Maharashtra

Nagpur

CC/10/64

Dr. Sau. Sindhu Milind Ganvir - Complainant(s)

Versus

ICICI Lombard General Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv. R.R.Ganvir

03 Sep 2010

ORDER


DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR.District Consumer Forum, 5th Floor, New Administrative Building, Civil Lines, Nagpur-440 001
Complaint Case No. CC/10/64
1. Dr. Sau. Sindhu Milind GanvirPlot No. 352, Empress Mill colony, Ring Road, Shrinagar, NagpurMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. ICICI Lombard General Insurance Co.Ltd.Shriram Towers, Kingsway, NagpurMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. MILIND KEDAR ,PRESIDING MEMBER
PRESENT :Adv. R.R.Ganvir, Advocate for Complainant

Dated : 03 Sep 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

(मंचाचा निर्णय: श्री. रामलाल सोमाणी- अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये)
                        -// आ दे श //-
                         (पारित दिनांक : 03/09/2010)
 
1.           प्रस्‍तुत तक्रार ही तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्‍द मंचात दिनांक 20.01.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.          प्रस्‍तुत तक्रारीत तक्रारकर्तीने नमुद केले आहे की, तिचेकडे स्‍वमालकीची टोयाटो मॉडेल कोरोला एच-5, रंग शॅम्‍पेन माईका, कारचे आर.टी.ओ. रजिस्‍ट्रेशन नं.एमएच-31, सीएन-5851 आहे. प्रस्‍तुत कार ही सन 2006 मधील उत्‍पादीत असुन चेसिस नं.22E1226830489  व इंजिन नं. 1222576020 आहे. सदर कारचा विमा गैरअर्जदार कंपनीकडे उतरविला असुन त्‍याची वैधता दि.15/05/2009 ते 14/05/2010 पर्यंत असल्‍याचे नमुद केलेले आहे.
 
3.          तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रारीत तिचे कारला दि.10/10/2009 रोजी नागपूर चंद्रपूर मार्गावर खैरी (बोरखेडी) गावाजवळ अपघात होऊन कारचे बरेच नुकसान झाल्‍याचे नमुद केले आहे. सदर कार मेसर्स ग्रेस टोयाटो, कामठी रोड, नागपूर येथे दुरुस्‍ती करीता दिली असुन अपघाताबाबतची सुचना गैरअर्जदार विमा कंपनीला देऊन झालेल्‍या खर्च मिळण्‍याकरता विमा दावा दाखल केला. गैरअर्जदारांचे सर्वेअरने दि.26.11.2009 रोजी प्रत्‍यक्ष भेट दिली असता तक्रारकर्तीला कारची क्षतिपुर्ती मिळणार नाही असे मौखिकरित्‍या सांगितल्‍याचे नमुद केले आहे.
 
4.          तक्रारकर्तीने पुढे नमुद केले आहे की, ती शासकीय दंत महाविद्यालयात वरिष्‍ठ प्राध्‍यापिका व प्रमुख या पदावर कार्यरत असुन नोकरीवर जाणे आवश्‍यक असल्‍यामुळे तिने कारच्‍या दुरुस्‍तीचा आलेला खर्च रु.1,14,050/- स्‍वतः दिला. तसेच विमा कंपनीकडे विमा उतरवुन सुध्‍दा विमादावा अनेकदा लीखीत अथवा मौखिकरित्‍या विनंती करुनही हेतुपुरस्‍सरपणे टाळाटाळ करीत असल्‍याचे म्‍हटले आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार मंचात दाखल करुन कारच्‍या दुरुस्‍तीवर झालेला क्षतीपुर्तीचा खर्च रु.1,14,050/- ची मागणी केलेली असुन मानसिक त्रासाबद्दल रु.1,00,000/- व तक्रारीच्‍या खर्चाबद्दल रु.10,000/- मिळण्‍याबाबत मंचास विनंती केलेली आहे.
 
5.          प्रस्‍तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारावंर नोटीस बजावण्‍यांत आली असता, त्‍यांना नोटीस मिळाल्‍यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्‍यांनी आपले लेखी उत्‍तर खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे.
6.          गैरअर्जदारांनी आपल्‍या लेखी उत्‍तरात, त्‍यांनी तक्रारकर्तीचे कारचा विमा, विमा कायदा 1938 च्‍या कलम 64 व्‍हीबी ची पुष्‍टी केल्‍यानंतर “Private Car Package Policy” क्र. 3001/5670719/00/000 निर्गमीत केल्‍याचे नमुद केले आहे. गैरअर्जदारांनी पुढे नमुद केले आहे की, पॉलिसी अंतर्गत संयुक्तिक असलेला कोणताही दावा विमाधारकाने दाव्‍याच्‍या पृष्‍ठयर्थ आवश्‍यक संपूर्ण कागदपत्रे व माहिती पुरविणे गरजेचे आहे. तसेच गैरअर्जदार तक्रारकर्तीचा विमा दावा जाणूनबुजून टाळत आहेत व फसवणुक करीत आहेत असे तक्रारकर्तीचे म्‍हणने अमान्‍य केले आहे.
 
7.          गैरअर्जदारांनी आपल्‍या उत्‍तरात पुढे नमुद केले आहे की, त्‍यांचे सर्वेअर श्री. मिलींद बेल्‍हेकर, यांनी क्षतिग्रस्‍त कारची तपासणी व निरीक्षण केल्‍यानंतर रु.63,070/- इतक्‍या रकमेचे मुल्‍यांकन केलेले आहे. तसेच तक्रारकर्तीला दाव्‍यासंबंधी आवश्‍यक कागदपत्रे पुरविण्‍याविषयी सुचित केले असता तिने ती कागदपत्रे पुरविण्‍यात व सहकार्य देण्‍यांत अपयशी ठरली असुन उपलब्‍ध कागदपत्रांच्‍या आधारे तक्रारकर्तीने जुन्‍या पॉलिसी व दाव्‍यासंबंधी वस्‍तुस्थिती लपवुन विमा पॉलिसी घेतल्‍याचे निदर्शनास आले. तसेच तक्रारकर्तीचा दावा हा रितसर छाननी, पडताळणी व तपासणी करुन खारिज केला होता त्‍यामुळे त्‍यांचे वतीने कोणतीही सेतेत तुटी नसुन ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या तरतुदींच्‍या कक्षेबाहेर असल्‍याचे नमुद केले आहे. तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायद्याचा दुरुपयोग करुन व महत्‍वपूर्ण वस्‍तुस्थिती लपवुन बेकायदेशिर लाभ मिळविण्‍याच्‍या उद्देशाने प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असल्‍यामुळे ती खर्चासह खारिज होण्‍यांस पात्र आहे, अशी गैरअर्जदारांनी मंचास विनंती केलेली आहे.
 
 8.                    प्रस्‍तुत प्रकरणात गैरअर्जदारांनी खालिल प्रमाणे सर्वोच्‍च न्‍यायालयाचे व राष्‍ट्रीय आयोगाचे न्‍याय निवाडे दाखल करुन आपली भिस्‍त ठेवली आहे.
 
      1.         2007 AIR SCW-7179 SC P.J. Chacko –v/s- Chairman, LIC.
            2.         2009 AIR SCW-3856 SC Vikram –v/s- New India Ass.Co. Ltd.
            3.         2009 NCJ-931 N.C. United India Ins. Co. Ltd. –v/s- V.C. Deendayal.
            4.         2009 NCJ-933 N.C. New India Ass.Co. Ltd. –v/s- New Good Luck.
            5.         2009 NCJ-246 N.C. New India Ass.Co.Ltd. –v/s- L. Subhash Chandra.
                       
9.          प्रस्‍तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि. 04.08.2010   रोजी आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांचे तर्फे वकील हजर.उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल न्‍याय निवाडयांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षांप्रत पोहचले.
 
 
 
 
 
-// नि ष्‍क र्ष //-
 
10.         तक्रारकर्तीने आपला लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे आणि त्‍यात गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीच्‍या वाहनाचे सर्वे केल्‍याचे नमुद केले आहे. सदर सर्वेअरने कोणतेही प्रतिज्ञा लेख प्रकरणात दाखल केले नाही. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याचा विमा दावा काल्‍पनिक कारणामुळे ना-मंजूर केलेला आहे. कारण तक्रारकर्तीच्‍या वाहनाला पुर्विची पॉलिसी प्रलंबीत असल्‍या दरम्‍यान अपघात झाला होता आणि सदर अपघात झालेल्‍या नुकसानीचा दावा त्‍या विमा कंपनीने तक्रारकर्तीला दिला नव्‍हता. आणि त्‍या दरम्‍यान नवीन पॉलिसी घेणे आवश्‍यक होते म्‍हणून जुन्‍या पॉलिसी अंतर्गत दावा निकाली न काढल्‍या गेल्‍यामुळे व तो तक्रारकर्तीला न मिळाल्‍यामुळे त्‍याबद्दल माहिती नवीन विमा काढतांना गैरअर्जदारांकडे दिली नव्‍हती, त्‍यात तक्रारकर्तीने कोणताही वाईट हेतु नव्‍हता. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला 25% “No Claim Bonus” दिलेला आहे याबद्दल वाद नाही.
 
11.          वरील विवेचनावरुन मंचाचे असे स्‍पष्‍ट मत आहे की, तक्रारकर्तीने गैरअर्जदारांकडून कोणतीही माहिती जाणून-बुजून लपविली नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
12.         तक्रारकर्तीने तिचे वाहनाला झालेल्‍या एकूण खर्चापोटी रु.1,14,0505/- एवढी रक्‍कम वाहन दुरुस्‍ती करणा-या ग्रेस ऑटो इंडिया यांना चुकती केलेली आहे, असे तक्रारीत नमुद केले आहे. तक्रारकर्तीने दस्‍तावेज क्र.19 ते 21 दाखल केलेले आहेत यावरुन असे स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्तीचे वाहनाला रु.1,14,050/- जो दुरुस्‍तीचा खर्च आलेला आहे ती रक्‍कम चुकती केलेली आहे. पॉलिसी वैध असतांना तक्रारकर्तीला विमा दाव्‍याची रक्‍कम मिळालेली नाही असा तिने आक्षेप घेतलेला आहे. गैरअर्जदारांनी नमुद केले आहे की, तक्रारकर्तीने महत्‍वाची माहिती गैरअर्जदारांपासुन लपविली आहे. आपल्‍या भिस्‍त असलेल्‍या निवाडयांवर भर देत नमुद केले आहे की, तक्रारकर्तीने चुकीच्‍या मार्गाने “No Claim Bonus”मिळविलेला आहे. तसेच सर्वेअरचा महत्‍वाचा दस्‍तावेज असतो आणि तो ग्राह्य धरण्‍यांत यावा असे उपरोक्‍त निवाडयात नमुद आहे, म्‍हणून तक्रारकर्तीची तक्रार खारिज करावी.
 
13.         मंचाचे असे स्‍पष्‍ट मत आहे की, तक्रारकर्तीच्‍या कथनावरुन तक्रारकर्तीला विमा कंपनीकडून विमा दावा मिळाला नाही आणि त्‍या दरम्‍यान नवीन पॉलिसी काढण्‍यांत आलेली आहे. म्‍हणून मंचाचे असे स्‍पष्‍ट मत आहे की, तक्रारकर्तीने गैरअर्जदारांकडून कोणतीही माहिती लपविलेली नाही आणि म्‍हणून वरील निवाडे या प्रकरणाला पूर्णपणे लागू होत नाही, आणि म्‍हणून तक्रारकर्तीने कोणती माहिती हेतुपुरस्‍सर लपविलेली नाही असे मंचाचे मत आहे आणि म्‍हणून गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीचा दावा फेटाळून तिला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.
 
14.         गैरअर्जदारांनी मंचासमक्ष नमुद केले आहे की, त्‍यांनी सर्वेअर नियुक्‍त केलेला आहे आणि अपघातग्रस्‍त वाहन हे 2006 मध्‍ये खरेदी केलेले आहे. आणि म्‍हणून त्‍याला घसारा (Depreciation) लागू होतो. आणि त्‍यावरुन सर्वेअरने वाहनाला झालेल्‍या नुकसानीचे आकलन रु.63,070/- एवढेच केले आहे. सदर वाहनाचा केलेला सर्वे हा योग्‍य व अधिकृत व्‍यक्तिने केलेला आहे. मंचासमक्ष सर्वेअर रिपोर्ट तसेच प्रतिज्ञा लेख दाखल नाही, परंतु रु.63,070/- च्‍या नुकसान भरपाईच्‍या आकलनाचा सर्वेअर अहवाल प्रकरणात दाखल असुन त्‍यावरुन तक्रारकर्तीला अपघातग्रस्‍त वाहनासाठी खर्च करावा लागलेला आहे असे स्‍पष्‍ट होते.
 
15.         सर्वेअरने आकलन केलेली रक्‍कम ही घसारा वजा केल्‍यानंतरचीच आहे असे अहवालावरुन स्‍पष्‍ट होते, परंतु महत्‍वपूर्ण माहिती दडवली या कारणास्‍तव तक्रारकर्तीला आकलन केलेली रक्‍कम दिलेली नाही असे एकंदरीत कागदपत्रांवरुन स्‍पष्‍ट होते. मंचाचे मते गैरअर्जदारांनी चुकीचे कारण देऊन तक्रारकर्तीचा रास्‍त विमा दावा ना-मंजूर केलेला आहे. तक्रारकर्तीने मंचासमक्ष नमुद केले आहे की, तिने वाहनाच्‍या दुरुस्‍तीची रक्‍कम चुकती केलेली आहे आणि तक्रारकर्तीच्‍या वाहनाला खरोखरच नुकसान झालेले आहे आणि तिने कोणतीही माहिती दडवलेली नाही म्‍हणून ती सदर रक्‍कम मिळण्‍यांस पात्र आहे. मंचाचे मते तक्रारकर्तीचा दावा रास्‍त असुन गैरअर्जदारांची कृती ही दोषपूर्ण सेवा आहे.
 
16.         मंचाचे असे स्‍पष्‍ट मत आहे गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे आणि म्‍हणून वरील विवेचनावरुन मंचाचे असे स्‍पष्‍ट मत झाले आहे की, तक्रारकर्तीचा रास्‍त विमा दावा फेटाळल्‍यामुळे तिला मानसिक त्रास झालेला आहे आणि म्‍हणून तिला प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करावी लागली. म्‍हणून तक्रारकर्ती गैरअर्जदारांकडून विमा दाव्‍या अंतर्गत नुकसान भरपाईची रक्‍कम तसेच तक्रारीचा खर्च मिळण्‍यांस पात्र आहे. करीता मंचा खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
 
-// अं ति म आ दे श //-
 
1.     तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीचे अपघातग्रस्‍त वाहन क्र.एमएच-31/सीएन-5851 चा योग्‍य         व रास्‍त विमा दावा चुकीचे कारण देऊन फेटाळून दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.
3.    गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला सर्वेअरने आकलन केल्‍यानुसार रु.63,070/- विमा  दावा
            फेटाळल्‍याचे दिनांकापासुन संपूर्ण रक्‍कम चुकती होईपर्यंत द.सा.द.शे. 9%       व्‍याजासह द्यावे.
4.    गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- अदा करावे.
5.    गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
6.    उपरोक्‍त आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन 30 
            दिवसांचे आंत करावी. अन्‍यथा उपरोक्‍त रकमेवरील देय आदेशीत व्‍याज द.सा.द.शे. 9%
            ऐवजी द.सा.द.शे. 12% राहील याची गैरअर्जदारांनी नोंद घ्‍यावी.
7.    तक्रारकर्तीने मा. सदस्‍यांकरीता दाखल केलेल्‍या (ब,क) प्रति 1 महिन्‍याच्‍या आंत  घेऊन जाव्‍यात. अन्‍यथा 20(5) Consumer Protection Regulation 2005 अन्‍वये नष्‍ट करण्‍यांत येईल.
 
 
 
      (मिलींद केदार)                                  (रामलाल सोमाणी)
         सदस्‍य                                         अध्‍यक्ष
     
 
 
 
 
 
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] PRESIDING MEMBER