ग्राहक तक्रार निवारण मंच, मुंबई उपनगर जिल्हा यांचेसमोर
प्रशासकिय इमारत, तिसरा मजला, चेतना कॉलेजजवळ,
बांद्रा-पूर्व, मुंबई-400 051.
तक्रार क्र.ग्रातनिमं/मुंउजि/347/2015
आदेश दिनांकः-20/11/2015
सुजी मॅथ्यु,
सी/103, अकृती-अनेरी को-ऑप हॉ.सोसा.लि.
मरोळ-मारोशी बस स्टॉप जवळ,
मरोळ, अंधेरी (पु)
मुंबई-400059 .......तक्रारदार
विरुध्द
मे.आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ इन्शु.कं.लि.
मार्फत- व्यवस्थापक
विनोद सिल्क मिल्स कंपाउंट,
चक्रवर्ती अशोक रोड, अशोक नगर,
कांदिवली (पु) मुंबई-400 101
2. मे.आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ इन्शु.कं.लि.
आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफ टॉवर, 1089,
अप्पासाहेब मराठा मार्ग, प्रभादेवी,
मुंबर्इ-400025 .......सामनेवाले.
मंचः- श्री.एम.वाय. मानकर, अध्यक्ष श्री.एस.आर.सानप, सदस्य.
तक्रारदाराकरीता ः स्वतः
सामनेवाले ः
आदेश- श्री.एम.वाय.मानकर, अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
तक्रार दाखल कामी आदेश
तक्रारदाराना तक्रार दाखल सुनावणी कामी ऐकण्यात आले. तक्रार व त्या सोबतची कागदपत्रे पाहीली तक्रारदारानी सामनेवाले यांची लाईफ स्टेज अॅश्युर पेन्शन यु.आय.एन 105 एल.ओ.92 व्ही 01 पॉलीसी घेतली ती दि.27/11/2009 पासून आरंभ झाली. पॉलीसी करीता वार्षीक हप्ता रु.60,000/- होता. सामनेवाले यांच्या एजंटनी माहिती दिल्यावरुन तक्रारदाराने ही पॉलीसी घेतली. दोन वार्षीक हप्ते भरल्यानंतर तक्रारदाराने ती पुढे चालु ठेवायची नव्हती. त्यामुळे तक्रारदाराने ती पॉलीसी परत केली व भरलेले रु.1,20,000/- देय असलेल्या लाभासहीत मागणी केली. परंतु बराच पाठपुरावा केल्यानंतर सामनेवाले यानी तक्रारदाराना रु 58,301.29 पैसे अदा केले. तक्रारी प्रमाणे त्या रु.1,20,000/- व इतर लाभाकरिता पात्र आहेत. सबब त्यानी ही तक्रार दाखल केली.
तक्रारदाराना सामनेवाले यांनी रक्कम अदा केली व ती रक्कम तक्रारदारानी स्विकारलेली आहे. आमच्या मते एकदा रक्कम स्विकारल्यानंतर तक्रारदार व सामनेवाले यांच्यामधील करार समाप्त होतो व त्यांच्यामधे ग्राहक व सेवापुरवठादार संबंध समाप्त होतो. तो ग्राहक वाद राहत नाही. व त्यामुळे ही तक्रार या मंचात चालू शकत नाही. या करिता आम्ही मा.राज्य आयोगानी प्रथम अपील क्र ऐ/11/763 मे.गोयल गंगा डेव्ह.(इंडिया) प्रा.लि.विरुध्द मेजर हरसिंदर ठाकूर व इतर निकाल तारीख 30/10/2012 चा आधार घेत आहोत. सबब,खालील प्रमाणेः-
आदेश
1. तक्रार क्र. 347/2015 ही ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 12 (3) प्रमाणे फेटाळण्यात येते.
2. खर्चा बाबत आदेश नाही.
3. अतिरिक्त संच तक्रारदाराना परत करण्यात यावेत.
4. या आदेशाची प्रत उभयपक्षाना विनामुल्य पाठविण्यात यावेत.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 20/11/2015