निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. सा.वाले क्र.1 ही विमा कंपनी आहे. तर सा.वाले क्र.2 ही बँक आहे. तक्रारदाराने सा.वाले क्र.2 यांचेकडून मे, 2006 मध्ये गृह कर्ज घेतले होते व सा.वाले क्र.2 यांचे सूचनेवरुन तक्रारदाराने सा.वाले क्र.1 यांचेकडून विमा पॉलीसी विकत घेतली. सा.वाले क्र.2 यांचे अधिकारी यांनी तक्रारदारांचे पती श्री.अनील माथूर यांचे विमा प्रस्तावाचे अर्जावर सहया घेतल्या. परंतु त्यातील मजकूर तक्रारदारांचे पती श्री.अनील माथुर यांना वाचून दाखविण्यात आला नाही. तक्रारदारांनी विम्याचा हप्ता एक रक्कमी रु.81,727/- सा.वाले क्र.1 यांचेकडे जमा केला. तक्रारदारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व त्यानंतर सा.वाले क्र.1 विमा कंपनी यांनी 7 जून, 2007 रोजी तक्रारदारांचे पती श्री.अनील माथूर यांना विमा पॉलीसी पाठविली. 2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे त्यांचे पती श्री.अनील माथूर ह्दयविकाराचे झटक्याने दिनांक 8 ऑक्टोबर, 2006 रोजी मयत झाले. त्यानंतर तक्रारदारांनी विमा कराराप्रमाणे विम्याची रक्कम मिळणेकामी सा.वाले यांचेकडे आपली मागणी सादर केली. बराच पत्र व्यवहार केल्यानंतर सा.वाले यांनी त्यांचे पत्र दिनांक 19.2.2007 प्रमाणे तक्रारदारांच्या विम्याची मागणी फेटाळली. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे पत्र व्यवहार केल्यानंतर दिनांक 27.7.2007 रोजी प्रस्तुतची तक्रार दाखल केली. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे तक्रारदारांचे पती निधनापूर्वी ह्दयविकाराचे किंवा मधूमेहाचे किंवा संबंधित अनुषंगीक आजाराने कधीही आजारी नव्हते. परंतु सा.वाले यांना तक्रारदारांचे पतीने ही बाब लपवून ठेवली असे खोटे कथन करुन तक्रारदारांची मागणी फेटाळली व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली. 3. सा.वाले क्र.1 विमा कंपनी यांनी आपली कैफीयत दाखल केली. व असे कथन केले की, विमा कराराच्या प्रस्तावामध्ये तक्रारदारांचे पती श्री.अनील माथुर यांना काही महत्वाचे प्रश्न विचारले होते व त्यामध्ये अर्जदार यांना पूर्वी कधीही ह्दयविकार, मधूमेह, किडणी किंवा इतर आजार झाले होते काय किंवा त्याबद्दल इलाज करुन घेतला होता काय असे प्रश्न विचारण्यात आले होते व तक्रारदारांच्या पतीने त्याचे नकारात्मक उत्तर दिले. तक्रारदारांचे पती मयत झाल्यानंतर तक्रारदारांनी विमा कराराप्रमाणे रक्कमेची मागणी केली व चौकशीअंती सा.वाले यांना असे दिसून आले की, तक्रारदारांचे पती श्री.अनील माथुन यांना ओकार्ड हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले होते. 7 ऑक्टोबर, 2006 व ओकार्ड हॉस्पीटलचे केस पेपरमध्ये तक्रारदारांचे पती श्री.अनील माथुन यांना मधुमेह, इतर विकार उच्च रक्तदाब इ.आजार होते व 2004 मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती असे दिसून आले. तक्रारदारांचे पती ह्दयविकाराच्या झटक्याने 8 ऑक्टोबर, 2006 रोजी मयत झाले. वरील सर्व बाबी तक्रारदाराच्या पतीनी विम्याचा प्रस्ताव अर्ज भरुन देताना लपवून ठेवल्या. सबब विम्याचा करारच अवैद्य ठरतो व विमा कंपनी तक्रारदारांना विमा कराराप्रमाणे कुठलीही रक्कम देणे लागत नाही असे कथन केले. 4. सा.वाले बँक यांनी आपली वेगळी कैफीयत दाखल केली. त्यामध्ये सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदाराचे पतीवर विमा करार करण्याबद्दल कुठलाही दबाव आणला होता किंवा विमा प्रस्ताव वाचून न दाखविता तक्रारदारांच्या पतीची सही घेतली हया तक्रारदारांच्या कथनास स्पष्टपणे नकार दिला. 5. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र व सा.वाले यांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला. 6. प्रस्तुतच्या मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्र तसेच सा.वाले क्र.1 यांचा लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यास अनुसरुन तक्रार निकाली काढणेकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले क्र.1 यांनी दिनांक 19.2.2007 च्या पत्रान्वये तक्रारदारांना विमा कराराप्रमाणे रक्कम अदा करण्यास नकार देवून सेवा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. | 2. | तक्रारदार सा.वाले क्र.1 यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही. | 3. | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 7. तक्रारदारांचे पती श्री.अनील माथुन यांनी विमा कराराचा प्रस्ताव देण्याबद्दल आपल्या फॉर्मवर सही करुन तो फॉर्म सा.वाले क्र.1 यांचेकडे दिला याबद्दल दोन्ही पक्षकारामध्ये वाद नाही. सा.वाले क्र.1 यांनी दिनांक 08.10.2008 रोजी यादीसोबत काही महत्वाचे कागदपत्र हजर केले. त्यामध्ये अनेच्चर 1 तक्रार संचिकेचे पृष्ट क्र.65 वर आहे. त्यावरील सही सा.वाले क्र.1 यांच्या पतीची इंग्रजीमध्ये आहे. तक्रारदारांच्या तक्रारीत असे कथन नाही की, ते अशिक्षीत किंवा अडाणी होते व त्यांना इंग्रजी भाषा वाचता येत नव्हती, समजत नव्हती. या प्रस्तावाचे कलम ई मध्ये वेगवेगळे प्रश्न अंतर्भुत करण्यात आलेले होते. त्यामेध्ये तक्रारदारांच्या पतीनी बहुतेक सर्व प्रश्नांना नकारात्मक उत्तरे दिली. 8. तक्रारदारांच्या तक्रारीतील कैफीयतीप्रमाणे तक्रारदारांचे पती 8 ऑक्टोबर, 2006 रोजी ह्दयविकाराच्या झटक्याने मयत झाले. सा.वाले क्र.1 यांनी सोबत जी कागदपत्रे दाखल केलेली आहेत त्यामध्ये अनेक्चर क पृष्ट क्र.6 मध्ये मुकुंद नर्सिग होम, अंधेरी (पूर्व) मुंबई यांनी दिलेल्या प्रमाणपत्राची प्रत हजर केलेली आहे. त्यातील नोंदीवरुन असे दिसते की, तक्रारदारांचे पती श्री.अनील माथुर यांनी त्यांच्या मृत्यूचे एक दिवस आधी 7 ऑग्स्ट, 2007 रोजी मुकूंद नर्सिंग होम येथे दाखल करण्यात आले होते. त्याप्रमाणे कलम 3 मध्ये रुग्णाच्या आजाराची परिस्थिती नमुद करण्यात आलेली आहे व त्यामध्ये रुग्णाला मधूमेह होता व इंन्सूलीन चालु होते अशी नोंद आहे. मुकुंद नर्सिग होम येथून तक्रारदारांचे पती श्री.अनील माथुन यांची प्रकृती बिघडल्याने एशीयन हार्ट इन्स्टीटयूट या हॉस्पीटलमध्ये दिनांक 08.10.2006 रोजी दाखल करण्यात आले. एशीयन हार्ड इन्स्टीटयूट, बांद्रा (पूर्व) यांनी दिलेल्या प्रमाणपत्राप्रमाणे त्या हॉस्पीटलातील सर्व कागदपत्रांच्या पती सा.वाले क्र.1 यांनी आपल्या यादीसोबत अनेक्चर 7 ते 11 वर दाखल केलेल्या आहेत. त्या सर्वाचे प्रस्तुत मंचाने वाचन केले. 9. अनेक्चर 8 च्या मलपृष्टावर म्हणजे संचिकेच्या पृष्ट क्र.89 वर डिसचार्ज कार्डची प्रत आहे. त्या डिसचार्ज कार्डच्या मलपृष्टावर म्हणजे संचिकेचे पृष्ट क्र. 90 वर रुग्णाच्या भूतकाळातील आरोग्याबद्दलच्या नोंदी लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये रुग्णाला मधुमेहाचा आजार होता व रुग्णाला पुर्वीपासून इन्सुलीन दिले जात होते अशी नोंद आहे. तसेच रुग्णाची दोन वर्षापुर्वी ओकार्ड हॉस्पीटल मध्ये एन्जीओग्राफी करण्यात आली होती अशी ही नोंद आहे. अनेक्चर 9 म्हणजे सचिकेचे पृष्ट क्र.91 वर एन्जीओग्राफी अहवालाची प्रत दाखल आहे. त्यातील नोंदीचे अवलोकन केले असताना असे दिसून येते की, एन्जीओग्राफी तपासणीमध्ये तिस-या रक्त वाहीनीमध्ये कुत्रीम अवयव ज्यास स्टेंट संबोधीले जाते ते बसविले होते अशी नोंद आहे. सदरील नोंद रुग्णाची दोन वर्षापुर्वी एन्जीओप्लास्टी झालेली होती या नोंदीस पुष्टी देते. अनेक्चर 9 सोबत एशीयन हार्ट इन्स्टीटयूट या हॉस्पीटलमध्ये मयत श्री.