निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 29/12/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 13/01/2011 तक्रार निकाल दिनांकः- 12/07/2011 कालावधी 05 महिने 29 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. अनिसोद्दीन पिता नजिरोद्दीन शेख. अर्जदार वय 50 वर्ष.धंदा. निरंक. अड.डि.यु.दराडे. रा.एक मिनार रोड.तुराबुल हक नगर. परभणी ता.जि.परभणी. विरुध्द आय.सी.आय.सी.आय. प्रुडेंन्शियल लाईफ इन्शुरन्स कं. लि. गैरअर्जदार. आय.सी.आय.सी.आय.प्रुह लाईफ टॉवर 1089 अड.अजय. जी.व्यास. अप्पासाहेब मराठे मार्ग. प्रभादेवी. मुंबई. – 400025 नोटीस तामीलीसाठी. आय.सी.आय.सी.आय.प्रुडेंन्शियल लाईफ इन्शुरन्स कं.लि. स्टेशन रोड.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.) विमा पॉलिसी बंद केल्यानंतर सरेंडर व्हॅल्युची रक्कम कमी दिली म्हणून प्रस्तुतची तक्रार आहे. अर्जदाराने गैरअर्जदारकडून लाईफ टाईम सुपर पेंन्शन नावाची दहा वर्ष मुदतीची तारीख 31/08/2007 रोजी जीवन विमा पॉलिसी घेतली होती तीचा पॉलिसी क्रमांक 06226100 व वार्षीक हप्ता रु.20,000/- होता.पॉलिसी घेतल्यावर अर्जदाराची पत्नी आजारी पडल्याने व त्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने घेतलेली पॉलिसी रद्द करुन हप्त्यापोटी भरलेली रक्कम परत घेण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून पॉलिसी रक्कम मुदतपूर्व मिळणेस गैरअर्जदाराकडे मागणी केली.परंतु त्यांनी फक्त रु.4,777/- एवढीच रक्कम चेकव्दारे दिली.ती बेकायदेशिररित्या कमी दिली.म्हणून दिलेली रक्कम वजा जाता उरलेली रक्कम रु.14,231/- मिळावी.याखेरीज मानसिकत्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचा खर्च रु.3000/- मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) पुराव्यातील कागदपत्रात नि.4 लगत पहिला हप्ता भरलेली पावती, पॉलिसीचे स्टेटमेंट, व्हाऊचर, वगैरे 5 कागदपत्रे दाखल केले आहेत. गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर त्यांनी तारीख 28/04/2011 रोजी आपला लेखी जबाब ( नि.8) दाखल केला. लेखी जबाबामध्ये सुरवातीलाच तक्रार अर्जावर कायदेशिर आक्षेप घेवुन अर्जदाराच्या तक्रारीमध्ये तक्रारीस गैरअर्जदाराविरुध्द कायदेशिर कारण काय घडले? याचा स्पष्ट उल्लेख नाही.तसेच तक्रार अर्ज कायदेशिर मुदतीतही नाही.आणि गैरअर्जदाराकडून कोणतीही सेवात्रुटी झालेली नाही. म्हणून तक्रार फेटाळण्यात यावी.असे त्यांचे म्हणणे आहे.पुढे असा खुलासा केला आहे की,अर्जदाराने पॉलिसीचा पहिला हप्ता भरल्यानंतर पुढे एकही हप्ता दिलेल्या मुदतीत किंवा वाढीव मुदतीतही (ग्रेस पिरीयड) भरलेला नव्हता.सलग तीन वर्षे पॉलिसी बंद अवस्थेत होती.तारीख 22/09/2010 रोजी अर्जदाराने पॉलिसी बंद करुन मुदतपूर्व रक्कम मिळणेची मागणी केल्यानंतर पॉलिसी कंडिशन क्रमांक 4 व 5 नुसार नियमा प्रमाणे आवश्यकत्या वजावटी करुन अर्जदारास रु.4,777.16 चेकने अदा केले.अर्जदाराने ती रक्कम नाहरकत स्वीकारलेली होती.दिलेली रक्कम पॉलिसी क्लॉज 10 व क्लॉज 4 नुसार जी देय होते ती सर्व दिलेली आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारे चुक नाही किंवा त्रुटी नाही अर्जदाराने तक्रार अर्जातून त्यांचे विरुध्द केलेली सर्व विधाने साफ नाकारलेली आहे. वरील सर्व बाबी विचारात घेवुन तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावी.अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र (नि.9) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.10 लगत अर्जदाराने घेतलेल्या पॉलिसीचा प्रपोझल फॉर्म व पॉलिसी टर्म्स कंडिशनची छायाप्रत दाखल केली आहे. तक्रार अर्जाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड. डि.यु.दराडे आणि गैरअर्जदारातर्फे अड अजय व्यास यांनी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर 1 तक्रार अर्ज कायदेशिर मुदतीत आहे काय ? होय 2 तक्रार अर्जास कायदेशिर कारण घडल्याचे शाबीत झाले आहे काय ? नाही. 3 गैरअर्जदारांनी अर्जदारास पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यु नियमा पेक्षा कमी दिली आहे काय ? या बाबतीत गैरअर्जदाराकडून सेवात्रुटी झाली आहे काय ? नाही. कारणे मुद्या क्रमांक 1 ते 3 अर्जदारास गैरअर्जदाराकडून पॉलिसी बंद केल्यानंतरची सरेंडर व्हॅल्युचा चेक माहे सप्टेंबर 2010 मध्ये मिळाला होता.ही अडमिटेड फॅक्ट आहे.चेकने दिलेली रक्कम कमी दिली म्हणून अर्जदाराने प्रस्तुत तक्रार अर्जाव्दारे माहे जानेवारी 2011 मध्ये मागितलेली असल्याने ग्रा.स.कायदा कलम 24 – अ मधील तरतुदी नुसार योग्य त्या कायदेशिर मुदतीत निश्चितपणे आहे.तरी परंतु, गैरअर्जदाराने दिलेली रक्कम कमी दिली अथवा चुकीची दिली या संदर्भात रक्कमेचा चेक स्वीकारले नंतर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे तसा आक्षेप घेतलेला होता किंवा अंडरप्रोटेस्ट रक्कम/चेक स्विकारली असल्याचा अर्जदाराने गैरअर्जदारास कळविले होते. असा कोणताही ठोस सबळ पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही.व मंचापुढे गैरअर्जदारा विरुध्द प्रस्तुतची तक्रार दाखल करणेस कायदेशिर कारण घडल्या बद्दलचा देखील स्पष्ट उल्लेख नाही कारण स्वीकारलेली रक्कम कोणतीही हरकत न घेता स्वीकारली असल्यामुळे तक्रारीस कायदेशिर कारण घडले आहे असा मुळीच अर्थ लावता येणार नाही.त्यामुळे या कारणास्तव तक्रार अर्ज निश्चितपणे फेटाळण्यास पात्र ठरते. मेरीटच्या दृष्टीकोनातूनही तक्रारीचा विचार करावयाचा झाल्यास पुराव्यातील कागदपत्रातून असे स्पष्ट दिसते की, अर्जदाराने सप्टेंबर 2007 मध्ये पॉलिसीचा घेण्याचा प्रस्ताव ( नि.10/1) गैरअर्जदाराकडे दिल्यानंतर त्याला पॉलिसी क्रमांक 06226100 या नंबरची लाईफ टाईम सुपर पेन्शन पॉलिसी दिली होती ही अडमिटेड फॅक्ट आहे.अर्जदाराने सुरवातीला पहिला वार्षिक हप्ता रु.20,000/- भरल्यानंतर पुढे सलग तीन वर्षे म्हणजे सप्टेंबर 2010 पर्यंत एकही हप्ता भरला नव्हता मधल्या काळातील हप्ते न भरल्यामुळे पॉलिसी बंद पडली होती ही देखील अडमिटेड फॅक्ट आहे.अर्जदाराने त्याच्या आर्थिक अडचणीमुळे पुढिल हप्ते न भरता पॉलिसी बंद करावी व भरलेली रक्कम मला परत मिळावी असा गैरअर्जदाराकडे अर्ज केल्यानंतर त्याने भरलेली हप्त्याची पूर्ण रक्कम जशीच्या तशी परत मिळावी ही केलेली मागणी निश्चितच बेकायदेशिर आहे कारण गैरअर्जदाराने पुराव्यात (नि.10/2) दाखल केलेल्या पॉलिसी कंडिशन सरेंडर क्लॉज 4, प्रिमियम क्लॉज 5, व फोरक्लॉजर क्लॉज 10, चे बारकाईने अवलोकन केले असता अर्जदाराने दिलेली रक्कम नियमा नुसार योग्यती वजावट करुनच दिलेली असल्याचे स्पष्ट दिसते.अर्जदारतर्फे अड.दराडे यांनी मंचापुढे युक्तिवादातून असे निवेदन केले की, कंडिशन क्लॉज 4 – ए प्रमाणे भरलेल्या हत्यातून फक्त 60 टक्के एवढीच रक्कम वजा होवुन म्हणजे रु.12,000/- वजा करुन उरलेली रक्कम रु.8,000/- अर्जदारास मिळावयास पाहिजे परंतु हा युक्तिवाद मुळीच ग्राह्य धरता येणार नाही कारण अर्जदारानेच पुराव्यात नि.4/2 वर दाखल केलेल्या पॉलिसी स्टेटमेंट ऑफ अकाऊंट मध्ये पॉलिसीच्या पहिल्या हप्त्यातून अलॉकेशन चार्जेस, युनिटफंड, अडमिनिस्ट्रेशन चार्जेस, मॉरेलिटी व राईडर चार्जेस, स्टँप ड्युटी वगैरे नियमाप्रमाणे वजा करुन हप्त्याची रक्कम खात्यावर रु.16,600/- जमा दाखवली आहे.वरील वजावटीचा अर्जदारतर्फे अड.दराडे यांनी सोईस्करपणे दुर्लक्ष केलेले दिसते.त्यामुळे अर्जदारास दिलेली रक्कम वर नमुद केलेल्या बाबीतून वजावट करुन रु.4,777.16 चेक व्दारे नियमाप्रमाणे दिलेली आहे ती कमी दिली आहे असे मुळीच म्हणता येणार नाही व त्याबाबतीत गैरअर्जदाराकडून मुळीच सेवात्रुटी झालेली नाही असाच यातून निष्कर्ष निघतो.त्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी व मुद्दा क्रमांक 2 व 3 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे. 2 पक्षकारांनी आपला खर्च आपण स्वतः सोसावा. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |