View 300 Cases Against Icici Lombard Insurance
View 13463 Cases Against Icici Lombard
Rameshwar Khadke filed a consumer case on 29 Apr 2015 against ICICI Lombard Insurance Co.Ltd in the Jalgaon Consumer Court. The case no is CC/09/1725 and the judgment uploaded on 05 May 2015.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 1725/2009
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-23/11/2009.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 29/04/2015.
श्री.रामेश्वर भागवत खडके,
उ.व.सज्ञान, धंदाः ट्रक व्यवसाय,
मु.पो.पाळधी,ता.जि.जळगांव,
ह.मु.102, पहिला माळा, सेंट्रल फुले मार्केट,जळगांव,
ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
श्री.अथोराईज्ड पर्सन (अधिकृत व्यक्ती)
आय सी आय सी आय लुंबर्ड जनरल इंन्शुरन्स कंपनी लि,
401, ए विंग, फोर्थ फलोअर, इंटरफेस्ट, बी हॅण्ड
गोरेगांव स्पोर्टस क्लब चे मागे, मुंबई. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विनायक रावजी लोंढे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.संग्राम बी चव्हाण वकील.
सामनेवाला तर्फे श्री.के.बी.खिवसरा वकील.
निकालपत्र
व्दारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्षः
1. तक्रारदार श्री.रामेश्वर भागवत खडके यांनी सदरील तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवली आहे म्हणुन नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेला आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारदार हे वाहन क्रमांक एम एच 19/झेड 2478 चे मालक आहेत. सदरील वाहनाचा विमा सामनेवाला यांच्याकडे उतरविला आहे त्याचा कालावधी दि.18/11/2008 ते दि.17/11/2009 पावेतो होता. दि.06/01/2009 रोजी एम आय डी सी रोड,जळगांव येथे तक्रारदाराचे वाहनाचा अपघात झाला व तक्रारदाराचे वाहनाचे त्यात बरेचसे नुकसान झाले. सदरील अपघाताबाबत सुचना तक्रारदाराने सामनेवाला यांना दिली. सामनेवाला यांचे निर्देशानुसार तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे आवश्यक ते दस्त हजर केले. सामनेवाला यांनी रक्कम रु.24,000/- मंजुर केले. तक्रारदाराने सामनेवाला यांच्याकडे चौकशी केली असता सामनेवाला यांनी रक्कम रु.31,925/- चा चेक दिला सदरचा चेक तक्रारदाराने तक्रार हक्क शाबीत ठेवुन स्विकारला. तक्रारदाराने वाहन दुरुस्त कामी रक्कम रु.80,882/- खर्च केले. सामनेवाला यांनी संपुर्ण रक्कम न देऊन सेवेत त्रृटी ठेवली आहे. सबब सामनेवाला यांनी उर्वरीत रक्कम रु.48,897/- त्यावरील व्याज, मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्यात यावा अशी मागणी केलेली आहे.
3. सामनेवाला यांना नोटीस प्राप्त झाली. नोटीस मिळुनही ते या मंचासमोर हजर झाले नाहीत तसेच लेखी निवेदन अगर शपथपत्र दाखल केले नाही.
4. तक्रारदार यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले नाही अगर मुळ दस्त दाखल केलेले नाहीत. ब-याच तारखांपासुन तक्रारदार गैरहजर असल्यामुळे व पुरावा न दिल्यामुळे सदरची तक्रार या मंचाने गुण दोषावर निर्णयासाठी ठेवली. न्याय निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदाराचा विमा दावा नाकारुन
सेवेत त्रृटी केली आहे ही बाब तक्रारदाराने शाबीत
केली आहे काय ? नाही.
2) कोणता आदेश अंतीम आदेशाप्रमाणे.
5. तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र दिलेले नाही तसेच अपघातग्रस्त वाहनाच्या दुरुस्तीसाठी तक्रारदाराने रक्कम रु.80,882/- खर्च करावे लागले त्या खर्चाच्या पावत्याही दाखल केलेल्या नाहीत. तक्रारदाराने फक्त कोटेशन दाखल केलेले आहे. तक्रारदाराने अपघातग्रस्त वाहनाच्या कोणत्या कोणत्या दुरुस्त्या करुन घेतल्या याबाबतचे मुळ दस्त या मंचासमोर हजर केले नाहीत अगर पैसे भरल्याच्या पावत्याही या मंचासमोर दाखल केलेल्या नाहीत. सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या विमा दाव्यावर विचार करुन नुकसान भरपाई रक्कम रु.31,925/- तक्रारदारास दिलेली आहे. सदरील रक्कमेपेक्षा जास्त खर्च तक्रारदाराने केला ही बाब तक्रारदाराने शाबीत केलेली नाही. सबब सदरची तक्रार रद्य होण्यास पात्र आहे. सबब आदेश.
आ दे श
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज रद्य करण्यात येतो.
2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
ज ळ गा व
दिनांकः- 29/04/2015. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विनायक रा.लोंढे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.