जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 168/2010.
तक्रार दाखल दिनांक :07/04/2010.
तक्रार आदेश दिनांक : 21/03/2012.
निकाल कालावधी: 00 वर्षे 11 महिने 14 दिवस
श्री. अतिश ज्ञानोबा जगदाळे, वय 22 वर्षे, व्यवसाय : शिक्षण,
रा. राजीव गांधी नगर, मुकुंद नगरजवळ, भवानी पेठ, सोलापूर. तक्रारदार
आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कं.लि.,
इंटरफेस बिल्डींग नं.11, 401/402, 4 था मजला, न्यू लिंक
रोड, मालाड (पश्चिम), मुंबई – 400 064. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
तक्रारदारयांचेतर्फेविधिज्ञ: यु.के. केकडे
विरुध्दपक्षअनुपस्थितीत / एकतर्फा
निकालपत्र
सौ. शशिकला श. पाटील, अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार)यांचे द्वारा एकतर्फा आदेश:-
1. तक्रारदार हे सोलापूर येथील रहिवाशी असून दि.5/2/2009 रोजी त्यांनी कायझन मोटार्स (होंडा) कंपनीकडून रु.52,270/- भरुन रोखीने खरेदी केली आहे. गाडीचा क्रमांक एम.एच.13/ए.पी.5712 आहे. गाडीचा विमा विरुध्द पक्ष यांच्याकडे दि.4/2/2009 ते 3/2/2010 कालावधीसाठी उतरला असून पॉलिसी नं. 3005/2010039673/0000002574 असा आहे. तक्रारदार हे साई सर्व्हीसे, मरिआई चौक, सोलापूर येथे काम करीत असताना साई सर्व्हीसेसचे मालक गोसावी यांनी सोलापूर येथील संतोष सुरवसे यांना कर्ज मिळवून देतो म्हणून त्यांना फसवून व तक्रारदारांची नमूद गाडी चोरुन नेली म्हणून फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापूर येथे तक्रार दिली. गुन्हा रजि. नं.113/2009 अन्वये नोंदला असून उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांच्याकडे गाडी ट्रान्सफर करु नये, असे कळविले आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी संपूर्ण कागदपत्रांसह क्लेम फॉर्म भरुन दिला असता व विरुध्द पक्ष यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी टाळाटाळ केली आहे. विरुध्द पक्ष यांनी सेवा देताना त्रुटी केल्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करुन गाडीच्या विम्याची रक्कम रु.44,840/-, त्यावरील दि.1/8/09 ते 31/3/10 पर्यंतचे व्याज रु.5,380/-, नोटीस खर्च रु.1,000/- असे एकूण रु.51,220/- देण्यासह मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- व रु.44,840/- रकमेवर व्याज मिळावे, अशी विनंती केली आहे.
2. तक्रारकर्ता यांनी दाखल केलेला अर्ज, कागदपत्रे, प्रतिज्ञालेख यांचे सुक्ष्मरित्या पडताळणी व अवलोकन केले असता पुढील मुद्दे उपस्थित झाले व कारणमिमांसा देऊन आदेश पारीत करण्यात आले.
2.1) तक्रारदार यांनी तक्रार-अर्जात नमूद केले आहे की, तक्रारदार हे साई सर्व्हीसेस, मरिआई चौक, सोलापूर येथे काम करीत असताना मालक श्री.गोसावी यांनी सोलापूर येथील संतोष सुरवसे यांना कर्ज मिळवून देतो म्हणून फसवून गाडी चोरुन नेली आहे. त्याबाबत गुन्हा फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापूर येथे गु.रं. नं.113/2009 हा आय.पी.सी. 420, 379 सह 34 अन्वये दि.2/7/2009 रोजी नोंदविला आहे. त्याची नोंद उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडेही रीतसर अर्जाने दिलेली आहे. त्यामुळे गाडी चोरीस गेली असून अन्य कोणाचेही नांव ट्रान्सफर करु नये, हे मान्य व कबूल केलेले आहे. यावरुन तक्रारदार यांची फसवणूक झालेली आहे. जरी विरुध्द पक्ष यांच्याकडे विमा उतरलेला असला तरी त्या विम्याची रक्कम विरुध्द पक्ष हे देण्यास जबाबदार नाहीत. कारण तक्रारदार यांनी स्वत:ची फसवणूक स्वत: मोठया अमिषापोटी करुन घेतलेली आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांची नोटीस व पत्रव्यवहाराची पत्रे मिळाल्यानंतर लेखी स्वरुपात उत्तर दि.23/2/2010 रोजी दिले आहे. त्यामध्येही तक्रारदार यांनी स्वत:च हलगर्जीपणा करुन गाडी दुस-याच्या ताब्यात दिलेली आहे व त्याची चोरी झालेली आहे. म्हणून विमा पॉलिसीच्या अटी व नियमाप्रमाणे विरुध्द पक्ष हे विमा रक्कम देऊ शकत नाहीत, असे उत्तर दिलेले आहे व हे उत्तर खरे व बरोबर आहे. तक्रारदार यांनी स्वत:च कर्ज मिळण्याच्या आमिषापोटी स्वत:ची गाडी गोसावी यांचे हाती दिलेली आहे. त्यास जबाबदारी तक्रारदार हेच आहेत. तक्रारदार यांनी फौजदारी दावा दाखल केलेला आहे. त्यामध्येही आजतागायत काहीही निष्पन्न झालेले नाही. ते का झाले नाही, याबाबतही कोणतीही दखल घेतलेली नाही. व्यक्ती माहीत असूनही त्यांच्या विरुध्द गंभीर कारवाई करण्यास भाग पाडणे आवश्यक होते. परंतु तसे न करता गाडी चोरीस गेली आहे, विमा उतरलेला आहे म्हणून विरुध्द पक्ष यांनी विमा रक्कम द्यावी. आजतागायत चोरीस गेलेली गाडी परत मिळालेली नाही म्हणून विमा रक्कम मिळावी, अशी केलेली मागणी ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे. विरुध्द पक्ष यांनी कोणतीही टाळाटाळ केलेली नाही, असे स्पष्ट झालेले आहे. म्हणून आदेश.
ग्राहक तक्रार क्रमांक : 168/2010.
आदेश
1. तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात आला आहे.
2. दोन्ही पक्षांनी आपआपला खर्च सोसावा.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (सौ. शशिकला श. पाटील÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
(संविक/स्व/श्रु/21312)
|