत्‍तर नोंदवित आहोत.

 

      सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. तक्रारकर्त्‍याने तक्रारीचा खर्च स्‍वतः वहन करावा.
  3. तक्रारकर्त्‍याला आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.