Maharashtra

Kolhapur

CC/09/427

Sou. Mugdha Gajanan Munishwar. - Complainant(s)

Versus

ICICI Phrudential Life Insurance Co. Ltd - Opp.Party(s)

Adv. N.P.Gandhi.

23 Aug 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/09/427
1. Sou. Mugdha Gajanan Munishwar.1089B ward. Mirajkar Tikti, Mangalwar Peth,Kolhapur.Kolhapur.Maharastra ...........Appellant(s)

Versus.
1. ICICI Phrudential Life Insurance Co. LtdKawla Naka ,Kolhapur.Kolhapur.Maharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Adv. N.P.Gandhi., Advocate for Complainant
Sachin Patil , Advocate for Opp.Party

Dated : 23 Aug 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

  

                  
निकालपत्र :- (दि.22/08/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)
 
(01)       तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर होऊन त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. उभय पक्षकारांचे वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद ऐकणेत आला.
 
           सदरची तक्रार ही सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा क्‍लेम नाकारलेमुळे दाखल केली आहे.                     
 
(02)       तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:-तक्रारदार हे नमुद पत्‍तयावर राहतात तसेच सामनेवाला ही कंपनी कायदयाखाली अस्तित्‍वात आलेली कपंनी आहे. तक्रारदार यांचे पती श्री गजानन विश्‍वनाथ मुनिश्‍वर यांनी सामनेवाला यांचेकडून ICICI Pro Health Saver non-medical policy घेतली. त्‍याअनुषंगाने रक्‍कम रु.25,000/- चा हप्‍ता भरला. त्‍यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदार, त्‍यांचे पती व त्‍यांचे मुलांच्‍या नांवे विमा पॉलीसी दिली व तिघांचाही विमा त्‍यात कव्‍हर होता. पॉलीसीचा कालावधी दि.15/01/2009 ते 15/01/2036 आहे. त्‍यासोबत तक्रारदाराला विमा पॉलीसीचे कार्डही दिले आहे.
 
           सदर पॉलीसी प्रमाणे पहिली पाच वर्षे प्रत्‍येकी रु.25,000/- भरावयाचे असतात. त्‍यामध्‍ये तक्रारदार, तिचे पती व मुलगा यांना प्रत्‍येक वर्षी रु.3,00,000/- पर्यंत काही मेडिक्‍लेम झालेस तर तो सामनेवाला यांनी दयावयाचा व पुढील 4 वर्षे रु.25,000/- भरले तर सामनेवाला यांचे नियमाप्रमाणे तक्रारदारांची पॉलिसी सुरु राहते व पॉलीसीचे सर्व फायदे तक्रारदार यांना मिळतात. सदर पॉलीसीची मुदत दि.15/01/2036 अखेर आहे.
 
           तक्रारदार यांचे छातीत त्रास सुरु झालेने तक्रारदारचे पतीने तक्रारदारास दि.25/02/2009 रोजी के.एल.ई. हॉस्पिटल, बेळगांव येथे चेकअपला घेऊन गेले. त्‍यावेळी रक्‍कम रु.1,100/- रोख भरुन घेतले. त्‍यानंतर पुन्‍हा दि.30/03/2009 रोजी पुन्‍हा सदर हॉस्पिटल येथे चेकअप करण्‍यासाठी गेले असता त्‍यावेळी रु.5,000/- भरुन घेतले व तक्रारदारांवर बलून मिट्रल वोल्‍वोटॉमी करण्‍यास सांगितले. त्‍याकरिता रक्‍कम रु.50,000/- हॉस्पिटलमध्‍ये भरले. त्‍याच दिवशी के.एल.ई_हॉस्पिटलमध्‍ये अॅडमीट केले व तक्रारदारांवर बलून मिट्रल वोल्‍वोटॉमी करुन दि.01/04/2009 रोजी डिस्‍चार्ज दिला. तक्रारदारास सदर ऑपरेशनकरिता रु.45,000/- इतका खर्च आला. इतर खर्च व ऑपरेशन खर्च असे एकूण रु.56,100/- इतका खर्च आला.
 
