Maharashtra

Nagpur

CC/357/2018

SMT. SEEMA RADHESHAM MOON - Complainant(s)

Versus

ICICI LOMBARD, GENERAL INSURANCE COMPANY LTD. - Opp.Party(s)

ADV. KANCHANA R. DHANDODE

23 Jun 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/357/2018
( Date of Filing : 11 May 2018 )
 
1. SMT. SEEMA RADHESHAM MOON
R/O. C/O. GAUTAM MOON, BUDDHA VIHAR, RANI BHOSLE NAGAR, NAGPUR-440024
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD, GENERAL INSURANCE COMPANY LTD.
5TH FLOOR LANDMARK BUILDING, ABOVE BIG BAZAR, SITABULDI, NAGPUR
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:ADV. KANCHANA R. DHANDODE, Advocate
For the Opp. Party: ADV. SACHIN JAISWAL, Advocate
Dated : 23 Jun 2020
Final Order / Judgement

                          आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की,  तिचे पती स्‍व. राधेश्‍याम रघुनाथ मुन यांनी विरुध्‍द पक्षाकडून वाहनाकरिता तसेच स्‍वतःचा वैयक्तिक अपघाती विमा अंतर्गत दि. 14.10.2015 ते 13.10.2016 या कालावधीकरिता पॉलिसी काढली होती. दि. 04.10.2016 ला रात्री 21.00 वाजता राधेश्‍याम रघुनाथ मुन हे वाहन क्रं. MH.04 S-9759 ने उमरेडला चालवित जात असतांना त्‍याचवेळेस विरुध्‍द दिशेने येणा-या ट्रक क्रं. MH.04, Y-2447 याने तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या मेटॅडोरला धडक दिली, त्‍यामुळे तक्रारकर्तीचे पती अपघातात जखमी झाले व त्‍यांना उपचाराकरिता चौधरी हॉस्‍पीटल, सक्‍करदरा नागपूर येथे भरती केले व त्‍यांचा उपचारा दरम्‍यान दि. 21.10.2016 रोजी निधन झाले.   

 

  1.      तक्रारकर्तीने पुढे नमूद केले की, तिने पतीच्‍या मृत्‍युनंतर विरुध्‍द पक्ष यांच्‍या कस्‍टमर केअर क्रमांकावर पतीच्‍या निधनाची माहिती दिली, त्‍यावेळी विरुध्‍द पक्षाने  तक्रारकर्तीला कार्यालयात येऊन भेटण्‍यास सांगितले. 2 महिन्‍यानंतर तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे व्‍यक्तिशः भेट दिली असता त्‍यांनी क्‍लेम फॉर्म दिला व तिच्‍या पतीच्‍या निधना संबंधीच्‍या दस्‍तऐवजाची मा‍गणी केली. त्‍यांनतर तक्रारकर्तीने क्‍लेम फॉर्म आवश्‍यक दस्‍तऐवजासह भरुन दिला. परंतु विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर केला नाही. त्‍यानंतर दि. 30.11.2017 ला तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे आर.पी.ए.डी.द्वारे विमा क्‍लेम फॉर्म आवश्‍यक दस्‍तऐवजासह पाठविले. त्‍यानंतर ही आजपर्यंत विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर न केल्‍यामुळे तक्रारकर्तीने दि. 03.02.2018 रोजी विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीच्‍या नोटीसची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला एकूण रक्‍कम रुपये 3,25,000/- द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजसह देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई देण्‍याचा ही आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की, तक्रारकर्तीचे पती स्‍व. राधेश्‍याम रघुनाथ मुन यांनी त्‍याचे वाहन आणि स्‍वतःचा वैयक्तिक‍ अपघात विमा पॉलिसी अंतर्गत विमा घेतला होता. यामध्‍ये चालक-मालक (Owner- Driver) यांचा विमा कव्‍हर होता. स्‍व. राधेश्‍याम मुन हे दि. 04.10.2016 ला रात्री 21.00 वाजता त्‍याचे वाहन  Eicher Metador 709 LPT Regd.No.MH-04, S-9759 चालवित होता त्‍याच वेळेस विरुध्‍द दिशेने येणा-या ट्रक क्रं. MH.04, Y-2447 या वाहनाने धडक दिली व झालेल्‍या अपघातामुळे राधेश्‍याम रघुनाथ मुन जखमी झाले व त्‍यांचा उपचारा दरम्‍यान दि. 21.10.2016 ला निधन झाल्‍याचे कथन नाकारले आहे.  

 

  1.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की,  तक्रारकर्तीने पतीच्‍या अपघातानंतर मृत्‍युची माहिती कस्‍टमर केअर क्रमांकावर दिलेली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रारीत क्‍लेम नं. नमूद केलेला नाही. तसेच तक्रारकर्तीला व्‍यक्तिशः कार्यालयात बोलविण्‍यात आलेले नव्‍हते व तिला क्‍लेम फॉर्म ही पुरविण्‍यात आला नाही. तसेच कस्‍टमर केअर नंबरला क्‍लेम सादर करण्‍याबाबत कळवितांना क्‍लेम नं. जनरेट होतो व तो कॉल सेंटर एक्‍झीकेटिव्‍हने कॉल करणा-याला पुरविला होता व तो क्‍लेम नबंर क्‍लेम फॉर्म मध्‍ये भरुन विरुध्‍द पक्षाच्‍या ब्रान्‍च ऑफिसमध्‍ये सादर करावयाचा होता. परंतु सदर प्रकरणात तक्रारकर्तीने क्‍लेम फॉर्म विरुध्‍द पक्ष कंपनीकडे सादर केला नाही आणि जो पर्यंत तक्रारकर्तीच्‍या विमा दावा मिळण्‍याच्‍या अर्जाची विरुध्‍द पक्ष कंपनीकडे नोंद होत नाही, तो पर्यंत तक्रारकर्तीला विमा दावा रक्‍कम देण्‍याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्तीने दि. 31.11.2017 ला क्‍लेम फॉर्म आवश्‍यक दस्‍तऐवजासह पाठविलेले नाही. सदरचे दस्‍तऐवज विरुध्‍द पक्षाकडे पोहचलेच नाही, त्‍यामुळे कायदेशीर नोटीस मधील मजकूर अमान्‍य आहे. तक्रारकर्तीने खोटी तक्रार दाखल केली असून विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही, त्‍यामुळे सदरची तक्रार दंडासह खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.

 

  1.        उभय पक्षाने दाखल केलेले दस्‍तऐवज व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

मुद्दे                    उत्‍तर

 

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ            होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला कायॽ           होय

 

  1. काय आदेश ॽ                             अंतिम आदेशाप्रमाणे

  निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1, 2 व 3 बाबत – तक्रारकर्तीचे पती स्‍व. राधेश्‍याम रघुनाथ मुन यांनी विरुध्‍द पक्ष कंपनीकडून वाहन तसेच स्‍वतःचा वैयक्तिक विमा अपघात अंतर्गत दि. 14.10.2015 ते 13.10.2016 या कालावधीकरिता पॉलिसी काढली होती. दि. 04.10.2016 ला रात्री 21.00 वाजता राधेश्‍याम रघुनाथ मुन हे वाहन क्रं. MH.04 S-9759 उमरेडला चालवित जात असतांना त्‍याच वेळेस विरुध्‍द दिशेने येणा-या ट्रक क्रं. MH.04, Y-2447 याने तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या मेटॅडोरला धडक दिली, त्‍यात तक्रारकर्तीचे पती जखमी झाले त्‍यामुळे त्‍यांना चौधरी हॉस्‍पीटल, सक्‍करदरा नागपूर येथे उपचाराकरिता दाखल केले असता उपचारा दरम्‍यान दि. 21.10.2016 रोजी तक्रारकर्तीच्‍या पतीचे निधन झाले.  तक्रारकर्तीने नि.क्रं. 2 वर दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजावरुन तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक ठरते. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे दिनांक 30.11.2017 रोजी विमा दावा अर्ज आवश्‍यक दस्‍तऐवजासह आर.पी.ए.डी. ने पाठविला होता. नि.क्रं. 2(17) वर दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजाचे अवलोकनावरुन असे निदर्श्‍नास येते की, तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष कंपनी आय.सी.आय.सी.आय. लोम्‍बार्ड जनरल इन्‍श्‍युरन्‍स सिताबर्डी नागपूर शाखेला विमा दावा प्रस्‍ताव आर.पी.ए.डी. द्वारे पाठविला होता व सदरचा विमा दावा प्रस्‍ताव हा आय.सी.आय.सी.आय. लोम्‍बार्ड इन्‍श्‍युरन्‍स सिताबर्डी शाखेला दि. 04.12.2017 रोजी पोहचल्‍याची पोच नि.क्रं. 2(16) वर दाखल केलेली आहे. सदरची डाक पटवर्धन पोस्‍ट ऑफिस यांनी विरुध्‍द पक्ष विमा कंपनीला पोहचविल्‍याचे पोस्‍टाच्‍या ट्रॅक रिपोर्टवरुन दिसून येते. विरुध्‍द पक्षाने विमा प्रस्‍ताव न पाठविल्‍याच्‍या कारणावरुन तक्रारकर्तीचा विमा दावा नाकारुन तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते .

                सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीला तिच्‍या पतीचा अपघाती विमा दावा रक्‍कम रक्‍कम रुपये 2,00,000/- अदा करावे व सदर रक्‍कमेवर दि. 04.12.2017 पासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 8 टक्‍के दराने व्‍याज रक्‍कम तक्रारकर्तीला अदा करावी.

 

  1. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व  तक्रारीचा खर्च म्‍हणून  रुपये 10,000/- द्यावा.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्ष यांनी करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.