द्वारा- श्रीमती मोहिनी ज. भिलकर, सदस्या -
अर्जदार श्रीमती उर्मिलाबाई सदुजी महारवाडे यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,...........
1. अर्जदार यांचे पती सदुजी तुकाराम महारवाडे हे श्री. नंदलाल हरी शिवणकर रा. दातोरा यांचेकडे गोबरगॅस प्लांट साफ करतांना मरण पावले. गोबरगॅस प्लांट साफ करतांना त्यात चार मजुरांचा मृत्यु झाला होता. त्या चार मजुरांपैकी सदु तुकाराम महारवाडे व वटु तुकाराम महारवाडे हे दोघे होते. पोलिसांनी नंदलाल विरोधात क्राईम नं. 43/05 प्रमाणे गुन्हा दाखल केला.
2. सरकारी नियम नं. 166/11-A नुसार गैरअर्जदार क्रं. 2 यांनी अर्जदार यांचे पती सदु यांचा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा काढला होता. गैरअर्जदार क्रं. 2 यांनी वटु तुकाराम महारावाडे यांचा विमा दावा नं. एम.यु.एम./0000695 हा नंबरचा व सदु तुकाराम महारवाडे यांचा विमा दावा नं. एम.यु.एम./0000696 हा गैरअर्जदार क्रं. 1 यांचेकडे केला होता.
3. गैरअर्जदार क्रं. 1 यांनी विमा दावा मंजूर करुन रु. 1,00,000/- चा चेक नं. 054079 हा दि. 16.09.2005 रोजी श्रीमती उर्मिला वटु महारवाडे यांच्या नांवे पाठवून केस नं. एम.यु.एम.0000695 बंद केली.
4. गैरअर्जदार क्रं.1 यांनी 12.08.05 रोजी पत्र पाठवून सदु यांचे मृत्युचे प्रमाणपत्र मागितले म्हणून अर्जदार यांनी दि. 25.08.05 रोजी मृत्युचे प्रमाणपत्र रजिस्टर पोस्टाने गैरअर्जदार क्रं. 1 यांना पाठविले. नंतर डिसेंबर 2005 मध्ये पुन्हा अर्जदार यांनी पत्राद्वारे विचारणा केली असता विमा दावा हा विचाराधीन असल्याचे अर्जदार यांना कळविण्यात आले.
5 अर्जदार विनंती करतात की, शेतकरी अपघात विमा योजनेचे रु.1,50,000/- व 18% व्याजाप्रमाणे तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून ते विमा दावा मिळेपर्यंत रक्कम गैरअर्जदार यांनी द्यावी.
6 सदर तक्रारीत गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हे आदरणीय मंचासमोर दि. 28.04.07 रोजी नोटीस मिळाला तसेच गैरअर्जदार क्रं. 2 यांना दि. 24.04.07 रोजी नोटीस मिळूनही गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हे आदरणीय मंचासमोर हजर झालेले नाहीत व ग्राहक तक्रारीचे उत्तर सुध्दा दिलेले नाही. अश्या स्थितीत गैरअर्जदार क्रं. 1 व गैरअर्जदार क्रं. 2यांचे विरोधात प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि. 25.06.07 रोजी पारित केला. आदेश नि.क्रं. 1 वर पारित करण्यात आला.
कारणे व निष्कर्ष
7 अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र , पुरावा व लेखी युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, अर्जदार हे शेतकरी होते. अर्जदार यांनी रेकॉर्डवर दाखल केलेल्या दस्ताऐवजातील सातबारा वरुन अर्जदार हे शेतकरी होते हे दिसून येते.
8 अर्जदार यांचा विमा हा गैरअर्जदार क्रं. 2 यांनी काढलेला होता. त्याचा क्लेम नं. एम.यु.एम/0000696 असा होता. त्यामुळे अर्जदार यांचा विमा हा गैरअर्जदार क्रं. 1 यांचेकडे काढलेला होता याबद्दल वाद नाही.
9 अर्जदार यांनी तक्रारीत सांगितले आहे की, वटु व सदु या दोन्ही शेतक-यांचा विमा दावा काढलेला होता. त्यात वटु यांना विमा दावा मिळाला. गैरअर्जदार क्रं. 1 यांनी अर्जदार यांना सदु यांच्या मृत्युचे प्रमाणपत्र मागितले होते ते अर्जदार यांनी त्वरित पाठविले परंतु त्यांचा विमा दावा मंजुर केला नाही ही गैरअर्जदार क्रं. 1 यांच्या सेवेतील न्युनता दिसत आहे. त्यामुळे अर्जदार हे विमा दावा मिळण्यास पात्र आहेत.
अशा स्थितीत सदर आदेश पारित करण्यात येते की,..........
आदेश
1. गैरअर्जदार क्रं. 1 यांनी विमा दाव्याची रक्कम रु.1,00,000/- ही अर्जदार यांना द्यावी.
2. अर्जदार यांना ती रक्कम मृत्युचे प्रमाणपत्र पाठविल्याच्या तारखेपासून म्हणजेच 25.08.05 पासुन ते विमा दाव्याची रक्कम मिळेपर्यंत 9% व्याजाने देण्यात द्यावी.
3. गैरअर्जदार क्रं. 1 यांनी शारीरिक व मानसिक त्रासासाठी रु.3000/- व ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रु.1000/- अर्जदार यांना द्यावा.
4. गैरअर्जदार क्र. 1 यांनी आदेशाचे पालन आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याचे आत करावे. अन्यथा गैरअर्जदार क्रं. 1 हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम-27 प्रमाणे दंडाहर्य कारवाईस पात्र ठरतील.