दिनांक 16 मार्च 2012
मा. अध्यक्षा, श्रीमती आर.डी. कुंडले यांच्या आदेशानुसार
तक्रारकर्त्याच्या वकिलाचा दाखल करुन घेण्याच्या मुद्यावर युक्तिवाद ऐकला. सदर तक्रार पॉलिसीची रक्कम परत मिळण्याच्या संदर्भात आहे. ज्यावेळी ही पॉलिसी काढण्यात आली. त्यावेळी गोंदिया येथून काढण्यात आली व त्याचे तीन हप्ते गोंदिया येथून भरल्याने या मंचाला अधिकारक्षेत्र आहे असे तक्रारकर्त्याचे वकील म्हणतात.
विरुध्द पक्षाचे ऑफिस सध्या गोंदिया येथे नाही. ते मुंबई येथे स्थानांतरित झाले आहे.
माझ्या मते तक्रारीस कारण गोंदिया मंचाच्या अधिकारक्षेत्रात घडल्याने ही तक्रार दाखल करुन घेण्या योग्य ठरते.
मा. सदस्या श्रीमती बडवाईक यांच्या आदेशान्वये
सदर तक्रारी मध्ये तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष म्हणून ICICI Prudencial Life Insurence Co. Ltd., Through its Sr. Manager Mr. Sabastian Pinto, ICICI Prulife Tower , 1089, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400 025 यांना विरुध्द पक्ष केलेले आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीत म्हटले आहे की, विरुध्द पक्षाचे ऑफिस गोंदिया येथे होते परंतु सध्यास्थितीत ऑफिस बंद आहे. ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये मंचाने तक्रार चालविण्याचे अधिकार क्षेत्र नमूद केले आहे. कलम 11 (2) complaint shall be instituted in District Forum within the local limits of whose jurisdiction या नुसार विरुध्द पक्षाचे कार्यालय गोंदिया येथे नाही. विरोधी पक्ष गोंदिया येथे कार्यरत नाही. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्याने गोंदिया येथून चेकची रक्कम दिल्यामुळे गोंदिया मंचाला तक्रार चालविण्याचा अधिकार आहे. परंतु चेक दिले त्या ठिकाणावरुन तक्रार दाखल करण्याचे कारण उद्भवत नाही हे मा. राष्ट्रीय आयोगाच्या अनेक निकालपत्रावरुन सिध्द झालेले आहे. तक्रारकर्त्याने गोंदिया मंचाच्या अधिकार क्षेत्रातील कोणालाही विरुध्द पक्ष न केल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार मंचाच्या अधिकार क्षेत्रात नाही असे माझे स्पष्ट मत आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार परत करण्यात येते.
करिता आदेश
1.मंचाला तक्रार चालविण्याचे प्रादेशिक अधिकार क्षेत्र नसल्यामुळे तक्रारकर्त्याला तक्रार परत करावी.
2 तक्रारकर्त्याने योग्य त्या न्यायालयासमोर तक्रार दाखल करावी.