Maharashtra

Satara

cc/14/203

Shri Sanjay Yashwant Sathe - Complainant(s)

Versus

ICICI Lombard Insurance Co. Ltd - Opp.Party(s)

Kadam

28 Sep 2016

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. cc/14/203
 
1. Shri Sanjay Yashwant Sathe
Mhasoli, Shewalewasi, Karad, Satara
...........Complainant(s)
Versus
1. ICICI Lombard Insurance Co. Ltd
ICICI Lomabrd House 414, Veer Savkar marg, Siddhivinayak, Prabhadevi, Mumbai 400 025
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MILIND PAWAR HIRUGADE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
  HON'BLE MRS.SUREKHA HAJARE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 28 Sep 2016
Final Order / Judgement

                  तक्रार अर्ज क्र. सीसी /203/2014

                              तक्रार दाखल दि. 05/12/2014

                           तक्रार निकाली दि. 28/09/2016

                      निकाल कालावधी 1 वर्ष 9 महिने 23 दिवस

 

श्री. संजय यशवंत साठे

रा. मु.पो. म्‍हसोली ( शेवाळेवाडी),

ता. कराड, जि. सातारा.                                     ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

 

1. आयसीआयसीआय लोम्‍बार्ड इन्‍श्‍युरन्‍स कंपनी तर्फे

मुख्‍य व्‍यवस्‍थापक,

आयसीआयसीआय लोम्‍बार्ड हाऊस, 414,

वीर सावरकर मार्ग, सिध्‍दीविनायक मंदिराजवळ, प्रभादेवी,

मुंबई – 400 025.                                          

2. आयसीआयसीआय लोम्‍बार्ड जनरल इन्‍श्‍युरन्‍स कंपनी तर्फे

फ्रंचायसी शाखा – सातारा

तर्फे व्‍यवस्‍थापक

हेमी एक्झिक्‍युटीव्‍ह इमारत, पहिला मजला,

पोवई नाका, सातारा.                                  .....जाबदेणार. *****************************************************************************

            तक्रारदारातर्फे  -  अॅड. श्री. कदम           

           जाबदारांतर्फे  -   अॅड. श्री. कुलकर्णी

********************************************************** 

                   //  निकालपत्र  //

                (पारीत दिनांक : 28/09/2016)

        (द्वारा- श्री. मिलींद पवार (हिरुगडे),अध्‍यक्ष यानी पारित केला)

 

1.           तक्रारदार यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्‍यात असा आहे की,  तक्रारदार दिनांक 06/04/2013 रोजी त्‍यांच्‍या टाटा कंपनीची मॅजिक आयरीस गाडी नं. एमएच/50/ ए – 1712 या गाडीने त्‍यांचे घरी जात असताना  सातारा रोडवरील डिमार्ट मॉल समोर  तक्रारदार यांना त्‍यांचे गावातील ओळखीचे चार व्‍यक्ति दिसले असता  त्‍या व्‍यक्तिंना कोणताही मोबदला न घेता  गाडीत बसविले. तक्रारदार सदरच्‍या व्‍यक्तिंना  गावी घेवून जात  असताना तक्रारदार यांचे वाहन  पाचवड फाटा ओलांडून कराड ते चांदोली या डांबरी रोडने जात  असताना, नांदगांव, ता. कराड  गावचे हद्दीत संगम बिअर  बार जवळ रात्री 10,45 वाजता चांदोली बाजूकडून कराड बाजूकडे  जाणारा एक ट्रक हा भरधाव वेगाने आला व सदर  भरधाव वेगात  आलेल्‍या ट्रकने   तक्रारदार यांचे वाहनास समोरुन जोरदार धडक देवून अपघात केला. सदर अपघातामध्‍ये  तक्रारदाराच्‍या वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. अपघातामुळे गाडीतील लोकांना कमी अधिक प्रमाणात दुखापत झाली व गंभीर जखमी झाले. तसेच वाहनाचेही पूर्ण नुकसान होवून वाहन संपूर्ण डॅमेज झालेले  आहे. सदर अपघातामुळे तक्रारदारांना गंभीर दुखापत होवून  ते कायमचे  अधू झालेले  आहेत.  तक्रारदार यांनी त्‍यांचे वाहनाचा विमा जाबदेणार यांचेकडे उतरविला असून त्‍याचा पॉलिसी नंबर 3001 /76915278 /00/000 असा आहे. सदर पॉलिसीचा कालावधी दिनांक 14/1/2013 ते 13/1/2014 असा होता. दरम्‍यान तक्रारदाराच्‍या वाहनास अपघात झाल्‍यास, अगर सदरचे वाहन   अपघातामध्‍ये  पूर्ण डॅमेज झाल्‍यास विमा पॉलिसीच्‍या  मूळ रकमेएवढी म्‍हणजेच रक्‍कम  रु. 2,10,024/-  एवढी रक्‍कम देण्‍याचे  विमा कंपनीने मान्‍य केले  होते. तक्रारदार यांचे वाहनाचा अपघात हा दिनांक 6/4/2013 रोजी म्‍हणजेच विमा पॉलिसीच्‍या कालावधीमध्‍ये  झालेला आहे.   सदरचे वाहन हे पंडीत अॅटोमोटीव्‍ह, सातारा यांचे ताब्‍यात  आहे.  अपघातानंतर  गाडीच्‍या कागदपत्रांसहीत अपघात क्‍लेम जाबदेणार कंपनीकडे सादर केला.  त्‍यानंतर जाबदारांनी ज्‍या ज्‍या कागदपत्रांची मागणी केली त्‍या सर्व कागदपत्रांची पूर्तता तक्रारदारानी केली.  दिनांक 29/11/2013 रोजी   जाबदेणार यांनी  तक्रारदार यांचा विमा दावा नामंजूर केले  बाबतचे पत्र  पाठवले. सदरच्‍या पत्रामध्‍ये जाबदेणार यांनी तक्रारदार यांचा विमा दावा  Limitation as to use  याचा भंग  करुन सदर वाहनामध्‍ये प्रवासी वाहतुक करुन विमा पॉलिसीचा भंग केला  या कारणावरुन तक्रारदाराचा विमा दावा नाकारला आहे.  तक्रारदार यांना सध्‍या  कोणतेही उत्‍पन्‍नाचे साधन  नसल्‍याने टाटा मोटर्स फायनान्‍स या कंपनीकडून सदर गाडीसाठी कर्ज घेतले आहे. कर्जाची रक्‍कम भरण्‍यासाठी संबंधीत फायनान्‍स कंपनीने तगादा लावला आहे.  त्‍यासाठी फायनान्‍स कंपनीने कर्जवसूलीचा दावाही दाखल केला आहे.  त्‍यामुळे  मानसिक, आर्थिक, शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.   तक्रारदारांनी त्‍यांचे वाहन कधीही टुरीस्‍टच्‍या व्‍यवसायासाठी  त्‍याचा उपयोग करत नव्‍हते व केलेला नाही.  त्‍यामुळे विमा कंपनीने दिलेले कारण हे खोटे आणि चुकीचे आहे.   तरी  पॉलिसीची रक्‍कम रु. 2,10,024/-, मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रु. 3,00,000/- अशी एकूण रक्‍कम रु. 5,10,024/-  जाबदारांकडून  वसूल होवून मिळावेत अशी विनंती तक्रारदार करतात.  

                       तक्रारदार यांनी  आपले तक्रारीचे पुष्‍ठयर्थ विमा वाहनाचे  आर सी बुक, विमा पॉलिसी,  विमा दावा नाकारल्‍याचे पत्र  इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहे.

 

2.    जाबदेणार क्र. 1 व 2 यांनी अभिलेखावर निशाणी – 14 कडे लेखी उत्‍तर दाखल केले असून  तक्रार कायदेशीरदृष्‍टया समर्थनिय नसल्‍यामुळे व मजकूर असत्‍य असल्‍यामुळे तक्रार रद्द करण्‍याची विनंती केली आहे. जादार यांनी तक्रारदारांनी त्‍यांची गाडी नं. MH -50 A-1712 या वाहनाचा विमा दिनांक 14/1/2013 ते 13/1/2014 या कालावधीसाठी  उतरविला होता हे मान्‍य आहे. सदर वाहनाचा अपघात झाला ही बाबत जाबदारांना मान्‍य नाही.  या बाबत कुठलाही ठोस पुरावा तक्रारदारांनी मे. मंचासमोर सादर केलेला नाही.  अपघाता बाबतचे जे पुरावे तक्रारदारांनी सादर केले आहेत ते मान्‍य व कबुल नाही.   तक्रारदारांनी सदरची गाडी ही स्‍वतःच्‍या वापरासाठी खरेदी केली होती.  तक्रारदारांनी  या वाहनाचा  वापर  भाडेतत्‍वावर पॅसेंजर ने- आण करण्‍यासाठी  केला आहे.  तक्रारदारांनी दिनांक  3/10/2013 रोजी दिलेल्‍या जबाबात असे म्‍हटले आहे की,  तक्रारदार  रोज कराड ते महासोळी या रोडला भाडेतत्‍वावर पॅसेंजर ने – आण करण्‍याचा व्‍यवसाय करतात.   ज्‍यावेळी सदरच्‍या वाहनास अपघात झाला तेव्‍हा वाहनामध्‍ये त्‍याचे नातेवाई किंवा ओळखीच्‍या व्‍यक्ति नव्‍हते तर  पॅसेंजर  होते.  जे भाडे देवून प्रवास करणारे प्रवासी होते.  म्‍हणजेच  तक्रारदारांनी पॉलिसीच्‍या अटीप्रमाणे भाडे तत्‍वावर प्रवासी घेवून  व्‍यवसायाच्‍या वापरासाठी सदरच्‍या वाहनाचा वापर करत होते.  यावरुन तक्रारदारांनी  पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचा उलंघण केल्‍याचे स्‍पष्‍ट  होते. याच कारणावरुन तक्रारदाराच्‍या वाहनाचा विमा दावा जाबदारांनी नाकारलेला आहे.  तरी तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासहीत नामंजूर करण्‍यात यावा अशी विनंती जाबदेणार करतात. 

 

             जाबदेणार  विमा कंपनीने निशाणी – 18 कडे  विमा पॉलिसी, विमा दावा नाकारल्‍याचे पत्र, क्‍लेम फॉम्र, सर्व्‍हेअर यांचा रिपोर्ट व निशाणी – 13 कडे  सर्व्‍हेअर यांचे प्रतिज्ञापत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल  केली आहेत.

 

 

3.    तक्रारदार यांची तक्रार, जाबदेणार यांचे लेखी म्‍हणणे, उभय पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे व लेखी युक्तिवादाचे अवलोकन केले असता, तसेच तक्रारदार यांचे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकल्‍यानंतर तक्रारीमध्‍ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

            मुद्दे                                उत्‍तर

 

1. जाबदेणार यांनी तक्रारदार यांचा विमा दावा नामंजूर करुन

  त्रुटीयुक्‍त सेवा   दिल्‍याचे सिध्‍द होते काय ?                        होय.    

2. तक्रारदार विमा रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?                  होय. 

3. काय आदेश ?                                        अंतिम आदेशाप्रमाणे.

 

                // कारणमीमांसा //

 

4.    मुद्दा क्र. 1 व 2  :-

                   तक्रारदार यांच्‍या टाटा कंपनीची मॅजिक आयरीस गाडी नं. एमएच/50/ ए – 1712 करिता  दिनांक 14/1/2013 ते 13/1/2014 विमा पॉलिसी विरुध्‍द पक्ष यांनी विमा संरक्षण दिल्‍याविषयी उभय पक्षकारांमध्‍ये विवाद नाही.  विमा कालावधीमध्‍ये दि.6/4/2013 रोजी तक्रारदार यांच्‍या विमा संरक्षीत वाहनाचा अपघात झाल्‍याबाबत उभयतांमध्‍ये वाद नाही. वाहन अपघातानंतर तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे विमा दावा दाखल केल्‍याबाबत व विरुध्‍द पक्ष यांनी त्‍यांचा विमा दावा  दिनांक  21/11/2013 नामंजूर केल्‍याबाबत उभय पक्षकारांमध्‍ये विवाद नाही.

 

           जाबदेणार यांचे दि. 29/11/2013 रोजीचे विमा दावा नामंजूर करणारे पत्र अभिलेखावर दाखल आहे. त्‍यामध्‍ये विमा संरक्षीत वाहन भाडे तत्‍वावर वापरल्‍यामुळे पॉलिसी अट Limitations as to Use चा भंग झाल्‍याचे कारण देऊन विमा दावा नामंजूर केल्‍याचे निदर्शनास येते. उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता, विरुध्‍द पक्ष यांनी विमा दावा नामंजूर करुन ‘सेवेतील त्रुटी’ निर्माण केली आहे काय ?  हा मुद्दा उपस्थित होतो. विमा संरक्षीत वाहनाचे रजिस्‍ट्रेशन सर्टिफिकेट अभिलेखावर दाखल असून ज्‍यामध्‍ये 5 व्‍यक्‍तीची आसनक्षमता असल्‍याचे नमूद आहे.  जाबदेणार यांनी अपघातसमयी वाहनामध्‍ये  प्रवासी प्रवास करीत असल्‍याचा उल्‍लेख केला आहे.  त्‍यामुळे Limitations as to Use या अटींचा भंग झाल्‍यामुळे  विमा दावा नाकारलेचा बचाव केला आहे.

 

उलटपक्षी, तक्रारदार यांनी  प्रवास करणा-या प्रवाशी करिता कोणत्‍याही प्रकारचे भाडे तक्रारदार यांनी स्‍वीकारले नसल्‍याचे नमूद केले आहे. तक्रारदार हे व्‍यवसायिक हेतूने वाहन वापरत नव्‍हते आणि केवळ कौटुंबीक हेतूने वापरत होते, असेही त्‍यांनी नमूद केलेले आहे. तक्रारदार यांचे दाखल केलेले  जादा  पुराव्‍याची प्रतिज्ञापत्र पाहता, विरुध्‍द पक्ष यांच्‍यातर्फे घेण्‍यात आलेल्‍या बचावाच्‍या पुष्‍ठयर्थ त्‍यांनी  तक्रारदार यांनी  सदर वाहन भाडयाने  वापरले होते असे प्रतिज्ञापत्र लिहून दिल्‍याचे  रेकॉर्डवर दाखल केले आहे.   सदर प्रतिज्ञापत्र हे तक्रारदारांनी  लिहून दिलेले नाही असे  कथन करुन त्‍यावरील अटी सुध्‍दा  ना‍कारलेली आहे.  त्‍यामुळे  सदर प्रतिज्ञापत्र/ संमतीपत्रावरील सही तक्रारदार यांनी  नाकारल्‍यामुळे ती  सिध्‍द करण्‍याची जबाबदारी  जाबदेणार यांचेवर येते.  मात्र  अशी  कोणतीही प्रक्रिया  जाबदेणार यांनी  वापरलेली नाही.

 

             त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांचा उलटतपास घेतलेला नाही किंवा त्‍या प्रतिज्ञापत्राचे पुराव्‍याद्वारे खंडन केलेले नाही. तक्रारदार यांच्‍या वाहनातून अपघातसमयी प्रवास करणारे प्रवाशी हे तक्रारदार यांचे नातेवाईक किंवा कुटुंबीय नसले तरी मित्रत्‍वाचे किंवा मानवतेच्‍या नात्‍याने वाहनाचा इतर व्‍यक्‍तीकरिता वापर झाला असल्‍यास तो अनुचित ठरत नाही. उभयतांचा वाद-प्रतिवाद व दाखल पुरावे पाहता, तक्रारदार यांच्‍या वाहनातून अपघातसमयी भाडे तत्‍वावर प्रवाशी वाहतूक करण्‍यात येत नव्‍हती, या निष्‍कर्षाप्रत आम्‍ही आलो आहोत.

 

7.         यदाकदाचित तक्रारदार यांच्‍या वाहनामधून अपघातसमयी भाडे तत्‍वावर प्रवाशी वाहतूक होत असल्‍याचे एक क्षण मान्‍य केले तरी अशाच एका प्रकरणामध्‍ये मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने 'अमलेंदु साहू /विरुध्‍द/ ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कं.लि.', 2 (2010) सी.पी.जे. 9 (एस.सी.) निवाडयामध्‍ये खालीलप्रमाणे निरीक्षण नोंदविलेले आहे.

 

            Para. 16 : In the instant case the entire stand of the insurance company is that claimant has used the vehicle for hire and in the course of that there has been an accident. Following the aforesaid guidelines, this Court is of the opinion that the insurance company cannot repudiate the claim in toto.

 

8.         तक्रारीची वस्‍तुस्थिती व वरील न्‍यायिक तत्‍व विचारात घेता, यदाकदाचित भाडे तत्‍वावर वाहन चालविण्‍यात येत असल्‍याचे मान्‍य केले तरी विमा कंपनीस पूर्णत: दावा  नामंजूर करता येणार नाही. अंतिमत: विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांचा विमा क्‍लेम नामंजूर करुन निश्चितच सेवेमध्‍ये त्रुटी केलेली आहे आणि तक्रारदार विमा रक्‍कम मिळविण्‍यास पात्र ठरतात, या निर्णयाप्रत आम्‍ही आलो आहोत.

 

10.       तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या विमा संरक्षीत वाहनाचे रु.210024/- नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांच्‍या वाहनाबाबत सर्व्‍हे रिपोर्ट व मुल्‍यनिर्धारण अहवाल अभिलेखावर दाखल केलेला आहे. त्‍यामध्‍ये वाहन दुरुस्‍तीसाठी आलेल्‍या खर्चाकरिता रु.166331/- मुल्‍यनिर्धारण केल्‍याचे निदर्शनास येते. सर्व्‍हेअरचा अहवाल उभयतांनी अमान्‍य केलेला नाही किंवा उचित पुराव्‍याद्वारे त्‍याचे खंडन केलेले नाही. सर्वसाधारणपणे, सर्व्‍हेअर हे स्‍वतंत्र व नि:पक्षपणे अहवाल देणारी यंत्रणा असल्‍यामुळे उचित कारणाशिवाय तो अमान्‍य करता येत नाही. अंतिमत: तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून रु.166331/- नुकसान भरपाई विमा दावा नामंजूर केल्‍याच्‍या तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने मिळविण्‍यास पात्र आहेत, या निर्णयाप्रत आम्‍ही आलो आहोत. वरील विवेचनावरुन आम्‍ही मुद्दा क्र.1 त 3 चे उत्‍तर होकारार्थी दिले आणि शेवटी खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.

 

आदेश

              1.         तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.

           

2.         जाबदेणार यांनी तक्रारदार यांना  वाहन क्र. एमएच/50/ ए – 1712  

      अपघात विमा रक्‍कम रु.166331/- (अक्षरी रुपये एक लाख सहासष्‍ठ

हजार तीनशे एकतीस फक्‍त) द्यावेत. तसेच प्रस्‍तुत रकमेवर विमा दावा नाकारल्‍यापासून  म्‍हणजे दि.29/11/2013 पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

                    3.       जाबदेणार यांनी तक्रारदार यांना  मानसिक, शारीरिक त्रासापोटी आणि

तक्रार खर्चापोटी रु. 3,000/- द्यावेत.

                        4.         जाबदेणार यांनी उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्‍तीपासून

                                    तीस दिवसात करावी.  

5.         उभय पक्षकारांना आदेशाची प्रत नि:शुल्‍क द्यावी.

 

 

     

 

 

 

(सौ.सुरेखा हजारे)   (श्री. श्रीकांत कुंभार)      (श्री.मिलींद पवार (हिरुगडे) )

         सदस्‍य              सदस्‍य                     अध्‍यक्ष

            सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, सातारा

 

 

 

ठिकाण : सातारा

दिनांक :28/09/2016                                           

 
 
[HON'BLE MR. MILIND PAWAR HIRUGADE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[ HON'BLE MRS.SUREKHA HAJARE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.