(मंचाचे निर्णयान्वये, सौ.मोहिनी जयंत भिलकर, सदस्या)
(पारीत दिनांक : 24 नोव्हेंबर 2010)
.... 2 ... (ग्रा.त.क्र.25/2010)
अर्जदार हीने, सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत अर्ज दाखल केला आहे. तक्रारीचा थोडक्यात आशय येणे प्रमाणे.
1. अर्जदार ही, मय्यत शंकर नारायण परकीवार याची पत्नी असून शंकर याचा दि.3.5.2005 रोजी खुन झाला. या अपघाती मृत्युमुळे, त्या संबंधाने अर्जदाराने शेतकरी अपघाती विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याबाबत गैरअर्जदार क्र.4 मा.तहसिलदार, अहेरी यांचे मार्फतीने दि.17.9.05 ला अर्ज सादर केला होता. अर्जदाराने, सदर अर्जासोबत आवश्यक दस्ताऐवज सुध्दा गैरअर्जदारांकडे पाठविले होते.
2. गैरअर्जदार क्र. 2 चे मागणी प्रमाणे मा.तहसिलदार, अहेरी यांनी दि.23.9.08, 14.10.08 व 3.9.09 चे पञान्वये प्रस्तावित कागदपञाची पुर्तता केली होती. तरी, अद्यापपावेतो कोणत्याही प्रकारची शेतकरी व्यक्तीगत अपघात विम योजनेतील रक्कम मिळाली नाही. बराच कालावधी लोटुन सुध्दा गैरअर्जदार सेवा देण्यात टाळाटाळ करीत असल्यामुळे, सदर तक्रार अर्ज दाखल केला. अर्जदाराने, मुळ दावा रुपये 1,00,000/- व त्यावरील व्याज रुपये 58,000/-, दावा दाखल करण्याचा खर्च रुपये 10,000/-, मानसिक ञासापोटीचा खर्च रुपये 25,000/- व तक्रर दाखल करण्याचा खर्च रुपये 5,000/- असे एकुण रुपये 1,98,000/- अशी मागणी केली आहे.
3. अर्जदाराने, तक्रारीच्या कथना पृष्ठयर्थ नि.4 नुसार 21 दस्ताऐवज दाखल केले. तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र. 1, 3 व 4 यांना नोटीस तामील होऊनही हजर झाले नाही. त्यामुळ, गैरअर्जदार क्र. 1, 3 व 4 चे विरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्र.2 ने पोष्टाव्दारे लेखी बयाण शपथपञाबिना दाखल केले.
4. गैरअर्जदार क्र. 2 ने लेखी बयाणात नमुद केले की, तक्रारदार हे आमचे ग्राहक होऊ शकत नाही. कारण की, कबाल इन्शुरन्स ब्राकींग सर्व्हीसेस प्रा.लि. ही बिमा विनियामक और विकास प्राधिकारण भारत सरकार यांची अनुज्ञत्पि प्राप्त विमा सल्लागार कंपनी आहे. महाराष्ट्र राज्य शासनाला सदरील विमा योजना राबविण्यासाठी विना मोबदला सहाय्य करतो यामध्ये मुख्यत्वे शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषी अधिकारी/तहसिलदार मार्फत आमच्याकडे आल्यावर विमा दावा अर्ज योग्यपणे भरला आहे कां ?, सोबत जोडलेली कागदपञे विमा कंपनीने मागणी केल्याप्रमाणे आहे कां ?, नसल्यास तालुका कृषीधिकारी, तहसिलदार यांना कळवून त्यांची पुर्तता करवून घेणे व सर्व योग्य कागदपञे मिळाल्यावर योग्य त्या विमा कंपनीकडे पाठवून देणे व
.... 3 ... (ग्रा.त.क्र.25/2010)
विमा कंपनीकडून दावा मंजुर होवून आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे, एवढाच आहे. यासाठी, गैरअर्जदार क्र.2, राज्य शासन वा शेतकरी यांच्याकडून कोणताही मोबदला घेत नाही. तसेच, यासाठी कोणताही विमा प्रिमियम घेतलेला नाही.
5. गैरअर्जदार क्र. 2 ने, लेखी बयाणात पुढे नमुद केले की, मय्यत शेकर नारायण पारकीवार, गाव व्यंकटापुर, तालुका- अहेरी, जि.गडचिरोली मध्ये अपघात दि.3.5.05 रोजी झाला. हा अपघात 10 जानेवारी 2005 ते 9 एप्रिल 2006 या आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड च्या विमा कालावधीतील असून सदरील योजनेसाठी आमची नियुक्ती दि.6 मे 2006 च्या पञाव्दारे विमा पॉलिसी 15.7.06 ते 14.7.07 या कालावधीसाठी करण्यात आली असून, घडलेल्या घटनेविषयी माहिती देण्यास असमर्थ आहे. त्यामुळे, सदर दाव्यातुन निर्दोष मुक्तता करावी. दोषी कडून कारण नसतानांही तक्रारीस सामोरे जाण्यास भाग पाडल्याने या अर्जाचा खर्च रुपये 5,000/- देण्याचा आदेश व्हावा, अशी मागणी केली.
6. अर्जदार यांनी, रिजाईन्डर शपथपञ दाखल करीत नसल्याची पुरसीस दाखल केली. गैरअर्जदार क्र. 2 ने, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई यांच्या औरगांबाद खंडपिठाचा आदेश क्र.1114/2008 दि.16.2.09 जोडला आहे. गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांना संधी मिळूनही रिजाईन्डर शपथपञ दाखल केला नाही, त्यामुळे प्रकरण पुढील स्टेजला ठेवण्यात यावे, असा आदेश नि.1 वर दि.30.10.10 रोजी पारीत केला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयाण व त्याचे दस्ताऐवजावरुन व अर्जदाराचे वकीलांनी केलेल्या तोडी युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
7. अर्जदार हीचे पती शंकर नारायण परकीवार याचा दि.3.5.2005 रोजी खुन झाला असल्याचे पोलीस दस्ताऐवजावरुन दिसून येते. अर्जदार ही मृतकाची वारसदार पत्नी असल्यामुळे क्लेम फार्म सोबत सर्व दस्ताऐवज जोडून गैरअर्जदार यांचेकडे प्रस्ताव सादर केला. परंतु, गैरअर्जदार यांचेकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळे, अर्जदार यांनी तक्रार दाखल केली आहे.
8. अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपञांचे अवलोकन केले असता नि.क्र.4-अ-1 FIR नुसार, तसेच घटनास्थळ पंचनामा (अ-2) व अर्जदाराच्या पतीचा मृत्यु इनक्वेट पंचनामा अ-3 यावरुन मृत्यु हा बंदुकीची गोळी लागल्याने झालेला आहे, असे दिसून येते. त्यामुळे, अर्जदाराचा पतीचा मृत्यु हा नैसर्गीक (Natural death) नसुन
.... 4 ... (ग्रा.त.क्र.25/2010)
अपघाती आहे, हे सिध्द होते. अर्जदार यांच्या पतीचे नांव हे सात-बारा वर नमुद आहे हे नि.क्र.4 अ-19 दाखल दस्ताऐवजावरुन दिसुन येते. त्यामुळे, अर्जदार हीचे पती हे शेतकरी होते, हे सिध्द होते.
9. अर्जदार हीला ञुटी असलेले दि.21 जानेवारी 2006 चे तहसिल कार्यालयाचे पञ नि.क्र. अ-13 वर आहे. तसेच, आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड जनरल इंशुरन्स कंपनीचे नि.क्र.अ-14 दि.17 सप्टेंबर 2005 चे ञुटी असलेले दस्ताऐवज आणि तहसिलदार अहेरी यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दिलेले दि.23.9.2008 चे पञ आणि कबाल इंशुरन्स यांना दोनदा तहसिलदार मार्फत पाठविलेले पञ रेकॉर्डवर दाखल केलेले आहेत. त्यामुळे, गैरअर्जदार क्र. 1 यांना सदर तक्ररीची माहिती मिळाली असून सुध्दा, त्यांनी अर्जदाराच्या तक्रारीची दखल घेतलेली नाही. यावरुन, अर्जदार ही शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे.
10. गैरअर्जदार क्र. 1 यांना दि.13.8.10 रोजी नोटीस तामील झाल्याचे नि.क्र.7 चे पोचपावती वरुन दिसून येते. नोटीस मिळूनही गैरअर्जदार क्र.1 यांनी नोटीसचे उत्तर दिले नाही व स्वतः हजरही झालेले नाहीत. तसेच, गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांनाही नोटीस मिळाल्याचे दस्ताऐवज नि.क्र.6 व नि.क्र.9 वरुन दिसून येते. परंतु, गैरअर्जदार क्र. 3 व 4 हे सुध्दा न्यायमंचात हजर झालेले नाही, त्यामुळे गैरअर्जदार क्र.1, 3 व 4 यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा पुढे चालविण्याचा आदेश नि.क्र.1 वर पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्र.3 व 4 यांनी अर्जदाराला त्याच्या नुकसान भरपाई मिळण्यास मदत केलेली नाही व नोटीस मिळूनही नोटीसचे उत्तर दिलेले नाही. यावरुन, गैरअर्जदार क्र.3 व 4 यांच्या सेवेत न्युनता आहे, तसेच त्यांनी न्यायमंचाचा अवमान केला, असे या न्यायमंचाचे मत आहे.
11. गैरअर्जदार क्र.2 यांनी पाठविलेला लेखी बयानात असे सांगितले आहे की, सदर योजनेसाठी त्यांची नियुक्ती दि.6 मे 2006 च्या पञाव्दारे विमा पॉलिसी 15.7.2006 ते 14.7.2007 या कालावधीसाठी करण्यात आलेली होती, त्यामुळे या आधी घडलेल्या घटने विषयी माहीत देण्यास ते असमर्थ आहेत. गैरअर्जदार क्र.2 यांनी पाठविलेला लेखी बयान शपथपञाशिवाय असल्यामुळे, ग्राह्य धरण्यास पाञ नाही, असे या न्यायमंचाचे मत आहे.
12. अर्जदार यांनी, गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे तहसिलदार मार्फत पाठविलेला प्रस्ताव हा गैरअर्जदार क्र.1 यांच्या ञुटी असलेल्या पञावरुन सिध्द होतो. गैरअर्जदार
.... 5 ... (ग्रा.त.क्र.25/2010)
क्र.1 यांनी, अर्जदार यांच्या प्रस्तावाची दखल घेतलेली नाही, तसेच गैरअर्जदार क्र.3 व 4 नी अर्जदारास नुकसान भरपाई मिळवून देण्यात मदत केलेली नसल्यामुळे, अर्जदार मिळणा-या लाभापासून वंचित राहीला. त्यामुळे, अर्जदार क्र. 1, 3 व 4 यांनी अर्जदारास सेवा देण्यात न्युनता केली असल्याचे सिध्द होते. त्यामुळे, तक्रार मंजुर करण्यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले आहे.
13. गैरअर्जदार क्र.2 यांची नियुक्ती सदर तक्रारीच्या काळात नसल्यामुळे त्याच्या सेवेत न्युनता आहे, असे म्हणता येणार नाही, त्यामुळे गैरअर्जदार क्र.2 चे विरुध्द तक्रार खारीज करण्यास पाञ आहे.
14. वरील कारणे व निष्कर्षावरुन तक्रार मंजुर करण्यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले, असल्यामुळे अर्जदाराची तक्रार मंजुर करुन, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आंदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर.
(2) गैरअर्जदार क्र.1 ने, मृतक शंकर नारायण परकीरवार याचा अपघाती मृत्युबाबत शेतकरी अपघात विमा योजनेची रक्कम रुपये 1,00,000/- तक्रार दाखल केल्यापासून म्हणजे 26.7.2010 पासून 9 % व्याजाने, आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदारास द्यावे.
(3) गैरअर्जदार क्र.3 व 4 यांनी, अर्जदारास झालेल्या मानसिक, शारीरीक व आर्थिक ञासापोटी प्रत्येकी रुपये 2,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदारास द्यावे.
(4) गैरअर्जदार क्र.2 चे विरुध्द तक्रार खारीज.
(5) उभयतांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 24/11/2010.