Dated the 12 Mar 2015
दाखल सुनावणी कामी आदेश
द्वारा- श्री.म.य.मानकर...................मा.अध्यक्ष.
1. तक्रारदार यांनी सामनेवाले विमा कंपनी यांच्या विरुध्द ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांच्या पत्नी नामे श्रीमती शोभा सुरेश संखे यांनी सामनेवाले कंपनीकडून पॉलीसी क्रमांक-17899021, ता.12.07.2013 ची घेतली होती व त्या करीता रु.1,01,000/- प्रिमीयम भरला होता. पॉलीसी घेतल्यानंतर श्रीमती शोभा सुरेश संखे हया ता.15.11.2013 रोजी मयत झाल्या, त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे दावा दाखल केला. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रु.88,887.01 पैसे सरंडर व्हॅल्यु म्हणुन अदा केले. सामनेवाले यांच्याप्रमाणे मयताने पॉलीसी घेतांना त्यांच्या आजाराबाबत नमुद केले नव्हते, व ही बाब लपवुन ठेवण्यात आली होती. तक्रारदार यांच्याप्रमाणे सामनेवाले यांनी पॉलीसीची रक्कम रु.10,10,000/- देणे आवश्यक होते, सबब ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
2. तक्रारदार यांच्या वतीने वकील श्री.कोतवाल यांना दाखल सुनावणीकामी ऐकण्यात आले.
3. तक्रार, व तक्रारी सोबत दाखल करण्यात आलेले कागदपत्रे पाहण्यात आले. ही पॉलीसी ता.12.07.2013 रोजी काढण्यात आली होती, व श्रीमती शोभा संखे हया अंदाजे चार महिन्यांनी म्हणजेच ता.15.11.2013 रोजी मयत झाल्या. अभिलेखावरील सामनेवाले यांचे ता.28.02.2014 रोजीच्या कागदपत्रांप्रमाणे मयत शोभा हया ता.23.07.2012 रोजी Bilateral Obstructive Uropathy करीता हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या व मयत ता.23.07.2012 ते ता.31.10.2012 या कालावधीमध्ये वैदयकिय रजेवर होत्या. परंतु पॉलीसी घेतांना त्यांना आजार नसल्याचे नमुद केले आहे. सबब सामनेवाले यांनी त्यांना पॉलीसीची पुर्ण रक्कम अदा केली नाही. परंतु सरंडर व्हॅल्यु करीता रु.88,887.01 पैसे इतकी रक्कम अदा केली. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना ता.06.06.2014 रोजी एक पत्र लिहिले होते, जे पृष्ठ क्रमांक-19 वर आहे. त्यामध्ये त्यांनी असे नमुद केले आहे की, मयत श्रीमती शोभा संखे यांना मुतखडयाचा त्रास होता व ही बाब सेल्स पर्सनला सांगण्यात आली होती. अभिलेखावर दाखल असलेल्या कागदपत्रांप्रमाणे ही बाब एकदम स्पष्ट आहे की, मयत श्रीमती शोभा संखे यांना पॉलीसी घेण्यापुर्वी पासुन किडणीचा त्रास होता. मृत्युच्या दाखल्यामध्ये किडणीच्या आजाराबाबत उल्लेख आहे. श्रीमती शोभा संखे हया ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात नोकरीस होत्या. त्यामुळे पॉलीसी घेतांना त्यांनी आजारा बाबत नमुद करणे अपेक्षीत होते. त्यांनी याबद्दल सेल्स पर्सनला सांगितले होते हे मान्य करता येणार नाही आणि तक्रारदार असा बचाव आमच्या मते घेऊ शकत नाही.
4. विमा पॉलीसी हा दोन पक्षामधील करार असतो व हा करार करतांना कोणतीही बाब एका पक्षाने दुस-या पक्षापासुन लपवुन ठेवणे अपेक्षीत नसते असे केल्यास दुस-या पक्षास असा करार बंधनकारक नसतो. याबाबत “ Indian Contract Act, 1872 ” मधील कलम-10, 14 व 17 यांचा उल्लेख करता येईल. हे कलम आम्ही खाली नमुद करीत आहोत.
What agreement are contract:- All agreements are contracts if they are made by the free consent of parties competent to contract, for a lawful consideration and with a lawful object, and are not hereby expressly declared to be void.
Nothing herein contained shall effect any law in force in (India) and not hereby expressly repealed, by which any contract is required to be made in writing or in the or in the presence of witnesses, or any law relating to the registration of documents.
14. Free consent defined: - consent is said to be free when it is not caused by-
(1) Coercion, as defined in section 15, Or
(2) Undue influence, as defined in section 16, Or
(3) Fraud, as defined in section 17, Or
(4) Misrepresentation, as defined in section 18, Or
(5) Mistake, subject to the provisions of sections 20, 21 and 22.
Consent is said to be so caused when it would not have been given but for the
Existence of such coercion, undue influence, fraud, misrepresentation or mistake.
17. Fraud defined:- Fraud means and includes any of the following acts committed by a party to a contract, or with his connivance, or with his connivance or by his agent, with intent to deceive another party thereto or his agent or to induce him to enter into the contract:-
(1) The suggestion as a fact, of that which is not true, by one who does not believe it
To be true;
(2) The active concealment of a fact by one having knowledge or belief of the fact;
(3) A promise made without any intention of performing it;
(4) Any other act fitted to deceive;
(5) Any such act or omission as the law specially declares to be fraudulent.
Explanation: Mere silence as to facts likely to affect the willingness of a person to
(6) Enter into a contract is not fraud, unless the circumstances of the case are such
That, regard being had to them, it is the duty of the person keeping silence to
Speak, or unless his silence is, in itself, equivalent to speech.
(Emphasis added by us)
आम्ही खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
- आदेश -
1. तक्रार क्रमांक-670/2014 ही ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम-12(3) प्रमाणे खारीज
करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
3. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
ता.12.03.2015
जरवा/