Maharashtra

Nagpur

CC/137/2017

Shri Gajanan Sadashiv Kawale - Complainant(s)

Versus

ICICI Lombard General Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv. Vidhya Chobhe

08 Jun 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/137/2017
( Date of Filing : 04 Mar 2017 )
 
1. Shri Gajanan Sadashiv Kawale
R/o. Plot No. 19, Gittikhadan Layout, Pratap Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. ICICI Lombard General Insurance Co.Ltd.
Office- ICICI Lombard House, 414, Veer Sawarkar Marg, Near Diddivinayak Temple, Prabhadevi, Mumbai 400 025
Mumbai
Maharashtra
2. ICICI Lombard General Insurance Co.Ltd.
Office- Big Bazar on 5th floor, Ramdaspeth, Wardha Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:Adv. Vidhya Chobhe, Advocate for the Complainant 1
 Sachin Jaiswal, Advocate for the Opp. Party 1
Dated : 08 Jun 2020
Final Order / Judgement

 

                          आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की,  त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून त्‍याचे  वापरात असलेले वाहन क्रं. एम.एच.31 ई.के.8153 या वाहनाचा दि. 30.12.2016 ते 29.12.2017 च्‍या रात्री 12.00 वाजतापर्यंतच्‍या कालावधीकरिता Zero Depreciation अंतर्गत  विमा पॉलिसी क्रं. 3001/ MI-0435093/00/000 काढली होती.  तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचे दि. 05.01.2017 रोजी नागपूर सोनेगांव विमानतळाजवळ अपघात झाल्‍याने ते क्षतिग्रस्‍त झाले. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वाहन दि. 17.01.2017 ला मारोती वर्कशॉप एम.आय.डी.सी. यांच्‍याकडे दुरुस्‍तीकरिता टाकले व दि. 20.01.2017 ला विरुध्‍द पक्ष कंपनीच्‍या सर्व्‍हेअरने वाहनाची तपासणी केली आणि सदरचा तपासणी अहवाल कंपनीकडे सादर केला.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने मारोती वर्कशॉप एम.आय.डी.सी.नागपूर यांनी दिलेले कार दुरुस्‍तीचे एकूण रुपये 1,16,134.69 इतक्‍या रक्‍कमेचे सर्विस इस्‍टीमेट (अंदाजे खर्च विवरण) विरुध्‍द पक्षाला पाठविले असतांना ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या  वाहनाचे दुरुस्‍ती बिलास मंजुरी दिली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे वाहन मारोती वर्कशॉप एम.आय.डी.सी. नागपूर यांच्‍याकडेच पडून राहिले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या क्षतिग्रस्‍त वाहन दुरुस्‍तीचा विमा दावा म्‍हणून रक्‍कम रुपये 18,013/- एवढी मंजूर करुन ती मारोती वर्कशॉप एम.आय.डी.सी.नागपूर यांना अदा केली. तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून सदरच्‍या क्षतिग्रस्‍त वाहनाचा विमा Zero Depreciation या तत्‍वावर काढला होता. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची वाहनाची दुरुस्‍त पोटी खर्च केलेली रक्‍कम रुपये 1,16,134.69 मंजूर न करता तक्रारकर्त्‍या प्रति त्रुटीपूर्ण सेवा दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दि. 03.02.2017 ला कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या नोटीसची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की,  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या मागणीप्रमाणे रुपये 1,70,121.69 इतकी रक्‍कम अदा करावी व त्‍यावर द.सा.द.शे. 12 टक्‍के दराने व्‍याज द्यावे. तसेच रुपये 1,000/- प्रमाणे खर्च तक्रार दाखल तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावे. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई देण्‍याचा ही आदेश व्‍हावा.
  3.      विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याचे वाहन विरुध्‍द पक्ष कंपनीकडे प्रायव्‍हेट कार पॅकेज अंतर्गत विमा पॉलिसी क्रं. 3001/ MI-0435093/00/000 अन्‍वये दि. 30.12.2016 ते 29.12.2017 च्‍या रात्री 12.00 वाजतापर्यंतच्‍या कालावधीकरिता  Zero Depreciation अंतर्गत विमाकृत केले होते. विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या वाहनाचा अपघात झाल्‍याबाबतची सूचना विरुध्‍द पक्षाला दिली नव्‍हती. तसेच त्‍याचे क्षतिग्रस्‍त वाहन क्रं. एम.एच.31 ई.के.8153 हे दुरुस्‍तीकरिता मारोती वर्कशॉप येथे पाठविले असल्‍याची सुध्‍दा माहिती दिली नाही. वि.प.ने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे विमा दावा सादर केलेला नाहीत. तसेच विरुध्‍द पक्षाने सर्वेअरची नेमणूक केल्‍याचे ही नाकारलेले आहे. तसेच वाहनाचे Assessment Of Loss सादर केल्‍याचे ही नाकारले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाच्‍या दुरुस्‍तीकरिता मान्‍यता दिल्‍याचे ही नाकारलेले आहे.  विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याच्‍या निष्‍काळजीपणामुळे तक्रारकर्त्‍याचे वाहन दुरुस्‍त करण्‍यात आले नाही. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कुठल्‍याही प्रकारची त्रुटीपूर्ण सेवा दिलेली नाही. म्‍हणून प्रस्‍तुत तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी मागणी केलेली आहे. 

 

  1.        उभय पक्षाने दाखल केलेले दस्‍तऐवज व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

मुद्दे                    उत्‍तर

 

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ            होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला कायॽ           होय

 

  1. काय आदेश ॽ                             अंतिम आदेशाप्रमाणे

  निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1, 2 व 3 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून  वाहन क्रं. एम.एच.31 ई.के.8153 या वाहनाचा दि. 30.12.2016 ते 29.12.2017 च्‍या रात्री 12.00 वाजतापर्यंतच्‍या कालावधीकरिता  Zero Depreciation अंतर्गत विमा पॉलिसी क्रं. 3001/ MI-0435093/00/000  ही काढली होती. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचा दि. 05.01.2017 रोजी नागपूर सोनेगांव विमानतळाजवळ अपघात झाल्‍याबाबतची सूचना विरुध्‍द पक्ष कंपनीला दिली होती. नि.क्रं. 13(8) वर दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, विरुध्‍द पक्षाने श्री. निखील अंबोने याची सर्वेअर म्‍हणून नेमणूक केली होती व त्‍यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या क्षतिग्रस्‍त वाहनाचा तपासणी अहवाल (Assessment) दि. 15.02.2017 ला विरुध्‍द पक्षाकडे सादर केला होता. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या विमाकृत वाहनाची सर्व्‍हेअरकडून तपासणी केल्‍यावर आय.आर.डी.ए. नियमानुसार त्‍याबाबतचा तपासणी अहवाल तक्रारकर्त्‍याला देणे बंधनकारक होते, परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सदरचा अहवाल पुरविला नाही. तसेच तकारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे पाठविलेले क्षतिग्रस्‍त वाहनाच्‍या दुरुस्‍तीच्‍या अंदाजे देयकाला मंजुरी दिली नाही किंवा त्‍याबाबत काहीही लेखी कळविले नाही. तक्रारकत्‍याने त्‍याचे क्षतिग्रस्‍त वाहनाच्‍या दुरुस्‍तीकरिता रुपये 1,16,134.69 एवढा अंदाजे खर्च असल्‍याचे विवरण सादर केले होते. तसेच तक्रारकर्त्‍याचे वाहन हे Zero Depreciation अंतर्गत विमाकृत केले असतांना सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या क्षतिग्रस्‍त वाहनाच्‍या दुरुस्‍ती पोटी केवळ रुपये 18,013/- एवढी विमा दावा रक्‍कम मंजूर केली ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. म्‍हणून तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाकडून क्षतिग्रस्‍त वाहनाची नुकसानभरपाई मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या नि.क्रं. 13 वर दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावर कुठलेही आक्षेप नोंदविलेले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर करणे योग्‍य व वाजवी असल्‍याचे मंचाचे मत आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला वाहन दुरुस्‍ती पोटी अदा केलेली विमा रक्‍कम रुपये 18,013/-  देय रक्‍कमेत समयोजित करुन उर्वरित रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करण्‍याचे आदेशित करण्‍यात येते.

                सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला

विमा दाव्‍या पोटी रक्‍कम रुपये 98,122/- अदा करावे व सदर रक्‍कमेवर दि. 23.02.2017 पासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा करावी.

 

  1. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व  तक्रारीचा खर्च म्‍हणून  रुपये 10,000/- द्यावा.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.