           तक्रारदार यांनी दि.04/04/2009 रोजी हॉस्पिटलमध्‍ये आलेल्‍या खर्चाची सामनेवाला यांचेकडे विमा पॉलीसीचे आधारे मागणी केली व त्‍यासोबत संपूर्ण कागदपत्रे जोडली. त्‍याअनुषंगाने सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.09/04/2009 रोजी आणखीन कागदपत्रे देण्‍याकरिता सांगितली. त्‍याप्रमाणे पूर्तता केली व त्‍यानंतर सामनेवाला यांनी मेडिकल सर्टीफिकेटची मागणी केली. त्‍याप्रमाणे तक्रारदार यांनी डॉ. प्रभू हलकट्ठी यांचे मेडीकल सर्टीफिकेटही दिले. त्‍यानंतर दि.26/06/2009 रोजी सामनेवाला यांनी पॉलीसी विथड्रॉवल स्‍टेटस मध्‍ये आहे त्‍यामुळे क्‍लेम मंजूर करता येत नाही असे कळवले.
 
           सामनेवाला यांनी क्‍लेम नाकारलेनंतर तक्रारदार यांनी दि.17/09/2009 रोजी सामनेवाला यांना नोटीस पाठवून दिली. त्‍यास सामनेवाला यांनी खोटया मजकूराचे उत्‍तर पाठवून दिले. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन विमा पॉलीसीची रक्‍कम रु.56,100/- व्‍याजासह तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/-, तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
 
(03)       तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ सामनेवाला यांनी दिलेले पॉलीसी सर्टीफिकेट, प्रिमियम रिसीट, तक्रारदाराचे नांवे दिलेले हेल्‍थकार्ड, के.ई.एल. हॉस्पिटलची रु.5,000/- ची रिसीट इतर रिसीट व फायनल बील, तक्रारदाराचे सामनेवाला यांना पत्र, तक्रारदारास सामनेवाला यांनी दिलेले पत्र, मेडिकल सर्टीफिकेट, तक्रारदाराने सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, त्‍यास सामनेवाला यांनी दिलेले उत्‍तर इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहे
 
(04)       सामनेवाला यांना रक्‍कम रु.500/- कॉस्‍ट भरणेच्‍या अटीवर म्‍हणणे दाखल करुन घेणेवर दि.05/04/2009 रोजी मे. मंचाने आदेश पारीत केलेला होता. त्‍यानुसार     दि. 22/10/2009 रोजी विजया बॅकेचा डी.डी.क्र.515925 अन्वये कॉस्‍टची रक्‍कम भरलेली आहे. सबब सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे दाखल करुन घेतले.
 
(05)       सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणेनुसार सामनेवाला यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला आपल्‍या लेखी म्‍हणणेत पुढे असे प्रतिपादन करतात की, गजानन विश्‍वनाथ मुनिश्‍वर (प्रपोजर) यांनी सही केलेला फॉर्म (प्रपोजल फॉर्म) सामनेवाला विमा कंपनीकडे दि.09/01/2009 रोजी दाखल केलेला होता. सदर अर्जाचा नंबर एचएस00179126, प्‍लॅन-हेल्‍थ सेव्‍हर, प्रपोजल सही केलेले दि.09/01/2009 प्रपोजल मिळाले दि.10/01/2009 रोजी प्रति वार्षीक हप्‍ता रु.25,000/- विमा निर्धारित केलेली रक्‍कम रु.2,00,000/- अशी होती. यामध्‍ये गजानन मुनिश्‍वर यांचे प्राय‍मरी लाईफ तसेच फॅमिली फ्लेाटर ऑप्‍शन अंतर्गत त्‍यांची पत्‍नी म्‍हणजे तक्रारदार व मुलगा अविनाश यांचाही समावेश केलेला होता.  गजानन मुनिश्‍वर तसेच तक्रारदार यांचे वय 35 पेक्षा जास्‍त असलेने सामनेवाला यांचे मार्गदर्शक तत्‍वानुसार नमुद दोघांचेही वैद्यकीय तपासणी करणेस सांगितले होते. सदर वैद्यकीय तपासणीचा अहवाल प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेला आहे. प्रस्‍तुत दोघांनीही स्‍वेच्‍छेने दि.19/01/2009 रोजी वैद्यकीय तपासणी करुन घेतलेली आहे व याची माहिती त्‍यांना आहे. पॉलीसीचे कागदपत्रे दि.15/01/2009 रोजी दिलेली आहेत. तक्रारदाराने त्‍यांना माहित असलेली आरोग्‍य विषयक वस्‍तुस्थिती उघड केलेली नाही. वैद्यकीय तपासणी वा चाचणी अहवालावरुन तक्रारदारास Cardiac murmur and Albuminuria झालेचे निष्‍पन्‍न झाले आहे. तसेच गजानन मुनिशवर यांना elevated fasting blood sugar and elevated HbA1C असलेचे निष्‍पन्‍न झालेले आहे व त्‍याची कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सदर वैद्यकीय कागदपत्रांचे अवलोकन केलेनंतर दि.17/03/2009 रोजी प्रपोजरला वैद्यकीय निष्‍कर्षानुसार विमा संरक्षण देता येणार नाही असे पत्राने कळवलेले आहे. तसेच विमा संरक्षण हवे असल्‍यास रु.8,282/- इतकी जादा विमा हप्‍ता भरावा याबाबतही कळवले होते. मात्र तक्रारदाराने त्‍याप्रमाणे कृती केलेली नाही. सबब तक्रारदाराने प्रस्‍तुतची तक्रार ही तक्रार दाखल करताना जाणीवपूर्वक सत्‍य परिस्थिती मे. मंचापासून लपवून ठेवलेली आहे. तक्रारदार हा स्‍वच्‍छ हाताने मे. मंचासमोर आलेला नाही. हप्‍त्‍याची वाढीव रक्‍कम तसेच कन्‍सेन्‍ट न आलेने सामनेवाला यांनी विम्‍याहप्‍त्‍यापोटी भरलेली रक्‍कम रु.25,000/- दि.28/5/2009 आयसीआयसीआय बँकेचा चेक क्र.201965अन्‍वये परत केलेली आहे. तक्रारदाराकडून दि.06/04/2009ची क्‍लेमबाबतची सुचना सामनेवाला यांना दि.08/04/2009 रोजी प्राप्‍त झाली. ज्‍याचा पॉलीसी क्र.10957759असा आहे. तक्रारदाराने Severe Mitral Stenosis and Ballon Mitral Valvotomy उपचाराअंतर्गत रु.56,100/-खर्चाची मागणी केलेली आहे. दि.09/04/2009 रोजी तक्रारदारास काही कागदपत्रे दाखल करणेबाबत सामनेवाला यांनी विनंती पत्र पाठवलेले आहे.
 
           पॉलीसी अदा केलेपासून तीन महिन्‍याचे आत क्‍लेमची मागणी केलेली आहे व ती वादातीत असलेने सामनेवाला यांनी क्‍लेमबाबत इन्‍व्‍हेस्‍टीगेशन केलेले आहे. त्‍यानुसार केईएलएस हॉस्पिटल, बेळगांव येथे दि.07/01/2009 पासून म्‍हणजेच प्रपोजल फॉर्म दाखल करणेपूर्वी दोन दिवस तक्रारदाराने सदर हॉस्पिटलमध्‍ये उपचार घेणेस सुरुवात केलेचे दाखल वैद्यकीय कागदपत्रांवरुन दिसून येते. यावरुन प्रपोजल दाखल करणेपासून 2 दिवस अगोदरच तक्रारदार वर नमुद आजाराने ग्रस्‍त होता. तक्रारदाराने क्‍लेम फॉर्ममध्‍ये विचारलेल्‍या प्रश्‍न क्र. 5(d)(iii), (e)(x), (e) (xiv) ची उत्‍तरे नकारार्थी दिलेली आहेत.तक्रारदाराने त्‍याला पूर्वीपासूनच असलेल्‍या आजाराची माहिती उघड केलेली नाही. सबब तक्रारदाराचा हेतू हा शुध्‍द नव्‍हता. सबब सामनेवाला यांनी प्रस्‍तुतची तक्रार खर्चासहीत फेटाळणेत यावी अशी विनंती‍ केलेली आहे. तसेच सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेमध्‍ये काही प्राथमिक मुद्दयान्‍वये आक्षेप नोंदवलेल्‍या आहेत. त्‍यानुसार तक्रारदाराचे तक्रारीतील कथने सत्‍य नाहीत. त्‍याने सत्‍य वस्‍तुस्थिती कथन केलेली नाही. तक्रारीत पारदर्शकता नाही. बेकायदेशीरपणे पैसे उकळण्‍या करिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदार हा स्‍वच्‍छ हाताने आलेला नाही. प्रस्‍तुत पक्ररणामध्‍ये साक्षीदार तपासणी व तयांचा उलट तपास घेणे गरजेचे आहे. समरी प्रोसीडींगमध्‍ये सदरची तक्रार चालणेस पात्र नाही. सामनेवाला विमा कंपनीचे करार हे परम‍ विश्‍वासावर (Utmost good faith) आधारीत असतात. प्रपोजल दाखल करणेपूर्वी तक्रारदाराने तिचे हॉस्पिटलाझेशनचे उपचाराबाबतची माहिती दडवून ठेवलेली आहे. तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक नाही. प्रस्‍तुतची तक्रार ही खोटी, चुकीची दाखल केली असलेने ती फेटाळणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.                       
 
(05)       सामनेवाला यांनी आपले म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ प्रपोजल फॉर्म, तक्रारदारचे मेडीकल टेस्‍ट रिपोर्टस, तक्रारदाराचे पत्र, चेकसोबतचे कव्‍हरींग लेटर, क्‍लेम इन्‍टीमेशनची प्रत, के.एल.ई.हॉस्पिटलचे मेडिकल रेकॉर्डस इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(6)        तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवालांचे लेखी म्‍हणणे व दाखल कागदपत्रे व उभय पक्षकारांचा अंतिम युक्तिवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1. प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे काय?       --- होय.
2. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय?                 --- नाही.
3. काय आदेश ?                                         --- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 :- सामनेवाला कंपनी ही विमा सेवा देणारी विमा कंपनी असून प्रस्‍तुत तक्रारदारचे पतीने सामनेवाला यांचेकडे स्‍वत:साठी प्रायमरी लाईफ तसेच त्‍यांचे पत्‍नी मुग्‍धा व मुलगा अविनाश यांचेसाठी फॅमिली फ्लोटर ऑप्‍शन अंतर्गत विमा संरक्षण घेतलेले होते. त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक होतात. सबब प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचात चालणेस पात्र आहे.
 
मुद्दा क्र.2 :- सामनेवाला यांनी तक्रारदारचे पती गजानन विश्‍वनाथ मुनिश्‍वर यांनी त्‍यांचेसाठी प्रायमरी लाईफ तसेच त्‍यांचे पत्‍नी मुग्‍धा व मुलगा अविनाश यांचेसाठी फॅमिली फ्लोटर ऑप्‍शन अंतर्गत विमा संरक्षण घेतलेले होते व त्‍याप्रमाणे दि.15/01/2009 रोजी पॉलीसीची कागदपत्रे त्‍यांना दिलेली आहेत. त्‍यासाठी रु.25,000/- प्रतिवार्षीक हप्‍त्‍याप्रमाणे रक्‍कम रु.25,000/- चा हप्‍ता रक्‍कम तक्रारदाराने सामनेवालांकडे भरले असलेचे सामनेवाला यांनी मान्‍य केलेले आहे. सामनेवाला यांनी त्‍याप्रमाणे तक्रारदारास पॉलीसी क्र.010957759 कार्ड दिलेले आहे व त्‍याची वैधता ही दि.15/01/2036 पर्यंतची आहे हे दाखल कागदपत्रांवरुन निर्विवाद आहे. तक्रारदाराने दाखल केलेले पॉलीसी प्रमाणपत्रावरुन पॉलीसी नंबर 10957759 असून शेवटचा हप्‍ता दि.15/01/2035 रोजी आहे. पॉलीसीची सुरुवात दि.15/01/2009 रोजीची असून विमा संरक्षण हे दि.15/01/2036 पर्यंतचे दिसून येते. त्‍यासाठी विमा रक्‍कम रु.2,00,000/- निर्धारित केलेली आहे. विमा उतरवतेवेळी तक्रारदाराचे वय 45 व तक्रारदारचे पतीचे वय 48 व मुलाचे वय 16 वर्षे दिसून येते.
 
           सामनेवाला यांचे मार्गदर्शक तत्‍वानुसार विमाधारक हे 35 वयापेक्षा जास्‍त असलेने त्‍यांची वैद्यकीय तपासणी केलेली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारचे पतीने दि.09/01/2009 रोजी भरुन दिलेला प्रपोजल फॉर्म तसेच दि.22/1/2009 रोजीचे नमुद दोघांचे वैद्यकीय तपासणी अहवाल प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेले आहेत. सदर अहवालानुसार तक्रारदारास Cardiac murmur and Albuminuria झालेचे निष्‍पन्‍न झाले आहे. तसेच गजानन मुनिश्‍वर यांना elevated fasting blood sugar and elevated HbA1C असलेचे निष्‍पन्‍न झालेले आहे. त्‍यामुळे सदर अहवालाचा आधार घेऊन व सामनेवालांचे मार्गदर्शक तत्‍वानुसार सामनेवाला यांनी तक्रारदाराचे पतीस दि.17/03/2009 रोजी वैद्यकीय तपासणीमध्‍ये त्‍यांचा आजार स्‍पष्‍ट झालेला असून सदर आजाराची माहिती प्रपोजल फॉर्ममधील नमुद असणारे प्रश्‍न क्र.5(d)(iii), (e)(x), (e) (xiv) ची उत्‍तरे नकारार्थी दिलेली आहेत व सदर बाब सामनेवाला विमा कंपनी पासून दडवून ठेवलेमुळे विमा संरक्षण देता येणार नाही असे कळवले आहे. तरीही जर विमा संरक्षण हवे असेल तर मूळ विमा हप्‍ता रु.4,872/- ऐवजी रु.8,282/- इतका वाढीव हप्‍ता भरलेस रु.2,00,000/- विमा संरक्षण देणेत येईल असे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे. तसेच प्रस्‍तुतची रक्‍कम व कन्‍सेन्‍ट सदर पत्र प्राप्‍त झालेपासून 30 दिवसाचे आत पाठवणेबाबत नमुद केलेले आहे. त्‍याप्रमाणे तक्रारदाराने कोणतीही कृती न केलेने सामनेवाला यांनी दि.29/05/2009 रोजी तक्रारदारास भरलेला प्रथम वार्षिक हप्‍ता रक्‍कम रु.25,000/- आयसीआयसीआय बॅकेचा चेक क्र.201965 अन्‍वये परत केलेला आहे. तसेच सदरचा चेक 3 महिन्‍यामध्‍ये वटवून देणेबाबतही नमुद केले आहे. मात्र मधल्‍या काळात जर वैद्यकीय कागदपत्रांची तसेच मागणी केलेल्‍या कागदपत्रांची पूर्तता केली असेल तर प्रस्‍तुत चेक कंपनीस परत करावा असे नमुद केले आहे. तसेच कंपनीचे सर्व्‍हीस कन्‍सलटंट श्री जुंघरे यांचेशी संपर्क साधणेबाबत कळवले आहे. प्रस्‍तुत चेकची सत्‍यप्रत दाखल केलेली आहे.
 
