Maharashtra

Nagpur

CC/10/764

Smt. Suman Rajan Lonare - Complainant(s)

Versus

ICICI Lombard General Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv. Smita Deshpande

17 Mar 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/764
 
1. Smt. Suman Rajan Lonare
Plot No. 98-A, Vedrushi, Dixit Nagar, Nari Road, Nari, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. ICICI Lombard General Insurance Co.Ltd.
TVG Mansion, 5th and 6th floor, Plot No. 6-2-1012, ICICI Bank, Kahiratabad, Hyderabad
Hyderabad 500004
Andhra Pradesh
2. Manager, ICICI Home Loan Finance
Civil Lines, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:Adv. Smita Deshpande, Advocate for the Complainant 1
 ADV.SACHIN JAISWAL, Advocate for the Opp. Party 1
 ADV.JAYESH VORA, Advocate for the Opp. Party 1
ORDER

 

श्री नरेश बनसोड, सदस्‍य यांचे कथनांन्‍वये.
 
 
- आदेश -
 (पारित दिनांक – 17/03/2012)
 
1.           तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून, वि.प.कडून मागणी केली की, वि.प.च्‍या गृहकर्ज पॉलिसी अंतर्गत तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या मृत्‍युबाबत दावा मिळण्‍यासाठी व मानसिक, आर्थिक त्रासाकरीता भरपाई, वि.प.ने घराची संपूर्ण मूळ कागदपत्रे परत करण्‍याबाबत, तक्रारीचा निपटारा होईपर्यंत कर्ज वसुलीची कारवाई करण्‍यात येऊ नये म्‍हणून अंतरिम आदेश मिळण्‍याची मागणी केली.
 
