जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/189 प्रकरण दाखल तारीख - 03/08/2010 प्रकरण निकाल तारीख – 27/01/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. श्रीमती तेजाबाई भ्र. राजेश बंडेवार वय 35 वर्षे, धंदा घरकाम अर्जदार. रा. विठठलवाडी पो.स्टे.जवळ, लोहा ता.लोहा जि. नांदेड. विरुध्द. आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. गैरअर्जदार मार्फत शाखा व्यवस्थापक, शाखा अक्सीस बँकेच्या वर, कलामंदिर जवळ, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.बी.व्ही.भूरे. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.एस.के.दागडिया. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमुख, सदस्या ) गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. थोडक्यात अर्जदाराची तक्रार अशी की, अर्जदार ही मयत राजेश बंडेवार यांची पत्नी आहे. अर्जदाराचे पती हे टाटा सूमो क्र.एम.एच.-26-व्ही-535 चे मालक असून त्यांनी गैरअर्जदार यांचेकडे सदर वाहनाचा विमा पॉलिसी क्र.300/53990204/00/000 घेतली असून तिचा कालावधी दि.30.04.2008 ते 29.04.2009 असा आहे. अर्जदाराचे पती राजेश हे दि.14.1.2009 रोजी नांदेडहून गंगाखेडकडे आपले वाहन घेऊन जात असताना नांदेडकडे येणारा ट्रक क्र.एपी-12-टी-5687 च्या ट्रक चालकाने अर्जदाराच्या टाटा सूमोला धडक दिल्यामूळे अर्जदाराचे पती अपघातात ठार झाले. पोलिस स्टेशन गंगाखेड येथे गून्हा नंबर 6/2009 अन्वये कलम 279ख् 304-ए भा.द.वि. द्वारे गून्हा नोंदवून पंचनामा करण्यात आला. अर्जदाराने घटना घडल्यानंतर गैरअर्जदार कंपनीला सर्व आवश्यक कागदपञासह क्लेम दाखल केला. अर्जदार हिस अशिक्षीत असल्यामूळे व पतीच्या मृत्यू मूळे क्लेम दाखल करण्यास विलंब झाला. अर्जदार यांनी वारंवार विनंती करुनही गैरअर्जदार यांनी विम्याची रक्कम दिली नाही. म्हणून अर्जदाराने दि.22.4.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली व ती नोटीस मिळाल्याबददलची पोस्टाची पावती दाखल केली आहे. दि.22.6.2010 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार यांना विम्याची रक्कम मिळण्यासाठी तोंडी विनंती केली असता त्यांनी नकार दिला, म्हणून सदरील तक्रार ही कालमर्यादेत आहे. म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, अर्जदारास विम्याची रक्कम रु.2,00,000/- व त्यावर अपघाताच्या तारखेपासून म्हणजे दि.14.1.2009 पासून नूकसान भरपाई रक्कमेवर 18 टक्के व्याजासह मिळावेत तसेच मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्हणून रु.10,000/- मिळावेत. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहेत. अपघात दि.14.1.2009 रोजी झाला हे त्यांना मान्य नाही. तसेच गंगाखेड पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिली हे त्यांना मान्य नाही. अर्जदाराने हे स्वतः सिध्द करावे. मयत राजेश हा दि.14.01.2009 रोजी मरण पावला व क्लेम हा दि.09.12.2009 रोजी दाखल केला त्यामूळे क्लेम दाखल करण्यास विलंब झालेला आहे. अर्जदार हा दारु पिलेला होता त्यामूळे तो वाहन हे रॅश, निष्काळजीपणे व झिगझॅग पध्दतीने चालवित होता त्यामूळे तो स्वतः उभ्या ट्रकवर जाऊन आदळला. अर्जदाराचा क्लेम हा गैरअर्जदार यांनी फेटाळलेला नाही त्यामूळे तक्रार दाखल करण्यास कारण घडलेले नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार ही प्रिमॅच्यूअर स्वरुपाची आहे. म्हणून गैरअर्जदार यांनी कोणतीही सेवेत ञूटी केलेली नाही. त्यामूळे अर्जदाराची तक्रार ही खारीज करावी असे म्हटले आहे. अर्जदाराच्या वाहनाचा विमा काढला होता हे त्यांना मान्य आहे. गैरअर्जदारांनी असा आक्षेप घेतला आहे की, अपघाताच्या वेळी वाहकाजवळ व्हॅलिंड व इफेक्टीव्ह ड्रायव्हींग लायसन्स नव्हते त्यामूळे कंपनी कोणतीही रक्कम देऊ शकत नाही. म्हणून अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञाप्रमाणे खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय ? होय. 2. अर्जदाराने मागणी केलेली नूकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार बांधील आहेत काय ? नाही. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 व 2 ः- अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे पॉलिसी उतरवलेली होती हे उभयपक्षाना मान्य आहे व त्यावर कुठलाही वाद नाही. म्हणून अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत व त्या हक्कानेच त्यांनी आपली तक्रार मंचासमोर दाखल केली. अर्जदार यांनी कागदपञे व क्लेमफॉर्म गैरअर्जदार यांचेकडे दाखल केला पण गैरअर्जदार त्यांचे म्हणण्याप्रमाणे त्यांनी म्हणजेच अर्जदाराने सदरील क्लेम उशिरा दाखल केला. तसेच वाहन चालक हा ड्रायव्हींग करतेवेळी दारु प्यायलेला होता हे गैरअर्जदाराचे म्हणणे यापूर्वीच्या हयाच अर्जदाराच्या तक्रार अर्ज क्र.175/2009 मध्ये स्पष्ट झालेले आहे की, पोस्ट मार्टम रिपोर्ट मध्ये मृत्यूचे कारण हे Head Injury असे आहे व मयताचा पोटात कूठेही अल्कोहलचे प्रमाण आढळले नाही. त्यामूळे गैरअर्जदाराचे म्हणणे याठिकाणी चूक आहे. गैरअर्जदार हयांच्या प्रस्तावावरुन व म्हणण्यावरुन तक्रारीस कारण घडले नाही व गैरअर्जदारांनी अर्जदाराचा क्लेम Repudiate केला नाही. त्यामूळे तक्रार ही प्रिमॅच्यूअर आहे. सदरील बाब बरोबर आहे या नीर्णयास्तव हे मंच आलेले आहे. म्हणून अर्जदाराचा क्लेम अर्ज गैरअर्जदार यांनी एक महिन्याचे आंत नीर्णय करावा तसे न केल्यास अर्जदार ही तक्रार पून्हा मंचासमोर येऊन दाद मागू शकते. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदारांनी त्यांचा अर्ज प्रिमॅच्यूअर असल्यामूळे पुन्हा गैरअर्जदार यांचेकडे क्लेम करावा. 2. गैरअर्जदार यांनी सदर क्लेमचा निर्णय एक महिन्यात करावा अन्यथा अर्जदार पून्हा आपली तक्रार मंचासमोर ठेऊन निर्णय घेऊ शकतो. 3. संबंधीताना निर्णय कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक.
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |