Maharashtra

Kolhapur

CC/13/79

Smt. Shantabai Bhimrao More - Complainant(s)

Versus

ICICI Lombard General Insurance Co.Ltd., through Local Branch Manager, - Opp.Party(s)

S.M.Potdar

31 Dec 2013

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, South Side, Second Floor,
Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. 0231-2651327, Fax No. 0231-2651127
Email- confo-ko-mh@nic.in, Website- www.confonet.nic.in
 
Complaint Case No. CC/13/79
 
1. Smt. Shantabai Bhimrao More
Ambawade, Tal.Panhala
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. ICICI Lombard General Insurance Co.Ltd., through Local Branch Manager,
Hall No.G-2, Omkar Plaza, C.S.N.1082/1, Near ICICI Bank, Bagal Chowk, Kolhapur
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Sanjay P. Borwal PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
PRESENT:
Adv.S.M.Potdar for Complainant
......for the Complainant
 
Adv. P.B. Gurav for O.P.
......for the Opp. Party
ORDER

नि का ल प त्र:- (द्वारा- (मा. सदस्‍य, श्री. दिनेश एस. गवळी) (दि .31-12-2013) 

(1)     प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज तक्रारदार यांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 12 अन्‍वये वि.प. विमा कंपनी  आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि., यांनी सेवेत त्रुटी ठेवलेमुळे नुकसानभरपाई मिळणेसाठी दाखल केला आहे.

      प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला.  वि. प. वकिलामार्फत  मंचापुढे उपस्थित राहून त्‍यांनी म्‍हणणे दाखल केले.  उभय पक्षकारांचे वकिलांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केले. 

(2)   तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की,

     तक्रारदार यांचे मयत पती भिमराव ज्ञानू मोरे हे शेतकरी होते.  तक्रारदार यांचे पतीचा  वि.प. विमा कंपनी यांचेकडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत  विमा उतरविला आहे.  सदर पॉलिसीच्‍या कालावधीतच दि. 01-06-2005 रोजी तक्रारदाराचे पती भिमराव ज्ञानू मोरे यांचा गोवा येथे वाहन अपघातामध्‍ये मृत्‍यू झालेला आहे. त्‍यानंतर तक्रारदारांनी आवश्‍यक त्‍या सर्व कागदपत्रांसह तहसिलदार कार्यालयामध्‍ये क्‍लेमफॉर्म जमा केला तो तहसिलदार कार्यालयाकडून दि. 15-12-2005 रोजी वि. प. विमा कंपनी यांचेकडे पाठविणेत आलेला आहे.   उर्वरीत सर्व कागदपत्रे दि. 04-04-2007 रोजी जमा केलेले आहेत.  तक्रारदारांनी  न्‍यायोग्‍य क्‍लेमची रक्‍कम रु. 1,00,000/- वि.प. यांचेकडे मागणी केली तथापि वि.प. यांनी सदर क्‍लेमबाबत कोणताही निर्णय तक्रारदारास कळविलेला नाही.  वि.प. कंपनी  यांनी कंपनीचे मुंबई कार्यालयाकडे दावा प्रलंबित असल्‍याचे कळवून त्‍यांचेकडे चौकशी करणेचे सांगणेत आले.  वि.प. यांनी तक्रारदारास विमा क्‍लेमबाबत कोणतेही उत्‍तर न दिलेने तक्रारीस सततचे कारण घडत आहे. सबब, तक्रारदारांनी  वि.प. कडून विमा क्‍लेमची रक्‍कम रु. 1,00,000/- दि. 01-09-2005 पासून द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासहीत व्‍याजासह मिळावेत व तक्रारदारांना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 3,000/- वि.प. कंपनीकडून वसुल होऊन मिळणेसाठी तक्रारदारांनी विनंती केली आहे.             

(3)  तक्रार अर्जासोबत तक्रारदाराने यादीसोबत वि.प. ला पाठविलेली वकील नोटीस दि. 16-12-2013, व नोटीस स्विकारलेबाबत पोस्‍टाची पोहोच, तक्रारदारांचे पतीचे नावचा 7/12 चा उतारा , गाव नमुना  नं. 6 – वारसा नोंदवही दि. 30-11-2009,   गाव नमुना नं. 8 अ जमीनीचे खातेवही दि. 30-11-2009, तलाठयाचे प्रमाणपत्र दि. 08-11-2009, Opinion as to cause of death date 2-06-2005, शव ताब्‍यात घेणेकरिता पोंडा- गोवा पोलिसांनी दिलेली N.O.C.  दि. 2-06-2005, शव ताब्‍यात मिळाल्‍याची पोहोच दि. 2-06-2005, मृत्‍यू दाखला दि. 05-10-2005, तहसिलदार ऑफीसमार्फत वि.प. यांना तक्रारदाराचा प्रस्‍ताव पाठविणेत आलेबाबत तहसिलदारांकडून मिळालेली जावक यादी दि.15-12-2005,  दि. 09-04-2007 रोजी तक्रारदाराने तहसिल ऑफीसमार्फत प्रस्‍ताव पुन्‍हा पाठविण्‍यात आलेबाबत जावक यादी  इत्‍यादी कागदपत्र दाखल केले आहेत.  तक्रारदार यांनी दि. 30-12-2013 रोजी  लेखी युक्‍तीवादासोबत क्‍लेम फॉर्मसोबत देणेत आलेला गोवा मेडिकल, कॉलेज यांचा मेमोरडन्‍म ऑफ अॅटोसपी दाखला व मा. राज्‍य आयोग यांचेकडील न्‍यायनिवाडे,Cervical Spine Fracture बाबत मेडीकल लिटरेचर इत्‍यादी कागदपत्र दाखल केली आहेत. तसेच तक्रारदारांचे पुराव्‍याचे शपथपत्र दि. 3-12-2013 रोजी दाखल केले.

(4)   विमा कंपनी यांनी दि. 26-08-2013 रोजी म्‍हणणे दाखल केले असून त्‍यांनी त्‍यामध्‍ये तक्रारदारांची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे. तक्रारदाराची तक्रार खोटी, चुकीची, काल्‍पनीक स्‍वरुपाची असून तक्रारदारांनी  तथाकथित अपघात पुराव्‍यानिशी शाबीत करावा.  अपघाताचे  अनुषंगाने कोणतीही  पोलिस कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. तक्रारदारांची क्‍लेम फॉर्म  आजतागायत  विमा कंपनी प्राप्‍त झाला नसलेने  वि.प. विमा कंपनी क्‍लेम अजून नाकारलेला नाही.  त्‍याकारणे सदरची तक्रार दाखल करणेस कोणतेही(Cause of Action) घडले नाही.  तथाकथित अपघात दि. 1-06-2005 रोजी घडलेला असून .  सदरची तक्रार सन 2013 मध्‍ये दाखल केली असलेने सदरच्‍या तक्रारीस ग्राहक सरंक्षण कायदा,1986 कलम 24-ए प्रमाणे मुदतीची बाधा येते.  तसेच तक्रारदारांनी विलंब  माफीचा अर्ज दाखल न केलेने तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी.  पॉलिसीमधील अटीप्रमाणे सदरच्‍या अपघाताची कल्‍पना तक्रारदारांनी 1 महिनेचे आत वि.प. विमा कंपनी अटीप्रमाणे न दिलेने तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी.  तक्रारदारांचा क्‍लेमफॉर्म  वि.प. कंपनीस प्रापत न झालेने  वि.प. विमा कंपनी यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही.  तक्रारदारांनी योग्‍य ती कागदपत्र मुदतीत दाखल न केलेने तसेच तक्रारीस कारण 2005 साली घडले असलेने व तक्रार 2013 साली दखल केली असलेने सदरच्‍या तक्रारीस  मुदतीची बाधा येते. सबब, तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी.             

(5)    तक्रार अर्ज, दाखल म्‍हणणे व उभय पक्षकांरानी दाखल केलेले लेखी युक्‍तीवाद व तोंडी युक्‍तीवाद ऐकला असता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. 

               मुद्दे                                        उत्‍तरे                      

1.  तक्रारदारांनी तक्रार मुदतीत दाखल केली आहे काय ?             --होय.  

2.  वि.प. विमा कंपनीने  तक्रारदारांना द्यावयाच्‍या

    सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?                                --- होय.

3.   तक्रारदार विमा रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?             --- होय‍

4.   तक्रारदार हे मानसिक व शारिरीक त्रासापोटी

     नुकसानभरपाईची रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?           --- होय‍.

5.   आदेश काय ?                               -----   अंतिम निर्णयाप्रमाणे. 

                            

कारणमीमांसा:-

मुद्दा क्र.1:    

     प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराचे पतीचे दि. 1-06-2005 रोजी अपघात होऊन मृत्‍यू झाला आहे.  तदनंतर तक्रारदारांनी वि.प. यांचेकडे क्‍लेम फॉर्म जमा केले तथापि, वि.प. यांनी तक्रारदारांनी पुन्‍हा कागदपत्रांची मागणी केलेने दि. 30-06-2007 रोजी वि.प. यांना शासकीय ऑफीसमार्फत कागदपत्रे पाठविली तथापि,  वि.प. यांनी आतापावेतो सदर क्‍लेमबाबत कोणतेही उत्‍तर तक्रारदारांना  दिलेले नाही.   त्‍यामुळे सदर तक्रारीस सततचे कारण (continuous cause of action) चे कारण घडले आहे.  तसेच  दि. 16-02-2013 रोजी तक्रारदारांचे वकिलांकडे नोटीस पाठवून विचारणा केली.  सदरची नोटीस वि. प. ना प्राप्‍त होवून देखील त्‍यांनी त्‍यास उत्‍तर दिलेले नाही असे कारण देवून तक्रारदाराची सदरची तक्रार या मंचात क्‍लेम नुकसानभरपाई मिळणेकरिता दाखल केली आहे.  वि.प. यांनी दाखल केलेले म्‍हणणेमध्‍ये तक्रारदाराचे पतीचा अपघात हा दि. 1-06-2005 रोजी झालेला आहे व सदरची तक्रार 2013 मध्‍ये दाखल केलेली आहे.  त्‍यामुळे ग्राहक सरंक्षण कायदा कलम 24-() प्रमाणे मुदतीची बाधा येते असे म्‍हणणे दाखल केले आहे.  त्‍याचप्रमाणे वि.प. यांनी दाखल केलेले युक्‍तीवादामध्‍ये तक्रारदाराची प्रस्‍तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायदयाचे कलम 24-()प्रमाणे मुदतीत दाखल नाही.  परिणामी तक्रार चालणेस पात्र नाही असा युक्‍तीवाद दाखल केला आहे.  सबब, तक्रारदारांनी तक्रार मुदतीत दाखल केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  त्‍याअनुषंगाने  या  मंचाने तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत दाखल केलेले अ.क्र. 11 कडील  तहसिलदार, पन्‍हाळा यांचेकडील जावक यादी पाहिला असता त्‍यामध्‍ये अ.क्र. 15 कडे भिमराव ज्ञानू मोरे यांचे नावाची नोंद असून आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि. ची नोंद आहे तसेच  ता. 15-12-2005 ही तारीख नमूद आहे.  त्‍याचप्रमाणे  अ.क्र. 12 कडे दाखल कागदपत्रांमध्‍ये तक्रारदारांनी  दि. 9-04-2007 रोजी विमा प्रस्‍ताव वि.प. कडे  पाठविलेचे दिसून येते. त्‍याचप्रमाणे अ.क्र. 1 व 2 कडील कागदपत्रांवरुन वि.प. यांना तक्रारदाराचे वकिलांनी पाठविलेली नोटीस व सदरची नोटीस वि.प. यांना पोहोचलेचे रजि. ए.डी. ची पेाहच इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.  वर नमूद  कागदपत्रांवरुन वि. प. ना क्‍लेम फॉर्म मिळालेचे स्‍पष्‍टपणे दिसून येते  तथापि,  वि.प. यांनी प्रस्‍तुत कामी तक्रारदारांना क्‍लेम नाकारलेबाबत आजअखेर कळविलचे कोणताही कागद या कामी दाखल केलेला नाही.  त्‍यामुळे सदर तक्रार दाखल करणेस सततचे कारण (continuous cause of action) आहे असे या मंचाचे मत आहे.  तसेच तक्रारदारांनी सदर मुद्दयाचे अनुषंगाने याकामी Revision Petition N0. 3118-3144 of 2010 मधील  Date 5-08-2011 National Commission चे आदेशाची प्रत दाखल केली असून सदर आदेशाचे अवलोकन केले असता वि. प. विमा कंपनीने तक्रारदारास विमा क्‍लेमाबाबत  काही कळविलेले नसलेस तर सदरचे तक्रारीस सततचे कारण (continuous cause of action) घडत आहे असे नमूद केले आहे.  तसेच  तक्रारदारांनी First Appeal No. A/10/1254 मा. राज्‍य आयोग,  महाराष्‍ट्र यांचेकडील दि. 11-06-2013 रोजी झालेला आदेश दाखल केला असून त्‍यामध्‍ये कलम 5 मधील जर वि.प. विमा कंपनी क्‍लेम नाकारला नसेल तर (continuous cause of action)  सततचे कारण घडते व त्‍यामुळे  सदर तक्रारीस मुदतीची बाधा येत नाही असे नमुद केले आहे. प्रस्‍तुत दोन्‍ही न्‍यायनिवाडे हे प्रस्‍तुत कामातील तक्रारीस उपस्थित मुदयांशी साम्‍य दर्शवितात त्‍यामुळे सदरचे न्‍यायनिवाडेमधील विवेचन हे मंच प्रस्‍तुत प्रकरणात ग्राहय धरत आहे.   प्रस्‍तुत कामी वि.प. यांनी तक्रारदारांना क्‍लेमबाबत क्‍लेम नाकारला किंवा नाही हे काही कळविलेचे दिसून येत नाही.   सबब वर नमूद विवेचन व  तक्रारदारांचे दाखल केलेल्‍या मा. राज्‍य आयोग व राष्‍ट्रीय आयोग यांचे न्‍यायनिवाडयांचा विचार करता तक्रारदारांची तक्रार मुदतीत आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर ह मंच होकारार्थी देत आहे.     

मुद्दा क्र. 2  :-   

      तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत  दाखल केलेले अ.क्र. 3 कडील 7/12 चा उतारा पाहिला असता सदर 7/12 वर श्री भिमराव  ज्ञानू मोरे यांचे नावाची नोंद आहे.  तसेच अ.क्र. 4 कडील गाव नमुना 6 वरती तक्रारदारांची वारस म्‍हणून नोंद दिसते.  तसेच अ.क्र. 6 कडील तलाठयाचे दाखल्‍यावर खातेदार म्‍हणून मयत भिमराव ज्ञानू मोरे यांचे नावाची नोंद आहे.  तसेच अ.क्र. 4 कडील गाव नमुना 6 वरती तक्रारदाराची वारस म्‍हणून नोंद दिसते. तसेच अ.क्र. 6 कडील तलाठयाचे दाखल्‍यावर खातेदार म्‍हणून मयत भिमराव ज्ञानू मोरे याची नोंद असून तक्रारदार हिचे नावाची  देखील नोंद आहे. अ.क्र. 7 कडील मृत्‍यूचे कारणाचा दाखला असून, त्‍यामध्‍ये “Due to fracture dislocation  of the cervical spine as assault of blunt force impact in the vehicular accident as alleged” असे नमूद आहे.  सदरचे कागद Goa Medical College, Goa यांचेकडील आहेत.  तसेच अ.क्र. 8 कडे  पोलिस स्‍टेशन फोंडा यांनी दिलेले No objection Certificate दि. 2/06/2005 रोजीचा दाखला असून त्‍यामध्‍ये भिमराव ज्ञानेश्‍वर मोरे रा. आंबवडे, ता. पन्‍हाळा, कोल्‍हापूर, P.S. No. 43/5 U/sec. 174 Cr.P.C. as all legal formulating have been completed by Ponda Police including Post Mortem  असे नमूद आहे.  तसेच अ.क्र. 10 कडील मृत्‍यूचा दाखला दाखल केला असून त्‍यामध्‍ये तक्रारदारांचे पती भिमराव ज्ञानेश्‍वर मोरे यांचे नावाची नोंद आहे, मृत्‍यू दि. 1-06-2005  असे नमूद आहे.  वरील  सर्व कागदपत्रांचा या मंचाने बारकाईने अवलोकन‍ केले असता तक्रारदाराचे मयत पती यांचा दि. 1-06-2005 रोजी गोवा येथे वाहन अपघाताने मृत्‍यू झालेचे तसेच सदरचा  मृत्‍यू पॉलिसीचे कालावधीत झालेचे व तक्रारदाराचे  पती शेतकरी असलेचे व त्‍याचा विमा वि.प. कंपनीकडे उतरविलेचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.  तसेच वर मुद्दा क्र. 1 मध्‍ये विवेचनाप्रमाणे वि. प. यांना क्‍लेम फॉर्म मिळूनदेखील त्‍यांनी  सदर तक्रारदारांचे क्‍लेमचे अनुषंगाने तक्रारदारास काहीही न कळवून तक्रारदारास द्यावयाचे सेवेत गंभीर त्रुटी केली आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर ह मंच होकारार्थी देत आहे.     

मुद्दा क्र.  3 व 4 :-   

      तक्रारदाराचे पतीचे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत‍ वि.प. यांचेकडे विमा उतरविला असलेने व वर नमुद मुद्दा क्र. 1 मध्‍ये विवेचनानुसार तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे सर्व कागदपत्रांची पुर्तता केली असलेने तसेच शेतकरी जनता अपघात विमा हा महाराष्‍ट्र शासनाने  शेती व्‍यवसाय करताना व नैसर्गिक कारणामुळे होणारे अपघात उदा. रस्‍ता अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश यामुळे ब-याच शेतक-यांचा मृत्‍यू होतात.  घरातील कर्त्‍या व्‍यक्‍तीस आलेल्‍या अशा प्रकारच्‍या अपघातामुळे कुटूंबाचे उत्‍पन्‍नाचे  साधन बंद होऊन  अडचणींची परिस्थिती निर्माण होत असल्‍याने शेतक-यांसाठी शेतकरी जनता अपघात विमा योजना कार्यान्‍वीत केलेली आहे व त्‍या अनुषंगाने विमा कंपनीकडे शासनाने विमा  हप्‍ता रक्‍कम भरलेली असते. त्‍यामुळे विमा पॉलिसीप्रमाणे असणारी विमा रक्‍कम रु. 1,00,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. तसेच सदर रक्‍कमेवर क्‍लेम दाखल ता. 5-06-2013 रोजीपासून संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के प्रमाणे व्‍याज मिळणेस पात्र आहेत.     

    तसेच वि.प. विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवलेमुळे तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करावी लागली त्‍यामुळे  त्‍यांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रुपये 1,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु. 500/- मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  सबब, मुद्दा क्र. 3 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.     

मुद्दा क्र. 5 :   सबब, हे मंच या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. 

                                 दे

1.    तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.

2.   वि.प. विमा कंपनीने तक्रारदारांना पॉलिसीप्रमाणे असलेली रक्‍कम रु. 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्‍त) अदा करावी व सदर रक्‍कमेवर दि. 5-06-2013 पासून ते संपूर्ण रक्‍कम मिळोपावेतो द.सा.द. शे. 6 टक्‍के प्रमाणे व्‍याज द्यावे. 

3.   वि.प. विमा कंपनीने तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 1,000/-(अक्षरी रुपये एक  हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रक्‍कम रु. 500/- (अक्षरी रुपये पाचशे फक्‍त ) अदा करावेत.

4.   वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प.यांनी 30 दिवसांचे आत आदेशाची पूर्तता करावी.

5.    सदर आदेशाच्‍या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना  विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'ABLE MR. Sanjay P. Borwal]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.