निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 20/11/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 02/12/2010 तक्रार निकाल दिनांकः- 16/03/2011 कालावधी 03 महिने 14 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. दत्तराव पि.मारोतराव मोरे. अर्जदार वय 50 वर्षे. अड.डि.यु.दराडे. रा.दत्तनगर.परभणी. ता.जि.परभणी. विरुध्द आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड गैरअर्जदार. जनरल इन्शुरंस कंपनी. अड.अजय व्यास. तर्फे शाखा व्यवस्थापक. इंटरफेस बिल्डींग नं.11, 401/402, 4 था मजला. न्यु लिंग रोड,मालाड(प.) मुंबई 400064 ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे.अध्यक्ष. ) चोरीस गेलेल्या वाहनाची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीने बेकायदेशिररित्या नाकारले म्हणून प्रस्तुतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत. अर्जदाराच्या मालकीची इंडिका कार रजि.नं.MH 22 / M776 चा गैरअर्जदार विमा कंपनीकडून पॉलिसी क्रमांक 3001/ TM 036248/00/000 उतरविलेला होता.तारीख 15/04/2010 रोजी रात्री घरापुढे कार पार्क केली होती. दुस-या दिवशी सकाळी सहा वाजता अर्जदाराची पत्नी घरा बाहेर झाडझुड करीत असतांना कार दिसली नाही शोधाशोध केल्यानंतर ती चोरीला गेल्याची फिर्याद मोंढा पोलिस स्टेशन परभणी यांच्याकडे दिली. पोलिसांनी तपास केला, परंतु कार मिळून आली नाही. अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीलाही वाहन चोरीला गेल्याचे कळविले होते परंतु त्यांनी नुकसान भरपाई मंजूर न करता सदरची कार भाडे वाहतुकीसाठी वापरत असल्याचे तपासात आढळून आल्यामुळे पॉलिसी नियमांचे उल्लंघन झालेले आहे या कारणास्तव क्लेम नाकारला. अर्जदाराचे म्हणणे असे की, तारीख 04/11/2009 रोजी स्वतःच्या वापरासाठी नविन कार खरेदी केली होती आणि तारीख 15/4/2010 रोजी केवळ 4 महिन्याच्या आतच ती चोरीला गेली तीची किंमत 3,31,122/- होती ती पॉलिसी हमी प्रमाणे गैरअर्जदाराकडून मिळाली पाहिजे म्हणून त्याची कायदेशिर दाद मिळणेसाठी ग्राहक मंचात प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.4 लगत वाहनाचे आर.सी.बुक, क्लेम नाकारल्याचे पत्र, पोलिसांना दिलेला खबरी जबाब, पॉलिसी कव्हरनोट वगैरे 4 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर त्यांने तारीख 09/02/2011 रोजी प्रकरणात लेखी जबाब(नि.9) सादर केला आहे.अर्जदाराच्या मालकीची तक्रार अर्जात वर्णन केलेली इंडिका कारचा गैरअर्जदारा कडून विमा घेतल्या संबंधीचा मजकूर त्याने नाकारलेला नाही.संबंधीत कारचा विमा 03/11/2009 ते 02/11/2010 या मुदतीचा होता. कार चोरीला गेल्याची माहिती अर्जदाराने कंपनीला दिल्यावर त्यांनी वस्तुस्थितीची खरी माहिती शोध घेण्यासाठी चौकशी अधिका-याची नेमणुक केली होती त्यांने अर्जदाराच्या मुलाचा जबाब घेतला होता त्यावेळी अर्जदाराची कार पॅसेंजर वाहतुक या कारणासाठी वापरली जाते असे त्याने सांगितले होते. अर्जदाराला ड्रायव्हींग लायसेंन्सची मागणी करुन ही त्याने सादर केले नाही अर्जदाराने व्यापारी कारणासाठी व्हेईकल वापरत असल्यामुळे प्रस्तुतची तक्रार ग्राहक मंचात चालू शकत नाही.शिवाय पॉलिसी कंडीशन General exceptions clause 3 (a) नुसार अर्जदाराने या अटीचा भंग केला आहे. त्यामुळे नुकसान भरपाईचा क्लेम नियमा नुसार नामंजूर केलेला आहे.त्याबाबत गैरअर्जदाराकडून कोणत्याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही.सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केलेली आहे. लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र (नि.10) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.11 लगत पॉलिसीची कॉपी, इनव्हेस्टीगेशन रिपोर्ट, अर्जदाराला पाठविलेले पत्र, वगैरे 4 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रार अर्जाच्या अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदारातर्फे अड.दराडे आणि गैरअर्जदार तर्फे अड.ए.जी.व्यास यांनी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदार यांनी अर्जदाराची चोरीस गेलेली इंडिका कार रजि.नं. MH 22 / M 776 ची नुकसान भरपाई बेकायदेशिर नामंजूर करुन सेवात्रुटी केली आहे काय ? होय. 2 क्लेम नाकारण्याच्या बाबतीत गैरअर्जदाराने दिलेले कारण कायदेशिररित्या शाबीत झाले आहे काय ? नाही. 3 अर्जदार नुकसान भरपाई मिळणेसाठी पात्र आहे काय ? होय. 4 असल्यास किती ? अंतिम आदेशा पमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 ते 3. अर्जदाराच्या मालकीची MH 22 /M 776 इंडिका डी.एल.एस. कार आहे ही अडमिटेड फॅक्ट आहे.पुराव्यात नि.4/1 ला वाहनाच्या आर.सी.बुकाची कॉपी दाखल केलेली आहे. तसेच सदर कारचा गैरअर्जदार विमा कंपनीकडून तारीख 03/11/2009 ते 02/11/2010 या मुदतीचा रु.3,31,122/- नुकसान भरपाई हमीचा विमा उतरविलेला होता ही देखील अडमिटेड फॅक्ट आहे पुराव्यात अर्जदाराने पॉलिसीची कव्हरनोटची कॉपी पुराव्यात नि.11/1 ला दाखल केलेली आहे. तारीख 15/04/2010 रोजी दत्त नगर कारेगाव रोड परभणी येथे अर्जदाराने सदरची कार घरा समोर उभी केली होती त्या दिवशी रात्री अज्ञात इसमाकडून कारची चोरी झालेली होती त्यासंबंधीची नवा मोंढा पोलिस स्टेशन परभणी यांच्याकडे दिलेल्या फिर्यादिची कॉपीही पुराव्यात नि.4/3 ला दाखल केलेली आहे. पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल करुन व गुन्हा इ.पी.को.कलम 379 अन्वये रजि.गु.रं.नं.72/10 करुन तपास केला, परंतु वाहन सापडले नाही त्यामुळे फाईल बंद केली. असे तक्रार अर्जात व शपथपत्रात ही म्हंटलेले आहे.अर्जदाराने त्यानंतर पॉलिसी हमी प्रमाणे चोरीस गेलेल्या कारची गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई मिळणेसाठी त्यांना कळवुन आवश्यक ती कागदपत्रे व विमा क्लेम भरुन दिल्यानंतर विमा कंपनीने 30/08/2010 च्या पत्राने (नि.4/2) कंपनी तर्फे नेमलेल्या चौकशी अधिका-याच्या तपासात अर्जदार आपले वाहन भाडे वाहतुकीसाठी वापरत असल्याचे त्याच्या मुलाने दिलेल्या जबाबातून उघड झाल्यामुळे पॉलिसी कंडिशनचे उल्लंघन झाल्याचे नमुद करुन नुकसान भरपाई क्लेम देण्याचे नाकारले असल्याचे सदरच्या पत्रात नमुद केले आहे. त्यामुळे गैरअर्जदाराने क्लेम नाकारण्याचे दिलेले कारण कायदेशिररित्या ग्राह्य धरता येईल काय ? या मुद्याचा विचार करतांना पुराव्यातील कागदपत्रातून असे लक्षात येते की,गैरअर्जदारास वाहन चोरीला गेल्याची माहिती अर्जदाराने दिल्यानंतर गैरअर्जदारातर्फे कार्टेल सर्व्हेअर अँड इनव्हेस्टीगेटर प्रा.लि. एजन्सी या चौकशी अधिका-याची नेमणुक केलेली होती त्याचा रिपोर्ट पुराव्यात नि.11/2 ला गैरअर्जदाराने दाखल केलेला आहे.त्या रिपोर्ट मध्ये तपासाचे कामी सतिश दत्ताराव मोरे या अर्जदाराच्या मुलाचा तारीख 26/06/2010 रोजी घेतलेल्या जबाबाची छायाप्रत दाखल केलेली आहे.त्यामध्ये संबंधीत मुलाच्या जबाबात असे लिहिलेले आहे की, मी गाडी भाड्यावरती चालवुन कुटूंबाचे पालन करतो. पूर्ण जबाबातील या एकाच वाक्यावर विसंबून राहून गैरअर्जदाराने नि.11/1 वरील पॉलिसी कंडिशन 7 चे आधारे अर्जदाराचा क्लेम नाकारलेला असल्याचे दिसते, परंतु अर्जदाराने वाहन चोरीला गेल्यानंतर पोलिसांना फिर्याद दिलेली होती पोलिस तपासामध्ये पोलिसांनी गु.रं.नं. 72/10 चे कामी अर्जदार खेरीज आवश्यक साक्षीदारांचे तपासा कामी जबाब घेतले असतीलच त्या तपासात देखील अर्जदार अथवा त्याच्या अन्य घरातील वैयक्तिने कार भाडे वाहतुकीसाठी वापरली होती अशा पुष्टी देणारा पुरावा दाखल केला असता तर कदाचित गैरअर्जदाराने घेतलेल्या बचावास ग्राह्य धरता आले असते परंतु त्या संबंधीचा कसलाही ठोस पुरावा गैरअर्जदाराने मंचासमोर सादर केलेला नाही या उलट अर्जदाराचा मुलगा सतिश मोरे यांने प्रकरणात नि.13 ला शपथपत्र दाखल करुन विमा कंपनी तर्फे नेमलेल्या चौकशी करण्यासाठी विमा कंपनीचा एक शिपाई व एक व्यक्ती आले होते त्यावेळी मी त्यांना कार कुटूंबातील व्यक्ती वापरतात भाड्याने देत नाही.असे सांगितले होते.भाड्याने दिली जाते असे मुळीच सांगितले नव्हते.हे शपथपत्रातून शपथेवर सांगितलेले असल्यामुळे तपास अधिका-याने चौकशी रिपोर्ट सोबत दाखल केलेला जबाब हा पुराव्याच्या कामी कुचकामी ठरला आहे.एवढेच नव्हेतर दुसरा मुलगा जीवन मोरे याने देखील प्रकरणात आपले शपथपत्र (नि.12) दाखल केलेले आहे त्याने देखील वरील प्रमाणेच शपथपत्रातून शपथेवर कथन केलेले आहे.त्यामुळे तपास अधिका-याने दाखल केलेला जबाब कायदेशिररित्या पुराव्यात ग्राह्य धरता येणार नाही दुसरी गोष्ट अशी की, मुळातच चोरीस गेलेली कार ही घरासमोर पार्क केली असतांना रात्री चोरी झालेली होती ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे देखील गैरअर्जदारतर्फे घेतलेले बचाव या कामी विसंगत असल्याचे अनुमान निघते. मुळातच पॉलिसी कंडिशन मध्ये इनव्हेस्टीगेशन करण्याची तरतुद किंवा अट कोठेही दिसुन येत नाही उलट अशा केसेच्या बाबतीत फक्त पोलिस अथोरेटीलाच क्रीमिनल प्रो.को.कलम 151 खाली अधिकार आहे व अन्य कोणाला नाही.या कारणास्तव देखील रिपोर्ट मधील मत विचारात घेता येणार नाही. मुळातच चोरी गेलेले वाहन हे घरा समोर उभे असतांना चोरी गेलेले असल्यामुळे ती पॅसेंजर वाहतुकीसाठी वापरली होती या घेतलेल्या बचावाचा संबंध नाही व तो बचाव मान्यही करता येणार नाही.त्यामुळे नुकसान भरपाई देण्याचे टाळण्यासाठीच सदरच्या नविन कारचे तारीख 14/02/2009 रोजी रजिस्ट्रेश झाल्यानंतर केवळ साडेतीन महिन्यात म्हणजे 15/04/2010 रोजी ती चोरीला गेलेली होती गैरअर्जदराने पॉलिसी उतरवितांना पॉलिसी मध्ये तीची नुकसान भरपाईची व्हॅल्यु रु.3,31,122/- असल्याचे नि.4/4 वरील पॉलिसी सर्टीफिकेट मध्ये नमुद केलेले आहे. या संदर्भात रिपोर्टेड केस 2004 (1) सी.पी.आर. पान 225 आणि रिपोर्टे केस 2003 (3) सी.पी.जे पान 109 मध्ये राज्य आयोगाने असे मत व्यक्त केली आहेत की, गैरअर्जदाराने असेसमेंट क्लॉज किंवा घेतलेल्या नुकसान भरपाई हमी पेक्षा नियमा नुसार कमी रक्कम पॉलिसी होल्डरला देय होते असा कोणताही सबळ व ठोस पुरावा अथवा सर्व्हे असेसमेंट रिपोर्ट दाखल केलेला नसल्यास पॉलिसी हमी प्रमाणे पॉलिसी होल्डरला पूर्ण नुकसान भरपाई दिली पाहिजे.हे मत अर्जदाराच्या प्रस्तुत प्रकरणालाही लागु पडते.कारण अर्जदाराची नवीन कार जी केवळ 4 महिन्यात चोरीला गेलेली असल्यामुळे तीची पूर्ण किंमत मिळणेस अर्जदार निश्चित पात्र आहे. गैरअर्जदारतर्फे युक्तिवादाच्या वेळी रिपोर्टेड केस 2007 (3) सी.पी.जे. पान 160 (राष्ट्रीय आयोग) आणि रिपोर्टेड केस 2009 (1) सी.पी.जे. पान 1 (सुप्रिम कोर्ट) चा आधार घेतला आहे. परंतु राष्ट्रीय आयोगाने व्यक्त केलेले मत चोरी झालेले वाहन प्रत्यक्षात भाडे वाहतुकीसाठी वापरली गेली होती हे सिध्द झाले होते याउलट अर्जदाराच्या प्रस्तुत प्रकरणातील भाडे वाहतुकी संबंधीची बाब सिध्द झालेली नाही.त्यामुळे हे मत या प्रकरणाला लागु पडत नाही.तसेच दुस-या मा.सुप्रीम कोर्टाच्या केसलॉ मध्ये व्यक्त केलेले मत या प्रकरणाला लागु पडत नाही कारण अर्जदाराने कार चोरीची घटना घडल्यावर लगेचच गैरअर्जदारास त्याची माहिती दिलेली असल्याचे व विमा कंपनीने क्लेम नाकारल्यानंतर ग्रा.सं.कायद्याच्या कलम 24(ए) प्रमाणे तो कायदेशिर मुदतीत दाखल केलेला आहे तसेच केसलॉ मधील वस्तुस्थिती आणि प्रस्तुत प्रकरणातील वस्तुस्थिती भिन्न असल्यामुळे सदर प्रकरणाला तो केसलॉ लागु पडत नाही. सबब, मुद्दा क्रमांक 1 व 3 चे उत्तर होकारार्थी आणि मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदार याने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत अर्जदाराच्या मालकीची चोरीस गेलेली MH 22 /M 776 इंडिकाची पॉलिसी हमी प्रमाणे नुकसान भरपाई रु.3,31,122/- क्लेम नाकारले तारखे पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी. 3 याखेरीज मानसिक त्रासापोटी रु. 1,000/- व अर्जाचा खर्च रु.1,000/- आदेश मुदतीत द्यावे. 4 पक्षकारांना निकालाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |