नि.२५
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या – श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र.१५७५/२००९
-------------------------------------
तक्रार नोंद तारीख : १७/०२/२००९
तक्रार दाखल तारीख : २५/०२/२००९
निकाल तारीख : ०७/०१/२०१२
-----------------------------------------
१. श्रीमती सविता अशोक भोसले
वय वर्षे – ५५, व्यवसाय – शेती व घरकाम
रा.रांजणी, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली. ...... तक्रारदार
विरुध्द
१. आय.सी.आय.सी.आय.लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स
कंपनी लि., महालक्ष्मी, मुंबई नं.३४
२. कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा.लि.
१०१, शिवाजी नगर, ३ रा मजला,
मंगला टॉकीज जवळ, पुणे – ४११००५
३. महाराष्ट्र शासन तर्फे मा.जिल्हाधिकारी
सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फेò : +ìb÷. श्रीएम.एन. शेटे
जाबदारक्र.१ तर्फे :+ìb÷. श्री सचिन ताम्हणकर
जाबदारक्र.२ : एकतर्फा
जाबदारक्र.३ : नो से
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. अनिल य.गोडसे
१. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा तपशिल पुढीलप्रमाणे-
महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यातील शेतक-यांच्या अपघातासंदर्भात शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार शेतक-यांना विमा संरक्षण देण्यासाठी जाबदार क्र.१ विमा कंपनी यांचेबरोबर विमा करार करण्यात आला आहे. तक्रारदार यांचे पती अशोक ज्ञानदेव भोसले हे शेतकरी होते व त्यांचा दि.४/४/२००५ रोजी मिरज एस.टी.स्टॅंडमध्ये श्वसनाचे मार्गात अडथळा आलेमुळे मृत्यू झाला. तक्रारदार या मयत अशोक भोसले यांच्या पत्नी या नात्याने कायदेशीर वारस आहेत. तक्रारदार यांनी शेतकरी अपघात विमा योजनेनुसार रक्कम मिळणेसाठी गावकामगार तलाठी रांजणी यांचेकडे मे २००५ मध्ये प्रस्ताव दाखल केला. गावकामगार तलाठी यांनी सदरचा प्रस्ताव तहसिलदार कवठेमहांकाळ यांचेकडे पाठविला. तहसिलदार कवठेमहांकाळ यांनी सदरचा प्रस्ताव योग्य ती कागदपत्रे व शिफारशींसह जाबदार क्र.१ यांचेकडे पाठविला. तक्रारदार यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनही जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार यांचा विमा दावा अद्याप मंजूर केला नसल्याने प्रस्तुत तक्रारदार यांनी विम्याची रक्कम व्याजासह मिळणेसाठी तसेच शारीरिक, मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळणेसाठी तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे.
तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.३ ला शपथपञ व नि.५ च्या यादीने ७ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.१ यांनी नि.१५ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांचे पती हे शेतकरी असल्याबाबतचे कथन जाबदार यांनी नाकारले आहे. जाबदार यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये विमादाव्यासोबत योग्य ती कागदपत्रे सादर केली नाहीत तसेच तक्रारदार यांचे पतीचा हदयविकाराने म्हणजेच नैसर्गिक मृत्यू झाला आहे. सदरचा नैसर्गिक मृत्यू हा पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार देय नाही. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे. त्यामुळे पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार तक्रारदार हे विमा रक्कम मिळण्यास पात्र नाहीत. जाबदार यांनी तक्रारदारांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यात नमूद केले आहे. जाबदार क्र.१ यांनी नि.१६ ला शपथपत्र व नि. १७ चे यादीने ३ कागद दाखल केले आहेत.
४. जाबदार नं.२ यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला आहे. जाबदार क्र.३ हे याकामी हजर झाले परंतु त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल नाही. म्हणून जाबदार क्र.३ चे विरुध्द नो से आदेश नि.१ वर करण्यात आला आहे.
५. तक्रारदार यांनी नि.१८ ला प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी जाबदार यांचे म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी नि.१९ ला प्रतिउत्तरासोबत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. जाबदार यांनी नि.२१ वर लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. तक्रारदार यांनी नि.२२ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार यांनी नि.२४ चे यादीने काही निवाडे दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी नि.२३ च्या यादीने काही निवाडे दाखल केले आहेत.
६. तक्रारदाराचा तक्रार अर्ज व दाखल कागदपञांचे अवलोकन केले असता सर्व शेतक-यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाने जाबदार क्र.१ यांचेबरोबर विमा करार केला आहे, त्यामुळे अपघातग्रस्त शेतकरी हे सदर विमा करारानुसार लाभार्थी होतात व ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार लाभार्थी हा सुध्दा ग्राहक या सदरात येतो त्यामुळे तक्रारदार हे जाबदार नं.१ यांचे ग्राहक आहेत असा या मंचाचा निष्कर्ष आहे.
७. तक्रारदार यांनी त्यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार रक्कम रु.१,००,०००/- मिळावेत अशी मागणी केली आहे. जाबदार यांनी नि.१७ वर पॉलिसीच्या अटी व शर्तींची प्रत दाखल केली आहे. तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू पॉलिसी कालावधीत झाला नाही असा कोणताही बचाव जाबदार यांनी घेतलेला नाही अथवा तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू झाला तेव्हा पॉलिसी अस्तित्वात नव्हती असेही जाबदार यांचे म्हणणे नाही. यावरुन तक्रारदार यांचे पतींचा मृत्यु पॉलिसी कालावधीत झाला आहे याबाबत कोणताही वाद दिसून येत नाही.
८. सदर पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार अपघातग्रस्त व्यक्ती ही शेतकरी असणे गरजेचे आहे व अपघातसमयी तिचे वय १५ ते ७० वयोगटातील असणे आवश्यक आहे. वयाच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड इत्यादी पुरावा देणे गरजेचे आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांच्या मुलाच्या वयाबाबत आक्षेप घेतला नाही त्यामुळे वयाबाबतचा उहापोह या प्रकरणी करण्यात येत नाही. अपघातग्रस्त व्यक्ती शेतकरी असलेबाबत तक्रारदार यांनी नि.५/२ ला खाते उतारा याकामी दाखल केला आहे. सदर उता-यावर तक्रारदार यांचे पतीचे नाव नमूद आहे. तसेच तक्रारदार यांनी नि.५ चे यादीने वारस नोंदीचा फेरफार दाखल केला आहे. सदर फेरफारवर मयत अशोक भोसले यांचे पश्चात तक्रारदार व त्यांच्या मुलांची नावे दाखल आहेत. जाबदार यांनी तक्रारदार यांचे पती हे शेतकरी नव्हते असे युक्तिवादामध्ये नमूद केले. परंतु तसे दाखविण्यासाठी कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे दाखल खातेउता-यावरुन तक्रारदार यांचे पती शेतकरी होते ही बाब स्पष्ट होते.
९. जाबदार यांनी त्यांचे युक्तिवादामध्ये तक्रारदार यांचे पती यांचा मृत्यू नैसर्गिक कारणास्तव झाला असल्याने सदरची बाब पॉलिसी अंतर्गत येत नसल्याने तक्रारदार हे विमादावा मिळण्यास पात्र नाहीत असे नमूद केले. तक्रारदार यांचे पती यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला आहे. पॉलिसीच्या अटी व शर्तीचे अवलोकन केले असता सदरची पॉलिसी ही अपघाती मृत्यूसंदर्भात आहे. हृदयविकाराचा झटका येवून मृत्यू येणे ही बाब नैसर्गिक मृत्यू या सदरात मोडते अथवा अपघाती सदरात येते हे ठरविणे गरजेचे आहे. तक्रारदार व जाबदार यांनी याबाबत वेगवेगळे निवाडे दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी सन्मा.राष्ट्रीय आयोग यांचा 2008 (1) CPR 96 (NC) हा रिटा देवी विरुध्द नॅशनल इन्शुरन्स कंपनी हा निवाडा दाखल केला आहे. सदर निवाडयामध्ये नमूद केलेले सारसूत्र प्रस्तुत प्रकरणास लागू होणार नाही असे या मंचाचे मत आहे. जाबदार यांनी 2011 ACJ 116 हा न्यू इंडिया +ìश्युरन्स कं. विरुध्द के.भिलंगम हा निवाडा दाखल केला आहे. सदर निवाडयाचे अवलोकन केले असता सदरचा निवाडा प्रस्तुत प्रकरणास लागू होईल असे या मंचाचे मत आहे. तक्रारदार यांचे पती यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे ही बाब दाखल शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट होते. सदरचा मृत्यू हा नैसर्गिक आहे. सदर अहवालामध्ये मयतास कोणत्याही जखमा झाल्या नसलेचे नमूद आहे तसेच मृत्यू नैसर्गिक असलेचे नमूद आहे. कोणत्याही अपघाती कारणामुळे मयतास हृदयविकाराचा झटका आला असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे सदर मृत्यू हा नैसर्गिक आहे ही बाब स्पष्ट होते. नैसर्गिक मृत्यू हा पॉलिसीअंतर्गत समाविष्ट नसलेने तक्रारदार हे मागणीप्रमाणे अनुतोष मिळणेस पात्र नाहीत असे या मंचाचे मत आहे.
१०. तक्रारदार यांच्या विमा दाव्याबाबत जाबदार यांनी सदरचा विमा दावा मुदतबाहय झाला आहे असा तीव्र आक्षेप घेतला आहे. सदरच्या आक्षेपाचा विचार करता तक्रारदार यांचा विमा दावा जाबदार यांनी दि.२१/१०/२००५ रोजी नाकारला असल्याच्या पत्राची झेरॉक्स नि.१७/१ वर दाखल केले आहे. सदरचे पत्र तक्रारदार यांना पाठविल्याबाबत व तक्रारदार यांना मिळाल्याबाबत कोणताही पुरावा जाबदार यांनी दाखल केलेला नाही. त्यामुळे सदरचे पत्र तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मुदतबाहय झाला आहे हे ठरविण्यासाठी उपयोगी पडत नाही. तक्रारदार यांनी याकामी अनेक निवाडे दाखल केले आहेत. त्यामध्ये सन्मा.राष्ट्रीय आयोग यांचा निवाडा III (2011) CPJ 507 Laxmi Bai V/s. ICICI Lombard मध्ये मुदतीबाबत सन्मा.राष्ट्रीय आयोगाने काही निष्कर्ष नोंदविले आहेत. सदर निष्कर्षांचा विचार करता तक्रारदार यांचा विमा दावा मुदतबाहय झाला आहे या जाबदार यांच्या कथनामध्ये कोणतेही तथ्य नाही असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येत आहेत.
२. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
सांगली
दि. ७/१/२०१२
(गीता घाटगे ) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रत – तक्रारदार यांना हस्तपोहोच/रजि.पोस्टाने दि. / /२०११
जाबदार यांना हस्तपोहोच/रजि.पोस्टाने दि. / /२०११