Maharashtra

Nagpur

CC/498/2017

SMT. USHA TARACHAND MISHRA - Complainant(s)

Versus

ICICI LOMBARD GENERAL INSURANCE COMPANY LTD. - Opp.Party(s)

ADV. YOGESHKUMAR YADAV

13 Mar 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/498/2017
( Date of Filing : 13 Nov 2017 )
 
1. SMT. USHA TARACHAND MISHRA
R/O. PLOT NO. 66H 3991, SHOBHARAMBH SOCIETY, WADI, NEAR HANUMAN MANDIR, MAGPUR.
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE COMPANY LTD.
NAGPUR BRANCH 5TH FLOOR, LAND MARK, PLOT NO. 5&6, RAMDASPETH, WARDHA ROAD, ABOVE BIG BAZAR, NAGPUR-440010
NAGPUR
MAHARASHTRA
2. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE COMPANY LTD.
REG. OFF. AT ICICI LOMBARD HOUSE, VEER SAWARKAR MARG, NEAR SIDDHIVINAYAK TEMPLE, PRABHADEVI, MUMBAI-400025
MUMBAI
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 13 Mar 2020
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये -

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अंतर्गत प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, तक्रारकर्तीचे पती मृतक ताराचंद मिश्रा यांनी सेवा अॅटोमोबाईल नागपूर यांच्‍याकडून मारोती कार रुपये 2,96,902/- मध्‍ये विकत घेतली. तक्रारकर्तीच्‍या पतीने सदरचे वाहन खरेदी करतांना विरुध्‍द पक्षाकडून कार हे वाहन खरेदीकरिता रुपये 2,50,000/- चे कर्ज घेतले. याकरिता तक्रारकर्तीच्‍या पतीने विरुध्‍द पक्षाकडे विमा स्‍वास्‍थ प्रिमियम भरुन विमा पॉलिसी क्रं.4065/ICICIAL/113788889/00 ही दिनांक 26.02.2016 ते दि. 25.02.2021 या कालावधीकरिता काढली होती.

 

  1.      तक्रारकर्तीने पुढे नमूद केले की, तिच्‍या पतीचा दि. 02.05.2017 रोजी व्‍होकार्ड हॉस्‍पीटल मध्‍ये निधन झाले. त्‍यामुळे तक्रारकर्तीने पतीच्‍या मृत्‍युनंतर विमा दावा मिळण्‍याकरिता प्रस्‍ताव सादर केला. त्‍यावर विरुध्‍द पक्षाने दि. 23.05.2017 ला पत्र पाठवून बरीच माहिती मागितली व ती माहिती तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला पुरविली होती. त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने दि. 13.07.2017 ला पत्र पाठवून विमा नामंजूर केल्‍याचे कळविले. त्‍यामुळे तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठवून विमा दावा मंजूर करण्‍याबाबतची विनंती केली. सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीच्‍या नोटीसची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की, तक्रारकर्तीच्‍या पतीने घेतलेले कर्ज रुपये 1,74,900/- किंवा त्‍यापेक्षा जास्‍त असलेली रक्‍कम दर दिवसाप्रमाणे व्‍याजासह देण्‍याचा विरुध्‍द पक्षाला आदेश द्यावा. तसेच शारीरिक व मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी जबाबात असे नमूद केले की, तक्रारकर्तीच्‍या पतीने आय.सी.आय.सी.आय बॅंकेकडून रुपये 2,50,000/- चे वाहन कर्ज घेतले होते व कार कर्ज सुरक्षाकरिता दिनांक 26.02.2016 ते दि. 25.02.2021 या कालावधीकरिता पॉलिसी क्रं. 4065/ICICIAL/113788889/00 काढली होती. तसेच तक्रारकर्तीच्‍या पतीला व्‍होकार्ड हॉस्‍पीटल मध्‍ये भरती करण्‍यात आले होते व उपचारा दरम्‍यान दि. 02.05.2017 ला मृत्‍यु झाल्‍याचे मान्‍य केले आहे. त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने दि. 23.05.2017 ला तक्रारकर्तीला पत्र पाठवून तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या मृत्‍यु संबंधातील काही दस्‍तऐवजाची मागणी केली असता तक्रारकर्तीने काही दस्‍तऐवज पुरविले व काही दस्‍तऐवज अद्याप पुरविलेले नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा पॉलिसीच्‍या शर्ती व अटीची पूर्तता न केल्‍यामुळे दि. 13.07.2017 ला पत्र पाठवून नामंजूर केल्‍याचे कळविले. तक्रारकर्तीच्‍या पतीचे व्‍होकार्ड हॉस्‍पीटलमधील डेथ समरी नुसार विमाधारकाचा मृत्‍यु  acute respiratory distress syndrome, sepsis with septic shock acute renal failure, metabolic encephalopathy and Antecedent cause was uncontrolled diabetes mellitus, Thrombocytopenia, chronic kidney disease, ITP, right mid and lower zone consolidation, Respiratory failure.  यामुळे झालेला आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने पुढे असे नमूद केले की, तक्रारकर्तीचा विमा दावा हा  पॉलिसीच्‍या शर्ती व अटीची पूर्तता न केल्‍यामुळे नामंजूर केल्‍याचे दि. 13.07.2017 ला पत्र पाठवून कळविले. विमाधारकाचा मृत्‍यु पॉलिसी मध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे हा फार मोठया वैद्यकीय आजारामुळे झालेला नाही व विमाधारकाचा आजार विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्ती अंतर्गत येत नाही. तसेच तक्रारकर्तीच्‍या पतीला 2 वर्षापासून मधुमेह होता व तक्रारकर्तीच्‍या पतीने विमा पॉलिसी काढतांना प्रकृतीबाबतची माहिती लपवून ठेवली या कारणास्‍तव विमा दावा नाकारण्‍यात आला. म्‍हणून तक्रारकर्तीची प्रस्‍तुत तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.

 

  1.      उभय पक्षाने दाखल केलेले दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे नोंदविले.

 

             अ.क्रं.                मुद्दे                                           उत्‍तर

 

1. तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय ? होय

 

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?होय

 

  1.      काय आदेश ? अंतिम आदेशानुसार

 

  •     कारणमिमांसा

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्तीच्‍या पतीने विरुध्‍द पक्षाकडून मेडिक्‍लेम  पॉलिसी क्रं. 4065/ICICIAL/113788889/00 ही दिनांक 26.02.2016 ते दि. 25.02.2021 या कालावधीकरिता काढली होती याबाबत उभय पक्षात वाद नाही. तक्रारकर्तीने नि.क्रं. 2 वर दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारकर्तीच्‍या पतीने विरुध्‍द पक्षाकडून विमा दावा काढला होता व तक्रारकर्तीच्‍या पतीचे  दिनांक 02.05.2017 रोजी निधन झाले. त्‍यामुळे तक्रारकर्ती विमाधारकाची विधवा या नात्‍याने लाभार्थी असल्‍याने विरुध्‍द पक्षाची ग्राहक होते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा acute respiratory distress syndrome, sepsis with septic shock acute renal failure, metabolic encephalopathy and Antecedent cause was uncontrolled diabetes mellitus, Thrombocytopenia, chronic kidney disease, ITP, right mid and lower zone consolidation, Respiratory failure या कारणाने झाला व सदरचा आजार विमा पॉलिसीच्‍या शर्तीनुसार मोठा आजार नाही. तसेच तक्रारकर्तीच्‍या पतीला विमा पॉलिसी काढण्‍यापूर्वीपासून  मधुमेह असल्‍याची बाब लपविल्‍याच्‍या कारणावरुन तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारल्‍याचे कळविले होते. परंतु heart attack हा pre-existing disease नसल्‍यामुळे तो केव्‍हाही येऊ शकतो.  तसेच तक्रारकर्त्‍याला विमा पॉलिसी काढण्‍यापूर्वी pre-existing disease होता हे विरुध्‍द पक्षाने सिध्‍द केलेले नाही. याकरिता मंचाने मा. राष्‍ट्रीय ग्राहक आयोग यांनी  Revision Petition No. 1129 of 2010, LIC of India Vs. Koll Santhi & anr, या प्रकरणात  दि. 22.01.2016 रोजी पारित केलेला आदेश व I(2019) CPJ 441(NC) PNB METLIFE INSURANCE Co. VS. VINITA DEVI या प्रकरणातील न्‍यायनिवाडयांचा आधार घेतलेला आहे. सदरच्‍या प्रकरणातील तथ्‍य व वर्तमान प्रकरणातील तथ्‍य हे सुसंगत असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते.  त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीने घेतलेले वाहन कर्जाच्‍या रक्‍कमेची परतफेड करण्‍याचे टाळण्‍याकरिता सदरचा विमा दावा नाकारल्‍याचे स्‍पष्‍ट होते व ही विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांची सेवेतील त्रुटी असून  अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करणारी कृती असल्‍याचे सिध्‍द होते.

 

सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्तीच्‍या पतीने बॅंकेकडून घेतलेले वाहन कर्जापोटी देय असलेली रक्‍कम रुपये 1,74,900/- तक्रारकर्तीला अदा करावी व सदरहू रक्‍कमेवर विमा दावा नाकारल्‍याच्‍या तारखेपासून म्‍हणजे दि. 13.07.2017 पासून ते रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 10 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आत विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

6. तक्रारकर्तीला तक्रारीची बव क फाईल परत करावी.

 

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.