(मंचाचा निर्णय: श्री विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 12/01/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्यानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 28.06.2010 रोजी दाखल केली असुन तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार त्याचे वाहन चोरीला गेल्यासंबंधीची आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीव्दारे विम्याची रक्कम रु.29,400/- व व्याज, मानसिक त्रासाबद्दल रु.10,000/-, नोटीसचे रु.1,000/- व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.7,000/- मिळण्याबाबत तक्रारीत नमुद केले आहे 2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना बजावण्यांत आली असता, त्यांना नोटीस मिळाल्यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्यांनी आपले लेखी उत्तर खालिल प्रमाणे दाखल केलेले आहे. 3. गैरअर्जदारांचे म्हणणे असे आहे की, पॉलिसी दिल्या पासुन 10 दिवसांतच वाहनाची चोरी झाली आहे, त्यामुळे सदर दावा ‘अर्ली क्लेम’ या सदरात येतो. तसेच आधीच्या पॉलिसीची प्रत, पोलिस स्टेशनला आणि विमा कंपनीला सुचना देण्यास उशिर का झाला याचे कारण आणि अनट्रेस रिपोर्ट याची माहिती व दस्तावेज तक्रारकर्त्याला मागितली ती प्राप्त झाली नसुन अद्यापही सदर दस्तावेज दाखल केल्यास ते तक्रारकर्त्याचा दावा निकाली काढण्यास तयार असल्याचे नमुद केले आहे. 4. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांचे जबाबला व म्हणण्याला खोडून काढले नाही त्यामुळे या संबधाने मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार निकाली काढण्यांत येते. 2. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांनी मागितलेले वरील दस्तावेज त्वरीत द्यावे. गैरअर्जदारांनी त्यांना याव्यतिरिक्त अवास्तव दस्तावेजांची मागणी करु नये व माहिती मिळाल्याचे तारखे पासुन 30 दिवसांचे आत तक्रारकर्त्याचा विमा दावा निकाली काढावा. 3. तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सोसावा.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |