नि.1 खालील आदेश
(दि.30-10-2023 रोजी पारीत)
द्वारा : मा. श्री. प्रविण खोत, अध्यक्ष.
1) तक्रारदार तर्फे वकील श्री. संकेत सावर्डेकर.
2) तक्रारदार तर्फे दि.03-04-2023 रोजी पुरसीस दाखल केली, त्यावेळी आयोगाचा कोरम अपूर्ण होता. त्यामुळे प्रस्तुतची पुरसीस दाखल करणेत आली. तक्रारदार व वि. पक्षकार यांचेदरम्यान तडजोड झाली असून तडजोडीप्रमाणे रक्कम रु.14,27,460/- (र.रु.चौदा लाख सत्तावीस हजार चारशे साठ मात्र) तक्रारदार यांना वि.प. विमा कंपनी यांचेकडून चेक नं.208642,आयसीआयसीआय बँक दि.20-03-2023 रोजीचा चेक तक्रारदार यांना आजरोजी मिळाला असून प्रस्तुत तक्रारीतील वि.प. विमा कंपनी यांचेविरुध्द कोणतीही तक्रार राहिलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांना पुढे प्रस्तुत तक्रार चालविणेची नाही असे पुरसीसीत नमूद केले आहे. आजरोजी सदर पुरसीसवर आयोगाचा कोरम पुर्ण असलेने आयोगाने आदेश पारीत केले.
3) दि.03-04-2023 रोजीच्या तक्रारदार यांच्या सहीने दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार यांची दि.03-04-2023 रोजीची पुरसीस हया आयोगाने पडताळून, पाहून मान्य केली आहे. सबब, प्रस्तुतच्या तक्रारदार यांच्या पुरसीसच्या आधारे प्रस्तुत तक्रार अर्ज निकाली काढणे न्यायोचित होईल. सबब आदेश खालीलप्रमाणे.
- आ दे श –
1) प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदार यांचे पुरसीसचे आधारे निकाली करणेत येतो.
2) तक्रारदार यांची दि.03-04-2023 रोजीची पुरसीस ही या आदेशाचा भाग समजणेत यावा.
3) प्रकरण दप्तरी दाखल करणेत येते.
4) उभय पक्षकारांना सदरच्या आदेशाच्या प्रती विनामुल्य दयाव्यात.