           तक्रारदाराने युक्‍तीवादाच्‍या वेळेस सामनेवाला म्‍हणतात त्‍याप्रमाणे असा कोणताही चेक तक्रारदारास प्राप्‍त झालेला नाही अथवा त्‍याची रक्‍कम तक्रारदाराने वटवून घेतलेली नाही. सदर चेक वटवून तक्रारदारास रक्‍कम मिळाली आहे याचा पुरावा सामनेवाला यांनी दयावा असे प्रतिपादन केले आहे. तसेच प्रस्‍तुत पॉलीसी ही नॉन मेडिकल कॅटॅगरीतील होती असेही प्रतिपादन केले आहे. सदर पॉलीसीचे अवलोकन केले असता तक्रारदाराचे पतीचे नांव, त्‍यांचे वय, पत्‍ता, जन्‍माची तारीख व कॅटॅगरी नॉन मेडिकल असे नमुद केलेचे दिसून येते. मात्र सदर पॉलीसी प्रमाणपत्राच्‍या सुरुवातीलाच सामनेवाला यांनी पॉलीसीच्‍या अटी, शर्तीस अनुसरुनच प्रस्‍तुत पॉलीसी ग्राहय धरली जाईल असे स्‍पष्‍टपणे नमुद केले आहे.
 
           वादाकरिता प्रस्‍तुत विमा पॉलीसी ही नॉन मेडिकल ग्राऊंडवर अदा केली असेल तर तक्रारदार व तिचे पतीस सामनेवाला यांनी दिलेले प्रपोजल फॉर्ममध्‍ये त्‍यांचे आरोग्‍य विषयक माहिती उघड करणेस काहीच हरकत नव्‍हती. त्‍यांनी वर नमुद केले प्रश्‍नांची उत्‍तरे नकारार्थी देऊन आपला वैद्यकीय इतिहास व आजार दडवून ठेवलेला आहे. हे सामनेवाला यांनी दाखल केलेले वैद्यकीय कागदपत्रे तसेच तक्रारदारावर केईएल हॉस्पिटल येथे दि.07/01/2009 पासून उपचार सुरु होते याबाबतचे दाखल वैद्यकीय रेकॉर्डवरुन निदर्शनास येते. तर तक्रारदाराचे पतीने भरुन दिलेला प्रपोजल फॉर्म हा दि.09/01/2009 रोजी भरुन दिलेला आहे. म्‍हणजेच प्रपोजल फॉर्मपूर्वी तक्रारदारास उपचार सुरु होते ही बाब सामनेवाला विमा कंपनीपासून दडवून ठेवलेली आहे. सबब सामनेवाला विमा कंपनीकडे असणारा फंड हा अशा अनेक विमाधारकांच्‍या फंडामधून निर्मित केलेला असतो व ते त्‍ंयाचे विश्‍वस्‍त असतात. त्‍यामुळे विमा कंपन्‍यांचे करार हे परम विश्‍वासावर आधारीत असतात. सदरचा परम विश्‍वास हा उभय पक्षांकडून अपेक्षित असतो. सामनेवाला विमा कंपनीने नमुद पती-पत्‍नीचे वय 35 वर्षापेक्षा जास्‍त असलेने त्‍यांचे मार्गदर्शक तत्‍वानुसार दोघांची वैद्यकीय तपासणी अनिवार्य असलेने सदर वैद्यकीय तपासणी केलेली आहे व तक्रारदार व तिचे पतीने स्‍वेच्‍छेने सदर तपासणी करुन घेतलेली आहे. त्‍यावेळी त्‍यांनी कोणतीही हरकत नोंदवलेली नाही. तसेच सामनेवाला विमा कंपनीने सदर वैद्यकीय तपासणी अंती नमुद विमाधारकाच्‍या वैद्यकीय इतिहास व आजाराबाबत माहिती झालेबरोबर दि.17/05/2009 रोजी पत्र पाठवून वर सविस्‍तर नमुद केलेप्रमाणे कळवलेले आहे. तरीही तक्रारदाराने जादाची विमा रक्‍कम व कन्‍सेन्‍ट फॉर्म भरुन दिलेला नाही. यामध्‍ये तक्रारदाराची व तिचे पतीची चुक दिसून येते. जरी तक्रारदारास कार्ड दिले असले तरी सदर कार्ड हे प्रपोजल फॉर्ममध्‍ये आरोग्‍य विषयक सत्‍य व खरी माहिती दिली आहे या विश्‍वासावर दिले होते ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. मात्र प्रपोजल तारखेपूर्वीच तक्रारदारावर उपचार सुरु केलेले होते. तसेच त्‍यांचे वैद्यकीय तपासणी अहवालावरुन सामनेवाला यांनी जादा रक्‍कम भरुन विमा संरक्षण देणेची तयारी दर्शविलेली होती व तसे पत्र तक्रारदाराचे पतीस पाठवून 30 दिवसाचे आत रक्‍कमेचा भरणा व कन्‍सेन्‍ट फॉर्म भरुन देणेबाबत कळवले होते. मात्र तक्रारदाराने कोणतीही कृती न केलेने सरतेशेवटी दि.29/05/2009 रोजी पत्र पाठवून दि.28/05/2009 रोजीचा आयसीआयसीआय बँकेचा चेक क्र.201965 अन्‍वये तीन महिन्‍याचे आत चेक वटवून घेणेचे अटीवर रक्‍कम परत केलेचे दिसून येते. मध्‍यंतरीच्‍या काळात तक्रारदाराने दि.06/04/2009 रोजी क्‍लेमची मागणी केलेली आहे. सबब जरी मागणी केली असली तरी सामनेवालांचे मार्गदर्शक तत्‍वे, पॉलीसीच्‍या अटी-शर्ती इत्‍यादीचे आधारे तक्रारदार व तिचे पतीस सर्व प्रकारची संधी देऊनही विमा संरक्षण तक्रारदाराने घेतलेले नाही. त्‍यामुळे प्रथम वार्षीक हप्‍ता दि.29/05/2009 रोजी परत केलेला आहे. सबब वरील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता यामध्‍ये सामनेवाला यांची कोणतीही सेवात्रुटी दिसून येत नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
           तक्रारदाराने प्रस्‍तुत रु.25,000/-चेकची रक्‍कम मिळालेचे सामनेवाला यांनी पुरावा दयावा असे युकतीवादाच्‍या वेळेस प्रतिपादन केले आहे. मात्र तत्‍पुर्वी तक्रारदाराने  कोणत्‍याही प्रकारचे कागदपत्रे हजर करणेबाबतचा अर्ज अथवा साक्षीसमन्‍सबाबत अर्ज देऊन सदर बाब त्‍यास सिध्‍द करता आली असती ती त्‍यांनी केलेली नाही. तसेच त्‍याचे बॅकेकडे असणारे खाते उतारे दाखल केले नाहीत. ज्‍यायोगे त्‍याचे खातेवर रक्‍कम जमा झाली अथवा नाही हे कळून आले असते. तक्रारदाराने सामनेवाला यांनी केलेला पत्र व्‍यवहार नाकारलेला आहे. सबब तक्रारदार हा स्‍वच्‍छ हाताने मे. मंचासमोर आलेला नाही. सबब वरील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केली नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.   
 
                           आदेश
 
1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करणेत येते.
 
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
 
 
 
 
 
          .
 
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT