(मा.अध्यक्ष श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
सामनेवाला यांचेकडून अर्जदार यांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रु.7,73,753/- मिळावेत, मालक/ड्रायव्हर यांचे मृत्युसंदर्भाची मागणी रक्कम रु.2,00,000/-मिळावेत, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.25,000/- मिळावेत व या एकूण रक्कम रु.10,48,753/- वर 18 टक्के दराने व्याज मिळावे या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला यांनी पान क्र.22 लगत लेखी म्हणणे, पान क्र.23 लगत प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे.
तक्रार क्र.124/2011
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत.
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?-होय.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?-होय.
3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी व्याजासह रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
4) अर्जदार हे मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय
5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
विवेचन
याकामी अर्जदार यांचे वतीने अँड.एस.ए.चोरडीया व सामनेवाला यांचे वतीने अँड.पी.पी.पवार यांनी तोंडी युक्तीवाद केलेला आहे.
अर्जदार यांच्या मालकिची गाडी क्र.एमएच-15-सिटी-3399 या वाहनाचा विमा सामनेवाला यांचेकडून घेतलेला होता ही बाब सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये मान्य केलेली आहे. अर्जदार यांनी पान क्र.5 लगत विमा सर्टिफिकेट हजर केलेले आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र व पान क्र.5 चे विमा सर्टिफिकेट याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पोलिस पेपर्सनुसार सदरच्या अपघाताचे वेळी वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. त्यामुळे विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग झालेला आहे व त्यामुळे सदर क्लेमबाबत नुकसान भरपाई देण्याबाबतचे सामनेवाला विमा कंपनीचे कोणत्याही प्रकारे उत्तरदायित्व नाही. तक्रार अर्ज खर्चासह रद्द करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे.
या कामी अर्जदार यांनी पान क्र.6 लगत पोलिसांचेकडील क्लेम डिटेल फॉर्म, पान क्र.7 लगत फिर्याद ही कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सामनेवाला यांनी पान क्र.29 लगत प्रफुल्ल शहा सर्वेयर यांचा सर्वे रिपोर्ट दाखल केलेला आहे. वाहनामध्ये जे प्रवासी बसले होते त्या प्रवाशांनी प्रवासी भाडयाची खर्चाची रक्कम देवून प्रवास केलेला आहे हे दर्शवण्याकरीता सामनेवाला यांनी कोणतीही योग्य ती कागदपत्रे व
तक्रार क्र.124/2011
पुरावा दाखल केलेला नाही. पोलिसांचेकडील कागदपत्रानुसार वाहनातून पाच सज्ञान व तीन अज्ञान लोक प्रवास करीत होते असे दिसून येत आहे. अर्जदार यांनी तक्रार अर्ज कलम 2 मध्ये वाहनामध्ये पाच इसम व तीन अज्ञान बालक प्रवास करीत होते ही बाब मान्य केलेली आहे. अर्जदार यांचे पती म्हणजे वाहनाचे मालक स्वतः अर्जदार नं.1 व 2 व अर्जदार यांचे नातेवाईक वाहनातून प्रवास करीत होते. वाहनाची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता पाच इतकीच आहे. तीन लहान मुले वाहनामधून प्रवास करीत होती व अन्य पाच व्यक्ती वाहनामध्ये होत्या हे स्पष्ट झालेले आहे. परंतु केवळ तीन जादा लहान मुले वाहनात असल्यामुळे वाहनास अपघात झालेला आहे ही बाब सामनेवाला यांनी स्पष्टपणे शाबित केलेली नाही. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांचा विमाक्लेम अयोग्य व चुकीचे कारण देवून नाकारलेला आहे हे स्पष्ट होत आहे.
याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे.
1) 2009 सिटीजे राष्ट्रीय आयोग पान 518 पी बी वेंकटारेड्डी विरुध्द न्यु
इंडिया इन्शुरन्स कं.
सामनेवाला यांनी पान क्र.29 लगत जो सर्वे रिपोर्ट दाखल केलेला आहे या सर्वे रिपोर्टनुसार वाहनाचे संपुर्णपणे नुकसान झालेले आहे असे दिसून येत आहे. पान क्र.5 ची विमा पॉलिसी प्रमाणे वाहनाचा रु.4,65,074/- इतक्या रकमेकरीता विमा घेतलेला आहे व ड्रायव्हर, मालक या करीता रु.2,00,000/- विमा घेतलेला आहे असेही दिसून येत आहे. अर्जदार व सामनेवाला यांचे कथनानुसार अर्जदार यांनी दि.23/11/2010 रोजी वाहन खरेदी घेतलेले आहे व वाहनास दि.29/12/2010 रोजी अपघात झालेला आहे. म्हणजे वाहन खरेदी घेतल्यापासून एक महिन्याचे आतच अपघात झालेला आहे, यामुळे घसा-याची रक्कम वजा करता येत नाही. पान क्र.5 चे विमा पॉलिसीचा विचार होता अर्जदार हे वाहनाचे नुकसान भरपाईपोटी रु.4,65,074/- व अर्जदार यांचे पती म्हणजे वाहनाचे मालक मयत शरद रामराव निकम यांचे विमाक्लेमपोटी रु.2,00,000/- अशी एकूण रक्कम रु.6,65,074/- इतकी रक्कम सामनेवाला यांचेकडून वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.6,65,074/- इतकी मोठी रक्कम अर्जदार यांना योग्य त्या वेळी मिळालेली नाही यामुळे निश्चितपणे अर्जदार यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागलेले आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला
तक्रार क्र.124/2011
यांचेकडून आर्थिक नुकसान भरपाई म्हणून मंजूर रक्कम रु.6,65,074/- या रकमेवर पान क्र.29 चे सर्वे अहवालाची तारीख दि.15/04/2011 पासून दोन महिन्यानंतर म्हणजे दि.16/06/2011 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे.
1) 2 (2008) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान क्र.186. ओरीएंन्टल इंन्शुरन्स कंपनी विरुध्द राजेंद्रप्रसाद बंन्सल.
2) 1 (2008) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान क्र.265. संजीवकुमार विरुध्द न्यु इंडिया इंन्शुरन्स कंपनी.
सामनेवाला यांचेकडून विमा क्लेमची रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. यामुळे अर्जदार यांना निश्चितपणे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद, तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद, मंचाचे वतीने आधार घेतलेली व वर उल्लेख केलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) आजपासून 30 दिवसांचे आत सामनेवाला यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा द्याव्यात.
अ) विमा क्लेमपोटी रक्कम रु.6,65,074/- द्यावेत व आर्थीक नुकसान भरपाई म्हणून या मंजूर रकमेवरती दि.16/06/2011 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज द्यावे.
तक्रार क्र.124/2011
ब) मानसिक त्रासापोटी रु.15,000/- द्यावेत.
क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत.