Maharashtra

Nagpur

CC/537/2017

RUPALI VIKAS SHELKE - Complainant(s)

Versus

ICICI LOMBARD GENERAL INSURANCE COMPANY LTD., THROUGH BRANCH MANAGER - Opp.Party(s)

ADV. MRS. UMA A. BHATTAD

08 Feb 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/537/2017
( Date of Filing : 29 Nov 2017 )
 
1. RUPALI VIKAS SHELKE
R/O. NANDANVAN, SHESH NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE COMPANY LTD., THROUGH BRANCH MANAGER
6TH FLOOR LANDMARK BUILDING, RAMDASPETH WARDHA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. ICICI LOMBARD GENERAL INSURANCE COMPANY LTD.
ICICI BANK TOWER, 9TH FLOOR, PLOT NO. 12, FINANCIAL DISTRICT, NANAKRAMGUDA, GACHIBOWLI, HYDRABAD-500032
HYDRABAD
KARNATAKA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. MRS. UMA A. BHATTAD, Advocate for the Complainant 1
 Adv. Sachin Jaiswal, Advocate for the Opp. Party 1
Dated : 08 Feb 2022
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अंतर्गत प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, तिचे पती श्री विलास शेळके यांनी सन 2013 मध्‍ये Hero Moto Corp (Formerly Hero Honda) Passion Pro DRS CCR Vide Frame No. MBLHA10AWDHJ24464, Engine No. HA10ENDHJ44515,  या वाहनाकरिता विरुध्‍द पक्षाकडून दिनांक 31.10.2013 ते 30.10.2014 या कालावधीकरिता वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी क्रमांक 3005/20800130/10297/000अन्वये विमाकृत केले होते व  सदर विमा पॉलिसी अंतर्गत वैयक्तिक अपघात विमा रुपये 1,00,000/- अंतर्भूत होता.
  2.      तक्रारकर्तीच्‍या पतीचा दिनांक 15.01.2014 रोजी 12.00(p.m.) वाजता मौजा- उटी शिवार, जिल्हा नागपूर येथे रोड अपघातात मृत्यू झाला. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे प्रथम खबरी अहवाल, पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, वाहन परवाना, अपघात अहवाल आणि इतर आवश्यक दस्तावेजासह विमा दाव्‍यासह सादर केला होता. विरुध्‍द पक्षाने तक्रारीतील विमा दाव्यानुसार विमा पॉलिसीचे शर्ती व अटी नुसार विमा दावा देण्याचे आश्वासित केले आणि त्यामुळे तक्रारकर्तीने दिनांक 20.12.2014 रोजी इंडेमनिटी बॉंड तयार केला,  परंतु विरुध्‍द पक्षाने इंडेमनिटी बॉंड  च्या मागणीनंतर तक्रारकर्तीला विमा दावा देण्याचे नाकारले. तक्रारकर्तीच्या पतीच्‍या अपघाता वेळी तिच्या पतीचे वाहन विरुध्‍द पक्षाकडे विमाकृत होते आणि तक्रारकर्तीच्‍या पतीजवळ विहित वाहन परवाना देखील होता. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला योग्‍य व वैध असलेल्‍या विमा दाव्‍याची रक्‍कम न दिल्यामुळे तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाला वकिलामार्फत 10.03.2017 ला कायदेशीर नोटीस पाठविली होती व सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने त्‍याची  दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन खालीलप्रमाणे मागणी केली आहे
    1. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे घोषित करावे.
    2. विरुध्‍द पक्षाला निर्देश द्यावे की, तक्रारकर्तीला वैयक्तिक विमा अपघात पॉलिसी अंतर्गत असलेला विमा दावा रक्कम रुपये1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याजासह रक्‍कम मृत्यू दिनांकापासून अदा करावी. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की, तक्रारकर्तीच्‍या पतीने त्याची वाहन Hero Moto Corp Passion Pro DRS CCR Vide Frame No. MBLHA10AWDHJ24464, Engine No. HA10ENDHJ44515, रजि. वाहन क्रमांक MH49/P-7573, करिता विमा पॉलिसी क्रमांक3005/20800130/10295/000 अन्वये दिनांक 31.10.2013 ते 30.10.2014 या कालावधीकरिता विमा पॉलिसी शर्ती व अटी अंतर्गत विमा मूल्य रुपये48,020/- करिता विमाकृत केल्याचे कबूल केले आहे. विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्तीच्‍या इतर परिच्छेद निहाय कथन नाकारलेले आहे. विरुध्‍द  पक्षाने जबाबात पुढे नमूद केले की, तक्रारकर्तीच्‍या पतीचा दिनांक 15.01.2014 रोजी अपघात झाला व तक्रारकर्तीने सदरची तक्रार 2 वर्षानंतर माहे आक्टोबर 2017 ला दाखल केल्यामुळे प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत  मुदतबाह्य असल्यामुळे खारीज करण्यात यावी. तसेच विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्तीला कोणतीही त्रुटी पूर्ण सेवा दिली नाही, त्‍यामुळे सदर तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण उद्भवले नसल्‍याने प्रस्‍तुत तक्रार दाखल होण्यास पात्र नसून ती खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.
  2.        उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता  व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

                    मुद्दे                                                                 उत्‍तर

  1. तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय ?                 होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय?          होय
  3. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्यापार पध्‍दतीचा अवलंब केला काय?    होय
  4. काय आदेश ?                                  अंतिम आदेशानुसार

 

  • कारणमीमांसा
  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडून त्याचे वाहन हीरो मोटोकॉर्प वाहन क्रमांक MH49P/7573 करिता दिनांक 31.10.2013 ते  दिनांक 30.10.2014 या कालावधीकरिता विमा मुल्य रक्‍कम रुपये 48,020/- करिता  विमा पॉलिसी क्रमांक3003/20800130/10297/000 अन्वये विमाकृत केले होते याबाबत उभय पक्षात वाद नाही.  तक्रारकर्तीच्‍या पतीचे दिनांक 15.01.2014 रोजी गावावरून येत असतांना झालेल्‍या रोड अपघातात निधन झाल्याचे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. तसेच सदरच्‍या विमा पॉलिसी मध्ये वैयक्तित अपघात निधना करिता रुपये 1,00,000/- एवढ्या रक्‍कमेचा विमा असल्‍याचे निशाणी क्रमांक 2(8) वर दाखल दस्तऐवजावरुन दिसून येते. तक्रारकर्ती ही विमा धारकाची पत्‍नी असल्‍यामुळे ती लाभार्थी या नात्‍याने विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे विमा दावा दि. 20.10.2014 रोजी सादर केला असल्‍याचे निशाणी क्रमांक 2(1) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे  पोस्‍टा द्वारे सर्व आवश्‍यक दस्‍तावेजासह विमा दावा प्रस्‍ताव दि. 09.03.2015 ला पाठविला होता व तो विरुध्‍द पक्षाला दि. 12.03.2015 ला प्राप्‍त झाले असल्‍याचा पोस्‍टाचा अहवाल निशाणी क्रमांक 2(14) वरुन दिसून येते. विरुध्‍द पक्षाला तक्रारकर्तीचा विमा दावा प्राप्त होऊनही विरुध्‍द पक्षाला तक्रारकर्तीला वैयक्तिक विमा अपघात दावा मंजूर केला नाही किंवा त्याबाबत कळविले नाही ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्ती प्रती त्रुटीपूर्ण सेवा असून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करणारी कृती असल्‍याचे दिसून येते असे आयोगाचे स्पष्ट मत आहे.

     सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

 

1    तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिल्‍याचे आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे घोषित करण्यात येते.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्तीला वैयक्तिक अपघात विमा दावा अंतर्गत देय असलेली विमाकृत रक्कम रुपये1,00,000/- दिनांक 20.10.2014 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्तीला द्यावी.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या  करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्तीला तक्रारीची ब  व  क फाईल परत करावी. 
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.