जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2008/392 प्रकरण दाखल तारीख - 18/12/2008 प्रकरण निकाल तारीख – 30/03/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य प्रविण पि.लक्ष्मणराव पतंगे, वय वर्षे 28, व्यवसाय नोकरी, अर्जदार. रा. दाती पो.कुर्तर्डी ता.कळमनुरी जि.हिंगोली. विरुध्द. आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड, गैरअर्जदार. जनरल इन्शुरन्स कंपनी लि, तर्फे अधिकृत शाखा व्यवस्थापक, शाखा कार्यालय अक्सीस बँकेच्यावर,कलामंदीर,नांदेड अर्जदारा तर्फे वकील - अड.बी.व्हि.भुरे. गैरअर्जदार - अड.अजय व्यास. निकालपञ (द्वारा-मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) यातील अर्जदार यांची तक्रार थोकडक्यात अशी की, अर्जदार यांनी टाटा स्पेसीओ नं.एम.एच.38-1623 हे वा दि.24/12/2007 रोजी बाफना मोटार्स नांदेड यांचेकडुन खरेदी केले. अर्जदार यांनी वाहनाचा विमा गैरअर्जदार यांचेकडे योग्य ती फिस भरुन काढला विमा काढते वेळेस गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्या हक्कात वाहनाचा विमा दिला व सर्व प्रकारची जोखीम स्विकारुन अर्जदार यांना पॉलिसी दिली त्याचा कव्हन नोट क्र. पीएफ 6683116 दिला ज्याचा पॉलिसी क्र.3001/53212384/00/000 असा आहे. सदरील पॉलिसीचा कालावधी दि.22/12/2007 ते दि.21/12/2008 पर्यंत आहे. अर्जदारांचा ड्रायव्हर श्री. राहुल पद्माकर कांबळे रा.नांदेड यांनी दि.03/02/2008 रोजी जामखेड बिडकडुन नांदेडकडे परत येत असतांना पांढरी शिवार आष्टी ते जामखेड रोडवर अर्जदाराच्या टाटा स्पेसीओ जिपचा व टेम्पो क्र.एमएच 15 जी 9367 ची समोरासमोर धडक होऊन अर्जदाराच्या टाटा स्पेसीओ जिपचे तीन लाखाचे नुकसान झाले. याबाबत पोलिस स्टेशन आष्टी जि.बीड फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा क्र. 16/08 नोंदविण्यता आला व घटनास्थळ पंचनामा केला. सदर घटना घडल्यावर अर्जदार यांनी गैरअर्जदार कंपनीला माहीती दिली त्यानंतर गैरअर्जदार यांनी सर्वेअर व लॉस असेसर यांची नेमणुक केली. सर्व्हेअर व लॉस असेसर यांनी अर्जदाराच्या वाहनाचे किती नुकसान झाले याची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी भेट दिली आणि तपासणी अंती सर्व कागदपत्रे आणि सर्व्हेअर अहवाल त्यांनी गैरअर्जदाराकडे जमा केली. त्यानंतर गैरअर्जदार यांनी सर्व्हेअर यांनी सांगीतल्याप्रमाणे अर्जदार यांनी सदरील वाहन घटनास्थळ पाहुन दुरुस्ती केली . अर्जदार यांनी सदरील वाहन टोचन करुन आणण्यासाठी जवळपास रु.20,000/- खर्च आला तसेच वाहन दुरुस्ती करण्यासाठी रु.3,00,000/- खर्च आला. अर्जदार यांना गैरअर्जदार यांनी सांगीतल्याप्रमाणे बाफना मोटार्स नांदेड येथे दुरुस्ती केली व दुरुस्ती करुन गैरअर्जदार यांचेकडे सदर दुरुस्तीच्या रक्कमेची मागणी केली. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा क्लेम मुदतीमध्ये मंजुर करण्यासाठी टाळाटाळ केली. अर्जदार यांना क्लेम क्र. MOT 00705412 दिला व दि.10/11/2008 रोजी वाहनाचा वापर हा व्यावसायीक उद्येशासाठी केला. म्हणुन अर्जदाराच्या नुकसान भरपाईचा क्लेम नामंजुर केला. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे अनेक वेळा विमा क्लेमची रक्कम मागणी केली. परंतु गैरअर्जदार यांनी देण्यास टाळाटाळ केली. म्हणुन अर्जदार यांनी हा तक्रारअर्ज दाखल करुन गैरअर्जदार यांचेकडुन वाहनाच्या विमा पोटी रु.3,00,000/- दि.03/02/2008 पासुन 18 टक्के व्याजाने देण्याचे व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- आणि दावा खर्चापोटी रु.5,000/- देण्याचे आदेश व्हावेत अशी मागणी केली आहे. यातील गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली, त्यांनी हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले, त्यांचे म्हणणे असे की, अर्जदार यांची तक्रार खरी व बरोबर नसुन ग्राहक संरक्षण कायदयातील तुरतुदीप्रमाणे नाही म्हणुन रद्य होण्यास पात्र आहे. गैरअर्जदार यांनी हे म्हणणे मान्य केले की, अर्जदार यांनी त्यांचे वाहनाचा विमा क्र. क्र.3001/53212384/00/000 काढला असुन त्याचा कालावधी दि.22/12/2007 ते दि.21/12/2008 असा आहे. गैरअर्जदार यांना अर्जदाराचे हे म्हणणे मान्य नाही की, अर्जदाराचा वाहन चालक श्री.राहुल पद्माकर कांबळे हा दि.03/02/2008 रोजी जामखेड बीडकडुन नांदेडकडे परत येत असतांना पांढरी शिवार आष्टी ते जामखेड रोडवर अर्जदाराच्या टाटा स्पेसीओ जिपचा व टेम्पो क्र. एमएच 15 जी 9367 ची समोरासमोर धडक होऊन अर्जदाराच्या टाटा स्पेसीओ जिपचे रु.3,00,000/- चे नुकसान झाले, अर्जदारांन ते नियमाप्रमाणे सिध्द करावे असे म्हटलेले आहे. गैरअर्जदार यांनी लॉ ऑफीसरची नियुक्ती करुन वाहनाच्या नुकसानीची पाहणी केली. परंतु हे मान्य नाही की, सर्व्हेअर व लॉस असेसरने सांगीतल्याप्रमाणे अर्जदाराने वाहन घटणास्थळा पासुन काढुन वाहनाची दुरुस्ती केली. गैरअर्जदारांना हे मान्य नाही की, अर्जदारास वाहनाच्या दुरुस्तीसाठी टोचन करुन आणण्यास रु.20,000/- खर्च आला व वाहनाच्या दुरुस्तीसाठी रु.3,00,000/- खर्च आला. गैरअर्जदार यांना हे म्हणणे मान्य नाही की, अर्जदार यांनी सदरील वाहन गैरअर्जदार यांच्या सांगण्याप्रमाणे बाफना मोटर्स नांदेड यांचेकडे वाहन दुरुस्त केले व दुरुस्ती करुन गैरअर्जदार यांचेकडे रक्कमेची मागणी केली व गैरअर्जदार यांनी प्रकरण मंजुर करण्यास टाळाटाळ केली. गैरअर्जदार यांनी श्री.संतोष रेनके या सर्व्हेअरला वादग्रस्त वाहनाचा सर्व्हे करण्यास नियुक्ती केली व त्याप्रमाणे दि.07/03/2008 रोजी सर्व्हे केला व सर्व्हेअरच्या निरीक्षणाप्रमाणे अपघातग्रस्त वाहनाचे रु.99,896/- एवढे नुकसान झाले असा अहवाल दिला. विमा कंपनीचे अधिकारी श्री.प्रसादकुमार यांनी चौकशी करुन दि.20/02/2008 रोजी चौकशी अहवाल विमा कंपनीकडे सादर केला. या अहवालानुसार अर्जदार हा व्होडाफोन या कंपनीमध्ये नौकरीस आहे, त्यास दरमहा रु.12,000/- वेतन मिळते. अर्जदार यांनी त्यांचे वाहन व्होडाफोन या कंपनीमध्ये रु.24,000/- प्रतीमहा प्रमाणे भाडयाने दिले आहे. दि.03/02/2008 रोजी म्हणजे घटनेच्या दिवशी सदरील वाहनामध्ये अर्जदाराचे वाहन चालक श्री. राहुल कांबळे व व्होडाफोन कंपनीचे अधिकारी संतोष राठोड, विजेंद्रसिंग, जगनाथ सिंग हे प्रवास करीत होते. सदर अधिका-यांना अहमदनगर येथे पोहचविण्यासाठी वाहन नगरला जात होते. अर्जदाराचे वाहन चालक हा वाहन स्वतः निष्काळजीपणे चालवित होता व त्याने समोरुन येणा-या टेम्पो क्र.एमएच 15 जी 9367 या वाहनाला धडक दिली. या अपघतामध्ये प्रवाशी व चालक जखमी होऊन सरकारी दवाखाना आष्टी येथे भरती करण्यात आले. टेम्पोच्या चालकाने अर्जदाराच्या वाहन चालका विरुध्द गुन्हा दाखल केला होता. कंपनीच्या अधिकारी यांनी वाहन चालक श्री.राहुल कांबळे याचा जबाब नोंदविला व त्या जबाबात त्याने स्पष्टपणे सांगितले की, सदरील वाहनाचा उपयोग हा व्यावसायीक म्हणुन होत होता, तसेच अर्जदाराने कंपनीच्या अधिका-यासमोर जबाब दिला की, सदरील वाहन हे व्होडाफोन कंपनीला रु.24,000/- प्रतीमहा प्रमाणे भाडयाने दिले होते. विमा कंपनीच्या अहवालानुसार असे दिसते की, अर्जदार हा त्याचे वाहनाचा हप्ता भरपाई करण्यासाठी त्याचे उत्पन्ना व्यतिरिक्त तो त्याचे वाहन व्यवसायीक कारणांसाठी उपयोग करुन भरणा करीत असे. अर्जदाराने त्याचे वाहन व्यवसायीक कारणासाठी उपयोग करीत होता, म्हणुन अर्जदार यांनी विमा कंपनीचे नियम व अटीचे उल्लंघन केले, त्यामुळे विमा कंपनी ही नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदारास कसल्याही प्रकारची त्रुटीची सेवा दिलेली नाही. अर्जदाराने सदरील तक्रार केवळ विमा कंपनीकडुन रक्कम हडप करण्याच्या उद्येशाने दाखल केली आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराने केलेली इतर सर्व विपरीत विधाने नाकबुल केली आणि असा उजर घेतला की, अर्जदाराचा तक्रारअर्ज फेटाळण्यात यावा. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र तसेच गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व शपथपत्र याचा विचार होता,खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही. 3. काय ? आदेश अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडुन टाटा स्पेसिओ नंबर एम.एच.38-1623 या वाहनाचा विमा उतरविलेला होता. सदर वाहनाची पॉलिसी गैरअर्जदार यांनी दाखल केलेली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे सदर वाहनाची पॉलिसी उतरविलेली होती, ही बाब त्यांच्या लेखी म्हणणे व शपथपत्रामध्ये नाकारलेली नाही. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र व गैरअर्जदार यांनी दाखल केलेली पॉलिसी याचा विचार होता, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत, असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 2 अर्जदार यांचे वाहनाचा दि.03/02/2008 रोजी अपघात झाल्यामुळे अर्जदाराचे वाहनाचे नुकसान झाल्याने अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे सदरच्या वाहनाच्या विमा रक्कमेची मागणी केलेली आहे. अर्जदारांच्या अर्जातील कथनानुसार अर्जदार यास वाहन दुरुस्तीस रु.3,00,000/- एवढा खर्च आलेला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा क्लेम वाहनाचा वापर हा व्यवसायीक उद्येशासाठी केला म्हणुन नामंजुर केलेला आहे. गैरअर्जदार यांनी त्यांच्या लेखी म्हणणे व शपथपत्रामध्ये अर्जदार यांचे अर्जातील बहुतांशी मजकुर नाकारलेला आहे. गैरअर्जदार यांनी श्री.संतोष रेनके या सर्व्हेअरला वादग्रस्त वाहनाचा सर्व्हे करण्याचे निर्देश दिले होते. श्री.संतोष रेनके यांनी दि.07/03/2008 रोजी सदर वाहनाचा सर्व्हे करुन अपघातग्रस्त वाहनाचा रु.99,896/- एवढे नुकसान झाले बाबतचा अहवाल दिलेला आहे श्री.संतोष रेनके यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणेनुसार अर्जदार हे त्यांचे वाहनाचा वापर व्यवसायीक कारणांसाठी करत होते. अर्जदार यांनी त्यांचे वाहन व्होडाफोन कंपनीकडे रु.24,000/- प्रतीमाह भाडयाने दिलेले आहे व अपघाताच्या दिवसीही अर्जदाराचे वाहन व्यापारी या कारणांसाठी वापरत असतांना सदर वाहनाचा अपघात झाल्याने गैरअर्जदार हे अर्जदारास नुकसान देण्यास जबाबदार नाही, असे म्हटलेले आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत बाफना मोटर्स यांनी वाहन दुरुस्तीसाठी आलेला खर्च रु.3,01,737.88 पैसे एवढया रक्कमेचा अहवाल दिलेला आहे. गैरअर्जदार यांनी दि.07/03/2008 रोजीचा श्री.संतोष रेनके यांचा सर्व्हे रिपोर्ट दाखल केलेला आहे. सदर रिपोर्ट प्रमाणे रु.99,896/- एवढया रक्कमेचा अपघातग्रस्त वाहनाच्या नुकसानी पोटी रक्कम दर्शविण्यात आलेली आहे. अर्जदार यांनी दाखल केलेला बाफना मोटर्स व गैरअर्जदारांचे श्री.संतोष रेनके यांचा सर्व्हे रिपोर्टच्या रक्कमेमध्ये प्रचंड तफावत दिसुन येत आहे. सदर अर्जाच्या कामी 2009 (1) CCC 6 (NS) SUPREME COURT OF INDIA, National Insurance Company Ltd, V/s Meena Aggarwal या प्रकरणांमध्ये Insurance Claim- Motor vehicle met with accident- Claim filed-rejected as the driver did not possess valid licence- the vehicle was being plied against the terms of the insurance policy-District Forum rejected the claim petition-on appeal State Commission held that it would be proper to declare the claim of complainant as Non-standard consequent to the violation and breach. Therefore, the present appellant was directed to pay Rs.90,000/- i.e.75% of Rs.1,20,000/- i.e. the amount assessed by the surveyor of the insurance company along with 9% interest. The only reason given by the state commission was that even if the vehicle was being used as a taxi, there was no fundamental breach of the terms of the policy—revision petition before the National Commission came to be dismissed by the impugned order—the National commission held that even though the vehicle was being used as a commercial vehicle and the driver did not have a valid driving licence, there was no fundamental breach of the terms of the policy – the owner of a vehicle cannot contend that he has no liability to verify the fact as to whether the driver of the vehicle possessed a valid licence or not—the State commission and the National commission have not practically indicated any reason for coming to the conclusion that there was no fundamental breach of the terms of the policy. Both the state commission and the national commission observed that the vehicle was being driven by a person who did not have a valid driving licence. In addition to that the vehicle which was insured for personal use was used for commercial purposes—the impugned orders of the state commission and the National commission are unsustainable, deserve to be set aside. या निकालपत्राप्रमाणे अर्जदार यांचा अर्ज नामंजुर होण्यास पात्र आहे, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी त्यांचे वाहनाचा वापर व्यापारी कारणांसाठी केलेला आहे असे अर्जदार व त्यांचे ड्रायव्हरचा जबाबही आहे. गैरअर्जदार यांनी DETECTIVE SERVICES दि.20/02/2008 रोजीचा अहवाल दाखल केलेला आहे. सदर रिपोर्ट प्रमाणे अर्जदार यांचे वाहन व्होडाफोन कंपनीकडे भाडयाने दिल्याचे स्पष्ट होत आहे. गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणेमध्ये अर्जदार हे व्होडाफोन कंपनीमध्ये नौकरीस आहेत व त्यास रु.12,000/- दर महा वेतन मिळते असे नमुद केलेले आहे. सदरची बाब अर्जदार यांनी प्रती उत्तर देऊन नाकारलेले नाही. अगर त्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा या मंचामध्ये दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी सदर वाहनाचा वापर स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी करत आहे असे त्यांच्या अर्जामध्ये कोठेही नमुद केलेले नाही. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या पॉलिसीचे अवलोकन केले असता, सदरची प्रायव्हेट कार पॅकेट पॉलिसी असल्याचे स्पष्ट होत आहे. सदर पॉलिसी मध्ये नमुद केल्याप्रमाणे LIMITATIONS AS TO USE : The policy covers use of the vehicle for any purpose other than : Hire or reward, Carriage of goods ( other than samples of personal luggage) organized racing, pace making, speed testing, Reliability trials, Any purpose in connection with motor trade. असे स्पष्ट दिसुन येत आहे. वरील सर्व बाबींचा विचार होता, अर्जदार यांनी पॉलिसीच्या अटी व शर्तीचा भंग केलेला आहे त्यामुळे अर्जदार यांचा क्लेम नाकारुन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र तसेच गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व शपथपत्र आणि वरील मा.सुप्रीम कोर्टाचा निकालपत्र याचा विचार होता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजुर करण्यात आली आहे. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार. लघूलेखक. |