(मा.सदस्या अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांना सामनेवाले यांच्याकडून विमाक्लेमपोटी रक्कम रु.5,41,368/- मिळावेत व या रक्कमेवर प्रत्यक्ष रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- मिळावेत व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.20,000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाले यांनी याकामी पान क्र.16 लगत लेखी म्हणणे व पान क्र.17 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत. मुद्देः 1) अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय?-होय. 2) सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?-नाही. 3) अंतिम आदेश?-- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे. तक्रार क्र.169/11 विवेचन याकामी अर्जदार यांचेवतीने अँड.डी.ए.देशपांडे व सामनेवाले यांचे वतीने अँड.पी.पी.पवार यांनी युक्तीवाद केलेला आहे. सामनेवाले यांनी त्याचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी चोरीला गेलेल्या वाहनाचा विमा घेतलेला आहे ही बाब स्पष्टपणे नाकारलेली नाही. अर्जदार यांनी पान क्र.6 अ लगत विमा सर्टीफिकेट दाखल केलेले आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, सामनेवाले यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र व पान क्र.6 अ चे विमा सर्टीफिकेट यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाले यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “विमाधारकांच्या माणसांकडून दाखविला गेलेला निष्काळजीपणा यामुळे घडलेली घटना आहे असा रिपोर्ट इन्व्हेस्टीगेटर यांनी दिलेला आहे. तक्रारदार यांचे पतीने गाडीच्या चाव्या तशास निष्काळजीपणे सोडून गाडीच्या सुरक्षेचा कोणताही विचार न करता गाडी तशीच सोडून दिली असे तक्रारदाराने स्टॅम्प पेपरवरती लिहून दिलेल आहे. सदरचे कृत्य हे विमा पॉलिसीमधील अटी व शर्तींचा भंग आहे. त्यामुळे सामनेवाला यांची कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी येत नाही. तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा.” असा उल्लेख केलेला आहे. या कामी अर्जदार यांनी पान क्र.7 लगत पोलिसांचेकडील पहिली खबरची प्रत दाखल केलेली आहे. यामध्ये “हँण्डल (स्टेअरिंग) लॉक करुन पार्क करुन घरात कागदपत्र आणण्यासाठी गेले.” असा उल्लेख आहे. परंतु या कामी सामनेवाला यांनी पान क्र.22 लगत अर्जदार यांचा रु.50/- स्टॅम्पपेपरवर नोंदविलेला जबाब झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे. यामध्ये “घाईमध्ये चुकून त्यांचेकडून गाडी लॉक न करता चावी गाडीमध्येच राहीली.” असा उल्लेख आहे. पान क्र.23 वरती सामनेवाला यांनी अर्जदार यांचे पती अशोक नारायण जोशी यांनी दि.06/01/2011 रोजी पोलिस निरीक्षक नाशिक यांचेकडे जो अर्ज दिलेला आहे त्याची प्रत दाखल केलेली आहे. या अर्जामध्ये अशोक नारायण जोशी यांनी “गाडीची चावी ही गाडीलाच विसरुन गेलो होतो. ” हे मान्य केलेले आहे. पान क्र.22 चे स्टॅम्पपेपरवरील जबाब व पान क्र.23 चे अशोक नारायण जोशी यांचा अर्ज याचा विचार होता अर्जदार यांचेकडूनच वाहनाचे बाबतीत निष्काळजीपणा झालेला आहे ही बाब स्पष्ट होत आहे व यामुळेच सामनेवाला यांनी अर्जदार यांचे वाहनाचे बाबतीत विमा पॉलिसीचे अटी व शर्तीप्रमाणे योग्य तो निर्णय तक्रार क्र.169/11 घेतलेला आहे असे दिसून येत आहे. वरील सर्व कारणाचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. या कामी अर्जदार यांनी पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे दाखल केलेली आहेत. 1) 2010(4) ए.एल.जे. सर्वोच्च न्यायालय. पान 239. अलमेंदु साहु विरुध्द ओरीएंटल इन्शुरन्स कं. 2) मा.महाराष्ट्र राज्य आयोग मुंबई यांचेकडील किरकोळ अर्ज क्र.1561/2007. निकाल ता.23/10/2008. आय.सी.आय.सी आय. लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कं.लि. विरुध्द श्री. विनोद प्रकाश कदम परंतु अर्जदार यांनी दाखल केलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामधील हकिकत व प्रस्तुतचे तक्रार अर्जामधील हकिकत यामध्ये फरक आहे. प्रस्तुतचे तक्रार अर्जामध्ये अर्जदार यांचे पती यांचेकडूनच वाहनाची चावी वाहनामध्येच राहीलेली होती यामुळे वर उल्लेख केलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे या कामी लागु होत नाहीत. सामनेवाला यांनी या कामी पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे दाखल केलेली आहेत. 1) मा.छत्तीसगड राज्य आयोग यांचेसमोरील अपील क्र.81/2006. बजाज अलायंझ जनरल इन्शुरन्स कं विरुध्द मनोज अग्रवाल. 2) मा.राज्य आयोग मुंबई यांचेसमोरील अपील क्र.600/2005. निकाल ता.19/12/2005. बजाज अलायंझ जनरल इन्शुरन्स कं विरुध्द भगवान हिरालाल धोटे. सामनेवाला यांनी दाखल केलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामधील हकिकत व प्रस्तुतचे तक्रार अर्जामधील हकिकत यामध्ये साम्य आहे यामुळे सामनेवाला यांनी दाखल केलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार यांकामी घेतलेला आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तिवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल तक्रार क्र.169/11 केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद व सामनेवाला यांनी दाखल केलेली व वर उल्लेख केलेली व आधार घेतलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.
|