2.          तक्रारकर्ती मृतक पॉलिसी धारक राजन लोणारे यांची विधवा पत्‍नी आहे. मृतक राजन यांनी वि.प.क्र. 2 कडून रु.6,28,000/- चे गृहकर्ज घेतले होते व वि.प.क्र. 2 कडून आय सी आय सी आय लोंबार्ड लोन केअर इंशूरंस पॉलिसी काढण्‍यात आली होती. मृतकाने गृहकर्ज घेतलेल्‍या मालमत्‍तेचे विवरण असे की, प्‍लॉ.क्र.98, ख.क्र.41/2, मौजा नारी, क्षेत्रफळ 135 चौ.मि. असे असून कर्ज अर्ज क्र. 7774482142, एल ए एन- एल बी एन ए जी 00001008902 कर्ज दि.06.06.2005. पॉलिसीधारक हा मृत्‍युपावेतो एक्‍साईड बॅटरी नागपूर येथे कार्यरत होता. मृतक 27.11.2011 रोजी स्‍कूटी क्र. एम एच 31 एल वाय 3222 ने नागपूरकडे जात असतांना अज्ञात वाहनाने धडक मारली. अपघातानंतर त्‍वरित मेडीकल कॉलेज येथे भरती करण्‍यात आले व उपचारादरम्‍यान 03.12.2009 रोजी त्‍यांचा मृत्‍यु झाला. त्‍यादिवशी पोलिस स्‍टेशनला एफ आय आर नोंदविण्‍यात आला, त्‍यावरुन मृत्‍यु अपघातामुळे झाला असल्‍याचे लक्षात येते. मृत्‍युनंतर शवाचे शव विच्‍छेदन अहवालानुसार मृत्‍युचे कारण डोक्‍याला जबर मार लागल्‍याने झाल्‍याचे लक्षात येते. तक्रारकर्तीने विमा मिळण्‍याबाबत वि.प.क्र.2 कडे मागणी केली. दाव्‍याचा क्र. आर.सी./0002954 असून तक्रारकर्तीने 400 एस ए /57971004 या पॉलिसी अंतर्गत दावा दाखल केला. परंतू वि.प.क्र.2 ने 08.06.2010 चे पत्राद्वारे सदर दावा पॉलिसी धारक दारुचे नशेत असल्‍याकारणाने नामंजूर केला. वि.प.कडे वारंवार पॉलिसी धारकाने घेतलेले कर्ज पॉलिसीद्वारे समावेशन करण्‍याची विनंती केली. वि.प.ने एफ आय आर, शव विच्‍छेदन अहवाला कडे दुर्लक्ष केले व तक्रारकर्तीचा दावा नामंजूर केला. कारण मेडीकल कॉलेजमधील कागदपत्रामध्‍ये Consumption of Alcohol +ve  या वाक्‍याने दावा फेटाळला. पॉलिसीधारकाने अल्‍कोहोलचे सेवन केले असते तर शव विच्‍छेदन अहवालात अल्‍कोहोलचा वास, पॉलिसी धारकाने अल्‍कोहोल सेवन केले होते असे नमूद असते, परंतू तसे नाही. तसेच अल्‍कोहोलचे प्रमाण, केमिकल चाचणी केली की नाही याबाबत नोंद नाही. वि.प.नुसार पॉलिसीच्‍या अटी व शर्तीचे उल्‍लंघन झाल्‍यामुळे सदर दावा नामंजूर केला.
पॉलिसीचे परि. क्र. 1 नुसार पॉलिसीधारकाचा मृत्‍यु अपघाताने झाला असता वि.प.भरेल व पॉलिसी धारक पूर्णपणे मुक्‍त होईल. तसेच वि.प.क्र. 1 ने पॉलिसीधारकाचे मृत्‍युनंतर काही कर्जाचे हप्‍ते राहिल्‍याने कर्जाच्‍या परतफेडीची मागणी केली. कर्ज घेऊन गहाण ठेवलेल्‍या घराव्‍यतिरिक्‍त घर नसल्‍याने सहानुभूतीपूर्वक मागणी केली. शव विच्‍छेदन अहवाल हा विश्‍वसनीय दस्‍तऐवज आहे, त्‍यामुळे मृतकाने मादक पदार्थाचे सेवन केले असे नाही. त्‍यामुळे मेडीकलचे कागदपत्रे शव विच्‍छेदन अहवालावर वरचढ ठरत नाही. त्‍यामुळे Exclusion Clause  लागू होत नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागाला व वि.प.ची कृती ही दोषपूर्ण सेवा व अनुचित व्‍यापार पध्‍दतीत मोडते. पॉलिसीधारकाचा मृत्‍यु 09.12.2009 रोजी झाल्‍याने व त्‍यानंतर वि.प.ने 08.06.2010 ला दावा नाकारल्‍याने तक्रारीचे कारण घडलेले आहे. आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयर्थ एकूण 7 दस्‍तऐवज दाखल केले आहे. त्‍यामध्‍ये गृहकर्ज कागदपत्रे, पॉलिसीची प्रत, शव विच्‍छेदन अहवाल, मृत्‍यु प्रमाणपत्र, वि.प.चे पत्र व नोटीसचा समावेश आहे.
 
3.          वि.प.क्र.2 ने प्राथमिक आक्षेपात सदर तक्रार खोटी व त्‍यांना त्रास देण्‍याच्‍या हेतूने असल्‍याने खारीज करण्‍याची मागणी केली. तक्रारीचे कारण नसतांना सदर तक्रार दाखल केली आहे, त्‍यामुळे चुकीचे संयोजन या कारणासाठी तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. मृतक पॉलिसीधारकासोबत तक्रारकर्ती ही गृहकर्जात को-बोरोअर आहे. तसेच वि.प.क्र. 2 ने कर्ज खात्‍याबाबत, थकीत गृह हप्‍त्‍याबाबत माहिती नमूद करुन थकीत कर्जाचे विवरण दिले. त्‍यांनी पुढे त्‍यांचा पॉलिसीधारक व वि.प.क्र. 1 मध्‍ये झालेला स्‍वतंत्र विमा कराराशी काहीही संबंध नाही व विमा करार हा तक्रारकर्तीच्‍या पतीने स्‍वतंत्ररीत्‍या केलेला आहे. वि.प.क्र.2 ने तक्रारकर्तीकडे कर्ज फेडीचे हप्‍ते थकीत राहिल्‍याने Securitasion Act  अंतर्गत मागणी करणे गरजेचे होते. वि.प.क्र.2 ने लेखी उत्‍तरासोबत 5 दस्‍तऐवज गृहकर्जासंबंधी पृ. क्र. 91 ते 127 वर आहेत. वि.प.क्र.2ने अर्ज दाखल करुन थकबाकी तक्रारकर्तीने भरण्‍याबाबत आदेश देण्‍याची मागणी केली.
 
4.                          वि.प.क्र. 1 ने तक्रारीचा परि. क्र. 1 नाकारुन, गृहकर्जासंबंधी कथनावर म्‍हणणे देण्‍याची गरज नसल्‍याचे नमूद केले. वि.प. हेसुध्‍दा नाकारले की, मृतक हा एक्‍साईड बॅटरी येथे काम करीत होता, मृतक हा उपरोक्‍त स्‍कूटीने 27.11.2009 रोजी येत असतांना त्‍याचा अपघात झाला व मेडीकल हॉस्‍पीटल उपचारादरम्‍यान 03.12.2009 ला मृत्‍यु झाला. वि.प.ने म्‍हटले की, तक्रारकर्तीचा दावा आर. सी./000294 नोंदविण्‍यात आला व 08.06.2010 ला पॉलिसीच्‍या अटी व शर्तीअंतर्गत विमा दावा नाकारण्‍यात आला. तक्रारीचा परि. क्र. 4 नाकारला. वि.प.क्र.ने नमूद केले की, मृतकाचा अपघात 27.01.2009 ला झाल्‍यानंतर 03.12.2009 ला मृत्‍यु झाला व हॉस्‍पीटलमध्‍ये उपचाराकरीता भरती करण्‍यात आले त्‍यावेळेस Under influence of alcohol असे नमूद करण्‍यात आले व शव विच्‍छेदन अहवालामध्‍ये त्‍याची नोंद दिसत नाही व पॉलिसीच्‍या अटी अंतर्गत नाकारलेला विमा दावा योग्‍य आहे. वि.प.क्र. 1 च्‍या म्‍हणण्‍यानुसार सदर अपघात हा मृतक Under influence of alcohol असल्‍याने झाला. परंतू अपघाताचे 7 दिवसानंतर मृत्‍यु पश्‍चात तक्रारकर्ती शव विच्‍छेदन अहवालाचा आधार घेऊ शकत नाही. वि.प.क्र. 1 नुसार Exclusion Clause  लागू होतो व त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी नाही. तसेच तक्रारकर्तीस तक्रार दाखल करण्‍याकरीता आधार नाही कारण तिने ग्राहक सेवेतील त्रुटीबाबत म्‍हटले नाही व सदर तक्रार खारीज करण्‍याची मागणी केली.
 
5.          मंचाने तक्रारीतील सर्व पक्षांचा युक्‍तीवाद ऐकला व दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले.
 
-निष्‍कर्ष-
6.          तक्रारकर्तीने वि.प.क्र.1 कडून विमा पॉलिसी घेतल्‍याने व वि.प.क्र.2 कडून गृहकर्ज घेऊन सेवाप्राप्‍त केल्‍यामुळे त्‍यांची ग्राहक ठरतो. वि.प.क्र.2 ने प्राथमिक आक्षेपात म्‍हटले की, त्‍यांना काही कारण नसतांना व त्‍यांचेविरुध्‍दमागणी नसतांना त्‍यांना विरुध्‍द पक्ष केले आहे व सदर बाब Misjoinder या सदरात मोडत असल्‍यामुळे त्‍यांच्‍याविरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍याची मागणी केली. तक्रारीचे संपूर्ण अवलोकन केले असता हे स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्तीने केलेली तक्रार वि.प.क्र. 2 तर्फे विमा दाव्‍याची रक्‍कम ही गृहकर्ज खात्‍यात जमा करण्‍याबाबत आहे. त्‍यामुळे वि.प.क्र. 2 हे सदर तक्रारीत आवश्‍यक पक्षकार आहे असे मंचाचे मत आहे.
 
7.          तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु 27.11.2009 रोजी स्‍कूटी वाहनाने जात असतांना अज्ञात वाहनाने धडक दिल्‍याने झाला व त्‍यांना रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले व उपचारादरम्‍यान 03.12.2009 ला मृत्‍यु झाला. तक्रारीसोबत दाखल एफ.आय.आर. व शव विच्‍छेदन अहवालावरुन मृतकाचा मृत्‍यु हा अपघातात डोक्‍याला जबर मार लागल्‍याने झालेला आहे. वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्तीचा दावा अनुक्रमे पृष्‍ठ क्र. 60 वरील 08.06.2010 चे पत्राद्वारा नाकारला व म्‍हटले की, मृतक अपघाताचेवेळी मद्याच्‍या अधिपत्‍याखाली असल्‍याने तक्रारकर्ती विमा दावा मिळण्‍यास पात्र नाही असे म्‍हटले. सदर तक्रार 18.12.2010 ला दाखल झाल्‍यानंतर व पूरेपूर संधी देऊनसुध्‍दा उत्‍तर दाखल न करता विलंबाने 18.01.2012 ला लेखी म्‍हणणे दाखल केले, त्‍यामुळे तक्रारकर्तीच्‍या विमा दाव्‍याबाबतचे निराकरण होण्‍याच्‍या दृष्‍टीने वि.प.ची अतिशय निराशाजनक वागणूक होती असे मंचास वाटते. वि.प.चे एकमेव म्‍हणणे आहे की, मृतकास मेडीकल कॉलेज व हॉस्‍पीटल येथे भरती करतांनाच्‍या कागदपत्रावर मृतक हा मद्याच्‍या अधिपत्‍याखाली होता, म्‍हणून त्‍यांनी विमा दावा नाकारला आहे व त्‍यामुळेच विमा धारकाचा अपघात होऊन त्‍यात मृत्‍यु झाला असे म्‍हटले. परंतू वि.प.क्र. 1 ने आपले म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ एकही दस्‍तऐवज मंचासमोर दाखल केलेला नाही. वि.प.क्र. 1 ने त्‍यांच्‍या ताब्‍यातील विमा दावा अर्ज व इतर सर्व दस्‍तऐवज दाखल करणे अगत्‍याचे होते. तसेच मेडीकल कॉलेज व हॉस्‍पीटल येथील नोंदी, इन्‍व्‍हेस्‍टीगेटर गोपनीय चौकशी अहवाल इ. आपल्‍या म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ दाखल करणे आवश्‍यक होते. परंतू वि.प.ने ते काही दाखल केले नाही. तसेच ज्‍या मेडीकल कॉलेज व हॉस्‍पीटलच्‍या एडमीशन पेपरमधील नोंदीचा आधार घेऊन वि.प.क्र. 1 ने दावा नाकारला, परंतू तो वस्‍तूनिष्‍ठ दस्‍तऐवज मंचासमोर नसल्‍याने, वि.प.ने नाकारलेला दावा पूर्णतः तथ्‍यहीन ठरतो व मेडीकल कॉलेज व हॉस्‍पीटल दस्‍तऐवजाअभावी शव विच्‍छेदन अहवालाच्‍या परि. क्र. 22 मधील नोंद (डोक्‍याला जबर मार लागल्‍याचा) निष्‍कर्ष निघतो. मंचाचा सुध्‍दा स्‍पष्‍ट निष्‍कर्ष आहे की, अपघाताचे 7 दिवसानंतर शव विच्‍छेदन झाल्‍यामुळे शव विच्‍छेदन अहवालात मद्याबाबतचा उल्‍लेख नाही, हे संयुक्‍तीक नाही. कारण शरीराचे अवयवात काही अंशीतरीही मद्याचे प्रमाण आढळून आले असते. परंतू तसे आढळून आलेले नसल्‍यामुळे शव विच्‍छेदनानंतर शरीराचे अवयव केमीकल एनालिसीसकरीता पाठविण्‍यात आलेले नाही असे मंचाचे मत आहे. मंचाने छत्‍तीसगढ राज्‍य ग्राहक आयोग, रायपूर
 
2008 IV CPR 165 Mrs. Prabha Chandrakar Vs. United India Insurance Co. Ltd. (Chattisgarh State Commission, Raipur)
 
“Where question of determination was whether insured decease was under influence of alcohol, in absence of medical test mere smell of alcohol in breathing could not lead to interfere to the fact.”
 
NCDRC 2008 IV CPR 248, National Insurance Co. Ltd. Vs. Suman Kanwar,
 
“Where insurance company repudiated claim under exclusion clause of company hence burden lies on it to prove that it was only because of consumption of liquor, deceased was unable to keep his balance and failed down from the roof.”
 
वरील दोन्‍ही निकालपत्रे सदर तक्रारीस लागू पडतात, कारण ज्‍या कारणासाठी वि.प.ने तक्रारकर्तीचा दावा नाकारला, ते कारण सिध्‍द करण्‍यास वि.प. पूर्णतः अपयशी ठरले आहे.
 
8.                         पॉलिसीचे कव्‍हर ए अंतर्गत, Death and permanent total disability applicable to the insured person as mention in the cover details, default on loan due to death of insured person on account of misfortune,  death on account of accident or the insured person suffering from permanent disability on account of accident-sum insured (maximum liability) principle outstanding.  त्‍यामुळे पॉलिसीअंतर्गत मुळ कर्जाची principle outstanding रक्‍कम मिळण्‍यास तक्रारकर्ती पात्र आहे असे मंचाचे मत आहे. वि.प.क्र. 2 ने अनुक्रमे पृ.क्र.160 वर नमूद केलेली की.  principle outstanding रक्‍कम ही रु.6,02,383/- अधिक रु.1,05,384/- म्‍हणून एकूण रु.7,07,767/- थकीत आहे. पॉलिसीच्‍या Important note clause 4 नुसार तक्रारकर्ती sum insured रु.6,28,000/- मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. विमा धारकाचा मृत्‍यु 03.12.2009 ला झाल्‍यानंतर व तक्रारकर्तीने विमा दावा दाखल झाल्‍यानंतरसुध्‍दा वि.प.ने 6 महिन्‍यानंतर म्‍हणजे 08.06.2010 ला विलंबाने तक्रारकर्तीचा न्‍यायोचित दावा नाकारला हे वि.प.क्र. 1 चे कृत्‍य आय आर डी ए च्‍या नियमाचे स्‍पष्‍ट उल्‍लंघन असून वि.प.च्‍या सेवेत गंभीर स्‍वरुपाची त्रुटी आहे, त्‍यामुळे तक्रारकर्ती रु.6,28,000/- विमा रकमेवर 12 टक्‍के व्‍याजासह परत करणे संयुक्‍तीक होईल असे मंचाचे मत आहे. तसेच तक्रारीचा खर्च म्‍हणून रु.3,000/- द्यावे. म्‍हणून खालील आदेश.
 
आदेश-
 
1)                  तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत असून, वि.प.क्र. 1 ला आदेश      देण्‍यात येतो की, त्‍यांनी विमा रक्‍कम रु.6,28,000/- पॉलिसी धारकाचे मृत्‍यु          दि.03.12.2009 पासून द.सा.द.शे. 12 टक्‍केने येणारी रक्‍कम वि.प.क्र. 2 कडील     कर्ज खाते क्र. LAN-LBNAG00001008902  मध्‍ये परस्‍पर जमा करावी.
2)                  वि.प.क्र. 1 ला आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारीच्‍या खर्चाबाबत तक्रारकर्तीला           रु.3,000/- द्यावे.
3)                  वि.प.क्र. 2 विरुध्‍द कोणतेही आदेश नाही.
4)                  सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 1 ने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून      
      30 दिवसाचे आत करावी.
         
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.