जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 12/ 2016 तक्रार नोंदणी दि. :-17/2/2016
तक्रार निकाली दि. :-21/6/2016
निकाल कालावधी:-4 महीने 5 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- श्रीमती भानु विजय साना,
वय – 44 वर्षे, व्यवसाय – घरकाम ,
रा.पो.लक्ष्मीपूर, ता. मुलचेरा,
जिल्हा – गडचिरोली.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- 1) आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंशुरन्स
कंपनी लिमिटेड,
तर्फे डिव्हीजनल मॅनेजर, डिव्हीजनल ऑफीस,
5 वा माळा, लँडमार्क बिल्डींग, रामदासपेठ,
नागपूर .
2) आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंशुरन्स
कंपनी लिमिटेड, तर्फे चेअरपर्सन,
रजी.ऑफीस आयसीआयसीआयएम बँक,
टॉवर्स बांद्रा कुर्ला कॉम्प्लेस, मुंबई-400051.
3) तहसिलदार, मुलचेरा,
ता. मुलचेरा, जिल्हा – गडचिरोली.
अर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री उदय क्षीरसागर
गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील :- अधि.श्री विनय लिंगे
गणपूर्ती :- (1) श्री विजय चंद्रलाल प्रेमचंदानी, अध्यक्ष
(2) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य
(3) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्या
- आदेश निशाणी क्र.1 वर -
(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 21 जून 2016)
1. अर्जदाराने सदर तक्रार अर्जदाराचे पतीचा अपघाती मृत्यु झाल्याने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रुपये 1,00,000/- गैरअर्जदार क्र.1 व 2 कडून मिळण्याबाबत दाखल केलेली आहे.
2. गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील हजर होऊन लेखी उत्तर दाखल करण्याकरीता मुदत मागितली.
3. गैरअर्जदार क्र. 3 तर्फे कोणीही हजर झाले नाही.
- कारण मिमांसा –
4. सदर तक्रार न्यायप्रविष्ट असतांना, अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी नि.क्र.16 अन्वये, आपसी समझौता झालेला असल्याने अंतिम आदेश पारीत करावा, असा संयुक्त अर्ज दाखल केला. त्याअनुषंगाने, पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
// नि.क्र.1 वर आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) गैरअर्जदार क्र.1 व 2 विमा कंपनीने शेतकरी अपघात विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत अर्जदारास दयावी.
(3) गैरअर्जदार क्र. 3 विरुध्द कोणतेही आदेश नाही.
(4) अर्जदार व गैरअर्जदार यांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 21/6/2016