अनील माथुन यांच्या ह्दयाचे जे छायाचित्र काढले होते त्याची प्रत हजर आहे. त्यामध्ये डाव्या बाजुची रक्त वाहीनी 100 टक्के बंद झाली होती अशी नोंद आहे. एशीयन हार्ट इन्स्टीटयूट या हॉस्पीटलचे डॉ. भास्कर शहा यांनी श्री.अनील माथुन यांच्या मृत्यूनंतर दिनांक 10.10.2006 रोजी जो अहवाल दिला त्याची प्रत अनेक्चर 11, संचिकेचे पृष्ट क्र.98 वर सा.वाले यांनी दाखल केलेली आहे. त्यामध्ये माथुर यांना पूर्वीपासून उच्च रक्तदाब,मधुमेह, ह्दयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली होती अशी नोंद आहे. त्यामधील नोंदीवरुन असे दिसून येते की, पूर्वी टाकलेली स्टेंट ही 100 टक्के बंध झालेली होती. 10. वरील सर्व नोंदी असे दर्शवितात की, तक्रारदाराचे पती श्री.अनील माथुन यांना 2004 पासून म्हणजे प्रस्तुतचा विमा करार होणेपूर्वी दोन वर्षापासून मधुमेह, उच्च रक्तदाब, व ह्दयविकार हे आजार होते. वरील सर्व बाबींचे विवरण तक्रारदारांचे पतीने विमा कराराचा प्रस्तुतचा अर्ज दाखल करताना त्यांनी त्यांना हॉस्पीटलमध्ये कधीही दाखल करण्यात आलेले नव्हते. तसेच त्यांना उच्च रक्तदाब, डायबीटीज, ह्दयविकार हे आजार नव्हते व त्याबद्दल इलाज चालु नव्हते असे निवेदन केले. सा.वाले क्र.1 यांनी तक्रारदारांची नुकसान भरपाईची मागणी फेटाळून लावल्याचे पत्र दिले आहे. त्यामध्ये तक्रारदारांच्या पतीने विम्याच्या प्रस्तावामध्ये मुख्य प्रश्नांना जी उत्तरे दिली ती उधृत करण्यात आलेली आहेत. त्याचे वाचन केले असताना असे दिसून येते की, तक्रारदारांच्या पतीने वरील सर्व महत्वाच्या बाबी लपवून ठेवल्या व खोटी विधाने केली व विमा करार करण्यास करण्यास सा.वाले क्र.1 विमा कंपनी यांना उद्युक्त केले. वरील सर्व बाबी सा.वाले क्र.1 यांच्या कथनास पुष्टी देताता. 11. विमा कराराचे बाबतीत असे म्हटले जाते की, विमा करार हा विश्वासाचा करार असून विमा करार करणारे व्यक्तीने प्रामाणीकपणे व सत्यतेची विधाने करणे आवश्यक असते. विमा पॉलीसी घेणा-या व्यक्तीने व विमा धारकाने विमा प्रस्तावामध्ये खोटी विधाने केल्यास विमा करार रद्द ठरतो व परीणामतः विमा धारक किंवा त्यांचे वारस विमा कराराचे अनुषंगाने मिळणारे फायदे प्राप्त करण्यास असमर्थ ठरतात. सा.वाले क्र.1 यांनी आपल्या लेखी युक्तीवादात सर्वोच्च न्यायालयाचे या मुद्यावर अभिप्राय व्यक्त करणारे विविध न्यायनिर्णयाचे संदर्भ दिलेले आहेत. त्याचे वाचन केले असताना असे दिसून येते की, विमा धारकाने विम्याचा प्रस्ताव देत असताना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर प्रामाणीकपणे व सत्य कथन देणे आवश्यक असते. असत्य विधानावरुन केलेला करार हा अवैद्य ठरतो व परीणामतः विमा धारक किंवा त्याचे वारस विमा कराराचे फायदे मिळण्यापासून वंचीत राहातात. 12. वरील सर्व निष्कर्षावरुन प्रस्तुतच्या मंचाचे असे मत झाले आहे की, सा.वाले क्र.1 यांनी त्यांचे पत्र दिनांक 19.2.2007 च्या पत्रान्वये तक्रारदारांना विमा कराराप्रमाणे रक्कम परत करण्यास नकार देऊन सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे म्हणता येणार नाही. 13. वरील निष्कर्षानुरुप पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 469/2007 रद्द करण्यात येते. 2. खर्चाबाबत काही आदेश नाही. <!--[if !supportLists]-->5 <!--[endif]-->आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |