जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/151. प्रकरण दाखल तारीख - 06/07/2009 प्रकरण निकाल तारीख – 26/10/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य वामन पि.प्रेमसिंग चव्हाण वय, 45 वर्षे, धंदा नौकरी रा.जवाहर नगर, नांदेड. ता. जि.नांदेड अर्जदार विरुध्द. 1. आय.सी.आय.सी. लोंम्बार्ड कंपनी कार्यालय झेनीत हाऊस, केशवराव खोड मार्ग, महालक्ष्मी मुंबई – 400 034. गैरअर्जदार 2. आय.सी.आय.सी. लोंम्बार्ड कंपनी कार्यालय, कलामंदी शेजारी, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.सुनिलकुमार पाटील. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.अजय व्यास. निकालपञ (द्वारा - मा.श्री. सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार आय.सी.आय.सी आय लोंम्बार्ड कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, अर्जदार हे बालविकास प्रकल्प कार्यालय नांदेड येथील कार्यालयात कर्मचारी आहेत.त्यांनी आपल्या स्वतःच्या वापरासाठी टाटा इंडिया कार एम.एच.-26- व्ही-0276 दि.16.02.2008 रोजी खरेदी केले होते. वाहनाच्या सूरक्षेसाठी गैरअर्जदार कंपनीकडून विमा पॉलिसी नंबर 3001/5354422210/01/001 ही पॉलिसी दि.16.02.2009 ते 15.02.2010 या कालावधीसाठी घेण्यात आली होती. अर्जदाराच्या कार्यालयातील कनिष्ठ लिपीक व जी.एल. राजमोड व शिवाजी चव्हाण वाहन चालक हे मिञत्वाचे नात्याने अर्जदाराची गाडी घेऊन कार्यालयीन कामासाठी दि.6.5.2009 रोजी सातारा येथे गेले. दि.7.5.2009 रोजी साताराहून नांदेड येथे परत येत असताना सातारा पंढरपूर रोडवर पूसेगांव जवळ पावसामूळे एक दूचाकी वाहन घसरुन पडल्यामूळे सदरील व्यक्तीस वाचविण्यासाठी ड्रायव्हरने ब्रेक लावले असताना कार रोडवरील पूलावरुन खाली कोसळली व गाडीचे नूकसान झाले. अर्जदाराची गाडी राजमोड यांनी मिञत्वाचे नात्याने विनामोबदला नेली होती. हे सर्व एकाच कार्यालयातील कर्मचारी असल्यामूळे खाजगी वापरासाठी दिली होती. घटना घडल्यानंतर अपघाताची सूचना गैरअर्जदार कंपनीस दिली असताना तयांनी सर्व्हेअर, लॉस असेसर यांना वाहनाची तपासणी साठी पाठविले. त्यांनी तपासणी अंती सर्व्हे रिपोर्ट गैरअर्जदार यांचेकडे सादर केला. घटनास्थळावरुन वाहन काढून गैरअर्जदार यांचे सांगणेप्रमाणे वाहनाची दूरुस्ती बाफना मोटार्स नांदेड येथे करुन घेतली. सदरील दूरुस्तीसाठी रु.,2,58,000/- चा खर्च आला. इस्टीमेंट प्रमाणे वाहनाच्या दूरुस्तीच्या रक्कमेची मागणी केली असता गैरअर्जदाराने ती देण्यास टाळाटाळ केली. यानंतर अर्जदाराने अर्ज दिल्यावर गैरअर्जदारांनी दि.13.6.2009 रोजीच्या पञानुसार अर्जदाराची विनंती फेटाळली. त्यांचे कारण त्यांने गाडीचा वापर व्यावसायीक होता असे म्हटले आहे. गाडीच्या वापरा संबंधीचा खूलासा केला नसल्यामूळे आपण विमा प्रमाणपञात नमूद केल्याप्रमणे फायदे घेण्यास अपाञ आहात अशी पञामध्ये विरोधाभासी भाषा वापरली आहे व नूकसान भरपाई देण्यास नकार दिला. त्यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, अर्जदार यांना गैरअर्जदार यांचेकडून वाहनाच्या दूरुस्तीसाठी रु.,2,58,000/- तसेच मानसिक ञासापोटी रु.42,000/- असे एकूण रु.3,00,000/- देण्याचे आदेश व्हावेत व त्यावरील व्याजही मिळावे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यात त्यांनी सदरील तक्रार ही बिनबूडाची व चूकीची आहे असे म्हटले आहे. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे कार्यालयातील कनिष्ठ लिपीक, राजमोड व चव्हाण व वाहन चालक हे मिञत्वाच्या नात्याने दि.6.5.2009 रोजी कार्यालयीन कामासाठी गाडी नेल्याचे अमान्य केले आहे. तसेच दि.7.5.2009 रोजी परत येत असताना पूसेगांव जवळ अपघात झाला हे ही अर्जदाराने सिध्द करावे असे म्हटले आहे. गैरअर्जदारांना हे मान्य आहे की, त्यांना घटना घडल्यानंतर सूचना मिळाल्या बरोबर त्यांनी सव्हेअर व लॉस असेंसर यांना पाठविले होते. त्यांचा अहवाल पण त्यांनी गैरअर्जदारास दिला परंतु वाहन काढून दूरुस्ती करण्यास त्यांनी सांगितल्याचे त्यांनी अमान्य केले आहे. तसेच रु.258,000/- चा खर्च झाला हे ही त्यांनी सिध्द करावयास हवे असे म्हटले आहे. गैरअर्जदारांनी दि.13.6.2009 रोजी अर्जदाराचा क्लेम नाकारला यांचे कारण गाडीचा वापर व्यावसायीक केला असे दर्शवून क्लेम फेटाळला. प्रायव्हेट कार पॉलिसी नंबर 3001/53544222/01/001 ही त्यांना मान्य आहे. यावीषयी वाद नाही. सर्व्हेअरने वादग्रस्त वाहनाचा सर्व्हे करुन त्यांचे पाहणीप्रमाणे अपघातग्रस्त वाहनाचे नूकसान रु.1,95,084/- एवढे झाले असा अहवाल दिला आहे. तो त्यांनी म्हणणे सोबत दाखल केलेला आहे. गैरअर्जदाराचे तपासणीक अधिकारी श्री. प्रसादकूमार कस्तूरे यांना नेमले होते त्यांनी चौकशी करुन दि..5.6.2009 रोजी विमा कंपनीकडे अहवाल दिला व त्यांनी अर्जदाराने वाहनाचा उपयोग व्यावसायकी कारणासाठी केला म्हणजे दि.6.5.2009 रोजी म्हणजे घटनेचे दिवशी सदरील वाहनामध्ये शिवाजी चव्हाण, जी.एल.राजमोड व वाहन चालक उल्हास जाधव हे प्रवास करीत होते. तपासणीक अधिकानी यांनी अर्जदाराचे व अर्जदाराचे वाहनातील प्रवाशाचे जवाब नोंदविले. त्या जवाबात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सदरील वाहनाचा उपयोग हा व्यावसायीक म्हणून होत होता. अर्जदाराने पॉलिसीचे नियम व अटीचे उल्लंघन केले आहे त्यामूळे गैरअर्जदर विमा क्लेम देण्यास जबाबदार नाहीत म्हणून सदरील तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदाराचे वाहन नंबर एम.एच.-26-व्ही-0276 हे त्यांचे मालकीचे असल्याबददल व यांचा खाजगी उपयोग असल्याबददल वाहनाचे आर सी बूक दाखल केलेले आहे. वाहनाच्या सूरक्षेसाठी गैरअर्जदार यांनी पॉलिसी नंबर 3001/53544222/01/001 ही पॉलिसी दिली होती. याबददल पॉलिसी दाखल केलेली आहे. अपघात झाल्याबददल अर्जदार यांनी दि..7.5.2009 रोजी त्यांचे वाहन त्यांचे कार्यालयातील लिपीक, राजमोड व शिवाजी चव्हाण व वाहन चालक यांनी खाजगी कामासाठी मिञत्वाच्या नात्याने नेली असताना साता-याहून नांदेड कडे परत येत असताना साता-याहून पंढूरपूर रोडवर पूसेगांव जवळ पावसामूळे एक दूचाकी वाहन घसरुन पडले व त्या व्यक्तीला वाचविण्यासाठी ब्रेक लावले असताना अपघात झाला असे म्हटले आहे परंतु या अपघाता बाबत पॉलिसीमध्ये एफ.आय.आर. सादर केलेला नाही किंवा घटनास्थळाचा पंचनामा ही दाखल करण्यात आलेला नाही असे जरी असले तरी गैरअर्जदारांनी आपले लेखी म्हणण्यात त्यांनी अपघाताची सूचना मिळाली व यानुसार त्यांनी सर्व्हेअरला पाठविले व जायमोक्यावर जाऊन वाहनाची तपासणी करुन त्यांचे नूकसान ठरविले. म्हणजे सदर अपघात हा गैरअर्जदार यांना मान्य आहे. त्यामूळे आता इतर कागदपञाची आवश्यकता उरलेली नाही. मूददा एवढाच शिल्लक राहतो की, अर्जदार यांनी रु.2,58,000/- या बाफना मोटार्स च्या इस्टीमेंट प्रमाणे वाहनाच्या दूरुस्ती बददलचा खर्च मागितलेला असताना गैरअर्जदार यांनी दि.13.06.2009 रोजी अर्जदार यांचे नांवे पञ देऊन त्यात वाहनाचा उपयोग हा कमर्शियल म्हणजे व्यावसायीक कारणासाठी केलेला असल्यामूळे व अर्जदारांनी वाहनाचा उपयोग कोणत्या कारणासाठी करणार आहेत यांचा उल्लेख केलेला नाही. म्हणून त्यांचा क्लेम नाकारलेला आहे. हे पञ पाहिल्यानंतर असे दिसून येते की, यात त्यांनी दोहेरी शब्दाचा प्रयोग केला आहे. गैरअर्जदार असे म्हणतात की, वाहनाचा उपयोग खाजगी व व्यावसायीक आहे यांचा उल्लेख अर्जदाराने केलेला नाही व एकीकडे म्हणतात की, वाहनाचा उपयोग हा व्यावसायीक आहे म्हणजे गैरअर्जदार स्वतः आपल्या मताशी ठाम नाहीत. अर्जदाराच्या वाहनाचा नंबर एम.एच.-26-व्ही-0276 या वाहनाचे आर.सी. बूक पाहिले असता यात खाजगी वापरासाठी असे स्पष्टपणे म्हटले आहे व ते गैरअर्जदाराने नाकारलेले नाही. अर्जदाराच्या तक्रारीत असे स्पष्टपणे म्हटले आहे की, त्यांच्याच कार्यालयातील काही कर्मचारी मिञाने मिञत्वाच्या नात्याने कार्यालयाच्या कामासाठी त्यांचेकडून वाहन नेले आहे. म्हणजे त्या वाहनाच्या उपयोगासाठी कोणत्याही प्रकारचा मोबदला अर्जदाराने स्विकारलेला नाही. यांला सपोंरटींग म्हणून तपासणीक अधिकारी श्री. प्रसादकूमार कस्तूरे यांनी चौकशी करुन दि.5.6.2009 रोजी अहवाल दिला व या अहवालासोबत शिवाजी चव्हाण, राजमोड व वाहन चालक उल्हास चव्हाण यांचे जवाब नोंदविले . हे पाहिजे असता व प्रसादकूमार कस्तूरे यांचे शपथपञ तपासले असता तपासणीक अधिकारी व्यावसायीक उपयोग जरी म्हणत असले तरी यात मोबदला अर्जदार यांना दिला गेला असे कूठलेही बाब स्पष्ट होत नाही. वामन चव्हाण अर्जदार यांचे जवाबात त्यांचे कार्यालयातील सहकारी यांना त्यांचे वाहन कूठलाही मोबदला नप घेता दिले होते एवढेच म्हटले आहे. यात शिवाजी चव्हाण, राजमोड व वाहन चालक उल्हास चव्हाण यांचे जवाब नोंदविण्यात आलेले आहेत. याप्रमाणे फक्त वाहनामध्ये डिझेल भरण्याच्या अटीवर हे वाहन अर्जदाराकडून त्यांचे मिञ घेऊन गेले होते यात कोणत्याही प्रकारे मोबदला घेण्यात आलेला नाही. डिझेल भरणे म्हणजे वाहनाचा उपयोग करताना हे पर्यायाने बाब आलीच यात कोणत्याही प्रकारचा नफा अर्जदाराने त्यांचेकडून घेतलेला नाही. दि.7.5.2009 रोजी अपघात झाल्याचे तपासणीक अधिका-याने स्पष्टपणे नोंद केलेली ेआहे व हा अपघात पोलिस स्टेशनला एफ.आय. आर दिला गेला नाही ही बाब नोंदलेली नाही. त्यामूळे एफ.आय.आर., पंचनामा इत्यादी कागदपञ उपलब्ध नाहीत. असे असताना सर्व्हेअरने सर्व्हे करुन अपघातग्रस्त वाहनाची नूकसान भरपाई ही रु.1,95,084/- ठरवलेली असताना व कोणतेही सबळ कारण नसताना गैरअर्जदाराने क्लेम नामंजूर करुन सेवेत ञूटी केलेली आहे. सर्व्हेअरने हा पहिला अधिकृत टेक्नीकल व्यक्ती आहे. जो की प्रत्यक्ष जागेवर जाऊन व वाहनाची तपासणी करुन वाहनाचे नूकसान ठरवू शकतो. त्यामूळे सर्व्हेअरने दिलेला सर्व्हे रिपोर्ट हे अतीशय महत्वाचे कागदपञ आहे. म्हणून सव्हे रिपोर्ट प्रमाणे अर्जदारास रक्कम मिळणे आवश्यक आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदारांनी हा निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांचा विमा पॉलिसी नंबर 3001/535442210/01/001 यासाठी एम.एच.-26-व्ही-0276 या वाहनाच्या अपघाती नूकसानी बददल रु.1,95,084/- व त्यावर क्लेम नाकारल्याचे दि.13.06.2009 पासून 9 टक्के व्याजासह पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |